Tuesday, August 18, 2020

जाणीव आणि नेणीव भगवंती नाही

प्रश्न: एखाद्या गोष्टीची जाणीव होते याचा अर्थ द्वंद्व अजून अस्तीत्वात आहे असा अर्थ निघतो का? म्हणजेच ज्याला सत्य कळते त्याला खरंतर त्याची जाणीव होत नाही असा अर्थ निघतो का? म्हणजेच ती व्यक्ति जाणीवांच्या पलीकडे गेली आहे असं समजायचं का ? 

जाणीव आणि नेणीव भगवंती नाही याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे.

जाणीव आणि नेणीव या मनाच्या अवस्था आहेत. जागृत अवस्थेत विचारा मुळे अनुभव येतात आणि झोपे मध्ये विचारा अभावी अनुभव येत नाही. सर्व मानवाचे अनुभव असेच असतात. ज्ञानी माणसाचे सुद्धा असेच असते. या जाणीव आणि नेणीव अवस्थां पलीकडील अवस्था जर असेल तर ती अनुभवात येणे शक्य नाही, त्याबद्दल काही सांगता येणे शक्य नाही, अशा अवस्थेला भगवंती नाव दिले गेले.

द्वंद्व याचा अर्थ समजू या. दोन गोष्टी असणे म्हणजे द्वंद्व. कोणत्याही जाणिवेत म्हणजेच अनुभवा मध्ये दोन गोष्टी कल्पिल्या जातात. एक अनुभव आणि दुसरी अनुभव करणारा.

अनुभव आणि अनुभव करणारा हे दोघे वेगवेगळे नसून एकच आहे, तो जो एक आहे तो केवळ विचार आहे हे समजणे म्हणजे अद्वैत आहे.

हे ज्याला कळते त्याला सुद्धा अनुभव येतच असतात, जाणीव होतच असते. जाणिवांच्या पलीकडे जाणे म्हणजे त्या जाणिवांना, अनुभवांना यथार्थ जाणणे की ते फक्त विचार आहेत.

म्हणजे घटना घडत असते ती सत्य असते परंतु त्या घटनेची मीमांसा न करता स्वीकारणे. घटनेची मीमांसा म्हणजे विचार येणे होय, तेच जाणीव आणि अनुभव निर्माण करीत असतात.

Friday, August 14, 2020

प्रेम आणि करुणा


प्रश्न : पालक आपल्या मुलाची काळजी घेतात. त्यांना चांगले  शिक्षण मिळावे म्हणून सुविधा  उपलब्ध  करून देतात. जे जे आवश्यक आहे त्याप्रमाणे मुलांची काळजी घेतात. पणअसे करताना ते आपल्या मुलांनी पुढे काय व्हावे, काय करावे, काय करू नये असे सांगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपले मत विचार आकांशा त्याच्यावर  लादतात. म्हणजे ते मुलावर खरे प्रेम करतात का? की मुलावर  अधिकार गाजवितात? मुलांवर अधिकार गाजवीत प्रेम करतो ते खरे प्रेम आहे काय? 

प्रत्येक सजीव हा एक स्वतंत्र जीव आहे आणि प्रत्येकाला आपले स्वातंत्र्य प्यारे असते. जर मला स्वातंत्र्य हवे आहे तर तसे स्वातंत्र्य माझ्या कुटुंबातील इतर सर्वांना हवे असते. मी जर कुटुंब प्रमुख म्हणून अधिकार गाजवीत असेन तर ते चुकीचे आहे. जर आपण आपल्या अधिकारातील इतरांना स्वातंत्र्य देत नसू तर त्याचा अर्थ आपण स्वतः अजून स्वतंत्र झालेलो नाही असा होवू शकतो. कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम असो वा नसो परंतु दुसऱ्या मानवी शरीरावर मालकी हक्क गाजविणे सर्वथैव अयोग्य आहे. मार्गदर्शन करणे वेगळे आणि मालकी हक्क गाजविणे वेगळे आहे. समाजाने आखून दिलेल्या कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची समज देणे हे कर्तव्य असते.

आपल्या मुलांना जे काही द्यायचे आहे ते जन्मतः आपण दिलेले असते. पूर्वीच्या पिढ्यांकडून जे आपणास प्राप्त झाले आहे ते आपण पुढच्या पिढीला देत असतो. आणि आपल्या वागण्याचा आदर्श पुढील पिढी उचलत असते जे अधिकार गाजवून शक्य होत नाही.


पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.... 

एखाद्या साम्राज्याचा सम्राट सुद्धा मनाचा गुलाम असतो हे जगज्जेत्या सिकंदर राजास भारतीय विचारवंतांनी पटवून दिले आणि तो माघारी परतला. संपूर्ण मानव जात ही मनाची गुलाम बनलेली आहे म्हणून ती इतरांना गुलाम करण्याच्या फंदात नेहमी असते. आपण मनाची गुलामी जेव्हा झुगारून देतो तेव्हा आपण खरे स्वतंत्र होतो बाकी सर्व बाह्य स्वातंत्र्य हे दिखावा मात्र आहे.

जबाबदारी, कर्तव्य आणि वासना यांचा ताळमेळ साधत मानवी मन प्रेम करण्याचा प्रयत्न करते परंतु ते प्रेम हे वैश्विक करुणेशी आपण तुलना करू शकत नाही. वैश्विक करुणेमध्ये विचार नसतात ते निव्वळ निखळ निर्वाज्य प्रेम असते.

Sunday, August 09, 2020

Krishnamurti Meditation


The first step is to perceive, perceive what you are thinking, perceive it, without any condemnation, justification, without wishing it to be different, perceive without center. 

And when you have perceived, you leave it, forget it. If you do not drop what you have learnt, what you have perceived, then there is a continuity of the movement of thought; and the movement and continuity of thought is time. And when the mind is caught in the movement of time, it is in bondage.

Can hought ever come to an end? 

That is the part of Krishnmurti meditation. It is part of a total mutation of the brain cells themselves, because if there is a continuity of the movement of thought, it is the repetition of the old, because thought is memory, thought is the response of memory, thought is experience, thought is knowledge.

The traditional approach to this question is control it, hold it, or learn to concentrate. 

Is not the controller part of the thought, part of the knowledge which says you must control?

So there is a way of observing thought without any control, without giving it a continuity, but observing so that it ends. 

And it is only when the mind is completely quiet, that there is the possibility of perception. To give one's attention completely, that attention itself is silence.

Silence is completely necessary, not only at the superficial level, but at the most deep level, at the very root of our being there must be complete silence.

Therefore the mind must observe, must be aware choicelessly of every perception and there must be the ending of that perception instantly, seeing and ending.

You know all this demands tremendous perception, tremendous vitality, energy. Now let us find how this energy comes into being.

The question is, can the ordinary everyday energy be heightened, can this energy be completely held without any form of distortion? 

Now let us find out, by investigating what is distraction.

Our energy is dissipated in conflict, conflict between two nations, conflict between two opinions, conflict between the husband and the wife and the children, conflict between trying to see God and suppressing all your instincts. That is also conflict, that is distortion. How does one have this complete energy without distortion? So that is a distortion of energy, every form of conflict dissipates energy.

So when you see the truth, when you perceive the truth that every form of conflict is a distortion, that very perception is the ending of conflict at that moment. Do not say "I have seen it once and I am going to hold on. And therefore there is no radical change in the structure of the memory, in the structure of the brain cells.

जिदु कृष्णमूर्ती यांची ध्यान साधना




कृष्णमूर्ती यांच्या ध्यान प्रक्रियेमध्ये पहिली पायरी आहे विचारांचे आकलन करणे ही होय. हे आकलन आपल्या दिवसभरच्या कार्याचे करावयाचे आहे. त्यांचे ध्यान केवळ अर्ध्या तासाचे नाही. आपल्या विचारांचे अवलोकन करताना त्यांचे विश्लेषण करू नका, त्यांची चिरफाड करू नका, त्यांना तिखटमीठ लावू नका, त्यांचे समर्थन करू नका, त्यांचा विरोध करू नका, ते अजून काहीतरी वेगळे असायला हवे होते अशी अपेक्षा करू नका, आपल्या मी ला केंद्रस्थानी आणू नका. केवळ त्रयस्थपणे संपूर्ण दिनक्रम उरकावा. अर्थात हे दिसते तेवढे सोपे नाही परंतु निकाल अभूतपूर्व आहे याची खात्री बाळगा. 

जेव्हा आपण विचारांना त्रयस्थपणे पाहण्यास शिकतो तेव्हा प्रत्येक विचार आकलनात आल्यानंतर त्या विचारांना तिथेच संपवून टाकायचे, संपूर्ण विसरून जायचे, ते विचार स्मृतीत राहिलेच पाहिजे असा प्रयत्न करूच नये. हातातून कपबशी पडली की ती फुटते आणि निकामी होते, परत वापरात येत नाही. थोडक्यात प्रिय आणि अप्रिय घटना विसरून जाणे. जर प्रिय आणि अप्रिय घटनांचे विचार तिथेच संपविले नाहीत तर त्यांना लगेच इतर विचारांचे फांदोरे फुटू लागतात, विचार सुरूच राहतात. भूतकाळातील विचार भविष्यकालीन योजना आखित काळाच्या कोठडीत बंधनात अडकले जातात. 

विचारांना थांबविणे हे महत्त्वाचे आहे हे जर आपल्या लक्षात आले तर आपण आपले सर्व व्यर्थ व्याप कमी करायला हवेत. वृथा भार वाहने थांबले पाहिजे.


विचारांचा कधी अंत शक्य आहे काय?

कृष्णमूर्ती यांच्या ध्यानाचा तो महत्वाचा भाग आहे. मेंदूमधून विचारांचे समूळ उच्चाटन करणे हेच त्यांच्या ध्यानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कारण जर विचारांची शृंखला चालू राहिली तर ती जुन्या विचारांची पुनरावृत्ती आहे, तो भूतकाळ आहे, कारण विचार म्हणजे स्मृती आहे, विचार म्हणजे स्मृतीचा प्रतिसाद आहे, विचार म्हणजे अनुभव आहे, विचार म्हणजेच माहितीचा संग्रह आहे. 

प्रश्न: कृष्णमूर्ती ध्यान म्हणजे दिवसभरच्या कार्याकडे सतत जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे होय. पण ते कसे करायचे आणि शक्य आहे काय?

केवळ त्या त्या वेळी आपण काय करीत आहोत यावर संपूर्ण जाणीव पूर्वक लक्ष देणे, यामुळे विचारांच्या साखळ्या तोडल्या जातात.  आपण मनाचा सहज स्वभाव जाणीवपूर्वक मोडला पाहिजे.  मनाचा धर्म आहे सतत बडबड करणे हा होय.

आपण कदाचित सतत लक्ष देणे विसरू शकतो, परंतु लक्षात येताच परत परत प्रयत्न करावयास हवे. आम्ही नेहमीच लक्ष देवू शकत नाही परंतु आम्ही मनामध्ये जे काही छेद निर्माण करतो ते मनाची विशाल भिंत मोडीत काढण्यासाठी तेवढे छोटे छेद पुरेसे असतात.  सत्याचा अविरत वर्षाव उर्वरित काम पूर्ण करेल.

ध्यानाकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन म्हणजे मनाला नियंत्रित करणे, धरून ठेवणे किंवा एकाग्र होणे शिकणे. हे जे पूर्वीचे ज्ञान आहे, हेच मन आहे आणि तेच नियंत्रक आहे, नियंत्रक स्वतः मन आहे त्यामुळे ते मनाला नियंत्रण करू शकत नाही.  म्हणून मनाला नियंत्रण न करता त्याचे केवळ निरीक्षण केले की मनाची निरंतरता संपली जाते. आणि जेव्हा मन पूर्णपणे शांत राहून निरीक्षण करते तेव्हाच मी ला समजण्याची शक्यता असते. जेव्हा आपण लक्षपूर्वक न्याहाळत असतो तेव्हा मनाची बडबड शांत झालेली असते तीच मनाची शांतता होय. 

शांतता पूर्णपणे आवश्यक आहे, केवळ वरवरच्या पातळीवरच नव्हे तर अत्यंत खोल स्तरावर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी संपूर्ण शांतता असणे आवश्यक आहे. आपले वास्तविक अस्तित्व पूर्ण शांत स्वरूपाचे आहे. मनाच्या बडबडीने आपल्याला त्याची जाणीव नसते, मनाची बडबड थांबली की आपण आपल्या मूळच्या अस्तित्वाच्या परमशांत अवस्थेशि एकरूप होतो. 

देहाच्या नैमित्तिक कर्मा एव्हढेच विचार येतील, कर्म संपले की विचार बंद होतील परत परम शांत अवास्थेशी एकरूपता साधली जाईल.

सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये असे setting करता येते की तो फक्त हालचाल आपल्या स्मृत्तीमध्ये साठवू शकतो आणि उर्वरित वेळेत काहीही साठवले जाणार नाही. 

म्हणून मनाने फक्त अवलोकन केले पाहिजे, प्रत्येक अनुभव करताना विना निवड जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्वरित त्या जाणिवेची आणि अनुभवाची समाप्ती होणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. 

पाहणे, पाहिलेले विसरून जाणे आणि तेच सतत करत राहणे हेच कृष्णमूर्ती यांचे ध्यान आहे आणि तीच केवळ साधना आहे, सर्व साधनांचे हेच मूळ आहे, विचारांची निरंतरता संपवून टाकणे.


ध्यानासाठी लागणारी ऊर्जा

आपणास कदाचित हे कळले असेल की सत्य आकलनात येण्यासाठी प्रचंड चैतन्य आणि ऊर्जेची आवश्यकता असते.  आता ही ऊर्जा कशी येते हे शोधूया.

प्रश्न असा आहे की आपली सामान्य उर्जा अधिक वाढवता येऊ शकते काय? कोणत्याही प्रकारच्या विचलन शिवाय ही उर्जा पूर्णपणे वापर केली जाऊ शकते काय? आपणास कोणत्या गोष्टी विचलित करतात याचा आता आपण शोध घेऊया. वेगवेगळी मतं मतांतरे, वादविवाद, संघर्ष यामुळे आपली शक्ती व्यर्थ वाया जात असते. हा संघर्ष वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक ते आंतरराष्ट्रीय युद्धे असा वाढत जात असतो. संघर्ष आणि मतांतरे यामुळे आपली ऊर्जा वाया जात असते. चुकीच्या संस्कारांनी अंधश्रद्धा वाढीस लागतात, मनाला नियंत्रित करण्यासाठीचे विविध उपायांनी आपण भरकटले जातो. ज्याक्षणी आपल्या हे लक्षात येते की संघर्षाचा प्रत्येक प्रकार आपणास विचलित करीत आहे, आपणास भरकटत ठेवण्याचे कार्य करीत आहे   त्या क्षणीचे ते आकलन आपल्यातील विकृती नष्ट करते. जर त्या वेळी आपण ती विकृती नष्ट करण्याची कृती नाही केली व नंतर पाहु असे म्हणून टाळली तर हातातोंडाशी आलेली संधी आपण दडवित असतो. आणि म्हणून मेंदूच्या पेशींच्या संरचनेत, मेमरीच्या रचनेत कोणतेही मूलगामी बदल होत नाहीत.

Sunday, August 02, 2020

उत्कर्ष



आपला उत्कर्ष व आपल्या समाजाचा उत्कर्ष वेगळा नाही आणि तो बाहेरून नव्हे तर आतून होत असतो.

आपले जीवन खरेच नैसर्गिक आहे काय? आपण सर्व परिस्थिती मध्ये आपली नैसर्गिक जीवन शैली कायम ठेवत आहोत काय? फक्त अंगावर विशिष्ट कपडे घालून प्रदर्शन करणे म्हणजे नैसर्गिक आदर्श जीवनशैली नव्हे. जर आपली जीवनशैली खरेच नैसर्गिक, सहज झाली असेल तर त्यामुळे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर अखिल मानवजातीच्या जाणिवेत बदल घडत असतो. याचे कारण असे आहे की आपली जीवनाविषयी ची जी जाणीव आहे ती आपली एकट्याची नसते तर आपल्या आसपासच्या समाजाचे ते प्रतिबिंब असते. आपला सर्व मानव समाज हा सारख्याच समस्यांशी झगडत आहे. समाजातील बहुतांश जण दुखी आहे, नैराष्येने ग्रासलेला आहे. सगळेजण त्रस्त, चिंताग्रस्त, अनिश्चित, एकाकी, असुरक्षित जीवन जगत आहोत. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हे असेच घडत आहे आणि आपण सर्वजण त्याचाच एक भाग आहोत. 

ज्यावेळी या मानव समाजातील एखादी जरी व्यक्ती आपल्या जीवनशैली मध्ये आमूलाग्र बदल करून सहज आणि नैसर्गिक शैलीने जगण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी त्याच्या जीवनशैलीचा फायदा मानव समाजाचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागत असतो. आपणा प्रत्येकामध्ये ती शक्ती विराजमान आहे परंतु आपण तिच्या कलाने जगत नाही. जर आपण आपल्या अंतःप्रवाहास अडथळा निर्माण न करता रिकामी वाट करून दिली तर ती शक्ती योग्य कार्य करत आपला व मानव समाजाचा उत्कर्ष साध्य करेल.

Is your life sacred, holy? Are you acting rightly under all circumstances? It does not mean putting on robes and all that circus. If your life is sacred, you affect the consciousness of mankind, because you are the representative of all humanity. Your consciousness is the consciousness of all humanity, because all human beings suffer, despair, hope, live in anxiety, in uncertainty, are lonely, with no security. This is happening right through the world, and you are part of that. Therefore if your life is changed radically, if your life is sacred, you affect the consciousness of man. That means the flame of discontent, the energy which is so tremendous if you do not run away from it, that energy will find the right action always.

- J Krishnamurti,
Public Discussion 3 in Madras (Chennai), 3 January 1978