आपले घर, आपल्या व्यवसायाची जागा, आपला परिसर हे व्यवस्थित राखण्यासाठी तेव्हढी बुद्धिमत्ता आणि तेव्हढी जबाबदारीची काळजी असणे आवश्यक असते.
म्हणजे सुव्यवस्थित अवस्था असण्यासाठी intelligence आणि compassion हे अंगभूत असणे आवश्यक असते.
Compassion, intelligence हे उसने आणता येत नाही, विकत घेता येत नाही, ते मानसिक रित्या तयार करता येत नाही. त्यासाठी गुरु आणि त्यांचे courses करून ते शिकता येत नाही.
आपले जीवन सुव्यवस्थित नाही आणि ते सुव्यवस्थित असलेच पाहिजे याची जाणीव होणे हीच ती अंतर्दृष्टी / आकलन असते ज्यामुळे परिवर्तन शक्य असते.
संपूर्ण विश्व हे कमालीचे सुव्यवस्थित (in order) आहे. या सुव्यवस्थित अवस्थेचे स्वतःचे अंगभूत असे Intelligence असते आणि ते विश्वातील सर्वांची काळजी घेत असते.
आपला वैयक्तिक मी हा हजारो वर्षांच्या मानवी संस्कृती चा प्रातिनिधिक भाग आहे. मानव समाजाची जी धारणा असते तीच आपल्या मी याची धारणा असते. मी याच्या मानवी धारणेला त्यांच्या अंगभूत अहंकार मुळे वैश्विक सूव्यवस्थेचे आकलन होणे शक्य नसते. त्यामुळे मानवी अहंकार हा त्याची स्वतःची वेगळी मानसिक व्यवस्था ( disorder ) निर्माण करीत असतो. ज्या व्यवस्थेचा पाया हा विभाजन, अहंकार आणि मी असतो ती व्यवस्था कधीही सुव्यवस्था होणे शक्य नसते. मानवी अहंकार मधून बनलेल्या सर्व मानवी व्यवस्था मध्ये संघर्ष अटळ असतो.
जी व्यक्ती प्राधान्याने आपले जीवन सुव्यवस्थित करते म्हणजे स्वतःमधील सर्व मानवी धारणा नाहीशा करते त्यावेळीच तो वैश्विक सुव्यवस्थेशी सहजरीत्या जोडला जातो. विश्र्वा मध्ये सुव्यवस्था आहे फक्त मानवी मनाला त्याच्या अव्यवस्थेमुळे ती कळत नाही.
आपल्या मानसिक धारणांच्या मानसिक धरणाने आपण आपला जीवन प्रवाह कोंडून ठेवला असतो. मी ची भिंत नाहीशी झाली की सर्व काही सुव्यवस्थित होते.
Order बाबतचे J Krishnmurti यांचे विचार खालील व्हिडिओ मध्ये आले आहेत.
https://youtu.be/mxoe9IrLdfo
No comments:
Post a Comment