Tuesday, January 16, 2018

गुणातीत

|| ईश्वरीय ज्ञान ||

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति || भ. गिता १४:१९ ||

त्रिगुणांहुन अन्य कोणि कर्ता नाहि तसेच या त्रिगुणांहुन वेगळा असा साक्षीभुत आत्म्यास ज्यावेळी द्रष्टा ज्ञानी जाणतो त्यावेळी तो ज्ञानी आपल्या आत्मस्वरूपास जाणतो. - ज्ञानेश्वरी

एका आत्म्याशिवाय दुसरे काहि सत्य नाहि. आत्म्याच्या सामर्थ्याने देह व त्यांचे त्रिगुण ऊत्पन्न होतात. देह व त्रिगुण व्यक्त झालेले असताना सामान्य जिव गोंधळुन त्यांनाच सत्य समजतात परंतु ज्ञानी जन त्या गुणांपासुन वेगळे गुणातीत अशा आपल्या स्वस्वरूपास जाणत असतात. आत्मज्ञानाचा बोध झाल्यानंतर ज्ञान्यास त्रिगुणांहुन चैतन्य वेगळे आहे असे दिसते. त्रिगुणांमुळे व देहामुळे सर्व कर्मे होत आहेत व त्यास आपण आत्मा जबाबबदार नाहि, आपण त्या सर्वांपासुन अलीप्त आहोत असे स्पष्टपणे ज्ञान्यास दिसत असते. आत्म्याच्या सामर्थ्याने त्रिगुणि देह कर्म करत असुनही आत्मा हा नित्य अकर्ता असतो. त्रिगुणि देह नाहिसा झाल्यानंतर जे ऊरते तो मी नित्यमुक्त आत्मा आहे.

समस्त अवस्थाओंमें स्थित हुए गुण ही, समस्त कर्मोंके कर्ता हैं तथा गुणोंके व्यापारके साक्षीरूप आत्माको गुणोंसे पर जानता है, तब वह द्रष्टा मेरे भावको प्राप्त होता है। - आदि शंकराचार्य

When the seer beholds no agent other than the Gunas and knows That which is higher than they, he attains to My Being. - Swami Sivananda

No comments: