Monday, November 09, 2015

चैतन्य

अध्यात्मिक साधू संतांनी अनुभवलेले व वैज्ञानिकांनी नंतर पडताळलेले हे विश्व दोन प्रकारचे आहे, 
  • एक व्यक्त, दृश्य, भौतीक, बाह्य, प्रकृती, physical स्वरूपाचे आहे तर दुसरे 
  • अव्यक्त, अदृश्य, अध्यात्मीक, आंतरीक, पुरूष, spiritual स्वरूपाचे आहे.
दृश्य, भौतीक विश्वाचा जन्म होतो सबब त्याला अंतहि आहे म्हणुन ते विनाशी आहे तर अदृश्य असे अध्यात्मीक विश्व हे ऊर्जा स्वरूपात असल्यामुळे त्याला जन्म व मृत्यु नाही ते अविनाशी आहे. ऊर्जा स्वरूपातील अध्यात्मीक विश्वातुनच ठराविक परीस्थीती मध्ये भौतीक स्वरूपातील विश्वाचा जन्म होतो. आकाराने व शक्तीने विशाल, असिमित असणाऱ्या अदृश्य अध्यात्मीक विश्वाला आपण ईश्वर असे संबोधतो तर आकाराने व शक्तीने लहान असणाऱ्या दृश्य भौतीक विश्वाला आपण अपरा प्रकृती समजतो. 

अध्यात्मिक विश्व हे ऊर्जा स्वरूपात असल्यामुळे ते चैतन्यमय आहे तर भौतीक स्वरूपातील विश्व हे अचेतन भासते. अध्यात्मिक ऊर्जेमधुनच भौतीक पदार्थ निर्माण होत असतात त्यामुळे त्या ऊर्जेचे गुण हे भौतीक पदार्था मध्ये ऊतरत असतात. काहिंमध्ये (मनुष्य) ते जास्त प्रमाणात दिसतात तर काहिंमध्ये (दगड माती) ते कमी प्रमाणात दिसतात. दगडांमध्ये चैतन्य जवळ जवळ दिसतच नाहि. दगडांपासुन पुढे माती, वनस्पती, पशु पक्षी, मनुष्य प्राण्यापर्यंत हे चैतन्य हळु हळू नैसर्गीक रित्या विकसीत होत असते. काहि विशिष्ट पध्दतींनी या गुणांचा विकास करता येतो (ध्यास, ध्यान). या गुणांचा साधनेने प्रचंड प्रमाणात विकास केल्यामुळे सामान्य माणुसहि असामान्य महामानव बनु शकतो याची अनेक ऊदाहरणे आपल्या परिचयाची आहेत.

म्हणजे आपले खरे स्वरूप हे ऊर्जेचे आहे आणी ति ऊर्जा आपल्या मध्ये आत्म स्वरूपामध्ये ऊपस्थीत आहे. विश्वामधील ऊर्जेला परमात्मा व शरीरा मधील ऊर्जेला आत्मा म्हटले जाते परंतु स्वरूपाने त्या दोन्ही एकच आहेत. जसे आकाराने विशाल असलेल्या समूद्रातील पाणी व आकाराने लहान असणाऱ्या पेल्यामधील पाणी हे पाणीच असते.
भौतीक पदार्थाने बनलेले शरीर, त्याचे विचार, संकल्पना, भावना, त्याचे अस्तीत्व, अनास्तीत्व, कालावधी ज्या कशामुळे त्याचा आपणास प्रत्यय येत असतो ते सारे नाशीवंत अाहे, ते आपले खरे स्वरूप नाही.
आपणास आपल्या खऱ्या स्वरूपाचा प्रत्यय येण्यासाठी सतत आपल्या मनास ध्यानधारणेच्या माध्यमातुन अंतर्मुख केल्याने अचेतन शरीराचा लोभ लोप पाऊन आपण त्यापासुन मुक्त होऊन सचेतन चैतन्याशी एकरूप होऊ शकतो.

कोजागीरी पौर्णिमा

कोजागीरी म्हणजे आपल्या शरीरस्थीत कुंडलीनी शक्तीचे जागरण, तीचे ध्यान करीत केलेली साधना. या पौर्णिमे दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्या मध्ये कमीत कमी अंतर असते त्यामुळे दोघांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती मध्ये प्रचंड वाढ झालेली असते परीणामी आपल्या शरीरा मधील अध्यात्मीक शक्तीचे प्रवाह जास्त प्रमाणात आंदोलीत होत असतात. अशा अनुकुल परीस्थीती मध्ये ध्यान केल्याने आपली अध्यात्मीक, शारिरिक, मानसीक व भौतीक प्रगती होते व अमरत्व प्राप्त होते.

अमृत हे अमरत्वाचे प्रतीक समजले जाते. प्रगाढ ध्यानावस्थेत साधकाच्या घशामध्ये मधुर चवीची लाळ तयार होते, त्याला अमृत म्हणतात. कोजागीरी पौर्णिमेच्या रात्री हे अमृतपान होते. ज्यांना अशी साधना शक्य होत नाही असे साधक व ईतरजण दुधाची खीर अमृत समजुन प्राशन करण्याचा प्रघात आहे. 

श्रध्देने दरवर्षी खीर प्राशन करता करता एकदिवस आपणास हि अमृत प्राशनाचे सौभाग्य लाभो हि या कोजागीरी पौर्णिमे निमित्त आपणास सदिच्छा !!!

शुभ दिपावली

ॐ असतो मा सद्गमय । 
तमसो मा ज्योतीर्गमय ।।
मृत्योरमा अमृतम गमय ।
ॐ शांती शांती शांतीः ।।

हे ईश्वर,
   हमे असत्य से सत्य कि ओर ले चलना।
   हमे अंधकार से ऊजाले कि ओर ले चलना।
   हमे मृत्यु से अमरत्व कि ओर ले चलना।
   और हमे शारिरिक, मानसीक और अध्यात्मीक शांती प्रदान करना।

Om Asato Ma Sad Gamaya
Tamaso Ma Jyotir Gamaya
Mrityor Ma Amritam Gamaya
Om Shanti Shanti Shanti
Lead us from untruth to truth
From darkness to light
From death to immortality
Om Peace Peace Peace.

हमारा भौतीक जिवन कभी ना कभी नष्ट होनेवाला है ईसलिये वह असत्य है। और हमाराअध्यात्मीक स्वरूप अविनाशी प्रकाशमय ऊर्जा है, ईसलिये वह सत्य है।
हमे असत और अंधकार रूपी भौतीक जिवन से मुक्ती मिले और सत, प्रकाशमय, चिरंतन अध्यात्म कि प्राप्ती हो। ईससे हमे शारिरिक, मानसीक और अध्यात्मीक शांती प्राप्त होकर हमे अमरत्व कि प्राप्ती हो।
दिपावली हमे एकसाथ सत्य और असत्य दोनो का दर्शन कराती है। अंदरसे सत्य, चिरंतन स्वयंप्रकाश का दर्शन और बाहरसे असत्य और अंधकारमय भौतीकता का प्रदर्शन ।
दिपावली का त्यौहार हमारा अध्यात्मीक विकास मनाने का यानी अंदर एक एक दिप जलाकर स्वयंप्रकाशी होने का त्यौहार है।
बाहर असत्यका प्रदर्शन करते करते हमे एक दिन हमारे अंदर स्वयंका अध्यात्मीक प्रकाश स्वरूपका दर्शन करना है। यहि दिपावली का सहि मकसद है।

|| शुभ दिपावली । Happy Deepavali ||

Saturday, October 31, 2015

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

संत तुकारामांच्या वेळची हि मनमोहक परिस्थिती होती. हिरव्यागार नैसर्गिक वातावरणाामध्ये माणूस लहानाचा मोठा होत होता, भोवतालच्या निसर्गाचा आस्वाद घेत घेत तो इथेच वैकुंठाचे सुख उपभोगीत होता. संत तुकाराम सदेह स्वर्गात गेले याला कारण त्यांचा स्वर्ग वा वैकुंठ इथे पृथ्वीतलावरच होता.
आज परीस्थिती बदलली आहे. माणसाने या सुंदर वसुंधरेचे लचके तोडून तिला विद्रूप केली आहे. नजीकच्या काळात परीस्थिती इतकी भयानक होईल कि माणसाला साध्या पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा युद्धे करावी लागतील. आपल्या ग्रहाची वाट लाऊन आजकाल आपण अवकाशामध्ये पृथ्वी सारखा दुसरा ग्रह कोठे दिसतो आहे काय याचा शोध घेत आहोत, पण सापडत नाही कारण पृथ्वी सारखा ग्रह बनविण्यासाठी निसर्गाला करोडो वर्षांची मेहनत घ्यावी लागते. जे बनवायला निसर्गाला अनेक युगे लागली ते आपण काही पिढ्यांमध्ये गमावणार आहोत. वेळीच आपण जर काही हालचाली केल्या नाहीत तर निसर्ग कोणाची वाट पहाणार नाही, त्याचे सृजनाचे चक्र जसे अव्याहतपणे चालत आहे तसेच त्याचे विनाशाचे चक्रही सुरु व्हायला वेळ लागणार नाही व एकदा का ते चालू झाले कि त्याला कोणीही थांबवू शकणार नाही.
काय करू शकतो आपण? गरज म्हणून नव्हे तर हव्यासापोटी आपण नैसर्गीक साधन संपत्तीचा विनाश करीत आहोत. जसजशी लोकसंख्या वाढणार आहे तसतसा या वाढत्या लोकसंखेचा हव्यास वाढणार आहे व निसर्गाचा विनाश वाढतच राहणार आहे. दुर्दैव असे कि हे हव्यासी लोकच जगभरातील सरकारे चालवीत आहेत. त्यांच्या पिढ्यान पिढ्यांच्या रसदीची ते सोय करीत आहेत, पण सामान्य माणसांचे काय?
एक रामबाण उपाय आहे. जे हव्यासी लोक आजपर्यंत या वसुंधरेचे लचके तोडीत होती तीच लोक तिला हिरव्यागार शालुने सजवतील!!!
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये आपल्या कडे शौचालयांची सोय नव्हती स्त्रियांसह सर्वजन बाहेर उघड्यावर बसायचे. सरकारने एक नियम केला ज्याच्या घरी शौचालय असेल त्यालाच पंचायतीच्या निवडणुकीस उभे रहाता येईल. परीस्थित झपाट्याने बदलली व प्रत्येक घरांघरांमध्ये शौचालये उभी राहली. हाच फॉर्म्युला आपण वृक्ष संवर्धनासाठी वापरू शकतो. सर्वत्र एकच नियम करायचा अमुक एक गोष्ट हवी असेल तर तमुक एव्हढी झाडे तुमच्या नावावर तुमच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी असायला हवीत.
काहि ऊदाहरणे :
इयत्ता १ली मध्ये प्रवेश पाहिजे तर मुलाच्या नावावर किमान एक झाड हवे, पाचवी प्रवेशाच्या वेळी पाच तर कॉलेज प्रवेशावेळी किमान दहा झाडे लागतील. प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येकाने किमान एक झाड लावावे.
नोकरी हवी असेल तर किमान २५ झाडे हवीत
व्यवसाय सुरु करायचा असेल तर व्यवसायाच्या जागेत, गुंतवणुकीच्या प्रमाणात झाडांची लागवण असायला हवी. उदा. एक लाख रुपये गुंतवणी मागे एक झाड.
घर बांधायचे असेल तर घराभोवती प्रत्येक कुटुंबाच्या मागे किमान पाच झाडे असावीत.
निवडणुकीला उभे राहायचे असेल तर त्यासाठीहि झाडांची संख्या हि पात्रता ठरवली जाईल. प्रत्येक मतदार संघात जास्तीत जास्त झाडे ज्याच्या नावावर असतील तो त्या मतदार संघाचा प्रतिनिधी असेल. निवडणुकीचा खर्च वाचेल व पर्यावरणप्रेमी, जागरूक उमेदवार शासन यंत्रणेमध्ये निवडले जातील. आजकाल सरपंचाच्या निवडणुकीसाठी गावागावातील राजकारणी काय काय करतात हे आपण पाहतोच आहोत. हि कल्पना प्रत्यक्षात उतरली तर पंतप्रधान बनण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार आपल्या मतदारसंघात तर झाडे लावेलच पण जागा कमी पडली तर राजस्थान सारख्या वाळवंटाचेही नंदनवन करतील. मंत्रीपदांसाठी निवडणूक घ्यायचीच झाली तर उमेदवारांना पडलेली मते व प्रत्येक मतदाराची झाडांची संख्या यांचा गुणाकार करून जी संख्या येईल ती त्याची मते ठरवली जाईल.
सामान्य माणसांना भुर्दंड का? प्रत्येकाला प्रत्येक श्वासाला प्राणवायुची गरज भासते. प्राणवायु फक्त झाडांपासुनच मिळतो सबब प्रत्येकाने आपल्या प्राणवायुची सोय केलेली बरी नव्हे काय?
वरील कल्पना प्रत्यक्षात उतरवणे तसे फारसे अवघड नाही व अशक्य तर मुळीच नाही फक्त जबरदस्त इच्छाशक्ती व पुढील पिढ्यांसाठी आपण हि वसुंधरा नुसती सुरक्षितच ठेवली नव्हे तर तिचे संवर्धन हि केले याचे समाधान आपणास मिळेल. यासाठी काही पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागेल.
वनविभागाची पुनर्रचना करून तिचे अद्ययावत संगणीकृत करावे लागेल. देशातील प्रत्येक झाडाची संगणकामध्ये नोंदणी करावी लागेल. देशातील प्रत्येक माणसाचे खाते वनखात्याकडे असेल, त्याच्या ग्रीनकार्ड मध्ये त्याच्या खाजगी मालकीच्या झाडांची अद्ययावत नोंद असेल. झाडांचा आकार, वय व त्याची ऊपयुक्तता यांनुसार प्रत्येक झाडाला वनखाते गुण देतील. ज्या व्यक्तीकडे स्वतःकडे झाडे लावण्याची सोय म्हणजे जागा नसेल त्याने दुसऱ्याची जागा विकत वा भाड्याने घेवून त्यामध्ये झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करावे. तेही शक्य नसेल तर त्याने वनखात्याला प्रत्येक झाडामागे काही रक्कम दरवर्षी 'हरित कर' म्हणून जमा करावा, वनखाते या रकमेतून त्याच्या नावावर वनखात्याच्या जागेमध्ये वृक्षारोपण करेल व त्याचे संवर्धन करेल. वनखाते हे स्वतंत्र विभाग असेल व ते वेळोवेळी प्रत्येकाच्या झाडांच्या संख्येचीे पडताळणी करेल व हि माहिती ते माहितीजालावर वेळोवेळी अद्ययावत करून ठेवतील.
वृक्षतोड वा वृक्षहानी हि मनुष्यवध वा मनुष्य हानिसारखा गंभीर गुन्हा समजला जाईल व संबंधितांवर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.
झाडांशिवाय बर्याच काळ पडीक राहिलेली जमीन सरकार जमा करण्यात येऊन त्या जमीनी मध्ये वनखात्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात येईल.
डोंगर व टेकड्या यांचा वापर पावसाचे पाणी जिरवण्या साठी storage tank म्ह्णुन करावा. यासाठी माथ्यापासुन ते पायथ्या पर्यंत आडवे चर काढावेत व त्याच्या बांधावर वृक्षारोपण करावे. या पध्दतीने काहि वर्षामध्ये दुष्काळी भागाचा कायापालट होऊ शकतो व मोठमोठी धरणे बांधावी लागणार नाही.
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन यासाठी प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती ग्रामिण भागामध्ये होऊ शकते, शहराकडे वळणारा लोंढा कमी होऊन शहरांचा बकालपणा तर कमी होईलच शिवाय शहरीकरणामुळे होणारा निसर्गाचा संहार सुध्दा कमी होईल.