Thursday, July 29, 2021

योग्य जीवनशैली


आपल्या जीवनात निसर्ग निर्मित गोष्टी असतात, मानव निर्मित जीवनावश्यक गोष्टी असतात. तशाच मानव निर्मित अनावश्यक संकल्पना सुद्धा असतात. जीवनावश्यक तेव्हढे ठेवून अनावश्यक असेल ते काढून जगणे म्हणजे विवेकी जगणे असते आणि तेच योग्य जगणे असते. - कृष्णमूर्ति

जे कृष्णमूर्ती यांची ही सर्वात महत्त्वाची चर्चा आहे.  एखाद्याला हे समजल्यास, त्याला सत्य नक्कीच समजेल.

प्रश्नः रोजीरोटी मिळविण्या मागील योग्य हेतू काय आहे?  योग्य जगणे म्हणजे काय असावे?

कृष्णमूर्ती: जीवन जगण्याचा योग्य हेतू काय असावा असा प्रश्न आहे काय?  

हेतू सोपा, फायदेशीर किंवा आनंददायक किंवा लाभदायक असावा असे नाही, परंतु योग्य जीवनशैली म्हणजे काय? आणि तो हेतू बरोबर असेल हे आपण कसे सांगू शकाल?

बरोबर म्हणजे नेमके काय आहे? ती पुन्हा एक अतिशय जटिल गोष्ट आहे.

 'बरोबर' या शब्दाचा अर्थ अचूक असा आहे.* आपण स्वार्थासाठी किंवा मौजमजेसाठी काहीतरी केले तर ते अचूक असू शकत नाही - बरोबर?  योग्य जीवनशैली काय आहे हे समजण्यासाठी आपण प्रथम वास्तविकता म्हणजे काय ते पाहिलेच पाहिजे.

मानवी विचारांनी जे काही निर्मिले आहे ते सर्व वास्तव आहे. हा तंबू उभारण्यासाठी विचार करावा लागला आहे म्हणून तो सुद्धा वास्तव आहे. समोरील वृक्ष विचारांनी निर्मिलेला नाही परंतु तो सुद्धा एक वास्तव आहे. काल्पनिक संकल्पना सुद्धा वास्तव आहेत. आणि त्यांच्या भ्रमातून झालेली कृती विक्षिप्त आहे ती सुद्धा वास्तविकता आहे. आणि वास्तविकता म्हणजे सत्य नव्हे. सर्व प्रकारच्या श्रद्धा भ्रम आहेत आणि त्यांच्या क्रिया विक्षिप्त असतात.

वास्तविक जीवनात बरोबर काय आहे हे दुसऱ्यांचे न ऐकता स्वतः शोधायला हवे. दुसरे आपणास सांगू शकत नाहीत. *जेव्हा आपण भ्रामक संकल्पना टाळून वास्तविक जीवनाकडे पाहु, ते पाहणे आणि त्याचे आकलन होणे हा विवेक आहे.* वास्तव आणि भ्रम यांची सरमिसळ नसणे म्हणजे विवेकवृत्ती आहे. *हि विवेकबुद्धी मग आपणास सांगत असते की योग्य आणि अयोग्य काय आहे ते.

सारासार विवेक म्हणजे सत्य आणि असत्य काय आहे हे ओळखणे होय. सत्य काय आहे हे पाहताना कोणत्याही मानसिक, काल्पनिक भ्रम साथीला नसावेत. आपण जेथे जावू तेथे विवेक बुद्धीचा वापर करू लागतो, म्हणजेच विवेकबुद्धी हीच बरोबर काय आहे हे ठरवीत असते. 

मग सत्य काय असावे?

अर्थात ते वास्तविकता नक्कीच नाही. जे भ्रामक हि नाही आणि वास्तविक सुद्धा नाही असे जे काही आहे ते सत्य आहे. सत्य अवस्था हि विवेक बुद्धी द्वारा वास्तविक आयुष्यात कार्य करत असते. 

( कृष्णमूर्ती यांनी इथे illusion / भ्रम, reality / वास्तविकता आणि Truth / सत्य अवस्था अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. आपल्या जीवनात नदी, डोंगर, झाडे आदि नैसर्गिक गोष्टी असतात, मानवाने बनविलेल्या घरे, रस्ते आदी वास्तविक गोष्टी असतात तशाच देव, देश, धर्म, जात आदि केवळ भ्रामक संकल्पना सुद्धा असतात. आपण या भ्रामक संकल्पनांना आपल्या वास्तविक जीवनातून काढून टाकल्या तर केवळ नैसर्गिक आणि जीवनावश्यक गोष्टीचं आपल्या जीवनात शिल्लक राहतील. भ्रामक कल्पना काढून टाकून संकल्प विकल्प रहित जीवन जगण्यासाठी विवेक बुद्धी लागते. ही विवेक बुद्धी सत्य अवस्थेची देणगी असते. वास्तविक जीवनातून भ्रामक संकल्पना काढणे हेच सत्य अवस्थेची क्रिया असते आणि तेच सत्य असते).

(SAANEN 7TH PUBLIC TALK 25TH JULY 1976).

Tuesday, July 20, 2021

गोदान आणि कन्यादान

एका व्यक्तीकडे काही गाई होत्या आणि तो गरजू व्यक्तींना गाई दान करायचा. एकदा एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याची गाय दान मागू लागला. माझ्याकडे चांगला गोठा आहे, शेत आहे, भरपूर चारा आणि पाणी आहे. माझा गुराखी आपल्या गाईची चांगली देखभाल करीन आणि तिची योग्य अशी काळजी घेईन. दानशूर व्यक्तीने त्या गरजू व्यक्तीला त्याची एक गाय दान देण्याचे कबूल केले. घेवून जा एक गाय असे तो म्हणाला. गरजू व्यक्ती म्हणाली की आपण जे करीत आहोत त्याची इतरांना सुद्धा माहिती व्हावी म्हणून आपण माझ्याकडील आणि आपना कडील चार चौघांना बोलावू आणि त्यावेळी पुढील व्यवहार कसा करायचा ते ठरवू या. दानी व्यक्तीने ते सुद्धा कबूल केले. 

ठरलेल्या दिवशी दोन्हीकडील बाया माणसे एकत्र आली, गाईची निवड केली. निवड झाल्या नंतर दानी व्यक्तीने गाय घेवून जा असे सांगितले. परत गरजू व्यक्तीने सांगितले असे नाही लगेच नेता येणार. आपण गाय घेवून जायचा मुहूर्त काढू या. पुजाऱ्याला बोलवा. पुजारी आला, मुहूर्त काढला गेला. गरजू व्यक्तीने जमलेल्या सर्वांना भोजन, पाहुणचार आणि पुजाऱ्याची दक्षिणा दानी व्यक्तीने करावी असे सांगितले. कारण दान तो करीत आहे.

नंतर योग्य मुहूर्तावर गाय दान करण्याचा सोहळा दानी व्यक्तीकडे घेण्याचे ठरले. दोन्हीकडील सर्व नातलग आणि मित्र मंडळीना पाचारण केले गेले. त्यांचा पाहुणचार दानी व्यक्तीला करावयास लावला. नंतर गाय सांभाळणाऱ्या गुराख्याचा यथोचित सत्कार केला गेला. गाईला सांभाळण्यासाठी दक्षिणा मागण्यात आली, गाईला नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करावयास लावली, कारण दान तो करीत आहे.

गोदान पेक्षा कन्यादान हे कितीतरी महान आहे. ती कन्या आता आपल्या कुटुंबाचा भाग होणार आहे, आपल्या मुलाची अर्धांगिनी होणार आहे, त्यांच्या मुलांची ती आई होणार आहे. तिचे नातलग सुद्धा आता आपले नातलग होणार आहेत. 

आणि ते कन्या दान घेताना आपण वधू पक्षाला किती छळत असतो याचा कधी आपण विचारच करीत नाही.

याचे कारण पूर्वी जे जे त्या अनुभवातून गेले आहेत अगदी जुन्या गायी सुद्धा त्यांना तेच योग्य वाटत असते. आणि नवीन गाय घेताना तोच व्यवहार अधिक क्रूर कसा करता येईल याचाच सगळेजण विचार करीत असतात. 

सत्य हे सहज असते त्याला आपण आपल्या अव्यवहाराने कडवट बनवीत असतो.

Tuesday, July 13, 2021

जागेपण

जागेपणातील प्रत्येक गोष्टी वर लक्ष ठेवण्यापेक्षा फक्त जागेपणा वरच लक्ष ठेवले तर चालू शकेल काय?

मनाला ज्याची सवय होते त्या गोष्टी मन त्याची जाणीव न ठेवता सुद्धा करीत राहते. पोहणे अथवा ड्रायव्हिंग हे सुरुवातीस लक्ष पूर्वक शिकावे लागते परंतु नंतर त्याची सवय झाली की मनाला ते सहज जमू लागते. मनाला जुने आणि तेच ते नको असते, त्याला सतत नवीन हवे असते. सतत नवे हवे असण्याची जी जाणीव आहे तेच मन असते. अशा अवखळ मनाला वेसण कशी घालायची तर त्याला जे नको आहे ते त्याला करावयास लावायचे. 

आपण आत्ता काय करीत आहोत याचे सतत भान ठेवल्याने मनाला अवांतर कल्पना मध्ये रमण्यास वेळ मिळत नाही. आणि आपल्या आयुष्याचा खूप कमी भाग असलेल्या मनास तेव्हढ्या उपायाने निरुत्तर करता येते. 

आपण जागे असतो याची जाणीव असते परंतु त्याची इतकी सवय झालेली असते की मन ते लक्षात ठेवत नाही. 

अशा वेळी मी जागा आहे या एकाच जाणिवेत राहणे योग्य होईल की मी आता जे काही करीत आहे त्या जागे पणातील जेव्हढ्या शक्य होईल तेव्हढ्या गोष्टीवर लक्ष ठेवणे योग्य होईल?

सकाळी उठल्यावर आपण जागे असतोच. समजा आपण फक्त मी जागा आहे एव्हढीच जाणीव सतत ठेवली तर मन तेथे अडकून राहील. जागे झाल्या नंतर पुढे काय करायचे आहे हे मन विचार करू शकणार नाही आणि जीवन तेथे ठप्प होण्याची शक्यता आहे. 

दिवस आणि रात्र हे भास आहेत, तथ्य फक्त सूर्य आहे. सूर्य असल्या आणि नसल्या मुळे दिवस रात्र भासतात. त्या प्रमाणे जीवन सतत चालू असते आणि त्यामधील जागृत अवस्था आणि निद्रिस्त अवस्था हे ठराविक काळ कामासाठी आणि विश्रांती साठी आवश्यक झाले आहेत. 

जागृत अवस्थेत आपण आवश्यक कामासाठी फक्त वेळ दिला आणि अनावश्यक कामांना वेळ दिला नाही, त्या बद्दल विचार केला नाही तरी सुद्धा आपण मनाला वेसण घालू शकतो. जीवन प्रवाह चालू ठेवून त्या मधील अनावश्यक / अवांतर गोष्टींना थारा न देणे याला नैसर्गिक शून्य अवस्था म्हणता येईल. 

Nothingness / शून्य अवस्था याचा अर्थ काहीच न करणे असा होत नसून आवश्यक तेव्हढे करणे आणि अनावश्यक ते टाळणे होय.

जागे असताना जागेपणा मधील देव, देश, धर्म, समाज, कुटुंब, नाते संबंध यांची सत्यता तपासा, फक्त श्रद्धेतून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या मधील असत्यता आपणास समजली तरच आपणास सत्य अवस्था समजू शकते. जागृत अवस्थेतील अशा सर्व गोष्टींचा असत्यपना लक्षात आला तरच मग फक्त जागे असण्याची जाणीव पुरेशी होईल. 

शरीराचा मृत्यू होण्या पूर्वी मनाचा मृत्यू होणे आवश्यक असतो. मन म्हणजे अवांतर, अनावश्यक विचार आशा आकांशा होत.

Thursday, July 08, 2021

आकलन

 राजकारणासाठी राजकारणी देव, देश, धर्म अशा श्रद्धाचा गैरवापर करतात याचे आकलन होणे म्हणजे त्या राजकारणाचे सत्य समजणे होय. हे साधे सत्य का समजत नाही तर त्यामध्ये आपला सुद्धा काही स्वार्थ असतोच. जोपर्यंत स्वार्थ आहे तो पर्यंत सत्य आकलन होत नाही. आणि तो पर्यंत सुराज्य अशक्य आहे. 

जीवनातील सत्य अवस्था न समजण्या मागे स्वार्थी वृत्ती हीच जबाबदार असते. सत्य सतत असते परंतु स्वार्थी अंतःकरणाने त्याचा बोध नाही. तो बोध करून घेण्यासाठी आपण परत तशाच स्वार्थी गुरूकडे जात असतो. 

आपणच आपल्या मध्ये जे काही न्यून आहे ते शोधले पाहिजे आणि त्याचा समाचार घ्यायला हवा. बाहेरचे कोणीही आपल्या आतील स्वच्छता करू शकत नाही. आपल्या वृत्ती हाच आपला मी असतो, वृत्ती क्षीण झाल्या की मी सुद्धा क्षीण होतो. सत्य तत्क्षणी समजू लागते.

Saturday, July 03, 2021

Why Life and Philosophy are different?

Why doesn't philosophy help us in our miserable life?

Just imagine a river and a bridge over it. The bridge is deliberately built at some distance above the river. So that river water does not flow over the bridge. Care is also taken not to drown the bridge in the river. For this a certain distance is kept between the two, the two do not meet each other.

Our real life is as natural as a river. We are creating bridges in the air of our thoughts, ideas, hopes, aspirations, desires etc. Our me and his thoughts are part of that psychological bridge they will never touch the actual river of Life.

If I realise who am I, then the ideas that I have created can also be understood. If one understands the real nature of I and his ideas, then he can ignore the bridge created by I and his ideas. Then he can touch the real life of river, then he can live real life, live his life without any philosophy. Otherwise he will remain separate forever from the river like a bridge. 

Bitter events in our life are coming to tear down the mental bridge of our ego. All those are psychological problems only and without them we will never get down in the real life of river. That is why the saints have asked a miserable life.

If we do not understand real nature of I beforehand, then the damage done when a river floods or a bridge collapses is irreparable.

Friday, July 02, 2021

नेती नेती

 


संपूर्ण विश्व हे त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने चालत असते. हे पाहून मानवी मन आपली स्वतःची वैयक्तिक बुद्धिमत्ता तयार करते. वैश्विक बुद्धिमत्ता हि नैसर्गिक असते, ती असिमित असते, ती कालबध्द नसते. तर मानवी बुद्धिमत्ता हि वैचारिक असते, ती कालबध्द असते, संकुचित असते. संकुचित, कालबध्द असणारी मानवी वैचारिक बुद्धिमत्ता ज्या संकल्पना तयार करते त्यामध्ये मूलभूत विभाजन असते ज्यामुळे वैचारिक संकल्पनांचे पुढे अजून विभाजन होत जाते आणि त्या विभाजित दुहिमध्ये संघर्ष होत राहतो. 

मी हा एक विचार असतो आणि तो विचार करून जी संकल्पना बनवितो ती सुद्धा विचार असतात. परंतु इथे मी हा त्याच्या संकल्पना पासून स्वतःस वेगळा समजत असतो. हे जे मूलभूत विभाजन असते ते पुढे प्रत्येक विचारात उतरते आणि सर्व विचारामध्ये संघर्ष होत राहतात. 

सर्व मानवांनी एकोप्याने, सदाचाराने, सुरक्षित रहावे यासाठी देव, देश, धर्म आदि संकल्पना पूर्वी निर्माण झाल्या होत्या. परंतु त्यातून नंतर अनेक देव, अनेक देश आणि अनेक धर्म तयार झाले. या अनेकात संघर्ष होत राहिले आणि मानव त्याच्याच वैचारिक संकल्पनेमुळे असुरक्षित झाला आहे. 

जर मानवी बुद्धिमत्ता मानवाला असुरक्षित करीत असेल तर वैश्विक बुद्धिमत्ता मानवाला का मदत करीत नाही?


वैश्विक बुद्धिमत्ता हि सर्वत्र असतेच असते फक्त आपल्या मानवी बुद्धिमत्तेमुळे ती दिसून येत नाही. मानवी बुद्धिमत्तेने ज्या काही संकल्पना बनविल्या आहेत त्या पासून आपण वेगळे झालो की आपणास वैश्विक बुद्धिमत्तेचे दर्शन होते. यासाठी प्रत्येक मानवी संकल्पनांना त्या कितीही महान असल्या तरी त्यांना राम राम म्हणणे अनिवार्य ठरते. आपल्या परंपरा आणि त्यांच्या श्रद्धा आणि त्यांची भीती या आपणास तसे करण्यापासून परावृत्त करतात. 


सर्व परंपरा आणि श्रद्धा यांचे मूळ असलेल्या वेदांनी त्यावर उपाय सांगितला होता - नेती नेती, न इति, न इति. जे जे काही वैचारिक आहे ते ते सत्य नव्हे. 

वैश्विक बुद्धिमत्ता आपणाशी प्रत्यक्ष संवाद करू शकत नाही त्यामुळे वैचारिक बुद्धिमत्तेनेच स्वतःचा धोका ओळखून, स्वतःस यथार्थ ओळखून, स्वतःस नजरबंद करणे आवश्यक असते. आणि हे आपण स्वतः करू शकतो त्यासाठी बाहेरचे कोणीही मदत करू शकत नाहीत.