Saturday, March 17, 2018

वैश्विक मन



आपल्या प्रत्येकांचे वेगवेगळे वा वैयक्तिक मन नसते. हवा वा आकाशासारखे सर्वांचे मिळुन एकच एक विशाल असे अदृश्य वैश्विक मन असते. पुर्वीच्या सर्व पिढ्यांपासुन ते आताच्या या क्षणापर्यंतचे सर्वांचे सर्व विचार व सर्व अनुभव या वैश्विक मनामध्ये साठविलेले आहेत. आपणास येणारे सर्व अनुभव व विचार हे या वैश्विक मनाकडुन येत असतात. आपणास ते नविन भासतात परंतु ते पुर्वी कोणि ना कोणि अनुभवलेले असतात. म्हणजे आपणास येणारे सर्व अनुभव व सर्व विचार हे नवीनतम व आपल्या एकट्याचे नसतात!

वैश्विक मन हे सर्वव्यापि माहितीचे प्रचंड मोठे असे भांडार आहे त्याला सर्वजण सतत वापरत असतात. परंतु यामधिल माहितीच्या आधारे आपण सत्य अनुभवु शकत नाहि. सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक प्रश्न व त्यांचि ऊत्तरे वैश्विक मनाच्या या महाजालामध्ये ठासुन भरलेली आहेत. पिढि दर पिढि आपण सर्वजण या महाजालामधिल तेच प्रश्न व त्यांचि तिच ऊत्तरे वापरत आहोत. जोपर्यंत ऊत्तरे चुकिचि आहेत तोपर्यंत प्रश्न अनुत्तरीतच राहतात. एकदा का एखाद्या प्रश्नाचे ऊत्तर बरोबर मिळाले कि तो प्रश्न त्या ऊत्तरासहित महामना मधुन नाहिसा होतो. - यु जी कृष्णमुर्ती

No comments: