कृष्णमूर्ती: समजा क्ष या व्यक्तीकडे अंतर्दृष्टी आहे. ती त्यालाच का प्राप्त होते?
David Bohm: बहुतेक सर्वच नैसर्गिक रित्या पशुवृत्तीचे असतात. आणि ते समजतात की त्यांचा दुसरा सहकारी क्ष हा अप्राकृतिक आहे. म्हणून मानवजात नेहमी असा विचार करते की जर खरोखरच काही लोक असे वेगळे असतील तर ते खूपच असामान्य आणि दैवी असले पाहिजेत.
कृष्णमूर्ती: तेच. बहुतेक मानव हे द्वेषाद्वारे द्वेषाला प्रतिसाद देत असतात. म्हणून ते जेव्हा वेगळी क्ष सारखी व्यक्ती पाहतात ते त्यांना नैसर्गिक किंवा तर्कसंगत दिसत नाही. क्ष् कडे अंतर्दृष्टी आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनातील अंधकार आणि त्या अंधाराचे केंद्र असणारा मी आणि अहंकार पूर्णपणे दूर झाले आहेत. आणि दुसरा एक गंभीर, प्रामाणिक, हुशार माणूस, त्याचे म्हणणे ऐकतो आणि क्ष जे काही सांगितले ते त्याला अतिशय वाजवी, तर्कसंगत आणि शहाणपणाचे वाटते. तो तसे वागण्याचे ठरवितो, काही साधना करतो परंतु ते सर्व विचार असतात आणि जोपर्यंत अंतर्दृष्टि येत नाही तोपर्यंत ते सर्व मिच्या अंधारात घडत असते.
ज्याच्या जवळ अन्तरदृष्टी नाही त्याच्या जवळ काहीच पर्याय रहात नाही काय?
त्याने त्याच्या जीवनात अंधकार कशामुळे आहे हे शोधले पाहिजे. आपले विचार हेच आपला मी आहे, मी हा भास आहे आणि या भासरुपी मी चे विचार हेच मिच्या अंधकारास जबाबदार आहे हे मीच्या लक्षात येत नाही. मी ला हे का समजत नाही?
आपला मी हाच आपल्या जीवनातील अंधकारास जबाबदार आहे हे समजणे हि सत्य आकलनात येण्यासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे.
ज्यावेळी X इतरांना सांगतो की प्रत्यक्षात अंधकार नाही, तो अंधकार आपल्या मिने त्याच्या विचारांनी बनविलेला आहे. मीने बनविलेल्या सर्व संकल्पना केवळ मानसिक आहेत. हे ऐकल्या नंतर ज्यांच्या मनात स्फोट होतो त्याच क्षणी त्यांच्या मि ने बनविलेल्या संकल्पना डळमळीत होवू लागतात. मी चे विचार, मी च्या संकल्पना असतात. संकल्पना नाहीशा झाल्या तर मी चे अस्तित्व धोक्यात येते. X ने केलेला बोध हा मूलभूत सत्य असेल तर त्याने इतरांच्या मनाची घडी विस्कटून टाकण्यास मदत होते.
मी माझ्यातील अंधार दूर करण्यास काही करू शकत नाही परंतु जेव्हा X त्याच्या अंतर्दृष्टिचा इतरांना बोध करतो त्या प्रकाशात मी चा अंधार नाहीसा होतो.
मी चे विचार, मी च्या अनावश्यक संकल्पना नाहीशा झाल्याने ती व्यक्ती नैसर्गिक पातळीवर येते. या पातळी वरील जीवनात अंधार नसतो की प्रकाश नसतो. त्याला आदि आणि अंत नसतो. त्या जीवना मधील चैतन्याची विभागणी नसते, द्वैत नसते. काळ नसतो, अंतर नसते, काहीच नसते. परंतु तीच काहीच नसण्याची अवस्था संपूर्ण ऊर्जेची असते. जे कालातीत आहे तेच अमर सुद्धा आहे. मी च्या मानसिक संकल्पनांचा अंत म्हणजे मी चा मानसिक अंत, मानसिक मृत्यू असतो.
कसलाही संघर्ष नसलेल्या मेंदूची अवस्था काय असेल? त्या मनाची गुणवत्ता काय असेल ज्यामध्ये कोणतीही अडचण नसेल? समजा असे मन शुद्ध प्रदूषण रहित हवेमध्ये रहात असेल, योग्य प्रकारचे अन्न घेत असेल तर ते जास्त वर्षे सहज, नैसर्गिकरीत्या जगू शकत नाही का?
किती विलक्षण गोष्ट घडली आहे! याचा माझ्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होईल, कारण मला या पृथ्वीवर जगायचे आहे ना? पूर्वी माझे दैनंदिन जीवन म्हणजे आक्रमकता, सतत काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न करणे, यशासाठी धडपडत - त्या सर्वाचा अंत झाला आहे.
No comments:
Post a Comment