Sunday, February 25, 2018

दुःख नको असेल तर...



जोपर्यंत मनुष्याला सुख हवे असते तोपर्यंत ते प्राप्त करण्यासाठी त्याचे विचारचक्र व तदनुसार कर्म सतत चाललेले असते. विचार व कर्म मनुष्याला संसारामध्ये बांधुन ठेवत असतात. सुखांच्या लालसेने संसारामध्ये राबणाऱ्या मनुष्याला सतत दुःखांचाच सामना करावा लागत असतो. अवतारी पुरूष असो, साधुसंत असोत वा गर्भश्रीमंत असो सर्वांना दुःखांचा सामना करावा लागत असतो. बुध्दिमान व विचारी मनुष्यजन्माला दुःख हे मोफत वाटले जात असते. दुःखामुळे विचारी मनुष्य त्या दुःखांच्या मुळाशी जाऊन त्यांचा समुळ बिमोड करू शकतो. 

सांसारीक सुखांच्या वासनेमधुन मनुष्याला बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे सुखाचा पाठलाग बंद करणे. हे अशक्यप्राय असल्यामुळे या संसारसुखांचा जिथुन ऊगम होतो अशा ईश्वरीय शक्तिचि साधना करण्यासाठी मनाला ग्रंथ, गुरू, मंत्र यांच्या स्वाधिन करावे लागते. मन जसजसे साधनेमध्ये रमु लागते तसतसे ते संसार सुखांपासुन निवृत्त होऊ लागते. मन जेव्हा पुर्णपणे संसार सुखांपासुन निवृत्त होते तेव्हा ते परत संसाराकडे ढुंकुनहि पहात नाहि. मनुष्याच्या गरजा अतिशय कमी असतात परंतु वासनांना अंत नसतो. 

या संसारमार्गाच्या प्रवृत्तीपासुन निवृत्त होण्यासाठी त्याच ईश्वरास शरण जायला हवे जिथुन या संसार वृक्षाचि मुळे निघाली आहेत व केवळ त्यालाच शरण गेलेले सत्पुरूष परत या संसारामध्ये येत नाहित. - #ज्ञानेश्वरी १५:४

ततः पदं तत्परिमार्गितव्य यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी।। #गिता १५:४ ||

जिस परमपुरुषसे इस मायारचित संसारवृक्षका विस्तार हुआ है, उस परमपदको शरणागत होकर खोजना चाहिये अर्थात् जानना चाहिये कि जिस परमपदमें पहुँचे हुए पुरुष फिर संसारमें नहीं लौटते -- पुनर्जन्म ग्रहण नहीं करते।  - आदि #शंकराचार्य

Singleminded devotion which consists of ceaselessly thinking of or meditating on the Supreme Being is the sure means of attaining Selfrealisation. Supreme Being Who is 'Existence Knowledge Bliss Absolute' is the goal. Taking sole refuge in the Primeval Purusha is the means to know or realise that supreme goal going whither the wise do not return again to this world of death. - Swami #Sivanand

Sunday, February 11, 2018

निरिच्छावस्था हिच मुक्तावस्था आहे

|| भगवद गिता 15.3 Bhagwat Gita ||


न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा।।

या अधोमुखी संसारवृक्षाचा आकार, आदि, अंत, मध्याचा पार लागु शकत नाहि. केवळ निरिच्छावस्था हिच त्यामधुन बाहेर पडण्याचा मार्ग आहे. केवळ नातलग, अर्थ, लोकसंग्रह आदि सुखांच्या ईच्छेमधुनच नव्हे तर स्वर्गप्राप्ती, ईश्वरप्राप्ति वा मोक्षप्राप्ती या सर्व ईच्छाप्राप्तींच्या अभिलाषांमधुन निवृत्त होणे हेच अंतीम ऊद्दिष्ट असायला हवे.

The world's form is not perceived here as such, neither its end nor its origin, nor its foundation nor resting place: having cut asunder this firmly rooted peepul tree with the strong axe of non-attachment.

यह जो संसारवृक्ष है इसका ऊलटा स्वरूप जैसा यहाँ वर्णन किया गया है वैसा दिखाई नहि देता क्योंकि यह स्वप्नकी वस्तु मृगतृष्णाके जल और मायारचित गन्धर्वनगरके समान होनेसे देखतेदेखते नष्ट होनेवाला है। इसी कारण इसका अन्त अर्थात् अन्तिमावस्था अवसान या समाप्ति भी नहीं है। तथा इसका आदि भी नहीं है अर्थात् कहाँसे आरम्भ होकर यह संसार चला है ऐसा किसीसे नहीं जाना जा सकता और इसकी संप्रतिष्ठास्थिति भी नहीं है यानी आदि और अन्तके बीचकी अवस्था भी किसीको उपलब्ध नहीं होती। इसकी मूलें -- जड़ें अत्यन्त दृढ़ हो गयी हैं -- भली प्रकार संगठित हो चुकी हैं। ऐसे संसाररूप अश्वत्थको असङ्गशस्त्रसे छेदन करके यानी पुत्रैषणा, वित्तैषणा और लोकैषणादिसे उपराम हो जाना ही असङ्ग है। ऐसे असङ्गशस्त्रसे जो कि परमात्माके सम्मुख होना, निश्चयसे दृढ़ किया हुआ है और बारंबार विवेकाभ्यासरूप पत्थरपर घिसकर पैना किया हुआ है।

Saturday, February 10, 2018

गिता १५:२



|| भगवद गिता 15.2 Bhagwat Gita ||


अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके।।

Below and above spread branches of the world tree, nourished by the three qualities / Gunas; sense-objects are its buds; and below, in the world of men, stretch forth the roots, originating action.

अपने सत्त्व, रज और तम इन तीनों गुणोंसे बढ़ी हुई -- स्थूलभावको प्राप्त हुई और विषयरूपी कोंपलोंवाली उस संसारवृक्षकी बहुतसी शाखाएँ जो कि अपनेअपने कर्म और ज्ञानके अनुरूप नीचेकी ओर मनुष्योंसे लेकर स्थावरपर्यन्त और ऊपरकी ओर धर्म यानी विश्वकर्ता ब्रह्मापर्यन्त, वृक्षकी शाखाओंके समान फैली हुई हैं।

मुळे वरती व फांद्या खाली असणाऱ्या ऊलट्या असणाऱ्या संसारवृक्षाच्या शाखा मनुष्य लोकाच्या खाली व वर स्वर्ग आदि लोकांपर्यंत पसरल्या आहेत. त्या सत्व, रज, तम या त्रिगुणांमुळे विशेष वाढलेल्या आहेत. वैषयिक वासना या त्या शाखांचे कोमल अंकुर आहेत. मनुष्यास कर्म करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या वासना सर्वत्र पसरलेल्या आहेत.

अज्ञानामुळे हि ऊलटि अष्टधा प्रकृती निर्माण होते. अज्ञान नाहिसे करण्यासाठी ज्ञान प्राप्त करावे लागते.

तरी बध्दमुळ अज्ञाने । महदादिकि शासने । वेदांचि थोरवचने । घेऊनियां ।।

Wednesday, February 07, 2018

संसारवृक्ष

श्री भगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् || भ गिता १५:१ ||

सर्वोत्तम ब्रम्ह ज्या वृक्षाचे मुळ आहे, ज्याच्या फांद्या खाली आहेत म्हणजे संसार निकृष्ट आहे परंतु तो कधिहि क्षय पावत नाहि अशा या वृक्षाचि पाने म्हणजे वेद आहेत म्हणजे निकृष्ट ज्ञान आहे. जो या संसारवृक्षास निट जाणतो तो खरा ब्रम्हज्ञानी होय. - #ज्ञानेश्वरी_१५:१ 

मागील अध्याया शेवटि भगवंतांनी असे सांगितले कि, ज्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाले आहे त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. हे ब्रम्हज्ञान प्राप्त होण्यासाठी व झालेले ब्रम्हज्ञान टिकण्यासाठि अंतःकरण शुध्द व पवित्र असले पाहिजे. अंतःकरण शुध्द होण्यासाठी विवेक व वैराग्याचि आवश्यकता असते. ज्याप्रमाणे अन्नामध्ये विष आहे हे समजताच आपण अन्न कितीहि चांगले असले तरी ते टाकुन देतो त्याप्रमाणे संसार हा मिथ्या आहे व ब्रम्हज्ञानासाठि अडथळा आहे हे समजल्या नंतर वैराग्य सहज प्राप्त होते. संसार हा अडथळा आहे हे समजविण्यासाठि भगवंतांनी ऊलट्या वृक्षाचि ऊपमा दिली आहे. संसाररूपि झाड ऊलटे केल्याशिवाय म्हणजे त्याचा बिमोड केल्याशिवाय त्याचे मुळ असणारे ब्रम्ह अनुभुतीमध्ये येत नाहि. ब्रम्ह हे सर्वत्र समान आहे परंतु संसाराच्या कल्पनेमुळे ते वर आहे असा भास निर्माण होतो. निर्गुण निराकार ब्रम्हास मायेच्या अज्ञानाचा विळखा पडतो. अज्ञान हे या संसारवृक्षाचे बिज आहे. गाढ झोपेचि सुषुप्ती हा बिजांकुर आहे, तर स्वप्नावस्था व जागृतअवस्था हि त्याचि फळे आहेत. महाभुते हि या वृक्षाच्या फांद्या आहेत. अंतःकरणाचे मन, बुध्दि हि या वृक्षाच्या डहाळ्या आहेत. ज्ञानेंद्रिये हि या वृक्षाचि पालवी होय. आठ अंगानी बहरलेला हा संसारवृक्ष ब्रम्हास पुर्ण झाकोळुन टाकतो. 

या संसारवृक्षास तो विचारांप्रमाणे सतत नाश पावत असतो म्हणुन अश्वत्थ म्हटलेे आहे तर दोन विचारांमधिल जागा स्मरणशक्ति भरून काढते व विचार अव्यय भासतात त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अव्यय आहे. केवळ ब्रम्ह सत्य आहे, जगत नित्य भासत असुनही ते अनित्य आहे, मिथ्या आहे हे जो जाणतो तो ब्रम्हज्ञानी होय. 

The Blessed Lord said They (the wise) speak of the indestructible peepul tree having its root above and branches below, whose leaves are the metres or hymns: he who knows it is a knower of the Vedas. - #Swami_Sivanand

श्रीभगवान् बोले --, ( यह संसाररूप वृक्ष ) ऊर्ध्वमूलवाला है। यह संसारवृक्ष अव्यय माना जाता है। ऋक् यजु और सामरूप वेद, जिस संसारवृक्षके पत्तोंकी भाँति रक्षा करनेवाले होनेसे पत्ते हैं। - #आदि_शंकराचार्य

Friday, February 02, 2018

मज आणि ब्रम्हा भेदु नाहि


ब्रह्मणो हि प्रतिष्ठाऽहममृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च || #गिता_१४:२७ ||


For I am the abode of Brahman, the immortal and the immutable, of everlasting Dharma and of absolute bliss. #Swami_Sivananda

जो परमात्मा अमृत -- अविनाशी, अव्यय -- निर्विकार, शाश्वत -- नित्य, धर्मस्वरूप -- ज्ञानयोगरूप धर्मद्वारा प्राप्तव्य और ऐकान्तिक सुखस्वरूप अर्थात् व्यभिचाररहित आनन्दमय है उस ब्रह्मकी मैं प्रतिष्ठा हूँ। #आदि_शंकराचार्य

मी आत्मा हा अविनाशी, अविकारी, नित्य, धर्मरूप आणि अत्यंतिक सुखमय अशा परमात्म्याचि प्रतिष्ठा आहे. #ज्ञानेश्वरी_१४:२७

सर्वारंभपरित्यागी वृत्ती व अव्यभिचारी भक्ती ने जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान आपल्या मधिल अहंकार व अज्ञान नाहिसे करते. अज्ञान नाहिसे होताच अविभक्त भक्तास अनुभुती येते कि, 'मज आणि ब्रम्हा । भेदु नाहि ।' आत्मा आणि परमात्मा वेगवेगळे नसुन एकच आहेत. ज्यास आपण परमात्व तत्व समजत होतो तेच आत्म तत्व आहे व तेच आपण आहोत. अत्यंतीक सुखमय, अविनाशी, अविकारी असे ते एकच तत्व आहे. तत्वदर्षींनी त्यास आत्मा, परमात्मा या नावाने संबोधले आहे. निर्गुण, निराकार परमात्मा हाच सगुण, साकार आत्म्यामध्ये प्रतिष्ठित आहे. निर्गुण, निराकार अशा तत्वाचा अनुभव घेता येत नाहि म्हणजे त्यास पहाता येत नाहि, एेकता येत नाहि, स्पर्ष करता येत नाहि परंतु सगुण, साकार विश्वाचा अनुभव घेता येतो. आपल्या सभोवताली जो निसर्ग आहे त्याचा आपण एक नैसर्गीक घटक आहोत. ईतर नैसर्गीक घटकांपासुन आपण वेगळे व श्रेष्ठ नाहि आहोत. सहज, नैसर्गीक नियमांनी आपण निसर्गाशी एकरूप होऊन सहज असे नैसर्गिक जिवन जगु शकतो.