What is the point of listening to the speaker and not living it. In the listening and not doing is the wastage of life. If you listen to something that is true and not acting you are wasting your life. Life is much too precious, it is the only thing that we have. And we have also lost touch with nature. Which means we have lost touch with ourselves which is part of nature. When one realises all this not merely intellectually and verbally then one lives religious life. - J Krishnamurthy
आता पर्यंत अनेक सत्य मार्गदर्शक येवुन गेले परंतु आपल्या जीवनातील दुःख संपत नाही, अंधकार नाहीसा होत नाही, प्रकाशाचा नेमका कोठे शोध घ्यावा कळत नाही.
एखाद्यास सत्य काय आहे हे कळल्यानंतर त्याच्या जीवनात परिवर्तन होते की त्याच्या जीवनात परिवर्तन होत असताना त्याला सत्य समजू लागते?
मनुष्यप्राणी सहसा इतरांचे ऐकून आपले जीवन बदलत नाही आणि सत्य स्वतःहून कोणाच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही, अतिक्रमण हा त्याचा स्वभाव नाही.
दोघेही आपापल्या मर्यादेत राहून आपापल्या मर्यादा सोडणार नसतील तर दोघे कधीकाळी एकत्र कसे येणार?
Let there be a Light, माझ्या जीवनात सत्य येवू दे हि हाक वास्तव जीवनातून सत्या पर्यंत पोहोचली की सत्य वास्तवाला वास्तवाच्या मजबूत भिंती पाडायला मदत करू लागते काय? कारण वास्तवाने जीवापाड मेहनत करून उभारलेले त्याचे विश्व पाडण्या ईतकी धमक आणि बुद्धीचे वैभव त्याच्या जवळ असेलच असे नाही. वास्तवाला अज्ञातामध्ये काय दडले आहे हे समजू शकत नाही आणि ज्ञातामधले सुख, सुरक्षा सोडवता येत नाही.
सुखाच्या एका रेषेत चाललेले आयुष्य मग अचानक भरकटू लागते, वास्तवातील एक एक मजबूत बुरुज ढासळू लागतात, जीवन असह्य होवू लागते, तहान भूक हरपते, नको ते जीवन असे वाटू लागते आणि त्याचवेळी ज्ञातातील सुख आणि सुरक्षा कवडीमोल आहेत हे कळून चुकते. जर ज्ञात जीवनात निरंतर सुख आणि सुरक्षा नसेल तर तसे काही नसतेच ती कदाचित अज्ञाताची खेळी असावी याचा स्वयं साक्षात्कार होतो आणि ते मन मग अज्ञातात उडी मारण्यास तयार होते.
एका अथांग जलाशयावर उसळलेली लाट काही काळ दिसते आणि नंतर नाहीशी होते. एक लाट शांत झाली तरी दुसरी परत उसळी घेते. जी लाट वरती जाते ती खाली येणार असते आणि जी खाली येत असते ती सागराशी एकरूप होत असते.
I have energy. The mind has energy now because I have pushed away all the things through observation, not through resistance that were dissipating energy.
विरोध न करता केवळ आकलनाने मी माझ्या वास्तव जीवनातील सर्व काही दूर केले आहे ज्यासाठी माझी शक्ती व्यर्थ वाया जात असे. ती शक्ती आता माझ्या जवळ आहे, ती शक्ती माझ्या मनाला अज्ञाताच्या प्रवासात मदत करील.
Krishnamurti from Dialogue 6 with Allan W. Anderson in San Diego, California, 20 February 1974
No comments:
Post a Comment