आपल्या जीवनात निसर्ग निर्मित गोष्टी असतात, मानव निर्मित जीवनावश्यक गोष्टी असतात. तशाच मानव निर्मित अनावश्यक संकल्पना सुद्धा असतात. जीवनावश्यक तेव्हढे ठेवून अनावश्यक असेल ते काढून जगणे म्हणजे विवेकी जगणे असते आणि तेच योग्य जगणे असते. - कृष्णमूर्ति
जे कृष्णमूर्ती यांची ही सर्वात महत्त्वाची चर्चा आहे. एखाद्याला हे समजल्यास, त्याला सत्य नक्कीच समजेल.
प्रश्नः रोजीरोटी मिळविण्या मागील योग्य हेतू काय आहे? योग्य जगणे म्हणजे काय असावे?
कृष्णमूर्ती: जीवन जगण्याचा योग्य हेतू काय असावा असा प्रश्न आहे काय?
हेतू सोपा, फायदेशीर किंवा आनंददायक किंवा लाभदायक असावा असे नाही, परंतु योग्य जीवनशैली म्हणजे काय? आणि तो हेतू बरोबर असेल हे आपण कसे सांगू शकाल?
बरोबर म्हणजे नेमके काय आहे? ती पुन्हा एक अतिशय जटिल गोष्ट आहे.
'बरोबर' या शब्दाचा अर्थ अचूक असा आहे.* आपण स्वार्थासाठी किंवा मौजमजेसाठी काहीतरी केले तर ते अचूक असू शकत नाही - बरोबर? योग्य जीवनशैली काय आहे हे समजण्यासाठी आपण प्रथम वास्तविकता म्हणजे काय ते पाहिलेच पाहिजे.
मानवी विचारांनी जे काही निर्मिले आहे ते सर्व वास्तव आहे. हा तंबू उभारण्यासाठी विचार करावा लागला आहे म्हणून तो सुद्धा वास्तव आहे. समोरील वृक्ष विचारांनी निर्मिलेला नाही परंतु तो सुद्धा एक वास्तव आहे. काल्पनिक संकल्पना सुद्धा वास्तव आहेत. आणि त्यांच्या भ्रमातून झालेली कृती विक्षिप्त आहे ती सुद्धा वास्तविकता आहे. आणि वास्तविकता म्हणजे सत्य नव्हे. सर्व प्रकारच्या श्रद्धा भ्रम आहेत आणि त्यांच्या क्रिया विक्षिप्त असतात.
वास्तविक जीवनात बरोबर काय आहे हे दुसऱ्यांचे न ऐकता स्वतः शोधायला हवे. दुसरे आपणास सांगू शकत नाहीत. *जेव्हा आपण भ्रामक संकल्पना टाळून वास्तविक जीवनाकडे पाहु, ते पाहणे आणि त्याचे आकलन होणे हा विवेक आहे.* वास्तव आणि भ्रम यांची सरमिसळ नसणे म्हणजे विवेकवृत्ती आहे. *हि विवेकबुद्धी मग आपणास सांगत असते की योग्य आणि अयोग्य काय आहे ते.
सारासार विवेक म्हणजे सत्य आणि असत्य काय आहे हे ओळखणे होय. सत्य काय आहे हे पाहताना कोणत्याही मानसिक, काल्पनिक भ्रम साथीला नसावेत. आपण जेथे जावू तेथे विवेक बुद्धीचा वापर करू लागतो, म्हणजेच विवेकबुद्धी हीच बरोबर काय आहे हे ठरवीत असते.
मग सत्य काय असावे?
अर्थात ते वास्तविकता नक्कीच नाही. जे भ्रामक हि नाही आणि वास्तविक सुद्धा नाही असे जे काही आहे ते सत्य आहे. सत्य अवस्था हि विवेक बुद्धी द्वारा वास्तविक आयुष्यात कार्य करत असते.
( कृष्णमूर्ती यांनी इथे illusion / भ्रम, reality / वास्तविकता आणि Truth / सत्य अवस्था अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. आपल्या जीवनात नदी, डोंगर, झाडे आदि नैसर्गिक गोष्टी असतात, मानवाने बनविलेल्या घरे, रस्ते आदी वास्तविक गोष्टी असतात तशाच देव, देश, धर्म, जात आदि केवळ भ्रामक संकल्पना सुद्धा असतात. आपण या भ्रामक संकल्पनांना आपल्या वास्तविक जीवनातून काढून टाकल्या तर केवळ नैसर्गिक आणि जीवनावश्यक गोष्टीचं आपल्या जीवनात शिल्लक राहतील. भ्रामक कल्पना काढून टाकून संकल्प विकल्प रहित जीवन जगण्यासाठी विवेक बुद्धी लागते. ही विवेक बुद्धी सत्य अवस्थेची देणगी असते. वास्तविक जीवनातून भ्रामक संकल्पना काढणे हेच सत्य अवस्थेची क्रिया असते आणि तेच सत्य असते).
(SAANEN 7TH PUBLIC TALK 25TH JULY 1976).

No comments:
Post a Comment