Tuesday, April 27, 2021

जाणीव नेणीव रहित अवस्था



U G Krishnamurti यांचा हा खूप महत्वपूर्ण संदेश आहे जर त्याची खोली लक्षात आली तर नैसर्गिक अवस्था म्हणजे काय हे समजू शकते.

UG: आपण आपल्या आसपासच्या जगाविषयी कधी सजग असतो? ज्यावेळी आपल्या भोवती काहीतरी घडत असते आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्या अंतर्मनात उमटत असतात त्यावेळी आपण सजग असतो, त्यालाच आपण जाणीव असणे असे म्हणतो. म्हणजे आपल्या आसपास जे काही घडत आहे ते जाणीव मध्ये येण्यासाठी आपणास विचारांची आवश्यकता असते. जर विचार नसतील तर आपणास आसपास काय घडत आहे आणि आपल्या भोवती कोणत्या व्यक्ती आहेत, त्यांचे आणि आपले काय संबंध आहेत हे कळणे शक्य होणार नाही. ज्यावेळी आपणास जाणिवेची शुद्ध असते त्यावेळी आपण (बेसावध / बेशुद्ध) unconscious नसतो.

परंतु असे काही क्षण असतात जेव्हा आपण जाणीव पूर्वक विचार करीत नसतो, आपण जाणीव अवस्थेत नसतो आणि आपण बेशुद्ध / बेसावध सुद्धा नसतो.

जागृत अवस्थेतील अशा जाणीव नेणीव रहित क्षणांची आपण कल्पना करू शकत नाही कारण आपण त्यावेळी सजग नसतो, विचार करीत नसतो परंतु जागृत असतो.

ही जी जाणीव नेणीव रहित अवस्था आहे ती तिच्या नैसर्गिक आणि सहज वृत्तीने कार्य करीत असते, किंबहुना तेच आपले खरे जीवन असते.

या जाणीव नेणीव रहित अवस्थेला तिच्या नैसर्गिक आणि सहज रित्या कार्य करण्यास आपले विचार मज्जाव करतात.

विचार हे आपल्या अस्तित्वाचे संरक्षण आणि संवर्धन साठी आवश्यक असतात आणि ते मरेपर्यंत येतच राहतात.

आपणास आपल्या संरक्षण आणि संवर्धन यांची फिकीर नसेल आणि जर आपणास नैसर्गिक आणि सहज जीवन जगावेसे वाटत असेल तर विचारांनी बनविलेल्या अवाढव्य काल्पनिक कृत्रिम जगातून निवृत्त व्हावे लागेल, तसे जगावे लागेल. 

कुटुंब, समाज, धर्म, देश, देव हे सर्व विचारातून जन्मलेले आहेत. सहज आणि नैसर्गिक जीवन जगण्यासाठी या सर्वांचा उपयोग नसतो तर अडथळा असतो. यांच्यात राहिलो तर कोणाची तरी authority स्वीकारावी लागते किंवा आपणास authority बनावे लागते. Authority मधून ego, conflicts निर्माण होत असतात जे जीवन विरोधी आहेत.

No comments: