Sunday, March 18, 2018

विचारांचि गुढि


जेव्हा एखादा नविन विचार निर्माण होतो त्यावेळी तो त्याच्या अस्तीत्वासाठि काळ व अवकाशाचि निर्मिती करतो. ज्यावेळी विचार नसतात त्यावेळी काळ व अवकाश अस्तित्वात नसतात. म्हणजे विचार हेच काळ व अवकाश आहेत. विचाराचा जन्म हाच संदर्भबिंदु असतो. ज्यावेळी विचाराचा जन्म होतो त्यावेळी आपल्या 'मी' चा जन्म होतो. जे काहि विचार या संदर्भबिंदु पासुन पुढे येतात ते सर्व काल्पनीक असतात. विश्व व विश्वामधिल भुतमात्रे काल्पनीक नाहित, ते सर्व निसर्गाचे नित्य अनुभवास येणारे भाग आहेत. परंतु विचार व विचारांपासुन निर्माण होणारे ज्ञान हे काल्पनीक आहेत. आता या क्षणि अनुभवास न येणारा परंतु भविष्याचे गाजर दाखविणारा तो मनोराज्याचा एक डोलारा आहे. या काल्पनीक ज्ञानास आपण सत्य समजु लागतो व खऱ्या सत्यास माया समजु लागतो. या विचारांच्या जंजाळामध्ये आपण गुरफटतो व हे विचार व त्यांचे काल्पनीक ज्ञान आपणास सत्य काय आहे याचि जाणिव होऊ देत नाहि. या काल्पनीक ज्ञानाव्यतिरीक्त दुसरे काहिहि आपण जाणुच शकत नाहि. त्याच्यामध्ये जे नाहि त्याचि आपण कल्पना करू शकत नाहि व त्याचा स्विकार करू शकत नाहि. आपली भिती, सुख-दुःख, त्रास, ऊद्विग्नता, ईच्छा, आशा, आकांक्षा, वासना आदि आपल्या सर्व भावभावनांचे मुळहि या काल्पनीक ज्ञानामध्ये आहे. काल्पनीक ज्ञानामधिल या सर्व भावभावना खरेतर केवळ विचारच आहेत म्हणुनच ते असत्य व काल्पनीक आहेत. जोपर्यंत आपण या भावभावनांचा विचार करत असतो तोपर्यंत त्यांना अस्तीत्व असते. आपण या भावभावनांचा विचार करणे बंद केले कि त्या नाहिशा होतात.

आपल्या सर्व भावना, विचार, अनुभव हे या वैश्विक मनाकडुन येत असतात, त्यामध्ये आपले स्वतःचे वैयक्तीक असे काहिहि नसते. या विचारांनाच आपण आपले अस्तित्व समजत असतो. जर हे विचारच वैश्विक आहेत तर आपण सुध्दा वैश्विकच आहोत, आपण कोणिहि वेगवेगळे नाहि तर आपण सर्वजण एकच आहोत.

'मी अमका तमका आहे' हा एक विचार आहे. मि चे अस्तित्व हे विचारांचे अस्तीत्व आहे. मी व माझे विचार हे वेगळे नसुन एकच आहेत. त्यामुळे ध्यान करताना मी माझ्या विचारांवर लक्ष ठेऊच शकणार नाहि. मी खरा कोण आहे याचा शोध लागु शकत नाहि कारण एक विचार दुसऱ्या विचारांचा मागोवा घेऊ शकत नाहि. विचारांचे रूपांतरण प्रथम कंपने व नंतर आवाजामध्ये होत असते त्यामुळे ते वेगळे आहेत असे भासते.

ज्याप्रमाणे ईंटरनेट वरील माहिती दाखविण्याचे कार्य संगणकाचा पडदा करत असतो त्याप्रमाणे आपले शरीर विचार करत नसते तर वैश्विक मनामधिल विचार त्यांना मुर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी आपल्या शरिराचा ऊपयोग करत असते. म्हणजे आपण स्वतंत्र नसुन आपण वैश्विक विचारांच्या तालावर नाचणारे एक ऊपकरण आहोत.

खरेतर आपणास प्रश्नांचि ऊत्तरे नको आहेत कारण ते जुनेच व ईतरांचे प्रश्न आहेत. आपल्या शरिरास धर्म, अध्यात्म, शांती, परमानंद, ईश्वर यांचि व त्यांना प्राप्त करण्याचे जे ध्यान, ऊपासना वा योगादि मार्ग आहेत त्यांचि बिलकुल आवश्यकता नसते. या सर्वांमुळे शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडत असते व त्यामुळे शरीर त्रस्त होत असते. या त्रस्त होण्याच्या क्रियांनाच आपण दैवी अनुभव समजत असतो. आपल्या मज्जासंस्थेच्या संवेदनक्षमतेवर या क्रियांचा विपरीत परिणाम होत असतो. निसर्ग हा विविधतेचा भोक्ता असतो, परिपुर्णतेचा नाहि. परिपुर्णतेचा शोध आपण लावला आहे व त्यासाठी आपण आपल्या नैसर्गिक संवेदनांना बोथट करून त्यांना कृत्रीम स्वरूप देत आहोत. आपल्या मानवी समाजाने नैतिकतेपेक्षा या बोथट झालेल्या कृत्रीम संवेदनांचि जास्त काळजि घ्यायला हवी.

आपल्या शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठि चालणे वा पळण्यासारखे व्यायाम पुरेसे आहेत. आपण जे आहोत, जसे आहोत तसे पुरेसे आहे परंतु आपण हे मान्य करत नाहि व अधिकाधिक मिळविण्यासाठि सतत नवनविन शोध लावत असतो आणि या अट्टाहासापायी आपण आपले व निसर्गाचे अतोनात नुकसान करत असतो.

हव्यास व विचार एकत्रीत चालत असतात, विचारांमुळेच आपल्या जिवनामध्ये दुःख, अस्थीरता येत असते. जर आपण कसलीहि अपेक्षा ठेवली नाहि तर ते प्राप्त करण्याचे विचार येणार नाहित व आपणास दुःखांचि झळहि पोहोचणार नाहि.

- यू जी कृष्णमूर्ती
https://youtu.be/hF6-nfnIe7Y

No comments: