Saturday, April 28, 2018

नैसर्गिक तत्ववेत्ता

नैसर्गिक तत्ववेत्ता - यु जी कृष्णमुर्ती


दक्षिण भारतीय यु जी कृष्णमुर्ती हे जागतीक किर्तीचे फार मोठे तत्ववेत्ते होते. त्यांनी स्वतः कोणतेहि पुस्तक लिहिले नाहि, कोणतिहि संस्था स्थापन केली नाहि, कोणतेहि अभ्यासवर्ग सुरू केले नाहित, त्यांचे स्वतःचे कार्यालय वा कोणि सहाय्यक नव्हते. त्यांनी कोठे व्याख्याने दिली नाहित, कोठे सत्संग केला नाहि, त्यांनी शिष्यांचा गोतावळा तयार केला नाहि. या सर्व संस्कारांनी मनुष्य जातीचे अगोदरच प्रचंड नुकसान केले असताना आपल्यामुळे त्यामध्ये अधिक भर पडता कामा नये याचि त्यांनी कटाक्षाने काळजि घेतली. त्यांच्याकडे भौतिक संपन्नता नव्हती, कौटुंबिक परिवार नव्हता, जमिन जायदाद नव्हती, कोणतिहि सांसारीक माया त्यांच्या जवळ नव्हती. वयाच्या चौदाव्या वर्षापासुन ते सतत प्रवास करत होते. सहा महिन्यापेक्षा जास्त काळ मुक्काम ते एका ठिकाणि करत नसत. परदेशामध्ये कफल्लक अवस्थेमध्ये फिरत असताना एका परदेशी व्यक्तीने त्यांचि सर्व जबाबदारी स्वीकारली व जेमतेम परिस्थितीमध्ये ते आपला ऊदरनिर्वाह करत होते.

त्यांचि विचारसरणि :

आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यासाठी मी सर्व काहि प्रयत्न केले होते परंतु त्याएैवजी मला नैसर्गिक अवस्था प्राप्त झाली. आतापर्यंत सर्वांनी जे काहि अनुभवले असेल, जो काहि विचार केला असेल, जो काहि भावनाविष्कार अनुभवला असेल ते सर्व अनुभव, विचार, भावना माझ्या अस्तित्वा मधुन पुर्णपणे नाहिसे झाले आहेत. हि घटना अध्यात्मिक, धार्मिक, मानसीक, शारीरिक स्तरावरील नाहि. कारण रूपांतरण करण्यासारखे तसे तिथे काहिहि नसते. विचारांच्या गैरसमजुतीमुळे आपण हे सर्व केवळ गृहित धरलेले असते.

मानवाच्या मानसीक विकृतीतून विचार जन्माला येतात. म्हणून त्यातून जन्मलेली कोणतीही गोष्ट हि विनाशकारी असते. सर्व आध्यात्मिक किंवा इतर प्रकारचे विचार व त्यांनी दिलेले अनुभव हेच आपल्या दुःखांचे मूळ कारण आहेत. खरेतर आपल्या शरीरास सतत आनंद किंवा सुखी जिवनाविषयी ओढ नसते. हि ओढ विचारी मनाचा कल्पनाविष्कार असतो.

मी कोणताहि नवीन संदेश देणार नाहि. खरा गुरू तोच जो आपल्या शिष्यांमधिल सर्व जुनाट श्रध्दास्थानांना, संकल्पनांना हाकलुन बाहेर काढण्यासाठि त्यांना मार्गदर्शन करतो. तो शिष्यांना एकटे चालावयास सांगतो. तो शिष्यांना असे सांगतो की, जर तुम्ही अपयशी ठरलात तर तुम्ही पुन्हा उठा व पुन्हा चालावयास लागा.

मी जे काहि सांगत आहे त्यामध्ये तथ्य असेल तर ते टिकेल, तथ्य नसेल तर ते स्वतःच कोलमोडुन पडेल, त्याला कोणत्याहि श्रध्दायुक्त अधिकारीक टेकुचि आवश्यकता नाहि.

जेव्हा, 'मी काय आहे, मी कोण आहे?' यासारख्या अध्यात्मिक प्रश्नांचा निकाल न लागताच ते नाहिसे होतात, तेव्हा कोणतेहि ईतर प्रश्न शिल्लकच राहणार नाहित.

अधिकाधिक ज्ञानार्जनाचि ईच्छा धरून विचार आपले अस्तित्व निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जसे श्रोत्याला अधिकाधिक ऐकण्यात स्वारस्य असते आणि त्या ऐकण्यामुळे श्रोत्याचे सातत्य कायम राहत असते.

असा कोणताहि मार्ग नाहि जो आपणास आपल्या विचारांच्या जडणघडणि पासुन मुक्त करू शकेल, त्यामुळे काही तथाकथित आध्यात्मिक गुरूंचे ऐकून स्वत:चि जडणघडण बिघडविण्याचा प्रयत्न करू नका. मनाचि जडणघडण बदलण्याचा प्रयत्न करणे हि एकप्रकारे त्याचि नविन जडणघडण करण्या सारखेच असते. एक विचार घालवण्यासाठि पुन्हा दुसरा नविन विचारच आणावा लागतो.

समाधिचि विचारशुन्य अवस्था अस्तित्वात नसते. जागृत अवस्थेमध्ये शरीर त्याच्या सर्व अवयवांसहित पुर्ण क्षमतेने कार्य करत असते, त्याला निद्रेमध्ये शांत होण्यास वाव मिळत असतो, तिच परिस्थिती ध्यानावस्थेमध्ये निर्माण झाल्याने काहि काळ विचार थांबतात, परंतु त्यांना जास्त वेळ थांबवता येत नाहि. मलाहि विचार येत असतात परंतु मी विचारांचा वापर माझ्या भौतीक वा अध्यात्मिक ऊद्देशासाठि करत नाहि.

आपण नेहमीच आपण जे नाही आहोत ते बनू इच्छितो, काहीतरी वेगळे बनणे ही आपली खरी समस्या आहे. आणि आपण आपल्या सर्व शक्तीचा गैरवापर सतत तिथेच करत असतो. तीच ऊर्जा रोजच्या समस्यांना सोडविण्यासाठी आपण वापरत नाही आणि हेच आपल्या दुःखी जिवनाचे मुळ कारण आहे.

सर्वजण शांती मिळविण्यासाठि प्रयत्न करत असतात. परंतु प्रत्यक्षात कोणत्याहि समाजास त्याचे अस्तित्व शिल्लक राखण्यासाठि शांततेचि गरज नसते त्यामुळे समाज हा शांत व्यक्तिकडे एक धोका म्हणुन पहात असतो. म्हणुन ज्यावेळी आपण शांत होतो त्यावेळी आपण समाजाचे शत्रुत्व पत्करत असतो.

माझ्याबरोबर नातेसंबंध ठेवण्यासाठी ईतरांना खुप कठीण जाते. कारण कोणतीही भावना, मानसिक समस्या, दुःख, वेदना मला स्पर्श करू शकत नाहीत. दुसऱ्यांचे अश्रू तर मला बिलकुल प्रभावित करीत नाहीत. निसर्ग हा कठोरच असतो, तो जन्माला घालतानाहि रडवतो व मरतानाहि रडवतो.

ज्ञान हेच अज्ञानास जबाबदार असते त्यामुळे कोणतेहि ज्ञान आपणास अज्ञानापासुन मुक्त करू शकणार नाहि. जे आहे ते कसे नाहि व जे नाहि तेच कसे सत्य आहे हे ज्ञान आपणास चुकिचे मार्गदर्शन करत असते व आपल्या अज्ञानामध्ये अधिकाधिक भर टाकित असते, ज्ञान हे अज्ञान मुलक असते. ज्ञानाचा अंत (वेदांत) झाल्याशिवाय सत्य गवसत नाहि.

या विश्वामधिल प्रत्येकजण दुःख विरहित निरंतर सुखाचि अपेक्षा करत असतो जे केवळ अशक्य आहे. मला सुख म्हणजे काय हे माहित नाहि त्यामुळे मी कधिहि दुःखी नसतो.

आपणास जे शिकविले जाते तेच आपणास ज्ञात असते व तेच आपल्या स्मृतीमध्ये राहते, हे सर्व यांत्रीक आहे. या असल्या पढिक ज्ञानामुळे आपण आपली वेगळी प्रतिमा तयार करतो व 'मी' चा भ्रम तयार होतो. तिथे अज्ञातात काहितरी अधिक असावे असे आपणास वाटत असते. हि जि अपेक्षा असते कि तिथे आपल्या व्यक्तीत्वाहुन वेगळा असा मी असावा तीच सर्व गुंतागुंतीस जबाबदार आहे.

आपणाकडे असलेल्या एैकिव ज्ञानावर आधारित आपले प्रश्न असतात, त्यांचि ऊत्तरेहि आपणाकडे असतात, खरेतर ऊत्तरेच प्रश्न तयार करत असतात. जर ऊत्तरे त्यांचि कामे पार पाडत नसतील तर त्यांना आपण हुसकाऊन लावावयास हवे. परंतु आपण असे करू शकत नाहि कारण या ज्ञानाभोवती, या ऊत्तराभोवती श्रध्दांचे संरक्षक वलय तयार झालेले असते त्यामुळे या गौडबंगालामधुन बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाहि.

श्रध्दांच्या ठेकेदारांनी निर्माण केलेले तथाकथीत ज्ञान मानवी समस्या सोडवण्यास पुर्णपणे कुचकामी ठरले आहे तरीहि त्यांचा त्याग करण्याचे धैर्य आपणामध्ये नाहि. मानवास मुक्त करणारे ज्ञानच त्यास मुर्ख बनवत असते कारण जो स्वतः मुक्तच आहे त्यास दुसरे कोणिहि मुक्ती देऊ शकत नाहि.

https://youtu.be/ZWAiJzKN5bs

Sunday, April 22, 2018

श्रध्दांचे गुलाम भक्त

श्रध्दांचे गुलाम भक्त 

देव, देश, धर्म आदि श्रध्दांच्या गुलामीमधुन सर्व मुक्त झाले तर केवळ श्रध्देखातर चालणारे सर्व व्यापार कोलमडुन पडतील. या करता श्रध्दांच्या ठेकेदारांनी सत्य प्राप्त करण्यासाठी जि साधना करावी लागते ति ईतकि किचकट व कष्टप्रद करून ठेवली आहे जेणेकरून बहुसंख्य मनुष्य त्यापासुन लांबच राहतील व श्रध्दांच्या गुलामगिरीमध्येच अडकुन राहतील.

या ठेकेदारांनी बनविलेल्या संस्कार, संस्कृती, श्रध्दांचे ईमाने ईतबारे पालन करणाऱ्या गरीब बैला सारख्या भक्तांना बैलगाडिच्या जुचि ईतकि सवय झालेली असते कि त्यांना स्वतःस बांधलेल्या गाडिच्या जु शिवाय एक पाऊल टाकणे जमत नाहि. जर यदाकदाचित कोणि प्रयत्न केला तर ठेकेदार त्यांना संभाव्य धोक्याच्या चाबकांनी वठणिवर आणत असतात. खरेतर हे धोके तसे खुपच सामान्य असतात, जिवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये धोके असतातच, एकदा दोनदा जरी धडपडलो तरी सावरून परत आपल्या पायावर ऊभे राहता येते. परंतु काहि अयशस्वी प्रयत्न करणारांच्या अधोगतीच्या ऊदाहरणांनी बाकिचे घाबरतात व प्रयत्न करायचे सोडुन देतात.

श्रध्दांच्या गुलामीचि शतकानुशतके सवय झालेल्यांमधुन कोणि बाहेर पडण्याचि शक्यता खुप धुसर असते. ऊलट प्रत्येकाला त्याच्या गुलाम अवस्थेचिच गोडि वाटत असते. त्यासाठि आपले सर्वस्व अर्पण करण्यापर्यंत मजल जाते कारण त्या अवस्थेमध्ये तो त्याच्या बुध्दिचा वापर करण्यासाठी पुर्णपणे असमर्थ झालेला असतो आणि त्याला मुळात श्रध्देच्या भितीखातर बुध्दि वापरण्याचि अनुमती नसते. श्रध्दांचि गुलामी अनंत काळ टिकण्यासाठि ठेकेदारांनी भविष्यकालीन ऊदात्त स्वप्ने,  रितीरिवाज, नियम, कायदे यांच्या बेड्या भक्तांना ठोकलेल्या असतात. या बेड्यांनि प्रत्येकांच्या हालचालीवर ईतकी बंधने आलेली असतात, त्यांना ईतके अपंग बनविलेले असते कि श्रध्दांच्या तुरूंगाबाहेर टाकलेली ऊडी नेमकि त्या छोट्याशा, अरूंद खंदकाबाहेर पडेलच याचिहि खात्री नसते. त्यामुळे पुर्णत्वाच्या योग्यतेस पात्र होण्यासाठि व स्वतःस पुर्णपणे मुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये खुपच कमी लोक यशस्वी होतात.

- ईमॅन्युयल काँट, जर्मन तत्वज्ञ 

Tuesday, April 17, 2018

सातत्याचा भ्रम

आपणास निरंतर सुख हवे असते परंतु हे शक्य आहे काय? त्यासाठि निरंतरता म्हणजे नेमके काय आहे हे प्रथम समजायला हवे.

आपल्यामध्ये 'मी' किंवा 'मन' किंवा 'आत्मा' असे काहि अस्तित्वात आहे काय? आपण जे पहात आहोत, जे एैकत आहोत, जो सुगंध घेत आहोत, ज्याचि चव घेत आहोत ईत्यादिंचा समन्वय साधणारा एखादा समन्वयक, साक्षी आतमध्ये आहे काय?

वास्तविक, कोणत्याही दोन संवेदनां दरम्यान नेहमीच अंतर असते. विचार हा समन्वयक बनुन हे अंतर स्वतः जोडतो. दोन संवेदनांमधिल पोकळी भरून काढुन समन्वयक निरंतरपणाचा एक भ्रम बनुन स्वतःला प्रस्थापित करतो.

नैसर्गिक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या संवेदनांकडून येणारे संदेश समन्वयित करणारा समन्वयक, साक्षी, आत्मा, मन वगैरे असे अस्तित्वात नसते. प्रत्येक संवेदना या स्वतंत्रपणे स्वतःच्या कमालीच्या कौशल्याने कार्य करत असतात. बघणे, एैकणे, स्वाद चाखणे, वास घेणे आदि सर्व संवेदना नैसर्गीकपणे, स्वतंत्ररित्या चालु असतात. परंतु जिवास जेव्हा एक किंवा दोन किंवा सर्व संवेदनांचा समन्वय साधणे आवश्यक असते, तशी बाहेरून मागणी येते तरीही तेथे समन्वयक नसतो, परंतु समन्वयाचि एक तात्पुरती स्थिती निर्माण होते. नैसर्गिक अवस्थेमध्ये सातत्य नसते. जेव्हा मागणी पूर्ण केली गेली जाते, तेव्हा पुन्हा एकदा विसंगत, विजोड, वेगळ्या संवेदनांचे कार्य स्वतंत्ररित्या सुरू राहते. नैसर्गिक अवस्थेमध्ये हे नेहमी असेच असते. एकदा समन्वयक व त्याचि निरंतरता संपली की - अर्थात ती कधीही अस्तित्वात नव्हती; फक्त निरंतरतेचा तो एक भ्रम होता. ति निरंतरता एकदा संपली कि पुर्णपणे संपुष्टात येते, ती परत कधि येत नाहि. जेव्हा समन्वयकच नसतो, तेव्हा संवेदनांचि जुळविणे नसते, संवेदनांचे भाषांतर नसते, त्यांना समजुन घेणे नसते त्यामुळे त्या संवेदना सहज, साध्या व शुद्ध नैसर्गिक स्वरूपामध्ये राहतात.

निरंतरता हाच भ्रम असल्यामुळे निरंतर सुख हि एक कल्पनाच आहे. शरीरास आपल्या संवेदनांचे जतन व संरक्षण करावयाचे असते त्यामुळे कोणत्याहि संवेदना अती झाल्या कि तो त्या संवेदनाना कंटाळवाण्या करून संवेदनांचे संरक्षण करतो. निरंतर सुख हि शरिराचि वा संवेदनांचि गरज नसते तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये आलेल्या समन्वयकाचि म्हणजे विचारांचि गरज असते ती स्वतःस निरंतर बनविण्यासाठि. त्यामुळे भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी, असे झाले आहे.

 - यु जी कृष्णमुर्ती

Sunday, April 15, 2018

अध्यात्मिक शिक्षा

शिक्षा प्रणाली का अर्थ है एैसी एक पद्धति या एक तकनीक या सोचने का एक तरीका ताकि आपके जीवन में परिवर्तन लाया जा सके। पहलेकि सभी धार्मिक शिक्षाओं ने हमें गुमराह किया है क्योंकि हमारी समस्याओं का अभी तक कोई हल नहीं निकाला है। ईसलिये मेरी तरफ से कभी कोई नई शिक्षा नहीं होगी।

मैं जो कह रहा हूं वह पूरी तरह से शिक्षा के क्षेत्र से बाहर है। जिस तरह से मैं प्राकृतीक ढंग से काम कर रहा हूं उसका यह बस वर्णन मात्र है। मनुष्य की प्राकृतिक अवस्था का यह सिर्फ एक वर्णन है, इसलिए "शिक्षण" इसके लिए सहि शब्द नहीं है।

प्राकृतिक अवस्था यह आत्मसाक्षात्कार वाले या ईश्वर-प्राप्ति वाले मनुष्य की अवस्था नहीं है। क्योंकि यह हासिल करने या प्राप्त करने वाली चिज नहीं है, और यह एैसी भी चिज नहि है जो स्वयं अस्तित्व में आना चाहती है। यह अवस्था हमेशा मौजुद रहति है, - यह जिवन कि अवस्था है। यह स्थिति सिर्फ जीवन की कार्यात्मक गतिविधि है। 'जीवन' शब्दसे मुझे कुछ सार का मतलब नहीं है; यह इंद्रियों का जीवन है, किसी सोच के हस्तक्षेप के बिना स्वाभाविक रूप से कार्य करना। विचार पराया होता है फिरभी खुद इंद्रियों के ऊपर हावी हो जाता है। वह खुदके लाभ के लिये, खुद का अस्तीत्व बचाने के उद्देश्य से इंद्रियों की गतिविधि को निर्देशित करता है, उनसे कुछ प्राप्त करने के लिए और स्वयं को निरंतरता देने के लिए वह उनका शोषण करता है।

प्राकृतिक अवस्था का अध्यात्मिक आनंद या धार्मिक बेहोषी के अनुभव के साथ कोई संबंध नहीं है, सभी अनुभव मन के अनुभवों के क्षेत्र में रहते हैं ।

जो लोग सदियों से अध्यात्मिक खोज करते आये है ऊन्होंने शायद एैसे अध्यात्मिक ऊन्माद का अनुभव किया होगा, तो आपभी कर सकते हैं। यह अवस्था विचार से प्राप्त होती है और जैसे ही वे अनुभव आते हैं, वैसे ही वे चले जाते हैं।

सभी धार्मिक और अध्यात्मिक चेतना के अनुभव समयमे बध्द है। अगर कोई कालातीत अवस्था है तो कोई ऊसकि कल्पना भी नहीं कर सकता है। कालातीत अवस्था का अनुभवहि नहि किया जा सकता है। ऊसे कभी भी समझा नहीं जा सकता है। ऊस अवस्था को किसी भी व्यक्ति द्वारा अभिव्यक्त नहि किया जा सकता है। एैसे झुठे व्यक्तिद्वारा घिसापिटा हुआ मार्ग आपको कहि नहि ले जा सकता है। वहॉ कोई स्वर्ग नहि है, कोई मुक्तावस्था नहि है, आप सभी मृगतृष्णाके साथ फंस गए हैं। - कृष्णमुर्ती

Saturday, April 14, 2018

आत्मसाक्षात्कार - 'न जानने' की स्थिति

आत्मसाक्षात्कार का मतलब है मन का अंत, विचारहिन अवस्था। विचारोंके अभाव से शरीरकि सभी संवेदी गतिविधियों स्वतंत्ररूपसे चलनी लगती है। विभिन्न गतिविधियों को जोड़ने वाला मन जैसा कोई समन्वयक नहीं रहने से बहुत मुश्किलोंका सामना करना पडता है। ज्ञान, जानकारी होते हुये भी ऊन्हे जोडनेवाली यंत्रणा कि अभाव से बच्चो जैसे हर चिज के बारे मे पुछना पडता है, यह क्या है, वह क्या है। बिना विचार के, बिना मन के और बिना ज्ञान के जिवन सहज नैसर्गिक हो जाता है, सब कुछ चलता रहता है लेकिन आस पास के लोग परेशान होते है। ऊन्हे लगता है शायद यह पागल हो गया है। लेकिन पता चलता था कि वास्तव में अंदर बहुत कुछ शानदार हो रहा है - वह क्या हो रहा है, कुछ नहीं पता था, लेकिन उसने मुझे परेशान नहीं किया।

जब मैं कुछ देखता रहता हूं, तो मैं वास्तवमें नहीं जानता कि मैं क्या देख रहा हूं - यही कारण है कि मैं कहता हूं कि यह 'न जानने' की अवस्था है। मैं सच में नहीं जानता।

जब आप सौभाग्य के वजह से, या कुछ अजीब मौकेकि वजह से आप ऊस अवस्था मे वहां होते हैं, तब से हर चीज अपने तरीके से होती है।

ऊस अवस्था मे आप हमेशा समाधि की स्थिति में होते हैं। समाधि मे जाने का और समाधि से बाहर आने का कोई सवाल ही नहीं होता है। आप हमेशा ऊस अवस्था मे होते हैं । मैं समाधि शब्द का उपयोग नहीं करना चाहता, लेकिन और कोई शब्द नहि है इसलिए मैं कहता हूं कि वह कुछ जानने की स्थिति नहीं है। आपके शरिर को जब किसी जानकारी कि जरूरत पडती है तभी वह जानकारी आपके सामने आती है और काम होने के बाद वह जानकारी निकल जाती है। 

Friday, April 13, 2018

Realisation is the state of not knowing

All the sensory activities began their independent activities. There were no thoughts, no Mind, no co-ordinator linking the various senses, so i had terrible problems. Like a baby, I had to relearn, reidentify everything all over, as all the knowledge was in the background and never came to the forefront as all the links were broken.

I was a very sane man, acting sanely, everything going on, and yet this ridiculous business of asking about everything "What is this? What is that?" But I knew that something really fantastic had happened inside -- what it was, I didn't know, but that didn't bother me.

When I am looking at something, I really don't know what I'm looking at -- that is why I say it is a state of not knowing. I really don't know. That is why I say that once you are there, through some luck, some strange chance, from then on everything happens in its own way. You are always in a state of samadhi; there is no question of going in and out of it; you are always there. I don't want to use that word, so I say it is a state of not knowing. You really don't know what you are looking at.
- U G Krishnamurthy

Sunday, April 08, 2018

ऊंबरठा

जगभरामधिल बहुतेक सर्व संस्कृती मध्ये विवाहानंतर स्त्रीस सासरी जावे लागते. माहेरच्यांच्या दृष्टिने परक्याचे धन तर सासरच्यांच्या दृष्टिने बाहेरून आलेली, अशा स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये किती तडजोडि कराव्या लागत असतील याचि पुरूष वर्गाला जाणिव असणे कमीच असणार परंतु स्त्रीवर्गाने हे सर्वस्वी मान्य का केले असावे? 

आजच्या दृष्टिने स्त्रीने सासरी जावे हा रिवाज बनलेला आहे त्यामुळे त्याचे कोणास काहि वाटत नसावे. परंतु ज्यावेळी हि प्रथा सुरू झाली असेल त्यावेळी याबाबत नक्किच काहितरी संघर्ष झाला असणार त्याशिवाय एक वर्ग सरसकट दुसऱ्या वर्गाचि गुलामी पत्करणार नाहि. 

निसर्गामध्ये ईतर कोणताहि प्राणि विवाह करून रहात नाहि वा आयुष्यभर एकत्र राहत नाहित कारण निसर्गाला तोचतोचपणा, एकसुरी जगणे मान्य नाहि. निसर्ग हा विविधतेचा भोक्ता आहे. गंमत म्हणुन नव्हे तर केवळ प्रजोत्पादनासाठि दोन जिव एकत्र येतात, मादि पिलांना जन्म देते, पिले मोठि होताच, सर्व स्वतंत्र व वेगवेगळे होतात. आयुष्यभराचे कसलेहि बंधन वा जबाबदाऱ्या नसतात. कारणपरत्वे तात्पुरते एकत्र येणे व कारण संपताच स्वतंत्र होणे हा निसर्गाचा सहज व साधासोपा नियम आहे. 

निसर्गाचाच एक भाग असलेला मनुष्य प्राणि यास अपवाद का झाला? मानवजातीच्या ऊत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये मानवास विचार करता येऊ लागला, विचारांमुळे मन निर्माण झाले, मनामुळे सुखाचि लालसा निर्माण झाली व एकदा प्राप्त झालेले सुख परत परत हवेसे वाटु लागले यातुनच सुख देणाऱ्या वस्तुंचा संग्रह करण्याचि वृत्ती निर्माण झाली. संग्रहित केलेल्या वस्तुंच्या संरक्षणाचि व्यवस्था निर्माण केली गेली. 

Survival of the fittest, जो जिव समर्थ आहे तो टिकुन राहतो हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपली पुढिल पिढि सशक्त निर्माण होणे हा प्रत्येक प्राण्यांच्या कळपाच्या जिवंत राहण्याच्या दृष्टिने अनिवार्य असते. यासाठि कळपातील मादि प्रजोत्पादनासाठि कळपामधिल धडधाकट नराचे सहाय्य घेत असते तो तिचा पुर्वीचा मुलगा असला तरी. नितीमत्ता वगैरे निसर्गामध्ये नसते गरज असते ति फक्त स्वसंरक्षण व प्रजोत्पादनाचि.

आदिम मानवामध्ये फक्त प्रजोत्पादनासाठि एकत्र येणारे स्त्री पुरूष नंतर प्रगत अवस्थेमध्ये मनाने निर्माण केलेल्या सुखांच्या म्हणजे प्रेमाच्या बंधनामध्ये अडकु लागले. स्त्री हि निसर्गतःच अबला आहे, ति एकटि सुरक्षित राहु शकत नाहि. याचा फायदा घेत पुरूष हा स्त्रीस आपणास सुख देणारी एक भोगवस्तु समजु लागला. बळी तो कानपिळी प्रमाणे रावणासारख्या कामपिपासुपासुन सिता सारख्या स्त्रियाहि पिडित होऊ लागल्या यासाठि जमीन जायदाद सांभाळण्यासाठि जसे कायदे झाले त्याप्रमाणे स्त्रीयांना सांभाळण्यासाठि विवाह संस्था निर्माण केली गेली. विवाहापुर्वी पित्याने व विवाहानंतर पतीने स्त्रीयांना सांभाळण्याचि जबाबदारी घातली गेली. पुर्वी लहान वयातच मुलीचे लग्न ऊरकावयाचे कारण पिता व पति यांशिवाय ति ईतरत्र कोठेहि सुरक्षित नाहि. एका जोडिदाराबरोबर आयुष्यभर राहणे नैसर्गिक नसल्यामुळे कौटुंबिक संस्कार वा संस्कृतीच्या बाह्य दडपणाशिवाय काहि अपवाद वगळता असे विवाह टिकणे अशक्य असते. आणि जर बाह्य दबावामुळे आणि असमाधानाने जर दोघे एकत्र राहत असतील तर तोहि विवाह नाहि. 

आजकाल प्रगत समाजामध्ये स्त्री स्वतंत्र आहे, ति स्वतःचे संरक्षण करू शकते, स्वतःचे भरणपोषण करू शकते, स्वतःचा जोडिदार निवडु शकते. म्हणजे पुर्वीचिच नैसर्गिक अवस्था परंतु आधुनिक ढंगामध्ये परत येत आहे. विवाह बंधनामध्ये न अडकता आपले जिवन आपल्या स्वतंत्र विचाराने जगणाऱ्या निना गुप्ता, सुश्मिता सेन सारख्या अनेक स्त्रीया आपणाकडेहि आहेत. परंतु विवाहसंस्थेच्या संरक्षीत जिवनाचा आधार घेऊन स्त्रीने अथवा पुरूषाने विवाहबाह्य संबंध ठेवणे म्हणजे स्वातंत्र्य नसुन तो व्यभिचारच आहे व तो कोणत्याहि प्रगत वा अप्रगत समाजात मान्य नाहि. 

Saturday, April 07, 2018

चेतना का प्रदुषण

आत्मसाक्षात्कार का रहस्य - २
- यु जी कृष्णमुर्ती

आत्मसाक्षात्कार, मुक्ती, ज्ञानप्राप्ति आदि घटनाये आपके किसी भी प्रयास से प्राप्त नहीं  कि जा सकती है; अचानक होती है। और एक व्यक्ति के लिए ऐसा होता है तो और दूसरे व्यक्ति के साथ क्यों नहीं, यह मुझे नहीं पता।

प्रश्नकर्ता: यह आपके साथ कभी हुआ।
युजी: मै ४९ साल का था तभी यह मेरे साथ हुआ था।

हम हमेशा अपने खुद के स्वाभाविक प्रकृतीक अवस्था मे रहते हैं। लेकिन खोज, सच्चाई या सच्चाई की खोज जो कुछ भी आप उसके प्राप्ती के लिये कर रहे हैं वह आप को स्वयं से दूर ले जाते हैं। ईसलिये यह अवस्था पाने के लिये कुछभी करना गलत है। यह एैसा कुछ नहि है जो आप कुछ करके प्राप्त कर सकते हैं, या अपने प्रयासों के परिणाम स्वरूप पूरा कर सकते है। यही कारण है कि मैं ईसके लिये 'अकारण' शब्द का प्रयोग करता हूं, इसका कोई कारण नहीं है, लेकिन किसी तरह हमारी सत्य कि खोज हमेशा के लिये समाप्त हो जाती है।

प्रश्न: महोदय, आपको सचमुच लगता है कि यह किसी खोज का नतीजा नहीं है? मैं ईसलिये यह पूछता हूं क्योंकि मैंने सुना है कि आपने दर्शनशास्त्र का अध्ययन किया है, और आप धार्मिक लोगों से जुड़े हुये थे।

युजी: हां, मैने यह अवस्था प्राप्त करने के लिये सबकुछ किया था। बचपनमे मुझे धार्मिक वातावरण मे रखा गया था, वैदिक शिक्षा मिली थी, पैसोंकि कोई कमी नहि थी ईसलिये केवल आत्मसाक्षात्कार के पिछे मै पडा था। देश विदेशोंके अच्छे अच्छे गुरूओंके साथ रहता था। लेकिन ऊससे कुछ नहि हो रहा था। मेरी वह खोज मुझे विपरीत दिशा मे दूर ले गयी थी।  साधना और साक्षात्कार का एकदुसरेसे बिल्कुल संबंध नहीं है।

प्रश्न: साधनाके बावजूद, ऐसा हुआ है, साधनाकी वजह से नहीं?

युजी: साधनाके बावजूद, हाँ, यह सहि शब्द है। जो भी साधना आप करते हैं वह साधना साक्षात्कार को या स्वयं को व्यक्त करने के लिए जो पहले से ही मौजुद है असंभव बनाती है । यही कारण है कि मैं इसे 'अपनी प्राकृतिक अवस्था' कहता हूं । क्योंकि हम हमेशा ईस स्थिति में हि रहते हैं । हमारी खोज ईस स्थिती को खुद को अपने तरीके से व्यक्त करने से रोकती है।

हमारी खोज हमेशा हमे गलत दिशा में ले जाती है। इसलिए आप जिसको गहरा ज्ञान समजते हो या जिसे भी आप पवित्र मानते हैं, वह सब हमारी चेतनामे किया हुआ प्रदुषण मात्र है। आपको शायद 'चेतना का प्रदुषण' यह शब्द अच्छा नहि लगेगा लेकिन यकिन मानो आप जिसे धार्मिक, पवित्र, शुध्द मानते है वह सब प्रदुषित है। प्राकृतीक अवस्थामे मिलावट का मतलब प्रदुषण है।

ऐसा कुछ नहीं है जो आप कर सकते हैं यह चिज आपके हाथों में नहीं है । मैं 'अनुग्रह' शब्द का उपयोग करना भी पसंद नहीं करता, क्योंकि यदि आप 'अनुग्रह' शब्द का उपयोग करते हैं, तो किसका अनुग्रह? अगर मेरे लिए यह संभव होता, तो मैं किसी की मदद करने में, अनुग्रह करने मे सक्षम होता। यह ऐसा कुछ है जो मैं या दुसरा कोई किसीको नहीं दे सकता, क्योंकि आपके पास वह पहलेसे हि मौजुद है। मैं आपको इसे कैसे दे दूँ? ऐसी चीज़ की पूछना हास्यास्पद है जो आपके पास पहले से है। अनुग्रह करना यह सरासर झुठ है, नामुमकिन है। खुदको गुरू बनाकर शिष्योंका शोषण करने के लिये एैसा किया जाता है। ईसके लिये कोई विशेष रूप से चुने हुये व्यक्ति कि जरूरत नहीं हैं। यह किसी के साथ भी हो सकता है।

प्रश्न: लेकिन मुझे यह महसुस नहीं होता, और आपको ऐसा महसुस होता हैं।

युजी: नहीं, आप यह कभी महसूस नहि कर सकते या ईसे जान सकते है; आपको कभी ईसका पता नहीं चलेगा। आपके पास यह जानने का कोई तरीका नहीं है । वह अवस्था खुद को व्यक्त करने के लिए जब शुरू होती है तभी महसुस होना चालु होता है। लेकिन मै आपसे अलग हुं या विशेष हुं यह विचार मुझे कभी आता नहि है। 

आत्मसाक्षात्कार का रहस्य



यू.जी. कृष्णमुर्ती नामक (आत्मसाक्षात्कारी) मनुष्य कि विस्फोटक संकल्पनाये जो आपकि धर्म और अध्यात्म कि सारी कल्पनाओंको बदल देंगी या मिटा देंगी।

"लोग मुझे आत्मसाक्षात्कारी 'प्रबुद्ध आदमी' कहते हैं । लेकिन मैं उस शब्द कि घृणा करता हूं। मैं जिस तरह से पेश आ रहा हूँ, उसका वर्णन करने के लिए शायद उन्हें कोई और शब्द नहीं मिल रहा है। मैं सभीको हमेशा यह बताता रहता हूं कि आत्मसाक्षात्कार जैसी कोई चीज हि नहीं है। मै यह दावे के साथ कह सकता हुं, क्योंकि मै सारी ज़िंदगी ऊसे खोजता रहा हुं। मै खुद एक प्रबुद्ध आदमी बनना चाहता था, और मुझे पता चला कि आत्मसाक्षात्कार जैसी कोई चीज नहीं है, और इसलिए कोई विशिष्ट व्यक्ति प्रबुद्ध है या नहीं, यह प्रश्न पैदा नहीं होता है। ईससे पहले आये हुये सभी प्रेषित या आत्मसाक्षात्कार के दावेदार वे सभी शोषणकर्ताओं का एक समूह है, जो लोगों के भोलेपन पर संपन्न हुये है। मनष्य के बाहर कोई शक्ति नहीं है । मनुष्य ने हि परमेश्वर को डर के भय से बनाया है । तो समस्या डर है, भगवान नहीं है ।

मैने खुद अपने लिए पता किया है कि जिसका साक्षात्कार हो एैसा कोई आत्मा नहीं है । और असल मे यही वह आत्मसाक्षात्कार है जिसके बारे में मैं आपसे बात कर रहा हूं। यह एक जबरदस्त झटके के रूप में आता है । वह आप पर एक वज्र कि भांती प्रहार करता है। एैसा समझो कि, आपने आपका सब कुछ आत्म-प्राप्ति कि टोकरी में निवेश किया है, और अंत में, अचानक आपको पता चलता है कि जिसको खोजने के लिए हम निकले थे एैसा कोई आत्मा हि नहीं है और जिसके साक्षात्कार कि आस लगाये बैठे थे एैसा कोई परमात्मा नहीं है । तभी आप आपको पुछने लगेंगे कि मै अबतक यह सब क्या कर रहा था? और यह बात आपके अंदर बहुत बडा विस्फोट करेगी।

मुझे जो आत्मसाक्षात्कार का अनुभव हुआ था वह कोई मानसिक या अध्यात्मिक नहि था, वह संपुर्णतः शारिरीक प्रक्रिया थी। शरीरकि हर मांसपेशीया, स्नायु, हड्डिया आदि सभीमे रासायनीक बदलाव आया था। ईस बदलाव के दौरान असहनीय शारीरिक दर्द मैने सहा था । यही कारण है कि मैं कहता रहता हूं कि आप वास्तव में एैसे साक्षात्कार कि ऊम्मीद नहीं करते हैं। अगर मैं आपको इसकि एक झलक दिखला दुं या इसका एक स्पर्श दे सकता तो आप इसे बिल्कुल भी नहीं छूना चाहेंगे। आप जिस प्रकारके आत्मसाक्षात्कार का पिछा कर रहे है वह कतई अस्तित्वमें नहीं है । वह एक काल्पनीक मिथक है । "

Wednesday, April 04, 2018

अध्यात्मिक जागृती



नियतीचा फटकारा म्हणा अथवा ईश्वराचि कृपा म्हणा अगदि अनपेक्षीतरित्या मला अशी एक अद्भुत व वेगळी अवस्था प्राप्त झाली. त्यावेळे पासुन मी स्वत: एका संपूर्ण नवीन अशा जीवनशैलीच्या जगामध्ये जगत आहे. पूर्वी मी देवास प्रार्थना करायचो कि, 'अरे देवा, तू मला विसरलास कि काय?' आता मी प्रार्थना करतो कि, 'हे देवा, तू मलाच का हे दिलेस? 

या घटनेस मी आत्मसाक्षात्कार असे म्हणणार नाहि कारण आत्मसाक्षात्कार म्हणजे असीम शांतता, कधिहि न संपणाऱ्या अमर्याद अशा स्वर्गीय सुखाचि वा आत्मानंदाचि कल्पना यापुर्वीच्या सर्व आत्मसाक्षात्कारी (!) युगपुरूषांनी करून ठेवलेली आहे. परंतु मला तसे काहिहि प्राप्त झाले नाहि कारण तसे काहिहि नसते. या अवस्थेविषयी काहिहि गुढ अथवा धार्मिक, अध्यात्मिक अवस्थांचा संबंध नाहि. ति एक अतिशय साधारण अशी शारिरीक घटना असते ज्यामध्ये आपले मन संपुर्णपणे संपुष्टात येते, आपली विचार करण्याचि यंत्रणा पुर्णपणे बंद होते. ज्यावेळी ज्यागोष्टिचि आवश्यकता असते ति गोष्ट सहजपणे कोणत्याहि पुर्वविचारांशिवाय होत राहते. आपल्या सर्व संवेदना वासना रहित अशा अतिशय शुध्द स्वरूपामध्ये कार्य करू लागतात, आणि हि विलक्षण नैसर्गिक अवस्था प्राप्त होणे हेच मानवी जिवनाचे साफल्य होय. 

हे कोणतेहि बौद्धिक चातुर्य अथवा अध्यात्मिक आत्मज्ञान नव्हते. हि अवस्था ईतर कोणत्याही व्यक्तीस प्राप्त होऊ शकते त्यासाठि ईश्वर, गुरू किंवा आत्म्याशी देवाण घेवाण करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या घटनेमुळे त्या व्यक्तिच्या वैयक्तीक जिवनामध्ये, त्याच्या आसपासच्या माणसांवर किंवा एकंदरीतच संपुर्ण मानवजातीवर प्रभावी परिणाम होत असतो. पेटलेली ज्योत कधि लपवुन ठेवता येत नाहि. 

हि नैसर्गिक अवस्था प्राप्त करण्याचा कोणताही निश्चित असा मार्ग नाही. ति अवस्था कोणत्याहि गुरू कडुन प्राप्त करता येत नाहि वा कोणत्याहि गुरूस ति दुसऱ्यांना देता येत नाहि. हि अवस्था अतिशय सहज सोप्या आणि अनपेक्षित पद्धतीने प्राप्त होते, त्या अवस्थेविषयी आपण कसलीहि पुर्वकल्पना करू शकत नाहि, खुपच अकल्पनीय अशी ती अवस्था आहे व हेच त्या अवस्थेचे गुपित आहे. - यु जी कृष्णमुर्ती

https://youtu.be/IBaAun6ft8w