डेव्हिड बोहम: सत्य पाहणे म्हणजे यथार्थ पाहणे होय. एखाद्याला वास्तवातील विकृत रूप दिसते, परंतु तरीही ते त्याला सोडता येत नाही. तो विकृतींकडे कसे पाहू शकेन म्हणजे ते संपूर्ण सुटू शकेल आणि त्यामध्ये तो परत अडकणार नाही?
कृष्णमूर्ती: महाशय, खरी मेख इथेच आहे. विकृती पाहणे, ती नाहीशी होणे हि वैचारिक प्रक्रिया आहे की ती विवेकाचे आकलन आहे?
डेव्हिड बोहम: नाही, वैचारिक प्रक्रिया नक्कीच नाही.
(पूर्वसुरींचे ज्ञान कितीही महान असले तरी का कामास येत नाही? ते सर्व आता विचार मात्र आहेत).
कृष्णमूर्ती: तुम्ही म्हणता ते विचारांनी आकलन होत नाही; विचार प्रक्रिया केवळ त्याचे स्पष्टीकरण करताना उपयोगात येते, स्पष्टीकरण आणि वर्णन म्हणजे ते नव्हे.
यथार्थ पाहणे म्हणजे संपूर्ण पाहणे होय. ते तसे असलेच पाहिजे, अन्यथा ते पाहणे होत नाही. आणि जर मनाने खरोखर यथार्थ पाहिले तर विकृती कधीही परत येऊ शकत नाही.
डेव्हिड बोहम: होय, मी असे म्हणतो आहे की, वास्तव जीवनातील विकृतीचे स्थूल स्वरूप पहा, प्रत्येक लहान तपशील पहायची आवश्यकता नाही.
( उदा. संपूर्ण राजकीय व्यवस्था भ्रष्ट आहे हे लक्षात आले तर कोण अधिक भ्रष्ट आणि कोण कमी भ्रष्ट आहे याचा तपशील पाहणे महत्वाचे नाही. भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याशिवाय राजकारणात टिकणे अशक्य आहे, हे पाहणे आणि समजणे म्हणजे यथार्थ पाहणे होय).
कृष्णमूर्ती: नाही, नक्कीच नाही. तसे करीत राहिलो तर संमोहन जाणार नाही.
वैश्विक बुद्धिमत्ता, विवेक वास्तविक जीवनात ठराविक परिस्थिती मध्ये काय आणि कसे कार्य करतो हे कोणी अगोदर सांगू शकते काय? त्याचे भाकीत करू शकतो काय? त्याचे तपशील सांगू शकतो काय? किंवा असे आपण म्हणू शकतो काय की हे प्रश्नच विकृत आहेत?
डेव्हिड बोहम: ते काहीसे विकृत आहे. त्या प्रश्नांचा अर्थ असा होतो की वैश्विक बुद्धिमत्ता सुद्धा ही एक प्रकारची वास्तविकता आहे.
कृष्णमूर्ती: होय. परंतु आपण हेच सतत करीत असतो. जुन्या ग्रंथात केलेली वर्णने, भाकिते सत्य मानून त्याचे आचरण करीत राहतो. आपण गुरूंना प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडून सत्य आपल्या वास्तविक जीवनात येईल यासाठी विनवणी करीत असतो.
डेव्हिड बोहम: मला वाटते की एखाद्या माणसाकडे ज्ञान आहे असे सांगण्याऐवजी त्या माणसाच्या कृतीतून वैश्विक बुद्धिमत्ता कार्यरत आहे हे आपण समजू शकतो, असे म्हणणे योग्य होईल.
(म्हणजे ती व्यक्ती धार्मिक अधिकारी, अध्यात्मिक गुरु या परंपरेत अडकणार नाही).
क्रमशः...

No comments:
Post a Comment