समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः || गिता १४:२४ ||
जो सुखदुःखमें समान है, जो स्वस्थ अर्थात् अपने आत्मस्वरूपमें स्थित -- प्रसन्न है। जो मिट्टी, पत्थर और सुवर्ण जिसके ( विचारमें ) समान हो गये हैं, जो प्रिय और अप्रिय दोनोंहीको जो समान समझता है और जो धीर अर्थात् बुद्धिमान् है तथा जिसके विचारमें अपनी निन्दा और स्तुति समान हो गयी है, ऐसा अपनी निन्दास्तुतिको समान समझनेवाला यति है।
Who is the same in pleasure and pain, who dwells in the Self, to whom a clod of earth, stone and gold are alike, who is the same to the dear and the unfriendly, who is firm, and to whom censure and praise are as one.
त्रिगुणातीत मनुष्याला सुख व दुःख समान असतात. सुख व दुःख हे दोन्ही मुळात विचार असतात. जे हवे आहे ते मिळाले कि आपण सुखी होतो व जे नको आहे ते मिळाले कि आपण दुःखी होतो. प्रत्येक मनुष्याच्या जिवनामध्ये ते दोघेहि असतात त्यामुळे त्यांचा ते आहेत तसा त्यांचा स्विकार केला कि आपणास त्यांचा त्रास होत नाहि.
त्रिगुणातीत मनुष्य नेहमी आपल्या आत्मानंदामध्ये स्थीत असतो. 'हवे व नको' या दोन्हिंचा त्याग केला कि मनुष्यांचि सर्व अनर्थास कारण असलेली विचार प्रक्रियाच बंद होते व तो आपोआप विचारशुन्य होतो. यासाठि त्याला कोणतिहि कृत्रीम साधना करावी लागत नाहि.
त्याच्या दृष्टीने माती, दगड, सोने सारखेच असतात. या सर्वांचे बाजारमुल्य व त्यांचि ऊपयुक्तता त्यास नक्किच माहित असते परंतु त्याचा हौशीपणा गेलेला असतो व तो कमीतकमी संसाधनामध्ये आपली गुजराण सहजपणे करत असतो म्हणुन त्यास मौल्यवान वस्तुंचि आवश्यकता नसते.
त्याला प्रिय व अप्रिय असे काहि नसते, सर्व सारखेच असते. समाजाने व कुटुंबियांनी भितीपोटि वा आपल्या स्वार्थासाठी काहि चालीरिती व रितीरिवाज सुरू केलेले असतात जे सर्वांना अधिकाधिक बंधनामध्ये अडकवित असतात. परंतु ज्याचि भिती नाहिशी झालेली आहे, ज्याच्याठायी कसलाहि स्वार्थ नाहि व जो सर्व बंधनामधुन मुक्त झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे तो कुटुंबाच्या व समाजाच्या चौकटिमध्ये राहु शकत नाहि. अशा मुक्तात्म्याला कोणिहि प्रिय असु शकत नाहि व कोणिहि अप्रिय असु शकत नाहि.
त्याला निंदा व स्तुती सारखी असुनहि तो धिरोदात्त असतो. ज्यास काहि प्राप्त करावयाचे नाहि, कसलाहि हव्यास नाहि, स्वार्थ नाहि त्यास आपली कोणि स्तुती करावी याचिहि अपेक्षा नसते व कोणा अज्ञान्याने त्याचि निंदा केली तरी त्याचे काहि नुकसान होत नाहि. तो निंदा व स्तुती या दोन्हिंचा धिरोदात्तपणे स्वीकार करत असतो. या सर्व गोष्टी 'हवे व नको' यामध्येच येत असतात ज्यांचा त्याने सहज त्याग केलेला असतो.

No comments:
Post a Comment