Wednesday, January 31, 2018

We all are selfish


 Q: So this pursuit of happiness has to go?


U.G.: Don't say it should go. Wanting selfishness to go is part and parcel of the selfish pursuit of a more pleasurable state -- selflessness. That is why you are eternally unhappy. Your search for happiness is making you unhappy. Both the spiritual goal and the search for material happiness are the same. Both are essentially selfish, pleasurable pursuits. If that understanding is somehow there in you, then you will not use the energy in that direction at all.

You know, I've been everywhere in the world, and have found that people are exactly the same. There is no difference at all. Becoming is the most important thing in the world for everybody -- to become something. They all want to become rich, whether materially or spiritually, it is exactly the same. Don't divide it; the so-called spiritual is the materialistic. You may think you are superior because you do Meditation.

Your material, religious and spiritual activities are all basically selfish. Because you always want something more. If you don't want anything there is no reason to go anywhere.

Sunday, January 28, 2018

अव्यभिचारी भक्ति


मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते || #गिता_१४:२६ ||


आणि जो माझी अव्यभिचारी भक्तियोगाने सेवा करतो तो त्रिगुणांचे ऊल्लंघन करून ब्रम्हभावास समर्थ होतो. #ज्ञानेश्वरी_१४:२६ 

ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्वारंभपरित्यागी होणे आवश्यक आहे असे सांगितल्या नंतर भगवान श्रीकृष्ण अजुन एका गोष्टिचे प्रतिपादन करतात ते म्हणजे 'अव्यभिचारी भक्ती'. अव्यभिचारी भक्ति म्हणजे नेमके काय हे समजणे अतिशय महत्वाचे व अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे साखर व तिचा गोडपणा हे एकच आहे त्याप्रमाणे ईश्वर व त्याचे विश्व हे एकच आहेत. विश्व बाजुला सारून ईश्वर निराळा आहे असा प्रकार नसुन केवळ सर्व काहि विश्वच होय.

तैसे विश्व येणे नावे । हे मिचि पै आघवे । म्हणौनि विश्वपण जावे । मग तैं माते घेयावे । तैसा नव्हे आघवे । सकटचि मी । एेसेनी माते जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेद काहि देखिजे । तरी व्यभिचारू तो । ज्ञा. १४:२६:८१

ईश्वर विश्वाहुन वेगळा, विश्वाबाहेर स्वर्गामध्ये आहे असे समजणे हा व्यभिचार आहे. हि विभक्तिचि भावना नसणे म्हणजे अव्यभिचारी भक्ति होय. मुळात ईश्वरास व स्वर्गास कोणिहि पाहिलेले नाहि कारण तो या विश्वाहुन वेगळा नाहि. जे विश्व आहे त्याचे त्याच स्वरूपामध्ये स्वीकार न करता जो नाहि त्याचे अवडंबर माजवुन आपणच आपल्या या अज्ञानातुन मोक्षासाठि अखंडपणे साधना करत असतो हा व्यभिचार आहे.

ईश्वर कोणितरी आहे व त्याचि साधना केल्याशिवाय अखंड सुख प्राप्त होणार नाहि या अविचाराने व भितीपोटि मनुष्याने ईश्वराचि या विश्वाहुन वेगळि अशी संकल्पना मांडली व सर्व संस्कार, धर्म, जाती, रितीरिवाज, प्रार्थना, साधना यांच्या मालीका त्याच्याभोवती तयार केल्या व त्यामध्ये तो स्वतःच पुरता अडकुन पडला आहे.

ज्याप्रमाणे रूग्णाला ईंजेक्शन टोचले वा त्याचे ऑपरेशन केले तर त्यास त्रास झाला तरी तो ते सहन करतो कारण ऊपचारांना पर्याय नाहि हे त्याला माहिती असते त्याप्रमाणे मनुष्य जन्मामध्ये सुख दुःख हे येतच रहाणार हे एकदा कबुल केले कि त्याचा त्रास होत नाहि. कोणत्याहि गोष्टिचा त्रासच होऊ दिला नाहि तर दुःखहि होणार नाहि. दुःखच नाहिसे झाले कि सुखी जिवनाचि अपेक्षा, स्वर्ग प्राप्तीचि अपेक्षा, मोक्षाचि अपेक्षा यांना काहि अर्थच रहात नाहि. या गोष्टिंचा व्यवसाय करणाऱ्यांचि दुकाने आपोआप बंद होतील, त्यांनी निर्माण केलेली माणसा माणसामधिल द्वेषभावना नाहिशी होऊन श्रध्देखातर होणाऱ्या हिंसाचाराचे समुळ ऊच्चाटन होऊ शकते.

एेसेनी बा समरसे । दृष्टि जे ऊल्हासे । ते भक्ति पैं एेसे । आम्हि म्हणो । ज्ञा. १४:२६:८७

विश्वापलीकडे ईश्वर नावाचि कोणितरी महान शक्ति आहे व अलीकडे मी दीन दुबळा मनुष्य प्राणि आहे हे अज्ञान नष्ट होऊन जे अनादि, स्वाभाविक, नैसर्गीक एैक्य ऊरते तिच नैसर्गीक अवस्था होय तिलाच तत्वदर्षींनी परम ज्ञान व परम त्रिगुणातीत ब्रम्हावस्था, मोक्षावस्था असे म्हटलेे आहे.

मनुष्य इन तीनों गुणोंसे किस प्रकार अतीत होता है इस प्रश्नका उत्तर श्रीकृष्ण अब देते हैं। जो संन्यासी या कर्मयोगी सब भूतोंके हृदयमें स्थित मुझ परमेश्वर नारायणको कभी व्यभिचरित ( विचलित ) न होनेवाले अव्यभिचारी भक्तियोगद्वारा सेवन करता है -- उस भक्तियोगके द्वारा जो मेरी सेवा करता है -- वह इन ऊपर कहे हुए गुणोंको अतिक्रमण करके ब्रह्मलोकको पानेके लिये, अर्थात् मोक्ष प्राप्त करनेके लिये योग्य समझा जाता है। अर्थात् ( मोक्ष प्राप्त करनेमें ) समर्थ होता है। #आदि_शंकराचार्य

And he who serves Me with unswerving devotion, he, crossing beyond the qualities, is fit for becoming Brahman.
#Swami_Sivananda

Saturday, January 27, 2018

सर्वारंभपरित्यागी


मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते || भ.गिता १४:२५ ||

Who is the same in honour and dishonour, the same to friend and foe, abandoning all undertakings he is said to have transcended three qualities. - Gita 14:25

जो मान और अपमानमें समान रहता है तथा मित्र और शत्रुपक्षके लिये तुल्य है। तथा जो सारे आरम्भोंका त्याग करनेवाला है। दृष्ट और अदृष्ट फलके लिये जानेवाले कर्मोंका नाम आरम्भ है, ऐसे समस्त आरम्भोंका त्याग करनेका जिसका स्वभाव है वह सर्वारम्भपरित्यागी है अर्थात् जो केवल शरीरधारणके लिये आवश्यक कर्मोंके सिवा सारे कर्मोंका त्याग कर देनेवाला है, वह पुरुष गुणातीत कहलाता है। - गिता १४-२५

मान व अपमान यांना सम माननारा, मित्र व शत्रु या दोन्हि विषयी सम असणारा, सर्व कर्मांचा सर्व प्रकारे त्याग करणारा असा जो असतो तो गुणातीत म्हटला जातो. - ज्ञानेश्वरी १४: २५

ईश्वरीय ज्ञान हवे असेल तर त्रिगुणातीत होणे आवश्यक आहे. त्रिगुणातीत होण्यासाठिचा सर्वात छोटा मार्ग येथे सांगितला आहे. सर्वारंभपरित्यागी हा तो मार्ग आहे. आपणास आपल्या जिवनामध्ये फार थोडक्या गोष्टिंचि आवश्यकता असते व त्या गोष्टि आपणास सहजपणे थोड्याशा मेहनतीने प्राप्त होऊ शकतात. सहज नैसर्गिक जिवनामुळे आपण ईकडे तिकडे भरकटले जात नाहि व आपले मनहि त्यामुळे फार लांब भरकटत नाहि. परंतु ज्यावेळी आपण आपले सहज नैसर्गिक जिवन सोडुन विविध आशा आकांक्षेच्या पुर्ततेसाठि नवनविन प्रकल्प आरंभ करतो त्यावेळी आपल्या मनास नवनविन खाद्य मिळायला सुरूवात होते व नंतर त्याला आवरणे मुश्कील होऊन जाते. नवनविन प्रकल्पामध्ये आपण गुंतत गेल्यामुळे जसे आपणास नविन मित्र मिळत जातात तसे नविन शत्रुहि निर्माण होतात. मित्र परिवार, कुटुंबिय, समाज, नातलग, शत्रु व त्यांचे विविध समारंभ यांच्याशी नित्य संबंध ठेवताना आपला कोठे सन्मान तर कोठे अपमान होत असतो. या सर्व नित्याच्या भानगडिंमुळे आपले मन सतत राग, लोभ यांनी विचलीत होत असते. विचलीत झालेल्या मनाच्या संतोषार्थ अनेक व्यसने, मनोरंजन, हौसमौज यांच्या मालीका ऊभ्या राहतात. ते काहि काळ तात्पुरते आपणास मानसीक समाधान देतात परंतु त्यासाठि आर्थिक व आजारांचि मोठि किंमतहि मोजावी लागते.

Friday, January 26, 2018

तत्वमसि अवस्था

जोपर्यंत संपूर्ण मानव जातीचा दैवी अनुभव आपल्या तथाकथीत ज्ञानामधून काढून टाकला जात नाही तोपर्यंत आपण आपल्या स्वत:च्या त्या अद्वितीय अवस्थेमध्ये येऊ शकत नाही. हे आपण आपल्या कोणत्याही इच्छेनुसार, प्रयत्नाशिवाय किंवा कशाचीही मदत घेऊन करू शकत नाही. आपण आतापर्यंत गोळा केलेल्या दुसऱ्यांच्या माहितीवजा ज्ञानामुळे आपण तशाच प्रकारच्या अनुभवांचि अपेक्षा ठेऊन असतो व जोपर्यंत हि अपेक्षा आहे म्हणजे तशी ईच्छा आहे तोपर्यंत ती अवस्था प्राप्त होत नाहि.

आपली ती अवस्था हि एकमेवाद्वितिय असते त्यामुळे आतापर्यंतच्या सर्व ईश्वरीय अवतार, संत, याजक, गुरू, संदेष्टे आणि तत्त्वज्ञ यांचे अनुभव आपल्या स्वस्वरूप प्राप्तिसाठि ऊपयोगी ठरत नाहित.

जोपर्यंत आपण जिवंत किंवा मृत अधिकारी व्यक्तिंवर विश्वास किंवा श्रद्धा ठेऊन असतो कि ते काहितरी करतील तोपर्यंत त्या अत्त्युच्च अवस्थेचि निश्चितता आपणामध्ये ऊतरत नाहि. ज्यावेळी हे आपल्या लक्षात येईल कि या सर्व अधिकारी लोकांचे अनुभव आपल्या ऊपयोगाचे नाहित तेव्हाच ति अत्त्युच्च अवस्थेचि निश्चितता आपणामध्ये अवतरीत होते. मग आपण आपल्या स्वत:च्या अनुभुतीवर स्वार होतो. जेव्हा आपणास याचि प्रथमता अनुभुती येते तेव्हा आपल्या दृष्टिने तो फार मोठा विस्फोट असतो. आपण पुर्वी कधिहि ज्याला अनुभवले नव्हते अशा पुर्णपणे अनन्य, अद्भुत व विस्मयकारक अशा जिवनास त्या स्फोटामुळे आपण अनुभवु शकतो. म्हणून मी जे काही आता माझे अनुभव बोलतोय ते तुमच्यासाठी सत्य असू शकत नाहीत. ज्या क्षणी तुम्ही ते सत्य स्वतः अनुभवाल त्याक्षणि मी जे आता सांगत आहे ते सर्व चुकिचे आहे असे तुम्हास समजेल. आधी आलेल्या सर्व गोष्टी त्या स्फोटामध्ये जाळल्या जातात.

 - यु जी कृष्णमुर्ती


How to achieve the absolute state?


You can't come into your own uniqueness unless the whole of human experience is thrown out of your system. It cannot be done through any volition or the help of anything.

The saints, saviors, priests, gurus, bhagavans, seers, prophets and philosophers were all wrong, as far as I am concerned. As long as you harbor any hope or faith in these authorities, living or dead, so long this certainty cannot be transmitted to you. This certainty somehow dawns on you when you see for yourself that all of them are wrong. Then you are on your own.

When you see all this for yourself for the first time, you explode. That explosion hits life at a point that has never been touched before. It is absolutely unique. So whatever I may be saying cannot be true for you. The moment you see it for yourself you make what I am saying obsolete and false. All that came before is negated in that fire.

- U G KRISHNAMURTI 


Thursday, January 25, 2018

ज्ञान्याचि लक्षणे


समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः || गिता १४:२४ ||


जो सुखदुःखमें समान है, जो स्वस्थ अर्थात् अपने आत्मस्वरूपमें स्थित -- प्रसन्न है। जो मिट्टी, पत्थर और सुवर्ण जिसके ( विचारमें ) समान हो गये हैं, जो प्रिय और अप्रिय दोनोंहीको जो समान समझता है और जो धीर अर्थात् बुद्धिमान् है तथा जिसके विचारमें अपनी निन्दा और स्तुति समान हो गयी है, ऐसा अपनी निन्दास्तुतिको समान समझनेवाला यति है।

Who is the same in pleasure and pain, who dwells in the Self, to whom a clod of earth, stone and gold are alike, who is the same to the dear and the unfriendly, who is firm, and to whom censure and praise are as one.

त्रिगुणातीत मनुष्याला सुख व दुःख समान असतात. सुख व दुःख हे दोन्ही मुळात विचार असतात. जे हवे आहे ते मिळाले कि आपण सुखी होतो व जे नको आहे ते मिळाले कि आपण दुःखी होतो. प्रत्येक मनुष्याच्या जिवनामध्ये ते दोघेहि असतात त्यामुळे त्यांचा ते आहेत तसा त्यांचा स्विकार केला कि आपणास त्यांचा त्रास होत नाहि.

त्रिगुणातीत मनुष्य नेहमी आपल्या आत्मानंदामध्ये स्थीत असतो. 'हवे व नको' या दोन्हिंचा त्याग केला कि मनुष्यांचि सर्व अनर्थास कारण असलेली विचार प्रक्रियाच बंद होते व तो आपोआप विचारशुन्य होतो. यासाठि त्याला कोणतिहि कृत्रीम साधना करावी लागत नाहि.

त्याच्या दृष्टीने माती, दगड, सोने सारखेच असतात. या सर्वांचे बाजारमुल्य व त्यांचि ऊपयुक्तता त्यास नक्किच माहित असते परंतु त्याचा हौशीपणा गेलेला असतो व तो कमीतकमी संसाधनामध्ये आपली गुजराण सहजपणे करत असतो म्हणुन त्यास मौल्यवान वस्तुंचि आवश्यकता नसते.

त्याला प्रिय व अप्रिय असे काहि नसते, सर्व सारखेच असते. समाजाने व कुटुंबियांनी भितीपोटि वा आपल्या स्वार्थासाठी काहि चालीरिती व रितीरिवाज सुरू केलेले असतात जे सर्वांना अधिकाधिक बंधनामध्ये अडकवित असतात. परंतु ज्याचि भिती नाहिशी झालेली आहे, ज्याच्याठायी कसलाहि स्वार्थ नाहि व जो सर्व बंधनामधुन मुक्त झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे तो कुटुंबाच्या व समाजाच्या चौकटिमध्ये राहु शकत नाहि. अशा मुक्तात्म्याला कोणिहि प्रिय असु शकत नाहि व कोणिहि अप्रिय असु शकत नाहि.

त्याला निंदा व स्तुती सारखी असुनहि तो धिरोदात्त असतो. ज्यास काहि प्राप्त करावयाचे नाहि, कसलाहि हव्यास नाहि, स्वार्थ नाहि त्यास आपली कोणि स्तुती करावी याचिहि अपेक्षा नसते व कोणा अज्ञान्याने त्याचि निंदा केली तरी त्याचे काहि नुकसान होत नाहि. तो निंदा व स्तुती या दोन्हिंचा धिरोदात्तपणे स्वीकार करत असतो. या सर्व गोष्टी 'हवे व नको' यामध्येच येत असतात ज्यांचा त्याने सहज त्याग केलेला असतो.

Tuesday, January 23, 2018

ज्ञान्याचे औदासिन्य


ऊदासीन ज्ञानी भक्त  


त्रिगुणांमुळे प्रत्येक मनुष्य हा देव, देश, धर्म यांच्या संस्कारामध्ये व रूढि परंपरांमध्ये गुंतला जातो. आपण खरे कोण आहोत याचा आपणास पत्ता लागु नये म्हणुन आपले मन हे आपणास नेहमी तथाकथीत ऊच्च मुल्यांच्या नादि लावते. आपल्या खऱ्याखुऱ्या अस्तित्वाचा म्हणजे आपल्या आत्मतत्वाचा शोध लावण्या एैवजी आपण आपली संपुर्ण क्षमता केवळ त्रिगुणांनी तयार केलेल्या या ऊच्च मुल्यांच्या संवर्धनासाठि व रक्षणासाठि खर्च करत असतो प्रसंगी आपण त्यासाठि बलीदानासहि तयार होतो. आतापर्यंतच्या सर्व महापुरूषांनी या संस्कार व ऊच्चमुल्ये यांचा नेहमीच पाठपुरावा केला आहे त्यामुळे त्यांना जणु अढळपदच प्राप्त झाले आहे.

संस्कार व त्याचि नितीमुल्ये हि कितीहि महान असली तरी ते सर्व मानवी समस्या सोडविण्यास पुर्णपणे हतबल ठरले आहेत. याऊलट आपलेच संस्कार व संस्कृती सर्वात महान आहेत हे दुसऱ्यांवर ठसविण्यासाठि आजपर्यंत अनेकदा प्रचंड नरसंहार झाले आहेत व अजुनही ते होतच आहेत.

आपल्या प्रत्येकांच्या स्वस्वरूप प्राप्तीच्या आड आपलेच जतन केलेले, संवर्धित केलेले संस्कार आहेत हे समजल्या नंतर ज्ञानी पुरूष ऊदासीन होतो नाहितर त्यालाच सुळावर चढविण्यास समाज मागेपुढे पहात नाहित.

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते || गिता १४:२३ ||

शरीर व ईंद्रिये याबरोबर त्रिगुण असणारच असे समजुन त्रिगुणातीत मनुष्य त्रिगुणांमुळे विचलीत होत नाहि, तो स्वस्वरूपासुन ढळला जात नाहि, शरीरधारी असुनहि शरिरधर्माच्या कर्तव्यापासुन तो नेहमी ऊदासिन राहतो.

गुणातीत उदासीनकी भाँति स्थित हुआ, गुणोंद्वारा विवेकज्ञानकी स्थितिसे विचलित नहीं किया जा सकता। चलायमान नहीं होता अर्थात् अविचलभावसे स्वस्वरूपमें ही स्थित रहता है।

He who, seated like one unconcerned, is not moved by the qualities, and who, knowing that the qualities are active, is self-centred and moves not.

Monday, January 22, 2018

The violent life


The natural life conflicts with our logical framework. We are using logic to continue that separative structure, that is all.

All logical thoughts are reactive. Our thought structure and our actual physiological framework are limited, but life itself is not. Natural Life is like a river in spate, lashing at the banks, threatening the limits that have been placed around it. We are desperately protecting this armour, this shield of thought, and are frightened that the movement of life might smash our logical frontiers. That is why natural way of life the actual freedom is painful to the body and the thoughts. The tremendous outburst of life energy that takes place here is a painful thing to the body, blasting every cell as it goes. You cannot imagine how it is in your wildest dreams.

आपण आता जे कृत्रीम जिवन जगत आहोत ते आपल्या नैसर्गिक जिवनाहुन कितीतरी वेगळे आहे. नैसर्गिक जीवन हे आपल्या कृत्रीम जिवनाच्या चौकटिच्या विरोधि आहे. आपण तर्कशास्त्राचा आधार घेत कृत्रीम जिवनाचि मांडणि करीत असतो. सर्व तार्किक विचार हे प्रतिक्रियात्मक असतात. आपली विचार करण्याचि यंत्रणा आणि आपली शारीरिक चौकट हि खुपच मर्यादित आहेत, त्याविरूध्द आपले खरे नैसर्गिक जीवन हे खुपच विशाल आहे. नैसर्गिक जिवन हे एखाद्या बेफाम नदिसारखे असते, ते तिला बंधनकारक असणाऱ्या तिच्या दोन्हि तिरांना सतत धडका मारीत असते. आपण नैसर्गिक जिवन जसे आहे तसे स्विकारण्या एैवजी आपल्या तार्किक विचारांनी कृत्रीम जिवनशैलीस बळकट करत असतो कारण आपणास भिती वाटत आहे कि नैसर्गिक जिवनाचि धार हि आपल्या कृत्रीम जिवनशैलीस संपवुन टाकिल. नैसर्गिक जीवनशैली हिच खरी वास्तविक मुक्त अवस्था आहे परंतु ती शरीर आणि विचारांसाठि खुप वेदनादायक आहे. त्यासाठी लोकांना जिवंतपणि नव्हे तर शरीराच्या मृत्युनंतर मुक्तावस्था हवी असते.

आत्मसाक्षात्कार हा जीवन शक्तीचा जबरदस्त उद्रेक आहे, हि शरीरासाठि खुप वेदनादायी गोष्ट आहे कारण हा ऊद्रेक शरीराच्या प्रत्येक नसामध्ये होत असतो. आपण स्वप्नामध्ये हि त्याचि कल्पना करू शकणार नाहि.

Sunday, January 21, 2018

प्रकाशं च प्रवृत्तिं

 श्री भगवानुवाच:
 प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव। 
 न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति || गिता १४:२२ ||

श्रीकृष्ण अर्जुनास त्रिगुणातीताचि लक्षणे सांगतात कि, सत्वगुणाचे ज्ञान व सुख, रजोगुणाचा लोभ व दुःख आणि तमोगुणाचा अविवेक, कष्ट आदि प्रवृत्त झाली असता त्यांचा तो द्वेष करत नाहि व निवृत्त झाली असता त्यांचि तो आकांक्षा करीत नाहि. - ज्ञानेश्वरी

श्रीभगवान् बोले कि पहले गुणातीत पुरुष किनकिन लक्षणोंसे युक्त होता है उसे सुन -, सत्त्वगुणका कार्य प्रकाश, रजोगुणका कार्य प्रवृत्ति और तमोगुणका कार्य मोह। ये जब प्राप्त होते हैं अर्थात् भली प्रकार विषयभावसे उपलब्ध होते है तब वह इनसे द्वेष नहीं किया करता। गुणातीत पुरुष उनकी प्राप्ति होनेपर उनसे द्वेष नहीं करता। और निवृत्त हुए गुणोंके कार्योंको गुणातीत नहीं चाहता। - आदि शंकराचार्य

The Blessed Lord said When light, activity and delusion are present, he hates them not, nor does he long for them when they are absent. - Swami Sivananda

सुर्याठायी सकाळ, दुपार व सायंकाळ याचि गणती नसते त्याप्रमाणे त्रिगुणातीत ज्ञानी भक्त त्रिगुणातीत होतो याचा अर्थ त्याचि त्रिगुणामधुन सुटका होत नाहि. शरीरास शरीरधर्माप्रमाणे सर्व काहि होत असते फक्त तो कोणत्याहि गुणांमुळे प्रतिक्षिप्त होत नाहि. आपण कर्म करत आहोत वा नाहि तसेच आपणाकडे सत्ता संपत्ती आहे वा नाहि व आपण ज्ञानी आहोत वा अज्ञानी आहोत या सर्वांचा त्याला शोक होत नाहि वा आनंदहि होत नाहि. तो दुसऱ्यांच्या ज्ञानाने समाधानि होत नाहि, स्वतःच खरे सत्य काय आहे याचा तो छडा लावत असतो. सत्य समजल्या नंतर सहज होतो, शांत होतो. आपणास प्राप्त झालेल्या सत्याचा तो आश्रम, मंदिरे, संस्था ऊभारून बाजार मांडत नाहि. खरे सत्य हे कधिहि असल्या बाजारामध्ये बसत नाहि. ज्यांना त्याचि खरोखर तळमळ आहे व जे त्याला बाजारामध्ये शोधायचे बंद करतात त्यांनाच ते सहज प्राप्त होत असते.

Friday, January 19, 2018

गिता १४:२१

|| ईश्वरीय ज्ञान ||


अर्जुन उवाच,
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो।
किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते || गिता १४:२१ ||


Arjuna said What are the marks of him who has transcended the three qualities, O Lord? What is his conduct and how does he go beyond these three qualities?

शरीरधारी जीव जीता हुआ ही गुणोंको पार करके अमृतका अनुभव करता है इस प्रश्नबीजको पाकर अर्जुन बोला --, हे प्रभो इन पूर्ववर्णित तीनों गुणोंसे अतीत -- पार हुआ पुरुष किनकिन लक्षणोंसे युक्त होता है और वह कैसे आचरणवाला होता है अर्थात् उसके आचरण कैसे होते हैं तथा किस प्रकारसे (किस उपायसे ) मनुष्य इन तीनों गुणोंसे अतीत हो सकता है।

हे प्रभो, काय केल्याने मनुष्य त्रिगुणांना ओलांडुन जाऊ शकतो, त्याचे आचरण कसे असते आणि तो त्रिगुणांना कोणत्या प्रकारे ऊल्लंघितो. - ज्ञानेश्वरी

प्रत्येक मनुष्य त्रिगुणांपैकि कोणत्यातरी एका गुणाने वेढला गेलेला असतो. त्रिगुणातीत होणे म्हणजे कोणत्याहि गुणांमध्ये स्थीत नसणे होय. संसार विश्वाचे चक्र हे अखंड चालु असते. त्यावर आरूढ होऊन त्याला ऊल्लंघता येत नाहि. त्या चक्रापासुन वेगळे झाल्याशिवाय त्यामधुन बाहेर पडता येत नाहि आणि त्यामधुन बाहेर पडल्याशिवाय त्यामधिल गुणदोष समजत नाहित. त्रिगुणि अवस्थेमध्ये देह असताना मन आपले मालक असते तर त्रिगुणातीत अवस्थेमध्ये मन आपले गुलाम बनते. मन चांगले वा वाईट नसते ते केवळ सर्व शारिरीक ईंद्रियांकडुन काम करून घेणारे यंत्र आहे. संसारचक्रा बरोबर फिरताना बेलगाम ईंद्रियांचे चोचले पुरविणारे मन विरक्तावस्थेमध्ये समाधानि ईंद्रियांच्या मागण्या कमी झाल्यामुळे 'आता ऊरलो ऊपकारा पुरते' अशी त्याचि सहज अवस्था होते. 

Wednesday, January 17, 2018

गुणानेतानतीत्य

|| ईश्वरीय ज्ञान ||


गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान्।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते || भ. गिता १४:२० ||


देहामधिल आत्मा देहाच्या ऊत्पत्तीचे बिज अशा त्रिगुणांना ऊल्लंघुन जन्म, मृत्यु, जरा, व्याधि, दुःख यांपासुन स्वतःस मुक्त करून अमृततत्वास प्राप्त होतो.

आपले सत्य स्वरूप जे आत्मस्वरूप आहे ते अज्ञानामुळे स्वतःस शरीर समजत असते. शरिर हे सत्व, रज व तम या त्रिगुणांच्या विळख्यात अडकलेले असते. त्रिगुणांमुळे शरीरास जन्म घ्यावा लागतो. जन्म घेतल्यामुळे शरीराचे आजार, वृध्दत्व, दुःख व मृत्यु आदिंचा अनुभव घ्यावा लागतो. तिन्हि गुणांचा व त्यामधिल सुख दुःखांचा अनुभव घेतल्यानंतर जिव त्रिगुणातीत होतो. त्रिगुणातीत अवस्थेमध्ये त्यास ईश्वरीय ज्ञान प्राप्त होते व तो जिवंतपणि जिवनामधिल सुखदुःखांच्या पार होतो, जिवनमुक्त होतो.

देहोत्पत्तिके बीजभूत इन मायोपाधिक पूर्वोक्त तीनों गुणोंका उल्लंघन कर अर्थात् जीवितावस्थामें ही इनका अतिक्रम करके यह देहधारी विद्वान् जीता हुआ ही जन्म, मृत्यु, बुढ़ापे और दुःखोंसे मुक्त होकर अमृतका अनुभव करता है। अभिप्राय यह कि इस प्रकार वह मेरे भावको प्राप्त हो जाता है।

The embodied one having crossed beyond these three Gunas out of which the body is evolved, is freed from birth, death, decay and pain, and attains to immortality.

Just as a river is absorbed in the ocean, so also he who has while still alive gone beyond the qualities which form the seed from which all bodies have sprung and of which they are composed is absorbed in Me. He ever enjoys the bliss of the Eternal. He attains release or Moksha. He attains to My Being.

Tuesday, January 16, 2018

गुणातीत

|| ईश्वरीय ज्ञान ||

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति || भ. गिता १४:१९ ||

त्रिगुणांहुन अन्य कोणि कर्ता नाहि तसेच या त्रिगुणांहुन वेगळा असा साक्षीभुत आत्म्यास ज्यावेळी द्रष्टा ज्ञानी जाणतो त्यावेळी तो ज्ञानी आपल्या आत्मस्वरूपास जाणतो. - ज्ञानेश्वरी

एका आत्म्याशिवाय दुसरे काहि सत्य नाहि. आत्म्याच्या सामर्थ्याने देह व त्यांचे त्रिगुण ऊत्पन्न होतात. देह व त्रिगुण व्यक्त झालेले असताना सामान्य जिव गोंधळुन त्यांनाच सत्य समजतात परंतु ज्ञानी जन त्या गुणांपासुन वेगळे गुणातीत अशा आपल्या स्वस्वरूपास जाणत असतात. आत्मज्ञानाचा बोध झाल्यानंतर ज्ञान्यास त्रिगुणांहुन चैतन्य वेगळे आहे असे दिसते. त्रिगुणांमुळे व देहामुळे सर्व कर्मे होत आहेत व त्यास आपण आत्मा जबाबबदार नाहि, आपण त्या सर्वांपासुन अलीप्त आहोत असे स्पष्टपणे ज्ञान्यास दिसत असते. आत्म्याच्या सामर्थ्याने त्रिगुणि देह कर्म करत असुनही आत्मा हा नित्य अकर्ता असतो. त्रिगुणि देह नाहिसा झाल्यानंतर जे ऊरते तो मी नित्यमुक्त आत्मा आहे.

समस्त अवस्थाओंमें स्थित हुए गुण ही, समस्त कर्मोंके कर्ता हैं तथा गुणोंके व्यापारके साक्षीरूप आत्माको गुणोंसे पर जानता है, तब वह द्रष्टा मेरे भावको प्राप्त होता है। - आदि शंकराचार्य

When the seer beholds no agent other than the Gunas and knows That which is higher than they, he attains to My Being. - Swami Sivananda

Monday, January 15, 2018

गिता १४:१८

|| ईश्वरीय ज्ञान ||

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः || भ. गिता १४:१८ ||

Those who are seated in Sattva go upwards; the Rajasic dwell in the middle; and the Tamasic, abiding in the function of the lowest Guna, go downwards.

सत्त्वगुणमें यानी सात्त्विक भावोंमें स्थित पुरुष उच्च स्थानको जाते हैं अर्थात् देवलोक आदि उच्च लोकोंमें उत्पन्न होते हैं। और राजस पुरुष बीचमें रहते हैं अर्थात् मनुष्ययोनियोंमें उत्पन्न होते हैं। तथा जघन्य गुणके आचरणोंमें स्थित हुए अर्थात् जो जघन्य -- निन्दनीय गुण है, उस तमोगुणके कार्य -- निद्रा और आलस्य आदिमें स्थित हुए मूढ़ -- तामसी पुरुष नीचे गिरते हैं -- वे पशु, पक्षी आदि योनियोंमें उत्पन्न होते हैं।

सात्वीक अवस्थेमध्ये स्थीत असलेल्याना ऊच्च स्वर्गलोक प्राप्त होतो. राजसीक अवस्थेमध्ये स्थीत असलेल्याना मध्यम अशा मनुष्य लोकामध्ये पुनर्जन्म होतो. तामसिक अवस्थेमध्ये स्थीत असलेल्याना अधोलोक म्हणजे पशु योनीमध्ये जन्म प्राप्त होतो.

आपल्या जन्मापुर्वी वा आपल्या मृत्युनंतर आपण कोठे व कसे असणार याचि कोणालाहि कल्पना नसते. परंतु या जन्मामध्ये आपल्या जिवनमानामध्ये फरक पाडण्याचि क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये असते. गरिब वा अज्ञानी असला तरी कष्ट व मेहनत करून कोणिहि ऊच्चपदावर जाऊ शकतो तसेच ज्ञानी वा श्रीमंत असला तरी आळशीपणामुळे अनेकजण रसातळास जातात. आपण कोणत्याहि गुणांमध्ये जन्मलो असलोतरी आपण आपल्या कर्माने आपल्या जिवनामध्ये परिवर्तन करू शकतो.

Sunday, January 14, 2018

मकर संक्रांती

|| ईश्वरीय ज्ञान ||

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च || गिता १४:१७ ||

From Sattva arises knowledge, and greed from Rajas; heedlessness and delusion arise from Tamas, and also ignorance.

उत्कर्षको प्राप्त हुए सत्त्वगुणसे ज्ञान उत्पन्न होता है और रजोगुणसे लोभ उत्पन्न होता है तथा तमोगुणसे प्रमाद और मोह -- ये दोनों होते हैं और अज्ञान भी होता है।

ऊत्कर्ष पावलेल्या सत्वगुणापासुन ईश्वरीय ज्ञान ऊत्पन्न होते आणि रजोगुणापासुन लोभ ऊत्पन्न होतो तर तमोगुणापासुन प्रमाद, मोह व अज्ञान ऊत्पन्न होते.

अध्यात्मिक ज्ञानाचि आवड निर्माण होण्यास सत्वगुण आवश्यक असतो. सत्वगुणाचि वाढ होण्यापुर्वी आपल्या मधिल तामसिक अज्ञान व राजसीक लोभ कमी व्हायला हवा. तामसीकता व राजसीकता हे दोन्हि ईश्वरीय ज्ञानास प्रतिबंध करतात तर सत्वगुण हा ईश्वरीय ज्ञान प्राप्तिसाठि सहाय्यभुत ठरतो. जे काहि प्राप्त करावयाचे ते आपणामध्येच आहे परंतु काहि गोष्टि ते समजण्यास सहाय्यभुत ठरतात तर काहि गोष्टि ते समजण्यास अडथळा ठरतात.

तिळामधिल तामसीकता व गुळामधिल राजसीकता एकत्र करून सात्विकतेच्या गोडव्याने आपण नविन ऊत्तरायणाच्या ज्ञान मार्गाने आपल्यावरील आलेली अज्ञानाचि संक्रांत दुर सारण्यासाठि जिवनमुक्तीचा ध्यास धरूया.