Friday, July 10, 2020

आत्म साक्षात्काराची प्रक्रिया

एका साधकाने प्रश्न केला आहे की बहुतेक सर्व संत म्हणतात की आत्मा हा निर्गुण निराकार व अमर आहे, व हा आत्मा प्रत्येक जीवात निवास करतो व जीवा ठायीच्या मन व इंद्रियांच्या अनुभवाने हा आत्मा जाणत असतो, असे असताना गौतम बुद्ध म्हणतात की आत्मा नावाची मन इंद्रियाना जाणणारी काहीही चिरंतन वस्तु नाही, त्या निर्गुण वस्तुला त्यानी शुन्य हा शब्दही वापरला आहे. कृष्णमूर्ती देखील त्या निर्गुण वस्तुला Nothingness म्हणतात, पण that is not self and "There is no self " असेही स्पष्ट वक्तव्य ते बुद्धाप्रमाणे करतात. अशा विरोधाभासी statements मुळे गोंधळ होतो, जर हे सर्व साक्षात्कारी संत आहेत तर त्यांच्यात एकवाक्यता का नाही? 

उत्तर: या आपल्या मनातील गोंधळाला कारण आहे आपल्याला असलेले अस्तित्व प्रक्रियेसंबंधीचे अज्ञान.
अस्तित्व प्रक्रियेचे अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय याचा खुलासा श्रवण वा वाचन करुन होवु शकत नाही. तरी तर्काचे सहाय्य घेवुन आपण समजण्याचा प्रयत्न करु. 

संताचा आत्मा शब्दामागील लक्षार्थ, बुद्धाचा अनात्म वा शुन्य शब्दाचा लक्षार्थ व J.Krishnmurti चा 
" no self " किंवा Nothingness या शब्दाचा लक्ष्यार्थ, संतानी वापरलेल्या आत्मा या शब्दाचा त्यांच्या मनातील लक्षार्थ व आपल्या मनातील आत्मा या शब्दाचा अर्थ यांचा ताळमेळ लागत नसल्याने हा गोंधळ झाला आहे. या गोंधळावर आज स्पष्ट व निष्पक्षपणे चिंतन करु. 

ही जी मतभिन्नता वाटते तीच्या कारणाचा शोध आपण घेवु. अस्तित्व प्रक्रियेचे संपुर्ण ज्ञान जो पर्यंत Real meditation मधे होत नाही तो पर्यंत, ही संपुर्ण अस्तित्व प्रक्रिया कळत नाही व मग ग्रंथात लिहिलेल्या गोष्टीबाबत काही तरी कल्पना करुन आपण आत्मा असा असा आहे असे म्हणत असतो, जी वस्तुस्तिथी नसते केवळ कल्पनाविलास असतो म्हणुन मत मतांतरे असतात. 

आत्मज्ञानी व्यक्ती मधे मतभिन्नता नसते.ते कोणताही शब्द वापरोत त्यांच्या शब्दांचा लक्ष्यार्थ एकच असतो.

सर्वात प्रथम आपण आत्मा कशाला समजतो याचे चिंतन केले तर लक्ष्यात येते की सामान्य माणसाला वाटते की प्रत्येकाच्या शरीरात आत्मा असतो व प्रत्येक शरीरातील आत्मा वेगळा वेगळा असतो, मृत्यु होतो तेव्हा हा आत्मा शरीर सोडुन जातो व हाच आत्मा नंतर जन्मालाही येतो व या शरीरातील मन इंद्रियांचे अनुभव हा आत्मा घेत असतो, अशी साधारण माणसाची मान्यता असते. आता ही वैयक्तीक आत्म्याची कल्पना कशी चुकीची आहे हे आपण अगदी सामान्य logic नेही लगेच तपासु शकतो.

आत्म्याच्या बाबत गीतेत उल्लेख येतो की आत्मा एक अमर, चिरंतन, omnipresent, omnipotent, अनंत, अपार वस्तु आहे या आत्म्याला मरण नाही व हा आत्मा कशानेही जळत नाही व कोणतेही शस्त्र त्याचे तुकडे करु शकत नाही. आता जर आत्म्याचे तुकडे होतच नाहीत तर प्रत्येक शरीरात वेगवेगळा आत्मा आहे ही मान्यता चुकीची ठरते. 

आता सर्व धर्मात आणि सर्व संप्रदायात आत्म्या संबंधी सांगीतलेली अजुन एक कल्पना पाहु. संत म्हणतात, सर्व शरीरात एकच विश्वात्मक आत्मा वास करत असतो व हा आत्मा विश्वात्मक तसेच निर्गुण निराकार व चेतन असतो. सर्व जीव या विश्वात्मक आत्म्यात रहातात व हा वैश्विक आत्मा सर्व जीवांना मन इंद्रिया मार्फत जाणत असतो म्हणजे मन इंद्रियाना जे जे अनुभव येतात त्या सर्व अनुभवाना जाणण्याचे काम आत्मा करत असतो. 

आता या मान्यतेत काय चुक आहे ते पहा अगदी logically जरी विचार केला तरी ही मान्यता कशी चुक आहे हे पहाता येते. एका बाजुला म्हणायचे आत्मा निर्गुण निराकार आहे, निर्गुण आहे म्हणजे त्यात एकही गुण नाही आणी दुसरीकडे म्हणायचे तो सर्व प्राण्यातील मन इंद्रियातील अनुभवाना जाणतो असे विरोधाभास या मान्यतेत आढळतो आणी सत्य परीस्तिथी तर अशी आहे की हा आत्मा निर्गुण निराकार असल्याने स्वत: ही स्वता:ला जाणत नसतो, जो स्वतालाही जाणत नाही तो सर्व भुतांच्या मन इंद्रिय अनुभुतीला जाणतो असे म्हणणे विरोधाभासी असल्याने ही मान्यता देखील चुक ठरते. 

संत ज्याला निर्गुण निराकार म्हणतात त्याला बुद्ध शुन्य म्हणतात व कृष्णमुर्ती Nothingness म्हणतात या तीन statement मधे कोणताही विरोधाभास नाही.

मग पुढचा प्रश्न उपस्थीत होतो जर आत्मा चेतन असुन जाणत नाही तर मग मन इंद्रियांचे अनुभव येतात तरी कोणाला? म्हणजे हे जे कळत ते कोणाला? 

आता एक एक करुन आपण विचार करु, प्रथम आपण डोळ्याना जो अनुभव येतो त्याचा विचार करु.

प्रथम विचार करु की श्वास सतत सुरु असतो या श्वासाला कळते का तर उत्तर येते की श्वासाला कळत नाही, मग पुढचा विचार करु शरीराला कळते का? तर उत्तर येते की शरीर तर जड आहे व जडाला कळत नाही म्हणुन शरीराला ही कळत नाही. मग विचार करु डोळ्याला कळते का? पण उत्तर येते की कारण डोळे जड आहेत आणी जडाला तर कळत नाही म्हणजे डोळ्यानाही कळत नाही आणी जडाला कळले असते तर मग प्रेताच्या डोळ्यानाही कळले असते पण प्रेताच्या डोळ्याना कळत नाही म्हणजे डोळ्यानाही कळत नाही.

मग विचार करु की मनाला कळते का पण मन तर material process आहे व material म्हणजे पंचभुते आहेत व पंचभुते तर जड आहेत म्हणुन मनालाही कळत नाही. मग कळते कोणाला? कारण कळते तर आहेच मग कोणाला कळते? श्वास घेतला हे श्वासाला कळत नाही, शरीराला कळत नाही, डोळ्याला कळत नाही व मनालाही कळत नाही, मग कळते कोणाला? कारण शरीर जे चेतन व जड तत्वाचे गाठोडे आहे यात चेतन स्वता: स्वता:ला जाणत नाही व जड तर जडच आहे, अनुभव चेतनला येत नाही व जडालाही येत नाही. 

शरीर व मन याशिवाय कळणे किंवा जाणणे हे जागृती, स्वप्न, सूषुप्ती या इतर अवस्थांमध्ये सुद्धा चालू असते. परंतु एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जाणत नसते. जागृतीतील मन इंद्रियांचे अनुभव स्वप्नावस्थेत येत नसतात तसेच ते अनुभव सुषुप्तीलाही येत नसतात व सामान्य मन इंद्रियात बेहोष असलेल्या माणसासाठी तर सुषुप्ती ही गाढ निद्रा असते म्हणुन मन इंद्रियांचे अनुभव सुषुप्तीलाही कळत नसतात. अंत:करणाची पुढची अवस्था आहे तुर्या वा ब्रह्ममयता जो universal consciousness आहे, वैश्विक जाणीव आहे पण ही पण अंत:करणाची एक अवस्था आहे व एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जाणत नसते म्हणुन मन व इंद्रियांचे अनुभव ब्रह्माला किंवा तुर्येलाही येत नसतात व त्या शेवटच्या निर्गुण निराकाराला तर स्वताची पण जाणीव नाही, ते तत्व कोणालाच जाणत नाही त्या तत्वाला कोणाचाच पत्ता नाही, मन इंद्रियांच्या अनुभवाचाही पत्ता नाही व चारी अवस्थांचाही पत्ता नाही. अशी सर्व सत्य परीस्थिती आहे. पण आपणाला अनुभव येत आहेत व अनुभव येणारा मी हा तर इंद्रिय ही नाही, मन ही नाही, जागृतीही नाही, स्वप्नही नाही, सुषुप्ती ही नाही, तुर्या/ ब्रह्म ही नाही व त्या पलीकडचे निर्गुण निराकार तत्वही नाही कारण माझी मला जाणीव आहे व निर्गुणाची जाणीव तर निर्गुणाला नाही म्हणुन मी निर्गुण सुद्धा नाही. 

मग आपणाला मन इंद्रियांचा अनुभव येतो तरी कसा हा मोठाच गहन प्रश्न आहे. जे काही मन व इंद्रियांचे अनुभव आहेत ते मी ला कळतात पण हा मी कोण हे काही कळत नाही. 

हा मी न कळणे म्हणजेच अज्ञान होय, अविद्या होय, माया होय, द्वैत होय,अहंकार होय.

आपण बुद्धीच्या सहाय्याने खुप शोध घेतला पण बुद्धीला हा मीचा बोध कधीच होवु शकत नाही. तुम्ही डॉक्टर असा की Engineer असा कीप IAS असा की IPS असा, आमदार खासदार असा की मुख्यमंत्री असा की पंतप्रधान असा की nobel prize winner शास्त्रज्ञ असा तुम्हाला हा बोध होवुच शकत नाही, हा बोध फक्त ज्याला real meditation समजले व अंतरंगातील चारी अवस्थांचा निरास ज्या मनाने अपरोक्षपणे आपल्या अंतरंगात अनुभवला त्या चार अवस्था निरासातच हा बोध प्रकटतो, दुसरा इलाजच नाही.

या real meditation मधे व चार अवस्था निरासात असे होते तरी काय ज्यामुळे हा बोध प्रकटतो हे पहाणे देखील मोठे मार्गदर्शक ठरेल. अर्थात real meditation मधील अपरोक्ष अनुभुतीशिवाय ही गोष्ट कळणे फारच कठीण आहे. 

सर्व संतानी ही गोष्ट त्यांच्या हयातीत समजावुन सांगीतलेली आहे, त्यांचे ग्रंथ या गोष्टीचे पुरावे आहेत. पण त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ अज्ञानी मन समजुच शकत नसल्याने व समजावणारे ९९.९९ % अज्ञानी असल्याने संतशिकवणीच्या अर्थाचा बेअर्थ काढुन तो बेअर्थ समाजात प्रचलीत होण्याचे अज्ञान कार्य अज्ञानात घडलेले दिसते. अन्यथा अध्यात्माची ईतकी अधोगती झाली नसती ती सद्या जितकी झाली आहे. 

संतानी सांगीतले की सृष्टी ही नाम -रुपात्मक असुन अनित्य व अनात्म आहे. याच्यातील कोणतीच गोष्ट नीटपणे न समजल्याने अध्यात्म भलतीकडेच भरकटुन गेले आहे. संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम, एकनाथ महाराज, वेदांत व उपनिषदे यातील नाम - रुपाचा अर्थही कोणाला समजला नाही.

नामाला तर शब्द समजुन शब्द रटण्याचा प्रकार संताचे नावाखाली काही जणानी केल्याचे दिसुन येते. संतानी तर अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याची दखल न घेता संताचे नाव सांगुन नकली सकाम अध्यात्म समाजात रुढ केले यात शंका ती काय? 

आता आपण नाम - रुप या शब्दाचा खरा अर्थ पाहु कारण नाम - रुप समजल्या शिवाय real meditation ला सुरवातच होत नाही. 

नाम - रुप म्हणजे
  • psycho - physical Phenomenon.
  • मनो - कायीक प्रक्रिया 
  • Psycho - somatic प्रक्रिया.
  • Mind - matter phenomenon
  • Time - space phenomenon. 

अगदी सोप्या शब्दात समजुन घ्यायचे असेल तर 

नाम -रुप प्रक्रिया म्हणजे मन प्रक्रिया. Mind process. Mind - matter, चित - जड प्रक्रिया.

गीतेत म्हणतात 
  • पुरुष - प्रकृती 
  • ज्ञान - विज्ञान 
  • क्षर - अक्षर 
  • क्षेत्रज्ञ - क्षेत्र 
  • अव्यक्त - व्यक्त 
यालाच 
  • द्रष्टा - दृश्य 
  • ज्ञाता - ज्ञेय 
  • अनुभव - अनुभविता 
  • subject - object
वेदांतात म्हणतात 
  • अहम - इदम 
  • I and you 
  • I am that 
  • तत्वमसी 
  • अहम ब्रह्मास्मी 
  • द्रष्टाच दृश्य आहे 

J krishnmurti म्हणतात,
  • observer is observed 
  • experience is experiencer.
  • Thiker is thought 
  • consciousness is content of consciousness.

या वाक्यांचा अपरोक्ष अर्थ real meditation मधे समजतो तेव्हा द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होवुन मग अद्वैत बुद्धीच्या म्हणजे choiceless awareness च्या विवेकाच्या प्रकाशात चारी अवस्थांचा अपरोक्ष निरास होवुन चारी अवस्था पलिकडील चार अवस्थाच्या निर्गुणाचा बोध निर्गुणाला होवुन अस्तित्व प्रक्रिया संपूर्ण समजुन नाम - रुप हा सर्प - रज्जुचा प्रकार असल्याचे उमजते. रज्जुच्या अज्ञानात सर्पाचा भास रज्जुवर प्रकटतो तसा चारी अवस्था व त्यांचे अधीष्ठानाचा अज्ञानात त्या चारी अवस्थावर, चारी अवस्थांच्य्या अज्ञानात अहम चा भास प्रकटतो जो रज्जुवरील सर्पाप्रमाणे nonexising असा भ्रम असतो. जसा अज्ञानी बालकासाठी fantom तसा अज्ञानी मनासाठी अहम असतो. दोरी कळली की जशी सर्प आपोआप मावळतो तसा ego मावळुन त्या ego च्या मावळण्यात निर्गुणाचा बोध निर्गुणाला होणे म्हणजे अहम ला आपले Nothingness स्वरुपाचा बोध होणे मोक्ष होय मग मी व माझे ही कल्पना पुर्णपणे मावळुन जाते मग तेथे माउली म्हणते,

मी माझी आठवण,
विसरले जयाचे अंतकरण,
तया संन्यासी जाण,
अर्जुना तु ll......( ज्ञानेश्वरी )

अजुन जास्त काय सांगु.

असा निर्गुणाचा बोध झाला की 
अशी अपरोक्षपणे 
self ची पुर्ण प्रक्रिया self ला समजणे हेच self knowledge होय.

- श्री विजय पांढरे, 9822992578, vbpandhare@gmail.com

No comments: