Tuesday, September 18, 2018

विचारांनी संस्कृती व संस्कृतींनी धर्माचा पाया रचला

विश्वाचि रचना झाल्यानंतर पृथ्वीतलावर अनेक नैसर्गिक घडामोडिंमधुन सजीव निर्मिती झाली. सजिव निर्मितीमागे कोणाचाहि कोणताहि ऊद्देष नाहि, ती फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया होती. सजिवांमधिल मानव प्राण्याने संवादासाठि वेगवेगळ्या आवाजांमधुन भाषेचि निर्मिती केली. भाषेमुळे मानव विचार करू लागला व विचार लक्षात ठेऊ लागला. पिढि दर पिढि हे विचार अधिकाधिक ऊन्नत होऊ लागले व ऊपजिविका व स्वसंरक्षण यापलीकडे जाऊन त्याने विज्ञान, संस्कृती, धर्म, अध्यात्म, साहित्य, कला, खेळ आदि वेगवेगळी क्षेत्रे निर्माण केली. ऊन्नत विचारांमुळे मानवाने स्वतःस निसर्गापासुन वेगळे व श्रेष्ठ बनविले व तो सुखदुःखांच्या कधिहि न संपणाऱ्या मायाजालामध्ये अधिकाधिक अडकु लागला.

आजकाल जगभरचे बुध्दिमंत आपल्या बुध्दीला वाव मिळण्यासाठी नविन संधिच्या शोधात ज्याप्रमाणे अमेरिकेकडे धाव घेत असतात त्याप्रमाणे साधारणपणे ३ ते ४ हजार वर्षापुर्वी युरोप, आफ्रिका व आशिया खंडामधिल बुध्दिमंत मध्य पुर्व आशिया मधिल ईराण मध्ये एकत्रीत येत असत व वेगवेगळ्या विचारांचि देवाणघेवाण होत असे. यामधुन पर्शियन व वैदिक या एकाच ज्ञानाच्या दोन संस्कृती निर्माण झाल्या. या दोन्हि संस्कृती एकाच विचारांच्या होत्या, त्या एकाच ठिकाणि म्हणजे ईराण मध्ये निर्माण झाल्या व त्यांचा नंतर भारत, युरोप, अरबस्तान, आफ्रिका व तिथुन नंतर सर्व जगभर प्रसार झाला. ज्या विचारांना धनाश्रय व राजाश्रय मिळाला त्यांचा प्रसार जास्त झाला व ज्यांना तसा आश्रय मिळाला नाहि व स्थानीक शक्तिंचा विरोध झाला त्या अस्तंगत झाल्या. या संस्कृतींच्या विचारांमधुन वा त्यांच्या विरोधि विचारांमधुन नंतर वेगवेगळे प्रेषीत निर्माण झाले. प्रेषितांनी काळानुरूप नवनवीन समाज कायदे निर्माण केले आणि त्यांच्या अनुयायांनी त्या कायद्यांचे संप्रदाय निर्माण केले, संप्रदायांचा रूपांतरण धर्मामध्ये झाले.

धार्मिक व्यवस्था निर्माण होण्यापुर्वी जगभर वेगवेगळ्या वंशाचे राजे राज्य करीत असत. सुसंस्कृत व प्रस्थापित राज्यावर बाहेरील रानटि टोळ्या आक्रमण करीत व नंतर ते त्या समाजाचे एक भाग बनुन रहात. परत दुसरी रानटि टोळीचे आक्रमण होई व परत समाजामध्ये सरमिसळ होत असे. असे सतत वर्षानुवर्षे चाललेले असे. नाईल व सिंधु नद्यां दरम्यान अशा नवनवीन वसाहती व राजांचे ऊदयअस्त होत असत व हि भुमि भविष्यकालीन जागतीक धर्मांचि एक प्रयोगशाळा बनली गेली होती.

मध्य पुर्व आशियामध्ये पर्शियन म्हणजेच ईराणियन साम्राज्य होते. ईराणियन्स म्हणजेच आर्यन्स होत. ईराणि साम्राज्यामध्ये बाहमन वा वाहमन (Kai Bahman or -Wahman) या नावाचा एक महान सम्राट झाला होता. पारशी अवेस्था या धर्मग्रंथामध्ये त्याचा ऊल्लेख Vohu Manah म्हणजे चांगल्या मनाचा राजा असाहि आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये त्याचा ऊल्लेख विष्णुंचे वामन अवतार व परशुराम अवताराशी खुपच साधर्म्य आहे.

बाहमन चे वडिल Esfandiar यांचा Rostam या राजाने वध केला होता त्याचा बदला घेण्यासाठि बाहमन याने रुस्तमचा वध केला, रूस्तमचे वडिल झाल यांचा वध केला, रुस्तमच्या भावांचा वध केला. रुस्तमच्या मुली काश्मीरमध्ये होत्या त्यांचाही त्याने वध केला. भारतामध्ये येऊन त्याने रूस्तुमच्या Faramarz या मुलाचा वध केला होता. रुस्तमच्या पुर्वजांच्या कबरीसुध्दा बाहमनने ऊध्वस्त केल्या होत्या. यावरून परशुरामाने केलेल्या क्षत्रीय राजांच्या हत्यांचि आठवण येते. पर्शिया मध्ये पुर्वी परशु म्हणजे कुऱ्हाडिंचा युध्दशस्त्र म्हणुन वापर होत असे. भटक्या दरवेशींचे परशु हेच हत्यार असे. भारताच्या पश्चिमेकडे परशुरामाचि मंदिरे सापडतात याचे कारण ईराण व अरबस्तान मधुन बाहमनी वंशीय लोक येऊन पश्चिम व दक्षिण भारतामध्ये स्थायिक झाले होते.


मध्यपुर्व आशिया मध्ये नंतर बाहमनी वंशीय राजे झोरास्ट्रीयन म्हणजे पारशी धर्मीय बनले. भारतामध्ये त्याचि पुनरावर्ती ब्राम्हण धर्मामध्ये झाली. त्यांनी (पारशी परशुराम) भारतामधिल क्षत्रीय राजांचा पराभव करून त्यांचे वर्चस्व कमी करून स्वतः सर्वश्रेष्ठ झाले व त्याप्रमाणे वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली गेली. ईराणचा पारशी धर्म व भारतामधिल ब्राम्हण धर्मीयांमध्ये गोपालन, अग्नीपुजा, सोमरस, होमहवन, जानवे, वेद - अवेस्था ग्रंथ, देवांचि नावे आदि बरेचसे साम्य आहे. वेद व अवेस्ता या धर्मग्रंथामधिल विचार सारखेच आहेत.

मध्यपुर्व आशिया मध्ये बाहमनी पारशी धर्माविरूध्द अब्राहमीक ज्यु, ख्रिस्ती, मुस्लीम धर्म निर्माण होऊन तिथुन बाहमनी पारशी धर्म हद्दपार केला गेला. भारतामध्येहि बाहमनी ब्राम्हण धर्माच्या वर्णाश्रम आचरणा विरूध्द एतद्देशीय बौध्द, जैन, शैव, शिख धर्म निर्माण झाले. भारतामध्ये मात्र गुप्त राजांच्या काळामध्ये ब्राम्हण धर्मास राजाश्रय व धनाश्रय मिळाला व त्यांनी वेगवेगळ्या देवतांच्या मुर्तीपुजा व त्यांचि मंदिर निर्मिती करून भारतभर धार्मिक वातावरण निर्माण केले. ब्राम्हण वेदांतींनी बौध्दांचे मोठ्या प्रमाणावर परत धर्मांतरं केले. सिंधु नदीवरून ब्राम्हण धर्मास भारतामध्ये हिंदु धर्म हे नाव पडले गेले व ईंग्रजांनी जनगणने दरम्यान त्यावर शिक्कामोर्तब करून टाकले.

भारतामध्ये मुघलांच्या अगोदर अनेक मुस्लीम सुलतान राज्य करीत असत त्यामधिल एक होते बाहमनी सुलतान. हे बाहमनी सुलतान ईस्लामी झाल्यानंतर सुध्दा स्वतःस ईराणच्या पुर्वीच्या बाहमन या सम्राटाचे वंशज मानण्यात धन्यता मानत असत.

गायत्री व गोमाता यांचे मुळसुध्दा पर्शियन आहे. पारशी धर्माच्या अवेस्ता धर्मग्रंथा नुसार गायोमार्ट हा त्यांचा आदिगुरू आहे ज्याने त्यांच्या अहुरा माजदा या ईश्वराची आराधना सुरू केली. ग्रीक समाज धरतीमातेला गैया म्हणतात. मश्य व मश्याना या प्रथम दंपत्ती पासुन मानव वंशाचि सुरूवात झाली असे ते मानतात ज्यांस भारतामध्ये मस्त्यावतार असे संबोधले जाते. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, परशुराम, वामन हे दैवी अवतार पर्शियन धरतीवरील आहेत तर नंतरचे राम, कृष्ण, बुध्द या भारतीय महाविरांना अवतारांचा दर्जा दिला गेला.

अतिरिक्त व अनावश्यक विचारांमुळे बुध्दिचे वैभव वाढत गेले व बुध्दिमत्तेच्या फापटपसाऱ्या मधुन आधुनिक संस्कृती, धर्मांचे व विज्ञानाचे अवडंबर वाढत गेले व मुळचि नैसर्गिक जीवनशैली मानव हरवुन बसला. विज्ञानामुळे धर्माचे पितळ ऊघडे पडत चालले आहे परंतु त्यामधुन चंगळवाद जोपासला जात आहे. पहिला काटा काढण्यासाठि दुसऱ्या काट्याचा आधार घ्यावा लागतो परंतु त्याने जखम भरली न जाता ति अधिकच चिघळत जाते याचे भान रहायला हवे.

Thursday, September 13, 2018

भाषा व मानवी ऊत्क्रांती

संवादासाठि आवाजाचे भाषेमध्ये रूपांतर करण्यात आदिम मानव यशस्वी झाले. भाषेमुळे विचार व मन अस्तित्वात आले. मनाने मानवी जिवनाच्या विकासा बरोबर श्रध्दा व भावनांच्या मोठमोठ्या कल्पना निर्माण केल्या. भाषेविना शरीर विचार करू शकत नाहि, विचारांविना मनास अस्तित्व प्राप्त होत नाहि. सुख, दुःख, आनंद, शांती या सर्व मनाच्या, विचारांच्या, भाषेच्या कल्पना आहेत. मनाच्या कल्पनां शिवाय शरीर आपले नैसर्गिक जिवन जगु शकते. डॉक्टर असूनही जंगलामध्ये राहणारे आमटे कुटुंबिय सुखी आहेत कि गडगंज संपत्ती असुनहि बँकांचे पैसे बुडवुन देश सोडणारे कोट्याधीश सुखी आहेत? मन हे सतत एैश्वर्याचि नवनविन ऊंचि गाठत असते परंतु ते कधिहि सुखी होत नाहि. मनाच्या वासना व हव्यास या कधिहि तृप्त होत नाहित.

लहानपणी आईवडिलांचे बोट धरून चालावयास शिकणारे मुल मोठे होताच स्वावलंबी होते व आपल्या विश्वामध्ये भराऱ्या मारू लागते. यासाठि त्याला यथावकाश आपल्या आईवडिलांचे बोट सोडावे लागते. आठवा ते अजरामर गीत,
     आकाशी झेप घेरे पाखरा, सोडि सोन्याचा पिंजरा....

मुक्त वाहणाऱ्या नदि प्रमाणे आपले नैसर्गिक जिवन असते, तिथे सुख व दुःख या कल्पनांचे बांध नसतात. झाडापासुन पाने, फुले व फळे अलग होताना ना झाडाला दुःख होते व ना झाडाला सोडणाऱ्यांना सुख होते. सतत वाहणे हा सृष्टिधर्म आहे. त्यागेन एक अमृतत्व लभते...

विचारांच्या व मनांच्या श्रध्दांच्या व भावनांच्या विविध संकल्पनांनी मानवी जिवनास ठिकठिकाणी बांध घातले जातात. खळाळत वाहणारा जिवन प्रवाह डबक्या डबक्यामध्ये नासवला, सडवला जातो. अशा कुजक्या जिवन प्रवाहांचे संस्कार व संस्कृतीच्या रितीरिवाजांखाली अवडंबर माजवले जातात. डबक्यांमधिल नाशीवंत जिवन प्रवाहांचि वेगवेगळी नक्षीदार कुंडे नदिच्या प्रवाहाच्या भितीने आपले वेगवेगळे अस्तित्व कसोशीने टिकवुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओबडधोबड खडकाळ दगड गोट्यांच्या व धबधब्यांच्या जिवंत नदि प्रवाहा एैवजी प्रवाहा पासुन वेगळ्या असणाऱ्या नक्षिदार कुंडामधिल जिवन सुरक्षित व सुखी भासणे हेच आपले फार मोठे दुर्दैव असते. 

Monday, September 10, 2018

देवपुजा


प्रश्नकर्ता: आपण देवपुजा का करतो?

जे कृष्णमुर्ती: माफ करा, आपण देवांचि खरोखरी पुजा करीत नाहि. आपण देवांवर प्रेम करीत नाहि. जर आपण खरेच देवावर प्रेम करीत असु तर हि असली देवपुजा आपण खचितच करणार नाही. आपण अज्ञाताला घाबरत असतो म्हणून देवांचि पुजा करीत असतो. आपण प्रेमापोटी नव्हे तर भीतीपोटि देवतांचि पुजा करत असतो. मुर्ती, मंदिरे, पुजाविधी, जानवे, माळा, अंगारे धुपारे हे काहिहि ईश्वरनिर्मित नाहि. या सर्व निरूपयोगी गोष्टि मानवाने भितीपोटि तयार केलेल्या आहेत. दुःखी, निराश, भयग्रस्त माणसे देवतांच्या पुजा करत असतात. ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती, अधिकार, सत्ता आहेत ती माणसे सुखी नसतात. महत्वाकांक्षी माणसे हि सर्वात जास्त दुःखी असतात.

आपण जेव्हा सर्व आशा - आकांक्षामधुन मुक्त होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखी होतो. अशी सुखी माणसे देवतांच्या पुजा करीत बसत नाहित. दुःखाने पिचलेली, निराश झालेली, अन्यायाने त्रस्त झालेली माणसे मंदिराच्या पायऱ्या झिजवत असतात. परंतु त्यांनी मंदिरामध्ये आपला वेळ व पैसा व्यर्थ व्यतीत करण्या एैवजी आपल्या दुःखाचे मुळ असणारे अज्ञान शोधून काढले तर त्यांना निश्चितच सत्याचे दर्शन होईल, ईश्वर नेमका काय आहे हे समजेल व ते सर्व नरनारी सुखी होतील.

Saturday, September 08, 2018

वास्तवतेचे मृगजळ


मन म्हणजे विचारांच्या न संपणाऱ्या शृंखला होत. विचारांच्या शृंखलांना मन हि संज्ञा दिली गेली आहे. मनास अस्तित्व नाहि, जे काहि चैतन्य जाणवते ते केवळ विचार होत. विचारांचे मुळ शोधले असता आपण आवाजाच्या स्पंदना पर्यंत जातो. तर स्पंदने हि ऊर्जाशक्तिचे आविष्कार आहेत. ऊर्जाशक्तिच्या स्पंदनांचा म्हणजे जिवनऊर्जेचा ऊपयोग करून सजिव जिव आपल्या जीवनावश्यक गोष्टि मिळवीत असतात व प्रजोत्पादन करत असतात. मानवी ऊत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये मनुष्य प्राण्याने या ऊर्जेच्या स्पंदनांचा भाषेमध्ये रूपांतरण केले व त्याच्या भाषा संवादाच्या प्रभुत्वाने म्हणजेच त्याच्या अधिक ऊच्च विचारांनी त्याने पृथ्वीवर प्रभुत्व मिळविले.

ऊर्जा स्पंदनांना भाषेमध्ये रूपांतरण करून आपण जे विचार करत असतो त्या विचारातुन ‘मी’ चि संकल्पना निर्माण झालेली आहे. जर विचार नसतील तर ‘मी’ सुध्दा नसणार. विचार हे शरीराहुन भिन्न आहेत. शरीर बेशुध्द झाले अथवा मृत झाले तरी विचार जिवंत असतात. कारण विचार हे ऊर्जेच्या स्पंदनांचे वेगवेगळे प्रकार आहेत व ऊर्जेचा विनाश होत नाहि. मृत व्यक्तीचि ऊर्जा स्पंदने हि दुसऱ्या जिवंत मनुष्याच्या संपर्कात येतात व त्यांचा पुढिल प्रवास सुरू राहतो. ऊर्जा स्पंदनांचे विचार हे शरिरास एक वाहन म्हणुन वापरत असतात. विचार हे सुध्दा ऊर्जेच्या स्पंदनास भाषेने दिलेले वेगवेगळी रूपे असतात. जसे एकाच हवेचे बासरीमधुन वेगवेगळे सुर निघतात त्याप्रमाणे एकाच वैश्वीक ऊर्जेच्या स्पंदनामधुन प्रत्येक शरीर वेगवेगळे विचार करत असते.

विचार व शरीर यांच्या संगनमताने मी, माझे आप्तेष्ट, माझा धर्म, माझा देश आदि वेगवेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक आपत्ती व त्यामधिल अनेक जडणघडणीमुळे अपघाताने जिव निर्मिती झाली आहे. अनेक वनस्पती व अनेक प्रकारचे प्राणि निर्माण झाले व त्यामधिल एक मानव प्राणी आहे. मानव प्राण्याने भाषा निर्माण केली व या भाषेच्या माध्यमामुळे त्याचि अफाट वेगाने भौतिक प्रगती झाली. भौतिक प्रगती बरोबरच अफाट मानसिक कल्पना तो रंगवु लागला. देवता, राक्षस, भुते, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य हे त्याच्या अफाट मानसिक कल्पनांचे आविष्कार आहेत.

बोलाचिच कढि व बोलाचाच भात या ऊक्तिप्रमाणे विचारां मधुन जन्मलेल्या सर्व कल्पना या असत्य आहेत त्यांचा वास्तवाशी काहिहि संबंध नाहि. शरिर हे सुध्दा पृथ्वीतलावरील एक अपघात आहे. शरीर व मन हे ज्या ऊर्जेमधुन निर्माण झाले आहेत ती ऊर्जा अविनाशी आहे परंतु तिला ना शरीर आहे वा ना मन आहे, तिथे काहिहि अनुभवगम्य नाहि. अशा अवस्थेमध्ये आपण समाजामध्ये समाजाच्या नियमांप्रमाणे राहुन कालव्यतीत करण्याहुन तरणोपाय नाहि. सर्व आशा आकांक्षा, वासना नाहिशा झाल्याने भिती नाहिशी होते व आपण आपले आयुष्य निर्धोकपणे जगु शकतो. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान हे संतांचे वचन याच सत्याचि साक्ष आहे. नवनविन वैज्ञानीक संशोधना मुळे जे ज्ञान आज विकसीत झालेले आहे ते पुर्वी संतांना उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांचि अनुभुती हि त्यावेळच्या ज्ञानावर आधारीत होती त्यामुळे ते चुकिचे होते कि काय असा गैरसमज निर्माण होऊ शकतो.