Tuesday, March 13, 2018

शरीराचे अमरत्व


विश्वात्मा, विश्व, जिव, मन, शरीर यांचे संबंध स्पष्ट करताना गिता सांगते कि, ईश्वरीय शक्तिचा अंश असणारा जिवात्मा हा विश्वाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर विश्वामधिल पंचईंद्रियात्मक स्थुलशरीर व मनाचे सुक्ष्म शरीर यांना आकर्षित करतो. ईश्वर जसा सनातन आहे तसेच हे विश्वहि सनातन आहे. ईश्वर निराकार असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल संभवत नाहि परंतु विश्व साकार असल्यामुळे त्याच्यामध्ये सतत बदल दिसत असतो. साकार विश्वामधिल प्रत्येक जिवजंतु सुध्दा सनातन आहेत. जन्म व मृत्यु हे आपल्या सनातन जिवनाचि सुरूवात वा शेवट नाहित. आपले  शरीर म्हणजे अणुरेणुंच्या असंख्य पेशींचा एक समुह आहे. आपल्या शरिरामधिल अणुरेणु हे आपल्या जन्मापुर्वी अस्तीत्वात होते व आपल्या मृत्युनंतर सुध्दा अस्तित्वात असणार आहेत. अणुरेणुंचे विघटन व परत नविन आकारामध्ये संमिलन हे निसर्गामध्ये सतत चालु असते.

अणुरेणु या थोकडा । तुका आकाशा एवढा ।।

प्रत्येक शरीरामध्ये त्याचे स्वत:चे असे अंगभुत कौशल्य असते कि ज्या आधारे ते स्वतः जिवंत रहात असते व स्वतःपासुन नविन शरिर निर्मिती ते करत असते. हे दोनच कार्य शरिराचि आहेत व त्यासाठी त्याला बाहेरील ज्ञानाचि आवश्यकता नसते.

मन वा विचार हे आपल्या शरीराचे स्वतःचे भाग नाहित. विश्वामध्ये सर्वत्र पसरलेले असे विचारांचे एक विशाल महाजाल आहे. या विचारांच्या महाजालामधुन विचार आपल्या मेंदुमध्ये सतत प्रवेश करत असतात व आपला मेंदु त्याला केवळ प्रतिसाद देण्याचे कार्य करत असतो कारण आपला मेंदु हा निर्माता नाहि. या परकिय विचारांच्या पारतंत्र्यामध्ये आपले शरीर अडकलेले आहे. शरीर स्वतः अमर आहे त्याला अमरत्व, मोक्ष, स्वर्ग या संकल्पनांशी काहिहि देणेघेणे नाहि. या संकल्पनांच्या संस्कारांच्या विचारांनी आपले संपुर्ण जिवन व्यापले आहे. ईश्वर, धर्म, विज्ञान, संसार, गुरू या सर्वांचि व्यापकता ईतकि प्रचंड स्वरूपाचि आहे कि त्यामधुन निसटणे जवळ जवळ अशक्यप्राय झाले आहे. विचारांशिवाय जगायलाच आपण पुर्णपणे विसरलेलो आहोत आणि विचारांचा भस्मासुर आपणास सोडायला तयार नाहि.


ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति || #गिता_१५:७ ||

जिवलोकामध्ये प्राण्यांचा जिव म्हणुन जो प्रसिध्द आहे तो ईश्वरीय पुरातन अंश आहे. प्रकृतीस्थित मनासह बाकि पंच ईंद्रियांना तो आकर्षित करतो. #ज्ञानेश्वरी

जीवलोकमें अर्थात् संसारमें जो जीवरूप शक्ति, भोक्ता, कर्ता इत्यादि नामोंसे प्रसिद्ध है, वह मुझ परमात्माका ही सनातन अंश है।मन जिनमें छठा है ऐसी कर्णछिद्रादि अपने अपने गोलकरूप प्रकृतियोंमें स्थित हुई श्रोत्रादि इन्द्रियोंको जीवात्मा आकर्षित करता है। - #आदि_शंकराचार्य

An eternal portion of Myself having become a living soul in the world of life, draws to (itself) the (five) senses with the mind for the sixth, abiding in Nature.  #Swami_Sivanand

No comments: