Dr David Bohm: या विश्वाच्या मूळ आधाराचे स्वरूप काय असावे? आणि ते जे काही असेल त्याचा मानवामध्ये काही रस असावा का? त्याच्यामुळे मानवाच्या वर्तनात बदल होण्याची शक्यता आहे काय?
कृष्णमूर्ती: विश्वाचा मूळ आधार असावा ही केवळ कल्पना आहे काय? एक भ्रम आहे काय, एक तत्वज्ञान आहे काय? किंवा, ज्या अर्थाने ते मूळ आधार आहे त्यापलीकडे परत दुसरे काही नाही ना? याचा तपास करावा लागेल.
डीबी: होय, मूलभूतपणे आपण असे म्हणतो की जे काही सत्य असेल ते मूलतः अज्ञात आहे. म्हणून आपण पूर्व ज्ञानापासून सुरुवात करू शकत नाही. अज्ञाताचा शोध घेण्यास अज्ञाता पासून प्रारंभ करायला हवा.
कृष्णमूर्ती: एखाद्याचे मन जे पुरातन ज्ञानाद्वारे विकसित झाले आहे, ज्यास त्या ज्ञानाने अत्यंत शिस्तबद्ध केले आहे ते मन हे कसे जाणू शकते? कारण ते जे काही अज्ञात असावे ते पूर्व ज्ञान असू शकत नाही, ते विचारांनी सुद्धा आकलन केले जावू शकत नाही.
ते जे काही अज्ञात आहे, जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भ्रम आहे, जोपर्यंत इच्छा, आनंद, भीती आणि या अशा सर्व मी च्या गोष्टीं आहे तो पर्यंत अज्ञाताला स्पर्श करता येत नाही. याचा अर्थ मूळ अधिष्ठान ही एक केवळ कल्पना आहे काय? किंवा ते असे काहीतरी असावे ज्याचा तपास केला जाऊ शकत नाही, ते नेहमी अज्ञातच राहील?
आपली मने पूर्व अनुभवाद्वारे आणि पूर्व ज्ञानाने संस्कारित, अनुशासित केली आहेत आणि अशी मने त्या ज्ञात ठिकाणीच कार्य करू शकतात, ती मने अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील काय? आणि समजा एखादा असे सांगू लागला की, मूळ अधिष्ठान ही केवळ कल्पना नाही, ते तात्विक संकल्पना नाही, ते विचारांनी एकत्र केले जाऊ शकत नाही किंवा ते विचारांनी आकलन केले जाऊ शकत नाही. तर जिज्ञासू माणूस या गोष्टीची कशा प्रकारे अनुभूती घेवू शकतो, त्यास कसा स्पर्श करू शकतो किंवा ते कसे समजून घेवू शकतो?
शब्द ते व्यक्त करू शकत नाहीत, त्यामुळे गुरु आणि त्यांचे ग्रंथ उपयोगाचे नाहीत. मग आपल्याकडे असे तंत्र असले पाहिजे जे सर्व प्रकारच्या ज्ञात ज्ञानापासून आपणास मुक्त करेल. मी प्रयत्न करेन असे म्हणावे तर तेही स्वार्थी इच्छेतून जन्माला येते.
मग मी काय करावे? मला वाटते हा साधारण प्रश्न नाही. हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे.
मी या प्रश्नाकडे कसे जाऊ? मला ते अव्यक्त आणि अज्ञात शोधायचे आहे. माझ्या मते जे जीवनाला अर्थ देते, जीवनाचा आधार आहे ते शोधणे, समजणे याचे मानवी जीवनात अपार महत्व आहे.
डीबी: मानव समाजाने जे जीवनाला महत्त्व देते तिथे देवाची कल्पना वापरली आहे.
कृष्णमूर्ती: नाही, नाही. देव हि फक्त एक कल्पना आहे, ती आपल्या मनाची कल्पना आहे, मनाची कल्पना मधून मन मुक्त नाही होवू शकत. आपण सांगता की ते जे काही अज्ञात आहे ते विचारांनी तयार केलेले नाही. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मानसिक कल्पनांच्या आधारे अज्ञाता पर्यंत येऊ शकत नाही. एक प्रामाणिक, विचारवंत माणूस म्हणून मी हे सर्व सर्वस्वी नाकारतो.
कारण सर्वप्रथम देव हे सर्वश्रुत, श्रद्धा आणि म्हणून ते सामान्य ज्ञान झाले आहे. सामान्यतः सगळेच तसे श्रद्धेने देव मानतात, तेथे त्यात इच्छा, आशा, भीती यांनी निर्माण केलेल्या भ्रमाची एक मोठी भावना आहे.
( कृष्णमूर्ती आणि Dr David Bohm यांच्या मध्ये १९८० साली Ojai, California येथे झालेली चर्चा )
क्रमशः…..

No comments:
Post a Comment