हिंदू पौराणिक कथांमध्ये त्रिदेव हि एक संकल्पना आहे.
विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेव, विश्वाचे संचालन, संवर्धन करणारे विष्णू तर विश्वाचा संहार करण्यासाठी शिव अशी ती संकल्पना आहे.
वेदांची रचना ब्रह्मदेवाने केली असे म्हटले जाते. वेद म्हणजे ज्ञान भांडार ते ब्रम्हदेवांनी निर्मिले.
विष्णू यांचे दहा अवतार आणि त्या अवताराच्या रंजक पुराण कथा प्रसिद्ध आहेत. विष्णू यांचे वाहन असणाऱ्या गरुड यांची सुद्धा गरुड पुराण कथा आहे. राम - कृष्ण यांना सुद्धा विष्णू अवतार समजले जातात आणि त्यांचे रामायण - महाभारत प्रसिद्ध आहेच.
शिव यांच्या कथा या विरक्त, सन्यस्त, स्मशानवास करणाऱ्या रानटी लोकांच्या आणि बहुतेक संहाराच्या कथा आहेत.
या कथांमधून थोडेसे बाहेर आलो तर असे लक्षात येते की,
माहिती, विचार, ज्ञान या द्वारे संमोहन करण्याची सुरुवात करणारी जी शक्ती ती ब्रम्हदेव असावी.
निर्माण झालेल्या विचार, माहिती, संकल्पना, ज्ञान यांचे संमोहन, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणारी जी शक्ती आहे ती विष्णू असावी.
विचार, माहिती संग्रह, संकल्पना, ज्ञान यांच्या सन्मोहनचे विष जेव्हा गळ्यापर्यंत येते तेव्हा त्या अज्ञानाने उन्मत्त झालेल्या प्रजापतींचा संहार करणारी जी शक्ती ती शिव शक्ती असावी.
सत्य हे शिव आहे आणि तेच सुंदर आहे.
त्रीदेव = विचारांची निर्मिती + विचारांचे संगोपन + विचारांचा संहार
त्रिदेव या व्यक्ती किंवा दैवते नसून त्या शक्ती आहेत. त्या शक्तींच्या कथा बनविणे, त्यांचा अपप्रचार करणे म्हणजे संमोहन होय. जोपर्यंत शिव समाधिस्त आहे, त्याने डोळे मिटलेले आहेत तोपर्यंत आपल्या संमोहनाची दिवाळखोरी चालू राहते.

No comments:
Post a Comment