Thursday, May 31, 2018

सामान्य बनणे अवघड आहे


आपली आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी मी आपणास काही मंत्र देण्यासाठि येथे आलो नाही. गुरु, ग्रंथ, आध्यात्मिक साधना इत्यादी सारख्या बाहेरच्या सहाय्यकाचि याकामी मदत होत नसते. जेव्हा बाहेरील सहाय्यकावर आपली मदार असते तेव्हा तिथे तो काहितरी करेल अशी आशा असते आणि ही आशा आपणामध्ये असहायता निर्माण करीत नाही. आपण स्वतः काहि न करता सर्व काहि त्याच्यावर सोपवुन निर्धास्त होतो. बाह्य मदत आपणास सत्य समजण्यास अडथळा निर्माण करते. मला याबद्दल निश्चित खात्री आहे परंतु ही निश्चितता मी इतरा मध्ये प्रसारित करू शकत नाही, अर्थात ईतर कोणिही तसे करू शकत नाहि. जे तसे सांगतात ते निश्चिपणे फसवेगिरी करत आहेत.

आत्मसाक्षात्कारा सारखी आध्यात्मिक ध्येये हि आपल्या अध्यात्मिक सत्याच्या शोधासाठी जबाबदार आहेत. जोपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाहि तोपर्यंत आपला सत्याचा शोध चालुच रहातो. खरेतर तथाकथित आध्यात्मिक ध्येये हि सुध्दा आपली स्वतःची नसतात. संस्कृती, संस्कार यांनी तीं आपणावर बिंबवलेली असतात. संस्कृती व संस्कारा मधुन आलेले ज्ञान आपली अध्यात्मिक ध्येय निश्चित करत असतात. आपण त्यांना अध्यात्मिक म्हणत असतो परंतु त्यांचे खरे स्वरूप हे सांसारीकच असते. अध्यात्मिक साधने द्वारे आपली सांसारीक दुःखे कमी होतील हा त्या मागचा उद्देश असतो. आपण आपले सांसारीक जिवन, धार्मिक वा अध्यात्मिक जिवन असे तुकडे करतो ते चुकिचे आहे कारण सर्व काहि संसारासाठिच, सुखासाठि चाललेले असते.

आपल्या शरिरास आत्मसाक्षात्कार, परमानंद, परमशांतीचि आवश्यकता नसते. मन जे विचार व माहितींचे माहेरघर असते त्याने या काल्पनीक अवस्था बनविल्या आहेत व त्यांचे ध्येयामध्ये रूपांतरण झाले आहे. ध्येयप्राप्तीसाठि सत्याचा शोध व सत्याच्या शोधासाठी गुरू, त्यांचे ग्रंथ, धर्म, रिती रिवाज आदि बाह्य संस्कृतीचा व संस्कारांचा डोलारा ऊभा राहिला आहे. आता या पोकळ डोलाऱ्याचा ईतका विस्तीर्ण विस्तार झाला आहे कि त्यामध्ये अध्यात्मिक ध्येये व सत्याचा शोध सुध्दा हरवले गेले आहेत.

हे लक्षात येणे अतिशय महत्वाचे आहे कि काहिहि समजण्याचे नाहि. काल्पनीक असणाऱ्या अध्यात्मिक ध्येये व सत्याच्या शोधाचा अंत व्हायला हवा. अधिकाधिक धार्मिक ज्ञान प्राप्त करण्याचे थांबले गेले पाहिजे. आपणा जवळ जे धार्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाने आपल्या मानवी समस्या सोडविल्या नाहित. संस्कृतीप्रधान पुर्वेकडिल देश पश्चिमेकडिल भौतीक दृष्ट्या प्रगत देशाकडे याचना करत फिरत असताना दिसते. संस्कृतीने जे प्रश्न सोडविले नाहित ते प्रगत तंत्रज्ञानाने सोडविले आहेत हे मान्य करावे लागेल. धार्मिक ज्ञान आपल्या समस्या सोडवेल या आशेने आपण ते गोळा करत असतो परंतु ते अधिक समस्या निर्माण करत असते. धार्मिक ज्ञानाचे भांडार ऊपलब्ध असताना म्हणजे त्यामध्ये मानवीय समस्यांचि तथाकथित ऊत्तरे असताना सुध्दा तरीहि समस्या शिल्लक आहेत कारण हे तकलादु धार्मिक ज्ञान व त्याचि ऊत्तरे समस्या सोडविण्यासाठि असमर्थ आहेत. धार्मिक ज्ञान पुर्णपणे नाकारल्या नंतर या ज्ञानाने निर्माण केलेला आशेचा ब्रम्हराक्षस कोसळुन पडेल व मनुष्य आपल्या नैसर्गिक अवस्थेमध्ये परत येईल त्याच्या सर्व समस्या आपोआप नाहिशा होतील.

सामान्य मनुष्याचे जिवन जगणे हे तसे अगदि सोपे असते, काहि विशेष करायचे नसते परंतु ते अतिशय अवघड झाले आहे. प्रत्येकास जो तो आहे त्या एैवजी काहितरी वेगळे बनायचे असते.यासाठि भरपुर खटाटोप करावा लागतो, आपल्या अस्वस्थ जिवनाचे हेच कारण आहे. काहितरी असामान्य, विशेष, अर्थपुर्ण कर्तुत्व करण्याच्या हव्यासापोटी आपण आपले स्वास्थ्य, मनः शांती हरवून बसतो. जेवढा जास्त वेळ आपण प्राप्तीच्या मागे लागु तेवढा जास्त वेळ आपणास सामान्य मनुष्य बनण्यास लागेल.

- U G Krishnamurti

Monday, May 28, 2018

मन के विभिन्न रूप

Our all desires or different forms of wants are originated from single source that is the mind. So basically all desires must be the same. Desires of having good food, good clothes, good shelter, beautiful companion, good entertainment should be of the same kind. To avoid boredom mind had created different forms of desires and separated them from each other.

So one can abstain from one form of desire say like sex but he may enjoy himself by fulfilling his other forms of desires like having good foods or listening to music or wandering world over etc. The real experiencer is not the body but the mind. Mind enjoys himself with the help of different organs of the body like skin, nose, ear, eyes, taste etc.

If desire of more and more fun is not there then one can be satisfied with just seeing his or her companion then there should not be any further need to actions like touching, kissing etc.


हमारी सभी इच्छाओं या इच्छाओं के विभिन्न रूपों का जन्म एकल स्रोत से हुआ है, जो दिमाग है। तो मूल रूप से सभी इच्छाएं एक जैसी होनी चाहिए। अच्छे भोजन, अच्छे कपड़े, अच्छा घर, सुंदर साथी, अच्छे मनोरंजन की सारी इच्छाये एक ही तरह की होनी चाहिए। बोरियत दिमाग से बचने के लिए इच्छाओं के विभिन्न रूप पैदा हुए थे और उन्हें एक-दूसरे से अलग कर दिया था।

तो कोई भी आदमी इच्छा के एक प्रकार से दूर रह सकता है, जैसा कि सेक्स लेकिन वह अपने अन्य प्रकार की इच्छाओं को पूरा करके आनंद ले सकता है जैसे अच्छे भोजन या संगीत सुनना या दुनिया भर में घूमना आदि। असल मे अनुभव करनेवाला, आनंद लेनेवाला शरीर नहीं बल्कि दिमाग है। मन त्वचा, नाक, कान, आंखों, स्वाद इत्यादि जैसे शरीर के विभिन्न अंगों की मदद से खुद को आनंदमय रखता है।

यदि अधिक से अधिक मज़े चखने की इच्छा नहीं होती तो कोई भी अपने साथी को देखकरहि संतुष्ट हो सकता था। ऊसे स्पर्श करने, चुंबन लेना आदि जैसी अधिक की कोई और आवश्यकता नहीं होनी चाहिए थी।

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ।। 

|| Gita 15.9 ||

Monday, May 21, 2018

सहज अवस्था

सहज अवस्था हि अशी अवस्था आहे जिला कोणत्याहि साधनांनी व साधनेने प्राप्त करता येत नाहि. सहज अवस्था प्राप्त करण्याच्या  ईच्छाशक्तीचा व ति अवस्था प्राप्त करण्याच्या प्रत्येक कृतीचा पुर्णपणे अभाव असणे म्हणजे सहज अवस्था होय.

सहज अवस्था प्राप्त होण्यासाठी जे काहि आपण प्रत्यक्षरित्या करतो वा प्रत्यक्षरित्या जाणिवपुर्वक करायचे टाळतो ते दोन्हि प्रयत्न तिथे फोल ठरतात. एखादि वस्तु प्राप्त करण्यासाठी आपण जे काहि करतो वा जे काहि करायचे टाळतो ते दोन्हि ति वस्तु प्राप्त करण्याचि कृतीच असते. अशावेळी मती गुंग होते व काय करावे समजत नाहि.

खरे पाहता हि अवस्था समजणे तसे अवघड नाहि, तसे ते खुप सोपे आहे परंतु आपण ज्या संस्कारामधुन लहानाचे मोठे झालेलो असतो व आपल्या आसपास जे रितीरिवाज पाळले जातात त्या श्रध्दांमुळे हि साधि सोपि गोष्ट आपल्या लक्षात येत नाहि. ज्या गोष्टिचा आपण शोध घेत आहोत तसे काहिहि अस्तित्वात नाहि. समजुन घेण्यासारखे वा ज्ञात करण्यासारखे काहिहि नाहि. भितीपोटि ईश्वराचि निर्मिती केली गेली आहे. सत्तेसाठि, नावलौकिकासाठि व अर्थार्जनासाठि देव, देश, धर्म या कल्पना बनविल्या गेल्या आहेत. आत्मा, परमात्मा या मनाच्या कपोकल्पित गोष्टि आहेत. त्यामुळे आत्मसाक्षात्कार वगैरे सर्व थोतांड आहे. ज्यांनी या गोष्टि आपल्या माथी मारल्या त्यांनी स्वतःस व ईतरांना शतकानुशतके मुर्ख बनविले आहे. मानवी समस्या सोडविण्यासाठि देव, देश, धर्म कुचकामी ठरले आहेत. ऊलट त्यांच्यामुळे मानवानेच मानवाच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत. आज आपल्या मुलभुत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यासाठि आपणास देव, देश, धर्म याचि कोठेच आवश्यकता भासत नाहि. केवळ हे ज्यांचे व्यवसाय बनलेले आहेत असे राजकारणी व धर्मकारणि आपल्या मनावर सतत ते बिंबवत राहतात व आपण सत्य असत्याचि शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतो. देशांचि व धर्मांचि ऊतरंड हि तर मनुष्याने रचलेली आहे हे सर्वांना माहित असायला हवे. देव हा निर्गुण, निराकार, जाणिवे पलीकडिल श्रध्देचा प्रकार आहे त्यामुळे त्याचि शहानिशा कोणि करू शकत नाहि. परंतु जो अज्ञात आहे तो ज्ञात होणे असंभव आहे त्यामुळे त्याचि भिती कशासाठि? जो अज्ञात आहे त्याच्या ज्ञानावर काहि बोलणे, एैकणे, लिहिणे वा वाचणे हे सर्व अर्थात काल्पनीक असणार आहे.

भितीपोटि, गरजेपोटि, व्यवसायासाठि, सत्तेसाठि अज्ञात देवांचा वापर सुरू झाला, त्यातुन धर्म निर्माण झाले व देश निर्माण झाले. अज्ञात दैवी शक्तिचा अनुभव घेण्याचि मानवी मनास ईच्छा निर्माण झाली व त्यासाठि गुरू व त्यांच्या साधना निर्माण झाल्या. जे मुळात अज्ञात आहे त्याचा अनुभव घेण्याच्या अट्टाहासापोटि मन बळि पडु लागले. शारिरीक व मानसीक क्रियाकलापामुळे मनास वेगवेगळे भास होत जातात व अशा साधनांवर व त्या साधना शिकविणाऱ्या गुरूवर विश्वास बसु लागतो. हजारांमध्ये एकाला जरी अनुभव आला तरी धंदा चालु राहतो, जुने सोडुन गेले तरी नवीन शेकडो भक्त येतच राहतात. अशा गुरूंमुळे व त्यांच्या साधनांमुळे मनाला नविन खुराक मिळतो, त्याला बरे वाटते मग ते येथे काहिकाळ रमते. जुन्या संप्रदायाचा विट आला कि नविन संप्रदाय, नविन गुरू, नविन मंत्र, नविन साधना हे चालुच राहते. काहितरी केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होणार नाहि यावर ठाम खात्री असते व ईथेच खरी मेख असते. जोपर्यंत आपण कशावर तरी श्रध्दा ठेवत असतो व त्याअनुसार साधना करत असतो तोपर्यंत सहज अवस्था प्राप्त होत नाहि. आपल्या अस्तित्वामधुन जोपर्यंत सर्व श्रध्दा, सर्व साधना निघुन जात नाहित तोपर्यंत आपले अस्तित्व शांत होत नाहि व त्याला सहज अवस्था प्राप्त होत नाहि.

- यु जी कृष्णमुर्ती

Friday, May 18, 2018

आत्मसाक्षात्काराचि आपत्ती

यु जी कृष्णमुर्ती हे जागतीक किर्तीचे भारतीय विचारवंत होते. आत्मसाक्षात्कारा भोवती असलेले अध्यात्मिक, धार्मिक, मानसिक वलये त्यांनी मोडुन काढली होती. त्यांच्या मते आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यासाठी काहि साधना कराव्या लागत नाहित व आत्मसाक्षात्कार म्हणजे सच्चिदानंद अवस्था वगैरे नव्हे. आत्मसाक्षात्कार हा शरीरामध्ये झालेला आमुलाग्र बदल असतो. या बदला दरम्यान शरिरामधिल प्रत्येक पेशी थरारत असतात, प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते, सतत पाणि प्यावे लागते नाहितर शरीर शुष्क होऊ लागते, यामुळे अतिशय शारीरिक यातना होत असतात, व जे काहि अनुभव येेत असतात ते पुर्णपणे शरीराचे अनुभव असतात व या यातना संपल्यानंतर जे हायसे वाटते त्याला पुर्वीच्या लोकांनी शांती, परमानंद असे संबोधले असावे. या नैसर्गिक बदला मध्ये ज्या काहि यातना भोगाव्या लागतात त्यामुळे ते त्याला आत्मसाक्षात्कारा एैवजी आपत्ती म्हणत असत व नंतर प्राप्त झालेल्या अवस्थेस त्यांनी नैसर्गिक अवस्था असे म्हटले आहे. त्यांनी त्या बदलांचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.

कमालीच्या शांत, निशब्द, गाढ निद्रेसारख्या अवस्थेमध्ये जे काहि होत असते ते आपल्या जाणीवे मध्ये येत नाहि त्यामुळे ते सर्व समजण्याच्या पलीकडचे असते. त्या विषयी काहिहि सांगता येणे शक्यच नाहि. मन हे अनुभव रेकॉर्ड करत असते, मनाच्या अनुपस्थीमध्ये काहिहि रेकॉर्ड होणे अशक्य असते. त्यामुळे मला जो काहि अनुभव आला तो केवळ शारीरिक होता त्याचा अध्यात्माशी, धार्मिकतेशी वा श्रध्देशी कसलाहि संबंध नाहि.

नैसर्गिक शारिरिक बदलांदरम्यान शरीराच्या बाह्य व अंतर्गत सर्व कार्यांचे प्रत्यक्षदर्षी अनुभव घेता येतात. आपले रक्ताभिसरण कसे होते, श्वासोच्छवास कसा होतो, ह्रदय, मेंदु, लिव्हर, किडनी कसे कार्य करतात हे प्रत्यक्ष दिसु लागते. रक्त नाड्यांमधुन फिरत असताना त्यांचा नदिच्या प्रवाहासारखा आवाज येत असतो. दररोज प्रत्येक वेळी नवनविन अनुभव येत असतात. आता काय होणार आहे, कोणता अनुभव येणार आहे याचि कसलीहि पुर्वकल्पना नसते, त्याबद्दल अंदाज बांधता येत नाहि, कल्पना करता येत नाहि.

आता माझ्या नैसर्गिक अवस्थेमध्ये मला विचार येत नाहित फक्त निर्विकार जाणीव असते. ज्यावेळी बाहेरून एखादा विचार माझ्या कडे येतो त्यावेळी माझी तंद्री भंग पावते. तंद्रि भंग पावल्यानंतर मी त्या विचारांचे अवलोकन करतो व त्यानुरूप कार्य करतो. कार्य संपल्यानंतर मी परत निर्विकार तंद्रि मध्ये परत जातो. मि एखादि वस्तु पहात असतो परंतु त्याबद्दल कसलेहि विचार मंथन चाललेले नसते त्यामुळे मी काय पहात आहे याचे मला भान नसते. विचारां अभावी मला कसल्याहि भावना निर्माण होत नाहित. एखादि गरज निर्माण होताच त्यांचि फक्त जाणिव होते. सुख, दुःख, नैराश्य, प्रेम, करूणा, दया, सहानुभुती, अश्रु या सर्वांचा माझ्यावर यत्किंचीतहि परिणाम होत नाहि. माझ्या दृष्टिने सर्व भावना एकसारख्या आहेत कारण मी त्यांचा फक्त दृष्टा आहे. अशी व्यक्ती कोणा बरोबर प्रेमसंबंध, लैंगिक संबंध ठेऊ शकेल काय? त्याच्या दृष्टिने नुसता स्पर्श, मिठी वा चुंबन हे सर्व एक सारखेच असते. अधिकाधिक सुखाच्या म्हणजे एका सुखाहुन दुसरे सुख अधिक चांगले असेल अशा कल्पना मला सुचत नाहित.

मन आहे परंतु पुर्वी सारखे ते आता मालक बनुन आज्ञा करत नाहि तर गुलाम बनुन सहाय्य करत असते. बालपणा पासुन गोळा केलेले माहितीवजा ज्ञान मनामध्ये साठवलेले असते परंतु आता ते चुपचाप पाठिमागे ऊभे असते व ज्यावेळी आवश्यकता भासेल त्याचवेळि ते पुढे येते. आपण जर मनाचा वापरच केला नाहि तर ते निष्क्रिय होऊन जाते. मनामध्ये जि काहि माहिती असते ति शब्दांचि वेगवेगळि ठेवण असते. वर्षानुवर्षांच्या अनुभवांनी धारदार बनलेले ते एक बुध्दिमान हत्यार असते. मनाचा केवळ हत्यार व चाकर या नात्यानेच वापर करायला हवा.

मन जाणीवे पलीकडील अनुभव ग्रहण करू शकत नाहि. मनाच्या या असमर्थतेमुळे जाणिवे पलीकडिल अनुभवांचा अनुभव घेणारा नसतो, त्यामुळे जाणीवे पलीकडील ज्ञानाचि मनाच्या ज्ञानामध्ये भर पडत नाहि.

विचारांच्या, मनाच्या, अऩुभवांच्या व ज्ञानाच्या अभावी भौतीक शरीर हे प्रत्येक क्षण वेगवेगळेपणाने जगत असते, भुतकाळाला भविष्यकाळाशी जोडणारा मनाचा दुवा तिथे नसतो. गुलाम बनलेले निष्क्रिय मन नवनवीन कल्पना, संकल्पनांचा पुरवठा करत बसत नाहि.

अशा या नैसर्गिक अवस्थेमधिल जिवनामध्ये आनंद नसतो, करमणुक नसते, नवीन ध्येय नसतात, नव्या आशा आकांक्षा नसतात. जिवन अतिशय साधे झालेले असते. मला खरेच समजत नाहि अशा साध्यासुध्या आयुष्याच्या मागे लोक का धावत असतात.

निर्भय पणा व संपुर्ण एकाग्रतेमुळे काहिहि नविन शिकु शकतो वा प्राप्त करू शकतो परंतु ती मागणीच नाहिशी झालेली असते. आशा आकांक्षा नसल्यामुळे नैराश्य सुध्दा नसते.

नैसर्गिक अवस्थेमध्ये ध्यानावस्था सहज प्राप्त होत असते त्यासाठि काहि करावे लागत नाहि, ध्यानासाठि बसावे लागत नाहि. ध्यानाअवस्था प्राप्त होण्यासाठी ध्यान करावे लागत नाहि, ध्यान करून ध्यानावस्था प्राप्त होत नसते. ध्यानसाधना करायला हवी या साधकांच्या विचारांमुळे ध्यान, गुरू, ध्यानकेंद्रे यांचा बाजार निर्माण केला गेला आहे. खरेतर ध्यानाचि संकल्पना व त्यासाठिच्या साधना आपणास ध्यानावस्थेमध्ये प्रवेश करण्या पासुन रोखत असतात.

आपण ज्याला आपले अस्तित्व समजत असतो ते केवळ विचारांचे व माहितीचा जुनाट सांगाडा असतो. आपल्या मधिल या जुनाट सांगाड्याचे आपण प्राणापलीकडे जतन करत असतो. जोपर्यंत आपण हा जुनाट सांगाडा मोडुन टाकुन देत नाहि तोपर्यंत आपण आपल्यामध्ये शांतता निर्माण करू शकणार नाहि.

माझ्याशी वैयक्तीक नातेसंबंध प्रस्थापित होणे अशक्य आहे कारण माझ्यासाठी सर्व नातेसंबंध सारखे आहेत. माझे अस्तीत्व सर्वत्वाशी एकरूप झालेले आहे. माझे आयुष्य एका एका क्षणांचे झाले आहे, त्याला दिशा नाहि, कोणतेहि ध्येय नाहि, काहि साध्य करावयाचे नाहि. जोपर्यंत माझ्या आसपास हालचाल आहे तोपर्यंत माझ्या आतमध्ये हालचाल होत असते अन्यथा माझ्या आयुष्यामध्ये फक्त शांतता आहे. शांतता हि मनाचि अवस्था नव्हे. आपण अंतर्यामी त्याचवेळि शांत होऊ शकतो ज्यावेळी आपली सर्व बाह्य कर्मे थंडावलेली असतात.