Tuesday, December 08, 2020

अज्ञानातून मुक्ती

 प्रश्न: आम्हाला ज्ञान - अज्ञानातुन सुद्धा बाहेर पडावे लागेल. सर्व त्या परमात्म्यावर सोपवावे लागेल. तरच आमचा अहंकार हळूहळू नष्ट होत जाईल. 

उत्तर: द्रष्टा आणि दृश्य एकच असतो, त्या अर्थाने आम्ही, मी, आपण या ज्या काही संकल्पना आहेत त्या सुद्धा तेच ज्ञान - अज्ञान आहे. त्याच माहिती मधून आम्हास आत्मा - परमात्मा यांच्या संकल्पना माहीत होतात. ही माहिती जेव्हढी प्राचीन तेव्हढ्या श्रद्धा जास्त भक्कम झालेल्या असतात. त्यांच्या विषयी मनात शंका येणे हे सुद्धा जिथे पाप ठरते तिथे त्यांच्या विरुद्ध प्रश्न निर्माण होणेच अशक्य होते. परंतु जे मन ते धाडस दाखवित त्या मनास बाहेर जाण्याचा (to go beyond) passport प्राप्त होतो.

जे मन असे म्हणते की मी माझ्या अज्ञानातून बाहेर येईन. ते मन हे त्याचं अज्ञानाचा भाग असते. असे संमोहित झालेले मन अज्ञानातून बाहेर येणे हे त्यामुळे अतिशय अवघड असते. 

आपण त्या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी त्या अज्ञानातील माहिती असलेल्या जुन्याच अज्ञानी पद्धती वापरतो. एक अज्ञानी पद्धत बदलण्यासाठी दुसरी अज्ञानी पद्धत वापरतो. संसारा पेक्षा धार्मिक कार्ये जास्त श्रेष्ठ वाटतात, त्याही पेक्षा अध्यात्मिक मुक्ती देणाऱ्या साधना अधिक उच्च वाटतात. 

पाण्यामध्ये पोहोत असताना आपण पाण्याचे निरीक्षण करू शकत नाही त्यासाठी आपणास नदीच्या तीरावर बसून वाहत्या पाण्याचे निरीक्षण करता येऊ शकते. म्हणजेच अज्ञानामध्ये राहून आपण अज्ञानाचे निरीक्षण करू शकणार नाही. 

अज्ञानाचे निरीक्षण करण्यासाठी आपण अज्ञानाचा त्वरित त्याग करायला हवाच. कारण आपले अज्ञानी मन त्याला जे हवे तेच आपणास दाखवित राहते.

मी म्हणजे आपले पूर्वीचे सर्व ज्ञान भांडार होय त्याला मध्ये न आणता आपणास नवीन अनुभव घेता यायला हवा. 

पूर्वग्रहदूषित माहितीचा संपूर्ण त्याग केल्यानंतर आपले सर्व अनुभव हे नवीन ताजे असतात आणि तेच खरे जीवन जगणे होय. Flowering in goodness each and every day. 

परंपरांनी अपप्रचारा द्वारा निर्माण केलेल्या सर्व साधना पद्धती या त्या अज्ञानाचा भाग आहेत सबब परंपरांच्या कोणत्याही साधना पद्धती आपणास परंपरा मधून बाहेर पडण्यास मदत करू शकणार नाहीत. 

आपल्याअज्ञानाची समज येणे हाच अज्ञानातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अज्ञानातून बाहेर येताच आपण ज्ञानामध्ये सहज प्रवेश करतो. आपले तेच विचार, तोच मेंदू आता विवेकाने बहरलेला असतो, जीवनाचा मोगरा फुलून नकळत सुगंध देवू लागलेला असतो.

https://youtu.be/z46n67DiiLg