Sunday, February 17, 2019

विचार हेच पतनाचे कारण होय !


मुक्तावस्था हि मनाचि अवस्था आहे. मनामध्ये ईच्छा निर्माण झाली कि ईच्छा तृप्ततेसाठि कर्म करावे लागते आणि कर्माचे फळ भोगण्यासाठी परत परत जन्म घ्यावा लागतो असे वेदांत सांगते.

आई वडिलांकडून जन्मजात मिळालेल्या जनुकांपासुन आपली जीवनयात्रा सुरू होते. आईवडिलांच्या पुर्वजांचा वारसा त्यांचि प्रतिमा, गुण, आशा, ईच्छा, संकल्पना वगैरे शारिरीक व मानसिक जडणघडण हि पुढल्या पिढिकडे जनुकांमार्फत प्रसारीत केली जाते. आपल्या जनुकांमध्ये पुर्वीचि वंशपरंपरागत माहिती असते व आताच्या आपल्या कर्म व विचारांनुसार त्यांमध्ये बदलहि होत असतात.

स्वार्थी कर्म व स्वार्थी विचारांमुळे आपली जनुके प्रदुषीत होत असतात तर निष्काम कर्म व वासना रहित विचारांमुळे आपल्या जनुकांचे शुध्दिकरण होत असते. पुर्ण निष्काम व वासना रहित अवस्थेमध्ये जनुकांचे संपुर्ण शुध्दिकरण झाल्यानंतर विचार शांत होतात आणि अशी विचारहिन अवस्था हिच मनाचि मुक्तावस्था होय. मुक्तावस्थे मध्ये शरीराचि काळजी रहात नाहि फक्त त्याचा भार वाहण्यासाठिचे जुजबी विचार गरजेनुसार येतात व जातात.

प्रदुषित जनुकांना वासना तृप्ततेसाठि कर्म करत रहावे लागते, कर्मभोगांचा कारावास भोगण्यासाठि परत परत जन्म घ्यावा लागतो. कर्माच्या कार्य व फलाशेस्तव सतत विचार येत राहतात. सांसारीक विचार हे जनुकांमध्ये बदल करत राहतात व हे जनुकिय बदल विचारांना बदलवीत असतात. या निरंतर खेळाला अंत देतात ते फक्त निष्काम कर्म.

या विश्वामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नाशीवंत वस्तुंचे कारण हे स्पंदने, विचार व मन हे आहेत तर आपल्या विचारांचा व मनाचा नाश करणारेच या स्पंदनांच्या भवसागरात तरून ( विरून ) जातात.

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च |
क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते || गिता १५:१६ ||

There are two kinds of beings in creation, the kṣhar (perishable) and the akṣhar (imperishable). The perishable are all beings in the material realm. The imperishable are the liberated beings.

Saturday, February 16, 2019

मनाचे खेळ


मनुष्य प्राणि हा जागृत अवस्थेमध्ये सतत विचार करीत असतो. जागृत अवस्थेमध्ये मेंदुमधिल न्युरॉन्स हे आसपासच्या स्पंदनांचा त्यांच्या पुर्वानुभवा नुसार अर्थ लावीत असतात. यातुनच विचारांचा जन्म होत असतो. बाह्य स्पंदनांचा लावलेला अर्थ आपल्या स्मृतीमध्ये अनुभव रूपाने साठविला जातो. अनुभवांच्या विचारांपासुन ज्ञान निर्मिती होत असते. मानवी संस्कृतीच्या आदिम कालापासुनचे जे अनुभवांचे विचार आहेत त्यामधुन ज्ञान भांडार विकसीत झालेले आहे. सर्व धर्मग्रंथे हि मानवी अनुभवांच्या विचारांचि फलनिष्पत्ती आहे. देश, काल परत्वे विचारांमध्ये जसजसा फरक पडत जातो तसतसे नवनविन संप्रदाय व त्यांचे नविन  ग्रंथ रचले जातात. लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा म्हणुन त्यांना अपौरूषीय, स्वयंभु, ईश्वरीय ज्ञान अशा ऊपमा दिल्या जातात.
विचारांच्या कल्पनांमधुन निर्माण झालेल्या ज्ञानाचा आधार पकडुन, विचारांच्याच साधनेद्वारे मग सत्याचा शोध घेतला जाऊ लागतो. ज्या मनाने ईश्वराच्या संकल्पनेची निर्मिती केली त्याच मनाचा आधार घेऊन ईश्वराचा शोध सुरू होतो व अकस्मात कळुन येते कि हा सर्व मनाचाच खेळ आहे. मन हेच वेदांचा, वेदांताचा व सर्व ज्ञानांचा निर्माता आहे. मन हेच परत त्यानेच निर्माण केलेल्या वेदांचा अर्थ लावीत बसते.
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे, येरांनी वहावा भार माथा |

मनोनिर्मित सांप्रदायिक ग्रंथांचि कितीहि पारायणे केली तरी जोपर्यंत मनाचा खेळ समजत नाहि तोपर्यंत फळ हाती येत नाहि.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् || १५:१५||
I am seated in the hearts of all living beings, and from Me come memory, knowledge, as well as forgetfulness. I alone am to be known by all the Vedas, am the author of the Vedānt, and the knower of the meaning of the Vedas.

Thursday, February 14, 2019

मनाचि विविध रूपे


आपणा सर्वांस आपले शरीर व मन यांचा नित्य अनुभव येत असतो. त्या पलीकडिल आत्मा व परमात्मा यांचा अनुभव आपणास कदापिहि येत नाहि. कारण कि ते अनुभव घेणारे साक्षी वा त्याहीपलिकडील निर्गुण व निराकार तत्व आहेत असे आपले शास्त्र सांगते. काया, वाचा, मने जे जे अनुभवास येते ते आत्मतत्व नाहि हे ऩिश्चित आहे. जे आत्मतत्व अनुभवास येत नाहि ते अनुभव घेण्यासाठि वा ईतर कोणत्याहि कारणास्तव आकारास येणे शक्य नाहि. म्हणजे आत्मतत्व अाहे असेहि म्हणता येत नाहि वा ते नसावे असेहि म्हणता येणार नाहि. आत्मतत्व अनुभवास येत नाहि असे असताना त्याबद्दल काहि बोलणे वा लिहिणे कोणासहि शक्य नाहि. परंतु जर ते असेल तर ते आपल्या अनुभवाच्या व कल्पनेच्याही पलीकडे असेल अर्थात ज्याला आपण सध्या आत्मतत्व वा परमात्म तत्व असे समजत आहोत वा त्यांचे अंश आहेत असे समजत आहोत ते सर्व केवळ संकल्पनांचे अवडंबर आहेत, त्यामध्ये सत्यांश यत्किंचीतहि नाहि.

शास्त्र असेहि सांगते कि आपल्या स्थुल शरिरा मध्ये सुक्ष्म शरीर आहे. मन, चित्त, बुध्दि व अहंकार यांचे मिळुन सुक्ष्म शरीर बनते. परंतु ते वेगवेगळे नसुन मनाचि विविध रूपे आहेत. मन हे विचारांचे पुंजके आहे. मनन करणाऱ्या विचारांना मन, चिंतन करणाऱ्या विचारांना चित्त, निर्णय करणाऱ्या विचारांना बुध्दि तर मीपणाच्या विचारांना अहंकार असे विचारांना त्यांच्या भुमिकेवरून स्वरूप प्राप्त झालेले आहे.

विचार जर अशी बेमालुम पणे विविध रूपे घेऊ शकत असेल तर कदाचित या विचारांनीच आत्मा व परमात्म्याचि रूपे घेऊन आपणास झुलवत ठेवले नसेल कशावरून. आपले मन सांगेल तेच आपण खातो व पचवितो तर मनास नावडते असणारे पदार्थ आपल्या पचनी पडत नाहित. मन हेच आपले खाद्य, पेय, कपडे वगैरे निवडत असते आणि मनाने निवडलेल्या वस्तु शरीरास वापराव्या लागतात.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: |
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् || १५:१४ ||

It is I who take the form of the fire of digestion in the stomachs of all living beings, and combine with the incoming and outgoing breaths, to digest and assimilate the four kinds of foods.

Sunday, February 10, 2019

विश्व निर्मिती व संचालन


विश्व निर्मिती कोणि केली व नंतर पृथ्वीवरील जिवसृष्टिला कोणि निर्माण केले व तीला आवश्यक असणारी ऊर्जा, प्राणशक्ति, अन्न वगैरे कोण देत असतो हा प्रश्न नेहमी विचारला जात असतो. श्रध्दाळु भक्त स्वतः काहिहि न शोधता देवाकडे बोट दाखवुन मोकळे होतात परंतु जिज्ञासु ज्ञानी ते अंतीम सत्य शोधण्याचा स्वतः प्रयत्न करतात.

पृ्थ्वीवर लाखो वर्षांच्या जडणघडणी मध्ये क्रमशः पाणि, प्राणवायु व नंतर जिव तयार झाले. आसपासच्या परिस्थितीशी जुळवन घेत व प्रसंगी परिस्थीतीवर मात करत जिवांचि वनस्पती, पशु, पक्षी ते मानव असा ऊत्क्रांत प्रवास झाला. विश्व निर्मिती पासुन सतत मोठमोठ्या तारकांचे स्फोट, ग्रहांच्या टक्करी, भुकंप, ज्वालामुखी, ग्रहताऱ्यांचे भ्रमण होत आहेत आणि त्यांचि स्पंदने सतत वातावरणामध्ये फिरत असतात. या निराकार वैश्वीक स्पंदनांचा आपल्या पंचेंद्रियांशी संपर्क आल्यानंतर मेंदुमध्ये त्या स्पंदनांचे विचारांमध्ये परिवर्तन होते व मन आकारास येते. मन संवादासाठि भाषेचा आधार घेते. भाषेमुळे विचारांना चौफेर ऊधळण्यास वाव मिळतो व त्यामधुन नवनविन संकल्पना व वासना ऊदयास येतात. आपल्या मेंदुकडे येणाऱ्या स्पंदनांचा प्रत्येक जिव त्याच्या शरीरामधिल जैव जनुकां मधिल पुर्व माहिती नुसार अन्वयार्थ लावीत असतो. आपल्या शरीरामधिल जैव जनुके हि आपणास आपल्या माता पित्यांकडुन वारसाने प्राप्त होत असतात. जैव जनुकांमधिल माहिती नुसार प्रत्येक जिव त्याच्याकडे येणाऱ्या स्पंदनांचा अन्वयार्थ लावुन त्यावर प्रतिक्रिया करत असतो.

मन हेच सर्व संकल्पनांचे व वासनांचे केंद्र आहे. आपल्या आयुष्यामध्ये व आसपास घडणाऱ्या घटनांचे आपले मन त्याला हवा तसा अर्थ काढत असते. या मनामधुनच ईश्वर, धर्म, गुरू, धर्मोपदेशक आदि संकल्पना निर्माण झालेल्या आहेत. लहानपणा पासुन आपले मन जे आपणास शिकवीत असते त्यावर आपण विश्वास ठेवत मोठे होत असतो. आपण कोणिहि पाहिलेले नाहि अथवा अनुभवलेले नाहि अशा ईश्वराने हे विश्व निर्माण केले आहे, तोच या विश्वाचा कर्ता, धर्ता, भर्ता आहे तसेच आपले भरण पोषण करणाऱ्या वनस्पतींचे पोषण करणाऱ्या सुर्य चंद्रांचे पोषण हि ईश्वरच करत आहे या कल्पना आपणास आपले धर्मग्रंथ पुरवित असतात.

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा |
पुष्णामि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक: || गिता १५:१३ ||

Permeating the earth, I nourish all living beings with My energy. Becoming the moon, I nourish all plants with the juice of life.

Saturday, February 02, 2019

रोमान्स चा व्यापार


प्रेम हे कळत नाहि, कारण ते मुळात अस्तीत्वातच नाहि. ज्याला तुम्हि प्रेम समजता ते माझ्या सारख्या नायलॉनचे कपडे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या जाहिरातींचा एक बागुलबुवा आहे. आपण जन्मतो एकटे, मरतोहि एकटेच परंतु स्वार्थाने भरलेले हे जग त्याचे काहि भ्रमित नियम आपणावर लादुन आपणास ते वास्तव विसरायला भाग पाडते. - डॉन ड्रेपर. ‘रोमान्स’ च्या रोमांटिक कल्पना या अगदि अलीकडिल काळामधिल आहेत. रोमॅंटिक कादंबऱ्या व चित्रपटांद्वारे या कल्पना रूजविण्यामध्ये व्यावसाईक यशस्वी झाले. झगमगीत कपडे, दागदागिने, साजशृंगाराच्या साहित्यांचि एक फार मोठि नविन बाजारपेठ त्यामधुन ऊभी राहिली. लाखो वर्षांच्या रक्तरंजीत मानवी ईतिहासामध्ये पुर्वी फक्त अन्न व सुरक्षा या दोन गोष्टिंनाच महत्व दिले जात असे. असुरक्षीत वातावरणामध्ये मोठे कुटुंब व आपल्याच लोकांच्या मोठ्या वस्त्या अन्न व सुरक्षेचे कवच देत असत त्यामुळे त्यांच्या निती नियमाविरूध्द जाण्याचा प्रश्न नसे. औद्योगिकरणा नंतर हे दोन प्रश्न बऱ्यापैकि सुसह्य झाले. तरूण तरूणि रोजगारासाठी आपल्या कुटुंब व गावापासुन दुर जाऊ लागले आणि त्यांना अधिक स्वातंत्र्य मिळु लागले. नवनविन कल्पनांच्या प्रेमात पडणारे जिव रोमॅंटिक कल्पनेने हुरळुन जाऊन एकमेकांच्या प्रेमात पडु लागले. रोमान्स विषयीच्या रोमॅंटिक कल्पना हाच बहुतेक प्रेम विवाहांचा प्रमुख दुवा असे. लग्नानंतर कळुन येते कि प्रेम हि खुप चांगली गोष्ट आहे परंतु रोमांस वगैरे सर्व काहि कवि कल्पना आहेत आणि जाहिरातीद्वारा व्यावसायिकांनी त्या आपल्या माथी मारल्या आहेत. वाढलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत संसाराचा गाडा हाकलताना रोमांसचा खुपच कमी ऊपयोग होतो. मग नसणारा रोमांस खुलत ठेवण्यासाठि परत परत शॉपिंग व टुर्सचा भडिमार सतत सुरू ठेवावा लागतो. रोमांसच्या भडीमाराचा ओसर कमी होताच दोन संपुर्णतः वेगळ्या विचारसरणीच्या जिवांनी आयुष्यभर एकत्र राहणे अवघड होऊ लागते व प्राणप्रिय जोडिदारांकडुन चुका होऊ लागतात. ज्याच्यावर जिव ओवाळुन टाकला त्यांच्याकडुन होणारी फसवणुक असहय्य होऊन जाते. दोन जिवांनी एकत्र येणे म्हणजे प्रेम असते हा भ्रम नाहिसा होतो व राहतो तो केवळ सांसारीक व्यवहार. आणि ईतर सर्व व्यवहारांमध्ये जे होते तेच प्रेमाच्या व्यवहारामध्ये होते, विश्वास नसेल तर प्रेमाचा व्यवहार सुध्दा मोडुन पडतो. अनेकदा सुखाच्या अपेक्षेने केलेले प्रेम हे प्राणांतीक दुःखास कारणिभुत ठरते. दुःखी, निरस, कंटाळवाण्या जिवनामधुन मुक्ति मिळविण्यासाठी प्रेम व रोमांस यांनी जगभरातील प्रेमिकांना रोमांचक अनुभव दिले आहेत. परंतु माणसा माणसांच्या नातेसंबंधातील लबाडि, अविश्वास, फसवणुक, स्वार्थी वृत्तींना सुध्दा सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. जिथे अपेक्षा आहेत तिथेच अपेक्षा भंग होत असतो.