[4/26, 1:34 PM] Vijay Pandhare: जागृती व स्वप्न ज्याप्रमाणे
एकाचवेळी एकाच ठिकाणी नसतात तसेच ही जाणीव नेणीव विरहीत अवस्था ही कधीच जागृतीचा भाग नसते .
बुद्धीच्या स्तरावर असेच आपण
सुषुप्ती ( unconscious)
तुर्या (universal
awareness.)
तुर्यातीत ( universal awareness not aware of itself )
अशा अनेक गोष्टींचे अर्थ काढुन आपल्याला ती अवस्था उमजली असा भ्रम करुन घेत असतो .
चार अवस्था निरासात ही जाणीव नेणीव विरहीत अवस्था आहे जे निर्वाण / परब्रह्म / शुन्य आहे .
🙏🙏
[4/26, 2:05 PM] Vitthal Sawant: विकार म्हणजे विचार, विचारांमुळे आपणास जाणीव नेणीव अवस्थेचे आकलन होत नाही परंतु त्या अवस्थेत आपण अनेकदा असतो.
आपण जे म्हणत आहात की आपण त्या अवस्थेत जातो म्हणजे विचार जातात, विचार त्या अवस्थेत जावू शकत नाहीत. आपण त्या प्राथमिक अवस्थेत असतोच फक्त विचारांमुळे जाणीव होत नाही, आणि त्या अवस्थेची जाणिव नसतेच.
[4/26, 2:08 PM] Vitthal Sawant: मन म्हणजे त्याच्यातील विचार, भावना, ज्ञान, अनुभव आदि सर्व काही. हे सर्व असलेले मन तरल आणि शुद्ध असू शकते काय.
[4/26, 2:41 PM] Vijay Pandhare: मनाचे
consc .,
subconsc.
unconsc.
universal consc .
असे
अनेक स्तर आहेत .
पृष्ठभागावरील तीन स्तर individual mind शी संबंधीत आहेत म्हणुन हे तीन्ही स्तर जबरदस्त विकारांच्या, विचारांच्या व भावनांच्या अधीन आहेत , individual विचार व भावना विकारच आहेत .
मनाचा चवथा स्तर वैश्विक आहे
जो vast unlimited space
ची अपरोक्ष अनुभुती आहे .
या चवथ्या स्तरावरील सर्व गोष्टी वैश्विक आहेत व या स्तरावरील विचार , भावना वैश्विक गुणानी युक्त असतात व या वैश्विक स्तरावरील , अनंत अपार आकाशा सारख्या अनुभुती प्रकटलेले मन हे शुद्ध व तरल मन म्हटले जाते कारण तेथे individuality चा भ्रम कार्यरत नसतो तर तेथे विश्वात्मकता कार्यरत असते व या वैश्विक मनाच्या ठिकाणी
दया करुणा प्रेम व प्रज्ञा हे गुण कार्यरत असतात .
वाफ , ढग , पाणी व गारा
या जशा पाण्याच्या विविध अवस्था निसर्गात आढळतात तसे
मनाचे/ consciousness चे विविध चार स्तर निसर्गात अस्तित्वात असतात .
याना सनातन हिंदु धर्मात चार अवस्था / चार कोष / चार देह / चार वाचा / चार consc. म्हटले आहे .
हे philosophical concept
नाहीत तर पाण्याच्या चार अवस्था प्रमाणे fact आहेत .
पण अपरोक्ष अनुभुती नसेल तर याना आपण हे philosophical
concept आहेत असा शिक्का मारुन मोकळे होत असतो , हे concept नाहीत .
लाखो कोटी मधुन एखाद्याच मनाला हा अपरोक्ष होताना आढळतो . हा बोध होण्यासाठी real meditation मधील observer is observed चा खराखुरा बोध झालेले
एक विशिष्ठ मन लागते .
observer is observed च्या समजेतुन निर्माण झालेली मनाची आत्यंतीक सजग निष्कामता
ही आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे .
🙏🙏🙏
[4/26, 3:38 PM] Vijay Pandhare: जाणीव नेणीव विरहीत अवस्था ही जागृतीची अवस्था नसते हे समजण्यासाठी चारी अवस्थांचा निरास अपरोक्ष अनुभुतीवर अनुभवला जाणे must आहे हा बौद्धीक concept नाही .
Unfolding of consciousness ,
किंवा
Then there is extreme fear
किंवा
Then there is vast space ( तुका आकाशा एव्हढा )
हे शब्द केवळ concept नाहीत तर त्या
अपरोक्ष अनुभुती आहेत .
खरे म्हणजे
सुषुप्ती ,
तुर्या
वा
तुर्यातीत
या अवस्था अपरोक्ष अनुभवल्या शिवाय
जाणीव नेणीव विरहीत अवस्था
उमजतच नाही .
समज तीन प्रकारची असते
(१) श्रवण व वाचनाची समज ( संमोहन )
(२) चिंतनाची समज
( संमोहन )
(३) अपरोक्ष समज
( चार अवस्था निरास )
चार अवस्था निरासात व्यक्तीचे आचरणात आमुलाग्र असा सहज अगदी प्रयत्न न करता बदल घडतो .
संत वचनांचा अर्थ real meditation मधील चार अवस्था निरासात कळतो असे माउली व उपनिषदे यानी नमुद करुन ठेवले आहे .
तर कृष्णमुर्ति नी consciousness unfolding मधे self realisation उमजते असे नमुद करुन ठेवले आहे .
बुद्धाने पंचस्कंध विघटनाच्या स्वानुभुतीत निर्वाण प्रकटते असे नमुद करुन ठेवले आहे.
Eternity - JK
शाश्वत चिरंतनता - माउली
निर्वाण / अमतं ( अमृततत्व )
- बुद्ध .
हे सर्व सामान्य मनासाठी अश्यक्यप्राय असल्यानेच दुधाची तहान ताकावर भागवणारे
short cut म्हणुन
सध्याचे प्रचलीत पारंपारीक सगुण साकार अध्यात्म उदयाला आले आहे .
खरे तर ही गोष्ट चर्चेच्या वा श्रवणाच्या वा वाचनाच्या वा चिंतनाच्या क्षेत्रातील गोष्ट नाही .
अपरोक्ष अनुभुतीला पर्याय नाही .
There is no path .
There is no guru .
You can not learn it from out side agency .
एक अंतरी निश्चळ ,
जे निहाळता केवळ ,
विसरले सकळ ,
संसारजात ll - माउली .
नातरी जाणीवेच्या आयणी ,
करता दधी कडसणी ,
अंतरी नवनीत निर्वाणी ,
दिसो लागे ll
बुद्ध म्हणतात ,
पर्यप्ती - पटीपत्ती - पटीवेदन ll
आतापी सम्पजानो सतिमान ll
कृष्णमुर्ति म्हणतात
Choiceless awareness is a process of intelligence .
🙏🙏
[4/26, 3:48 PM] Vijay Pandhare: Beyond words विषयी
words काही सांगु शकत नाहीत म्हणुन तसे काही नाही हे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे .
There is something beyond universal consciousness which is beyond words .
JK calls it absolute truth which can not be conveyed by words .
माउली म्हणते - परब्रह्म
बुद्ध म्हणतात - निर्वाण
🙏🙏
[4/26, 3:54 PM] Vitthal Sawant: Thanks Sir 🙏
एखादा झोपलेला नाही म्हणजे तो जागृत आहे असे आपण समजतो परंतु तो जागृत असून जाणीव नेणीव रहित अवस्थेत जेव्हा असेल त्या क्षणाना जागृत अवस्था समजू नये असे असावे.
मुळात जाणीव नेणीव अवस्था सर्वत्र आहे केवळ मनुष्य प्राणी त्याच्या विचारामुळे तिला समजू शकत नाही.
जागृत, स्वप्न, सुशुप्ति या देहधर्माने होत असतात.
[4/26, 3:56 PM] Vijay Pandhare: तेव्हा पंचभुते अस्तित्वात नसतात .
जागृतीत पंचभुते अस्तित्वात असतात .
जागृतीत फक्त घनघोर भ्रम असतो .
🙏🙏
[4/26, 4:00 PM] Vijay Pandhare: जागृती - पंचभौतिक देह .
स्वप्न - पृथ्वी तत्व शिवायची चार महाभुते .
सुषुप्ती - फक्त दोन भुते
आकाश व वायु .
तुर्या - फक्त एक भुत ( आकाश )
तुर्यातीत - पंचभुतातीत .
🙏🙏
[4/26, 4:01 PM] Vitthal Sawant: जे काही आहे ते विचारांनी बनविलेले आहे त्यामुळे विचारांच्या पलीकडे काहीच नाही. काहीतरी असावे अथवा नसावे हे सुद्धा विचारच ठरवितात.
जे विचारांनी बनविलेले नाही त्याला JK यांनी absolute truth संबोधले म्हणजे काहीतरी आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
[4/26, 4:08 PM] Vitthal Sawant: चारही अवस्था पंचभौतिक देहाच्या आहेत. विचार आणि मन सुद्धा भौतिक प्रक्रियेतून जन्मतात म्हणून ते सुद्धा भौतिक आहेत.
फक्त जाणीव नेणीव रहित अवस्था ही भौतिक नाही. ती शारीरिक नाही आणि मानसिक सुद्धा नाही.
जाणीव नेणीव रहित अवस्था ही सार्वत्रिक आहे. या अवस्थेमध्ये पंचभुतांचे विश्व उभे राहते.
[4/26, 4:24 PM] Vijay Pandhare: 👍👍
होय ,
पण
ते वेगवेगळे देह आहेत .
प्रथम जागृत देह सघन असतो .
स्वप्न मनोमय असतो .
सुषुप्ती प्राणमय असतो
तुर्या विज्ञानमय असतो .
त्यानंतर आहे , शब्दातीत
absolute awareness.
हे सर्व देह वेगवेगळे अपरोक्ष अनुभुतीवर येणे महत्वाचे .
जाणीव नेणीव रहीत अवस्था
सार्वत्रीक आहे हे ही खरे पण
चार अवस्था निरासा शिवाय
जाणीव नेणीव विरहीत अवस्था अपरोक्षपणे
उमजत नसते .
सुषुप्तीचा अपरोक्ष अनुभव नसेल तर पुढच्या अवस्थांचा प्रश्न उदभवत नाही .
बुद्धीच्या स्तरावर ची समज वेगळी व अपरोक्ष समज वेगळी .
या अपरोक्ष समजेला
JK direct understanding
म्हणतात .
🙏🙏
[4/26, 4:58 PM] Vijay Pandhare: जागृती ही द्वैत अवस्था आहे
तुर्या अद्वैत अवस्था आहे .
जाणीव नेणीव विरहीत जे आहे ते द्वैत - अद्वैता पलिकडे आहे .
अद्वैत ( ब्रह्म ) अपरोक्षपणे न अनुभवता , त्यापलिकडच्याची समज येईलच कशी ?
🙏🙏
[4/26, 5:53 PM] Vitthal Sawant: असेही असू शकते की, विचार करणे म्हणजे जाणीव असणे म्हणजे जागृत असणे, म्हणजे द्वैत अवस्थेत असणे होय.
विचार नसणे, जाणीव नसणे म्हणजे अद्वैत अवस्था असावी.
[4/26, 8:28 PM] Vijay Pandhare: बुद्धी व विचार ही individuality / द्वैताचे चे लक्षण आहे .
बुद्धीने व विचारानी कितीही खटपट केली तरी बुद्धीला व विचाराला अद्वैत अवस्था कळत नसते .
केवळ individualistic बुद्धी व individualistic विचार पुर्णपणे अस्ताला गेल्यावरच observation without observer मधे अद्वैत प्रकटते .
बुद्धी नेहमी personal व द्वैतात्मक असते .
द्वैतात जीवभाव असतो .
द्वैतात विचार individualistic असते व जाणीवही individualistic असते .
द्वैतात पाचही इंद्रिये हजर असतात .
अद्वैतात पाची इंद्रिये गैरहजर असतात .
अद्वैत अवस्था विश्वात्मक आहे .
( तुका आकाशा एव्हढा )
तेथे फक्त वैश्विक विचार ,वैश्विक जाणीव व वैश्विक प्रज्ञा असते .
अद्वैत अवस्था मनाचा सर्वात विरल स्तर आहे .
अद्वैत हे द्वैताचे अधीष्ठान आहे .
अद्वैतात फक्त एकच पंचभुत असते व अद्वैतात individuality नसते म्हणजे शरीर व इंद्रिये नसतात व म्हणुन षडविकार नसतात .
🙏🙏
[4/26, 9:05 PM] Vitthal Sawant: फक्त दोनच अवस्था आहेत, एक विचारांची आणि दुसरी विचार रहित.
विचार करणारी अवस्था सर्व कल्पना मांडत बसते. ती अवस्था विचार रहित अवस्थेस जानु शकत नाही.
बुद्धी ही विचारातून निर्माण होते, एखादा बुद्धीच्या वैभवाच्या आधारे अरूपास रूपाला आणु शकतो.
[4/26, 9:06 PM] Vijay Pandhare: अद्वैत प्रकटन होत असताना
जीवभावाचा म्हणजे seed of individuality चा म्हणजे सुषुप्तीचा निरास अनुभवला येतो जो मृत्यु चा अपरोक्ष अनुभव असतो .
जे .कृष्णमुर्ति याला ending of extreme fear म्हणतात . जो मृत्यु चा अनुभव असतो .
U.G. कृष्णमुर्ति म्हणतात
" Realisation is calamity "
तुकाराम महाराज म्हणतात
" ब्रह्मज्ञान नोहे लेकुरांच्या गोष्टी "
death experience मधे
मनाची समता रहाणे अट आहे
अद्वैत प्रकटनाची .
कोटी कोटी लोकात एखाद्या मनालाच ते शक्य होते .
माउली म्हणते ,
आस्थेच्या महापुरी ,
निघतात कोटीवरी ,
परी प्राप्तीच्या पैलतीरी ,
विरळा पोहोचे ll
🙏🙏
[4/26, 9:19 PM] Vijay Pandhare: अवस्था फक्त दोन म्हणणे अज्ञान आहे .
कारण
विचार असलेल्याच चार अवस्था असतात ,
consc.
subconsc.
unconsc.
व
universal consc.
चार वाचा सांगणारी माउली
चार अवस्था / चार कोष / चार देह वर्णन करणारी उपनिषदे
चार consc. चा उल्लेख करणारे कृष्णमुर्ति .
विचारयुक्त अशा या चार अवस्था माहीत नसतील तर मग विचार रहीत अवस्था नक्कीच माहीत नसते .
🙏🙏
[4/26, 10:04 PM] Vitthal Sawant: जे कृष्णमूर्ती यांनी consciousness म्हणजे त्याचे contents म्हणजे श्रद्धा, विचार आणि भावना आहे असे सांगून ते धुडकावून लावले होते. Different layers of consciousness सुद्धा ते विचारांच्या कल्पना समजत असतं.
UG Krishnmurti सुद्धा consciousness हे part of illusions समजत असत.
No comments:
Post a Comment