Thursday, March 22, 2018

पुनर्जन्म



शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् || गिता १५:८ ||

ज्याप्रमाणे वायु गंधाना एका ठिकाणापासुन दुसरीकडे वाहुन घेऊन जातो त्याप्रमाणे अंतरात्मा हा मनासह ईतर ज्ञानेंंद्रियांना एका शरीपासुन दुसऱ्या शरीराकडे घेऊन जातो. - #ज्ञानेश्वरी १५:८ 

स्थुल शरिराच्या मृत्युनंतर आत्म्याच्या शक्तिमुळे मनासह अंतःकरणाचे सुक्ष्म शरीर दुसऱ्या नविन शरीरात प्रवेश करते. आपले दिसणारे हाडामांसाचे स्थुल शरिर हे मृत्युनंतर निसर्गाशी एकरूप होते. मन, चित्त, बुध्दि, अहंकार यांना अंतःकरण व सुक्ष्म शरीर समजले जाते. अंतःकरणामध्ये आपल्या पुर्वीच्या सर्व आठवणि, अतृप्त ईच्छा, वासना ईत्यादि साठविलेले असतात. स्थुल शरीराच्या मृत्युनंतर सुक्ष्म शरीर दुसऱ्या स्थुल शरीरामध्ये प्रवेश करते. पुर्व कर्मानुसार व राहिलेल्या अतृप्त वासना पुर्ततेसाठि अनुरूप असे नविन शरिर सुक्ष्म शरिरास प्राप्त होत असते. 

आपले विश्व, स्थुल शरीर व सुक्ष्म शरीर हे सर्व भौतिक वस्तुंचे बनलेले आहेत. या भौतीक विश्वाचे कार्य सतत चालु रहाण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या ऊर्जेचि, शक्तिंचि, प्रकाशाचि आवश्यकता असते. ऊर्जा, प्रकाश वा शक्ति या गोष्टि भौतीक विश्वाकडे नसतात. आत्म्याच्या चैतन्यशक्ती मधुन भौतिक विश्व आपला संसार चालविण्यासाठि आवश्यक असणाऱ्या शक्ति प्राप्त करत असते. आत्म्याच्या चैतन्यशक्तीच्या प्रभावाखाली भौतीक विश्व कार्यरत असते. आत्मा व त्याच्या शक्ति स्वतः काहि करत नाहित परंतु त्यांच्या प्रभावाखाली विश्व, स्थुल शरीरे व सुक्ष्म शरिरे यांचे कार्य चालु असते. आत्मा हा भौतीक विश्वाच्या व शरीरांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाहि. स्थुल व सुक्ष्म शरिरे हि भौतिक विश्वाचे भाग आहेत. भौतिक विश्वाच्या प्रत्येक सजिव व निर्जिव कणांमध्ये अंतःकरण असते व हे अंतःकरण आपले स्थुल शरीर निवडत असते. अंतःकरणाच्या शुध्दतेनुसार त्यास नविन शरिर प्राप्त होत असते. 

जब देहादिसंघातका स्वामी जीवात्मा शरीरको छोड़कर जाता है तब वह मन और ईंद्रियोंको आकर्षित करता है। जैसे वायु गन्धको लेकर जाता है वैसे ही, जब जीवात्मा पहले शरीरसे दूसरे शरीरको पाता है तब मनसहित इन छः इन्द्रियोंको साथ लेकर जाता है। - #आदि_शंकराचार्य 

When the soul obtains a body and when He leaves it, He takes inner subtle body and goes to another body as like the wind takes the scents from place to place. - #Swami_Sivanand 

Sunday, March 18, 2018

विचारांचि गुढि


जेव्हा एखादा नविन विचार निर्माण होतो त्यावेळी तो त्याच्या अस्तीत्वासाठि काळ व अवकाशाचि निर्मिती करतो. ज्यावेळी विचार नसतात त्यावेळी काळ व अवकाश अस्तित्वात नसतात. म्हणजे विचार हेच काळ व अवकाश आहेत. विचाराचा जन्म हाच संदर्भबिंदु असतो. ज्यावेळी विचाराचा जन्म होतो त्यावेळी आपल्या 'मी' चा जन्म होतो. जे काहि विचार या संदर्भबिंदु पासुन पुढे येतात ते सर्व काल्पनीक असतात. विश्व व विश्वामधिल भुतमात्रे काल्पनीक नाहित, ते सर्व निसर्गाचे नित्य अनुभवास येणारे भाग आहेत. परंतु विचार व विचारांपासुन निर्माण होणारे ज्ञान हे काल्पनीक आहेत. आता या क्षणि अनुभवास न येणारा परंतु भविष्याचे गाजर दाखविणारा तो मनोराज्याचा एक डोलारा आहे. या काल्पनीक ज्ञानास आपण सत्य समजु लागतो व खऱ्या सत्यास माया समजु लागतो. या विचारांच्या जंजाळामध्ये आपण गुरफटतो व हे विचार व त्यांचे काल्पनीक ज्ञान आपणास सत्य काय आहे याचि जाणिव होऊ देत नाहि. या काल्पनीक ज्ञानाव्यतिरीक्त दुसरे काहिहि आपण जाणुच शकत नाहि. त्याच्यामध्ये जे नाहि त्याचि आपण कल्पना करू शकत नाहि व त्याचा स्विकार करू शकत नाहि. आपली भिती, सुख-दुःख, त्रास, ऊद्विग्नता, ईच्छा, आशा, आकांक्षा, वासना आदि आपल्या सर्व भावभावनांचे मुळहि या काल्पनीक ज्ञानामध्ये आहे. काल्पनीक ज्ञानामधिल या सर्व भावभावना खरेतर केवळ विचारच आहेत म्हणुनच ते असत्य व काल्पनीक आहेत. जोपर्यंत आपण या भावभावनांचा विचार करत असतो तोपर्यंत त्यांना अस्तीत्व असते. आपण या भावभावनांचा विचार करणे बंद केले कि त्या नाहिशा होतात.

आपल्या सर्व भावना, विचार, अनुभव हे या वैश्विक मनाकडुन येत असतात, त्यामध्ये आपले स्वतःचे वैयक्तीक असे काहिहि नसते. या विचारांनाच आपण आपले अस्तित्व समजत असतो. जर हे विचारच वैश्विक आहेत तर आपण सुध्दा वैश्विकच आहोत, आपण कोणिहि वेगवेगळे नाहि तर आपण सर्वजण एकच आहोत.

'मी अमका तमका आहे' हा एक विचार आहे. मि चे अस्तित्व हे विचारांचे अस्तीत्व आहे. मी व माझे विचार हे वेगळे नसुन एकच आहेत. त्यामुळे ध्यान करताना मी माझ्या विचारांवर लक्ष ठेऊच शकणार नाहि. मी खरा कोण आहे याचा शोध लागु शकत नाहि कारण एक विचार दुसऱ्या विचारांचा मागोवा घेऊ शकत नाहि. विचारांचे रूपांतरण प्रथम कंपने व नंतर आवाजामध्ये होत असते त्यामुळे ते वेगळे आहेत असे भासते.

ज्याप्रमाणे ईंटरनेट वरील माहिती दाखविण्याचे कार्य संगणकाचा पडदा करत असतो त्याप्रमाणे आपले शरीर विचार करत नसते तर वैश्विक मनामधिल विचार त्यांना मुर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी आपल्या शरिराचा ऊपयोग करत असते. म्हणजे आपण स्वतंत्र नसुन आपण वैश्विक विचारांच्या तालावर नाचणारे एक ऊपकरण आहोत.

खरेतर आपणास प्रश्नांचि ऊत्तरे नको आहेत कारण ते जुनेच व ईतरांचे प्रश्न आहेत. आपल्या शरिरास धर्म, अध्यात्म, शांती, परमानंद, ईश्वर यांचि व त्यांना प्राप्त करण्याचे जे ध्यान, ऊपासना वा योगादि मार्ग आहेत त्यांचि बिलकुल आवश्यकता नसते. या सर्वांमुळे शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडत असते व त्यामुळे शरीर त्रस्त होत असते. या त्रस्त होण्याच्या क्रियांनाच आपण दैवी अनुभव समजत असतो. आपल्या मज्जासंस्थेच्या संवेदनक्षमतेवर या क्रियांचा विपरीत परिणाम होत असतो. निसर्ग हा विविधतेचा भोक्ता असतो, परिपुर्णतेचा नाहि. परिपुर्णतेचा शोध आपण लावला आहे व त्यासाठी आपण आपल्या नैसर्गिक संवेदनांना बोथट करून त्यांना कृत्रीम स्वरूप देत आहोत. आपल्या मानवी समाजाने नैतिकतेपेक्षा या बोथट झालेल्या कृत्रीम संवेदनांचि जास्त काळजि घ्यायला हवी.

आपल्या शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठि चालणे वा पळण्यासारखे व्यायाम पुरेसे आहेत. आपण जे आहोत, जसे आहोत तसे पुरेसे आहे परंतु आपण हे मान्य करत नाहि व अधिकाधिक मिळविण्यासाठि सतत नवनविन शोध लावत असतो आणि या अट्टाहासापायी आपण आपले व निसर्गाचे अतोनात नुकसान करत असतो.

हव्यास व विचार एकत्रीत चालत असतात, विचारांमुळेच आपल्या जिवनामध्ये दुःख, अस्थीरता येत असते. जर आपण कसलीहि अपेक्षा ठेवली नाहि तर ते प्राप्त करण्याचे विचार येणार नाहित व आपणास दुःखांचि झळहि पोहोचणार नाहि.

- यू जी कृष्णमूर्ती
https://youtu.be/hF6-nfnIe7Y

Saturday, March 17, 2018

वैश्विक मन



आपल्या प्रत्येकांचे वेगवेगळे वा वैयक्तिक मन नसते. हवा वा आकाशासारखे सर्वांचे मिळुन एकच एक विशाल असे अदृश्य वैश्विक मन असते. पुर्वीच्या सर्व पिढ्यांपासुन ते आताच्या या क्षणापर्यंतचे सर्वांचे सर्व विचार व सर्व अनुभव या वैश्विक मनामध्ये साठविलेले आहेत. आपणास येणारे सर्व अनुभव व विचार हे या वैश्विक मनाकडुन येत असतात. आपणास ते नविन भासतात परंतु ते पुर्वी कोणि ना कोणि अनुभवलेले असतात. म्हणजे आपणास येणारे सर्व अनुभव व सर्व विचार हे नवीनतम व आपल्या एकट्याचे नसतात!

वैश्विक मन हे सर्वव्यापि माहितीचे प्रचंड मोठे असे भांडार आहे त्याला सर्वजण सतत वापरत असतात. परंतु यामधिल माहितीच्या आधारे आपण सत्य अनुभवु शकत नाहि. सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक प्रश्न व त्यांचि ऊत्तरे वैश्विक मनाच्या या महाजालामध्ये ठासुन भरलेली आहेत. पिढि दर पिढि आपण सर्वजण या महाजालामधिल तेच प्रश्न व त्यांचि तिच ऊत्तरे वापरत आहोत. जोपर्यंत ऊत्तरे चुकिचि आहेत तोपर्यंत प्रश्न अनुत्तरीतच राहतात. एकदा का एखाद्या प्रश्नाचे ऊत्तर बरोबर मिळाले कि तो प्रश्न त्या ऊत्तरासहित महामना मधुन नाहिसा होतो. - यु जी कृष्णमुर्ती

Thursday, March 15, 2018

Reject all paths.


There is no individual mind. Mind is a totality of all experiences and thoughts of all previous generations  till this point in time. Its a very huge knowledge bank and everyone uses it. This knowledge bank does not help us to realise the reality. All the religious and spiritual questions and their answers are already there in this internet of minds. Generations after generations we use same questions and same answers. As long as answers are wrong, questions will remain unanswered. Once answer fits questions then both question and answer will wipe out from the system.

When thought is born, it creates space and time for its own survival. When thought is not there, there is no space and no time. So actually thought is the space and time.

The birth of thought is the reference point. When thought is born we are born. Anything that we experiene from this reference point is an illusion. The World is not illusion but the thoughts and experience and knowledge are illusion. And this illusory knowledge does not help us to realise reality. We can't realise what is not there in this illusory knowledge bank. All the emotions of pains, misery, happiness are part of this  knowledge and hence are not real. There are no individual thoughts or experiences as everything comes from this universal mind. So actually no one is separate from one another, no individual is there. There can't be a new questions, as all questions are already there in the universal mind with answers alongside. Its like School books which already contains both questions and answers but teachers or examinations repeats them again and again to the new students.

'I Am' is a thought, so we the individuals means actually the thoughts only. We the thoughts can not observe any thoughts. We can not separate ourselves from thoughts, both are one and not separate two. The vibrations and sound of thoughts creates illusion of separateness. We do not think but thoughts uses our body to express itself. Its like the computer display is showing the contents of the internet. So we are not independent but are mechanically acting as per the thoughts.

Actually we do not need answers to the questions which are not our own questions. Our Body is not at all interested in religion, spirituality, peace, bliss or methods like yoga and meditation. All these things actually disturbs chemistry of our body and we think this disturbance as some divine experiences. Meditation and yogas destroys sensitivity of nervous system. Nature is just interested in creating unique bodies and not perfect bodies. We invented perfection and are destroying sensitivity of nervous system. Society is affected by these neurological problems and not by ethical issues.

Some exercises like running or walking is enough for the body.

We are what we actually should be but we do not accept it and starts searching and wanting more and more and make hell of our life.

Wanting and thinking goes together, thinking creates pains and unhappiness. If we don't want a thing from this world, thinking will stop.

Any enlightened person can never knows that he is free or enlightened. Anyone who claims to be enlightened is a phoney and he can't free others. Enlightenment is nothing but the knowledge you have about it. We can't search what we already know. All this has to come to an end. Reject all paths and goals. Every individual is a unique and has his own paths and goals. We can't reach our goals by following others paths. As long as goal, desire, want is there paths will be there. Path and goal go together, they are not separate. When we realise that there is no path, we stop searching paths. Meditation by controlling breathing and thoughts won't help at all. To become thoughtless or timeless by some method is also a thought. Trying to Control thoughts with the help of thoughts is meaningless.

Only thing one can know that the search for the enlightenment is over, he is free from the desire to be free.

There is no value of enlightenment to the jnani unless he want to make disciples and money.

Search for happiness, fearlessness has to go.

No one get enlightenment by any method, enlightenment expresses itself by a person who had reached that state.

U G Krishnamurthy

https://youtu.be/hF6-nfnIe7Y

Tuesday, March 13, 2018

शरीराचे अमरत्व


विश्वात्मा, विश्व, जिव, मन, शरीर यांचे संबंध स्पष्ट करताना गिता सांगते कि, ईश्वरीय शक्तिचा अंश असणारा जिवात्मा हा विश्वाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर विश्वामधिल पंचईंद्रियात्मक स्थुलशरीर व मनाचे सुक्ष्म शरीर यांना आकर्षित करतो. ईश्वर जसा सनातन आहे तसेच हे विश्वहि सनातन आहे. ईश्वर निराकार असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल संभवत नाहि परंतु विश्व साकार असल्यामुळे त्याच्यामध्ये सतत बदल दिसत असतो. साकार विश्वामधिल प्रत्येक जिवजंतु सुध्दा सनातन आहेत. जन्म व मृत्यु हे आपल्या सनातन जिवनाचि सुरूवात वा शेवट नाहित. आपले  शरीर म्हणजे अणुरेणुंच्या असंख्य पेशींचा एक समुह आहे. आपल्या शरिरामधिल अणुरेणु हे आपल्या जन्मापुर्वी अस्तीत्वात होते व आपल्या मृत्युनंतर सुध्दा अस्तित्वात असणार आहेत. अणुरेणुंचे विघटन व परत नविन आकारामध्ये संमिलन हे निसर्गामध्ये सतत चालु असते.

अणुरेणु या थोकडा । तुका आकाशा एवढा ।।

प्रत्येक शरीरामध्ये त्याचे स्वत:चे असे अंगभुत कौशल्य असते कि ज्या आधारे ते स्वतः जिवंत रहात असते व स्वतःपासुन नविन शरिर निर्मिती ते करत असते. हे दोनच कार्य शरिराचि आहेत व त्यासाठी त्याला बाहेरील ज्ञानाचि आवश्यकता नसते.

मन वा विचार हे आपल्या शरीराचे स्वतःचे भाग नाहित. विश्वामध्ये सर्वत्र पसरलेले असे विचारांचे एक विशाल महाजाल आहे. या विचारांच्या महाजालामधुन विचार आपल्या मेंदुमध्ये सतत प्रवेश करत असतात व आपला मेंदु त्याला केवळ प्रतिसाद देण्याचे कार्य करत असतो कारण आपला मेंदु हा निर्माता नाहि. या परकिय विचारांच्या पारतंत्र्यामध्ये आपले शरीर अडकलेले आहे. शरीर स्वतः अमर आहे त्याला अमरत्व, मोक्ष, स्वर्ग या संकल्पनांशी काहिहि देणेघेणे नाहि. या संकल्पनांच्या संस्कारांच्या विचारांनी आपले संपुर्ण जिवन व्यापले आहे. ईश्वर, धर्म, विज्ञान, संसार, गुरू या सर्वांचि व्यापकता ईतकि प्रचंड स्वरूपाचि आहे कि त्यामधुन निसटणे जवळ जवळ अशक्यप्राय झाले आहे. विचारांशिवाय जगायलाच आपण पुर्णपणे विसरलेलो आहोत आणि विचारांचा भस्मासुर आपणास सोडायला तयार नाहि.


ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति || #गिता_१५:७ ||

जिवलोकामध्ये प्राण्यांचा जिव म्हणुन जो प्रसिध्द आहे तो ईश्वरीय पुरातन अंश आहे. प्रकृतीस्थित मनासह बाकि पंच ईंद्रियांना तो आकर्षित करतो. #ज्ञानेश्वरी

जीवलोकमें अर्थात् संसारमें जो जीवरूप शक्ति, भोक्ता, कर्ता इत्यादि नामोंसे प्रसिद्ध है, वह मुझ परमात्माका ही सनातन अंश है।मन जिनमें छठा है ऐसी कर्णछिद्रादि अपने अपने गोलकरूप प्रकृतियोंमें स्थित हुई श्रोत्रादि इन्द्रियोंको जीवात्मा आकर्षित करता है। - #आदि_शंकराचार्य

An eternal portion of Myself having become a living soul in the world of life, draws to (itself) the (five) senses with the mind for the sixth, abiding in Nature.  #Swami_Sivanand

Sunday, March 04, 2018

संत तुकारामांच्या सदेह वैकुंठ गमनाचे रहस्य


आपण भक्तजण ईश्वर स्वर्गामध्ये आहे असे समजतो. ईश्वराच्या परमधामास कोणि वैकुंठ म्हणतात तर कोणि कैलास म्हणतात. ईश्वराचे हे परमधाम स्वयंप्रकाशी आहे तिथे प्रकाशासाठि चंद्र, सुर्य, अग्नी आदि माया जगतामधिल पंच महाभुतांचि आवश्यकता नसते. खरेतर ईश्वर हा निर्गुण निराकार स्वरूपाचा आहे, तो सर्वत्र आहे, त्याच्या विना रिता ठाव नाहि. सर्वव्यापि ईश्वराचे केवळ एखादे ठिकाण असु शकत नाहि. त्यामुळे तो वैकुंठामध्ये, कैलासावर वा स्वर्गामध्ये आहे असे म्हणणे हे रुपकात्मक आहे. पुराण कालापासुन पुराणिकांनी सामान्य मनुष्यास ईश्वराविषयी माहिती सांगण्यासाठि गोष्टिरूप पुराणकथा तयार केल्या. या सर्व पुराणकथा या कपोकल्पित व केवळ ईश्वरीय शक्तीच्या निर्देशासाठि वापरल्या जातात. साधनेच्या सुरूवातीस या कथांचा श्रध्देसाठि ऊपयोग होतो परंतु जसजशी साधना परिपक्व होऊ लागते त्याप्रमाणे साधक गोष्टिंमधुन तत्वज्ञानाकडे वळु लागतो. ईश्वरीय ज्ञान हे आकारामध्ये नाहि, ते सर्व अनुभवांच्या पलीकडील आहे. साधकास येणारे सर्व अनुभव हे मनाशी निगडीत असतात. जोपर्यंत मन आहे (आशा, आकांक्षा) तोपर्यंत अनुभव येत राहतात, मन निर्मन झाल्यानंतर अद्वैत अवस्थेमध्ये सर्व काहि शुन्य होते. या अवस्थेमध्ये सुख नसते, दुःख नसते, आनंदहि नसतो, परमानंदहि नसतो. काहि अनुभव आहे असे म्हणणे म्हणजे मनाच्या अस्तित्वाचे लक्षण होय. 

संत तुकारामांनी अशी अद्वैत स्थीती (वैकुंठ) जिवंतपणि (सदेह) प्राप्त केली होती. त्यांच्या साधनेचा मार्ग हा आकाशमार्गे गुप्तपंथे (विहंगम - विमान) असा होता. साधनेचे पिपिलका - मुंगीचा व विहंगम - पक्षांचा असे दोन मार्ग त्यांच्या गतीनुसार शास्त्रामध्ये सांगीतले आहेत. 

ईश्वराच्या परमधामास सुर्य, चंद्र वा अग्नी प्रकाशीत करत नाहित. अशा ईश्वराच्या परमधामास गेलेला परत संसारामध्ये परतुन येत नाहि. - #ज्ञानेश्वरी १५:६

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम || गिता १५:६ ||

उस तेजोमय धामको यानी परमपदको सूर्य प्रकाशित नहीं कर सकता। वैसे हि चन्द्रमा और  अग्नि भी प्रकाशित नहीं कर सकता। ऊस परमधामको पाकर मनुष्य पीछे नहीं लौटते वह मेरा परमधाम है। 

Neither doth the sun illumine there nor the moon, nor the fire; having gone thither they return not; that is My supreme abode.


Thursday, March 01, 2018

ईश्वरीय ज्ञान कोणास प्राप्त होउ शकते


निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् || #गिता १५:५ ||


ईश्वरीय ज्ञानावर सर्वांचा समान अधिकार आहे, ते कोणासहि प्राप्त होऊ शकते. ते ज्ञान आपणास ईतर कोणिहि देऊ शकत नाहि ते आपले आपण प्राप्त करायचे असते. जशी ईतर कोणतीहि गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्याचि पात्रता आपणाकडे असायला हवी वा त्याच्या कसोट्या आपणास पार कराव्या लागतात त्याप्रमाणे ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणजे ईश्वरीय अव्यय पदाला पोहोचणारा ज्ञानी हा मान, गर्व, अभिमान रहित असायला हवा, आसक्तिच्या दोषाला त्याने जिंकलेले असायला हवे, अध्यात्मिक साधनेमध्ये तो नित्य रममाण असायला हवा, त्याच्या सर्व काम वासना निवृत्त झालेल्या असाव्यात, तो सुख-दुःखांच्या द्वंद्वामधुन मुक्त झालेला असावा, तो अज्ञान रहित विवेकि बुध्दिचा असावा. - ज्ञानेश्वरी

उस परमपदको कौन प्राप्त कर सकता है? जो मानमोहसे मुक्त हैं, जिन्होंने आसक्तिरूप दोषको जीत लिया है। जो नित्य अध्यात्म विचारमें लगे हुए हैं। जो कामनासे रहित हैं। ऐसे जो कि सुखदुःख नामक प्रिय और अप्रिय आदि द्वन्द्वोंसे छूटे हुए हैं। वे मोहरहित ज्ञानी, उस उपर्युक्त अविनाशी पदको पाते हैं। - #आदि_शंकराचार्य

He who is free from pride and delusion, victorious over the evil of attachment, dwelling constantly in the Self, desires having completely turned away, freed from the pairs of opposites known as pleasure and pain, the undeluded reach the eternal goal. - #Swami_Sivanand