Truth is pathless land असे JK म्हणतात याचा सरळ सरळ अर्थ असा वाटतो की सत्य प्राप्तीचा कोणताही मार्ग नाही.
परंतु त्याचा इतर अर्थ असा असू शकतो की पूर्वी कोणीही न चोखाळलेला रस्ता, आपला स्वतःचा मार्ग असाही अर्थ असू शकतो. यासाठी total independence आवश्यक असावे.
एखादे ज्ञानी आपले मित्र आहेत, त्यांच्या बरोबर राहिलो, त्यांच्या पुस्तकांची पारायणे करीत राहिलो की काम संपले असे वाटण्याची शक्यता असते. यामध्ये आपण आपले स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो. स्वतः काही वेगळा प्रयत्न न करता त्यांच्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याच्या खाजगी मालकीच्या मार्गाने आपण जावू शकतो परंतु आपण त्याचे मालक नाही बनू शकत, असे कदाचित intelligence चे नियम असू शकतात.
एखाद्या realised master च्या सानिध्यात राहण्याचे भाग्य लाभू शकते, त्याचे संस्कार मिळू शकतील, ते मार्ग सुद्धा दाखवतील परंतु तरीही सत्य समजणार नाही कदाचित तो मार्ग उघडण्या आधी आपणास काही वेगळ्या अनुभवा मधून जावयाचे बाकी असेल, काही अग्नी परीक्षा द्यायच्या बाकी असतील आणि आपली ती तयारी नसेल. May be, just speculations.
1 comment:
����������
मी चा अपरोक्ष निरास ही अग्नी परीक्षा आहे या
अग्नीपरीक्षेला जीव तयार नसतो हाच खरा अडथळा आहे.
हा अडथळा दुर करण्यास सतसंग catalyst चे काम करतो. Self चे मायावी स्वरुप समजुन त्या समजेत सेल्फ चा अपरोक्ष मृत्यु ची घटना घडते .
अपरोक्ष मृत्यु अनुभुती हीच अग्नीपरिक्षा आहे .
मन प्रक्रियेतील द्वैत बोध महत्वाचा .
observer is observed
ही insight आहे जी तुम्हाला अग्नी परीक्षेपर्यंत नेते पण त्या अग्नीपरीक्षेत टिकणे हे ज्याचे त्याचे संचित आहे . पण त्या आणीबाणीत अपरोक्षपणे मरणाला सहजपणे सामोरे जाणे सतंगामुळेच शक्य होते .
ही भीती खुप साधकाना अनुभवला येते पण भितीचे , मीचे व consciousness चे नीट आकलन व त्या भितीला घाबरु नकोस ,
Be there , Don't move .
हे JK चे शब्द काम करुन जातात .
या extreme भिती चा अनुभव ही वैश्विक प्रक्रिया आहे व ही अग्नीपरीक्षा देणे जीवाला कधीच आवडत नसते हा प्रोब्लेम आहे .
आपल्या जिवनात येणारी संकटे व दुख ही तुम्हाला training देण्यासाठी व perfection
वाढावे म्हणुन निसर्गाने योजलेली योजना आहे .
मनाच द्वैत स्वरुप व मनाची द्वैत प्रक्रिया म्हणजे observer is observed हे खरोखर समजल तर काळाच्या अंताची calamity रुपी अपरोक्ष अनुभुती अग्नी परीक्षा म्हणुन समोर उभी ठाकते,पुढे आपले आपले संचीत .
J K यालाच flight of egle म्हणतात ज्याला माउली विहंगम मार्ग म्हणते .
JK म्हणतात,
That flight does not leave any trace behind . That is the meaning of
Truth is path less land.
ती घटना अवचीतपणे निष्काम सजग अवस्थेतच घडते हे मात्र खर .
- श्री विजय पांढरे
Post a Comment