मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते || भ.गिता १४:२५ ||
Who is the same in honour and dishonour, the same to friend and foe, abandoning all undertakings he is said to have transcended three qualities. - Gita 14:25
जो मान और अपमानमें समान रहता है तथा मित्र और शत्रुपक्षके लिये तुल्य है। तथा जो सारे आरम्भोंका त्याग करनेवाला है। दृष्ट और अदृष्ट फलके लिये जानेवाले कर्मोंका नाम आरम्भ है, ऐसे समस्त आरम्भोंका त्याग करनेका जिसका स्वभाव है वह सर्वारम्भपरित्यागी है अर्थात् जो केवल शरीरधारणके लिये आवश्यक कर्मोंके सिवा सारे कर्मोंका त्याग कर देनेवाला है, वह पुरुष गुणातीत कहलाता है। - गिता १४-२५
मान व अपमान यांना सम माननारा, मित्र व शत्रु या दोन्हि विषयी सम असणारा, सर्व कर्मांचा सर्व प्रकारे त्याग करणारा असा जो असतो तो गुणातीत म्हटला जातो. - ज्ञानेश्वरी १४: २५
ईश्वरीय ज्ञान हवे असेल तर त्रिगुणातीत होणे आवश्यक आहे. त्रिगुणातीत होण्यासाठिचा सर्वात छोटा मार्ग येथे सांगितला आहे. सर्वारंभपरित्यागी हा तो मार्ग आहे. आपणास आपल्या जिवनामध्ये फार थोडक्या गोष्टिंचि आवश्यकता असते व त्या गोष्टि आपणास सहजपणे थोड्याशा मेहनतीने प्राप्त होऊ शकतात. सहज नैसर्गिक जिवनामुळे आपण ईकडे तिकडे भरकटले जात नाहि व आपले मनहि त्यामुळे फार लांब भरकटत नाहि. परंतु ज्यावेळी आपण आपले सहज नैसर्गिक जिवन सोडुन विविध आशा आकांक्षेच्या पुर्ततेसाठि नवनविन प्रकल्प आरंभ करतो त्यावेळी आपल्या मनास नवनविन खाद्य मिळायला सुरूवात होते व नंतर त्याला आवरणे मुश्कील होऊन जाते. नवनविन प्रकल्पामध्ये आपण गुंतत गेल्यामुळे जसे आपणास नविन मित्र मिळत जातात तसे नविन शत्रुहि निर्माण होतात. मित्र परिवार, कुटुंबिय, समाज, नातलग, शत्रु व त्यांचे विविध समारंभ यांच्याशी नित्य संबंध ठेवताना आपला कोठे सन्मान तर कोठे अपमान होत असतो. या सर्व नित्याच्या भानगडिंमुळे आपले मन सतत राग, लोभ यांनी विचलीत होत असते. विचलीत झालेल्या मनाच्या संतोषार्थ अनेक व्यसने, मनोरंजन, हौसमौज यांच्या मालीका ऊभ्या राहतात. ते काहि काळ तात्पुरते आपणास मानसीक समाधान देतात परंतु त्यासाठि आर्थिक व आजारांचि मोठि किंमतहि मोजावी लागते.

No comments:
Post a Comment