श्रध्दांचे गुलाम भक्त
देव, देश, धर्म आदि श्रध्दांच्या गुलामीमधुन सर्व मुक्त झाले तर केवळ श्रध्देखातर चालणारे सर्व व्यापार कोलमडुन पडतील. या करता श्रध्दांच्या ठेकेदारांनी सत्य प्राप्त करण्यासाठी जि साधना करावी लागते ति ईतकि किचकट व कष्टप्रद करून ठेवली आहे जेणेकरून बहुसंख्य मनुष्य त्यापासुन लांबच राहतील व श्रध्दांच्या गुलामगिरीमध्येच अडकुन राहतील.या ठेकेदारांनी बनविलेल्या संस्कार, संस्कृती, श्रध्दांचे ईमाने ईतबारे पालन करणाऱ्या गरीब बैला सारख्या भक्तांना बैलगाडिच्या जुचि ईतकि सवय झालेली असते कि त्यांना स्वतःस बांधलेल्या गाडिच्या जु शिवाय एक पाऊल टाकणे जमत नाहि. जर यदाकदाचित कोणि प्रयत्न केला तर ठेकेदार त्यांना संभाव्य धोक्याच्या चाबकांनी वठणिवर आणत असतात. खरेतर हे धोके तसे खुपच सामान्य असतात, जिवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये धोके असतातच, एकदा दोनदा जरी धडपडलो तरी सावरून परत आपल्या पायावर ऊभे राहता येते. परंतु काहि अयशस्वी प्रयत्न करणारांच्या अधोगतीच्या ऊदाहरणांनी बाकिचे घाबरतात व प्रयत्न करायचे सोडुन देतात.
श्रध्दांच्या गुलामीचि शतकानुशतके सवय झालेल्यांमधुन कोणि बाहेर पडण्याचि शक्यता खुप धुसर असते. ऊलट प्रत्येकाला त्याच्या गुलाम अवस्थेचिच गोडि वाटत असते. त्यासाठि आपले सर्वस्व अर्पण करण्यापर्यंत मजल जाते कारण त्या अवस्थेमध्ये तो त्याच्या बुध्दिचा वापर करण्यासाठी पुर्णपणे असमर्थ झालेला असतो आणि त्याला मुळात श्रध्देच्या भितीखातर बुध्दि वापरण्याचि अनुमती नसते. श्रध्दांचि गुलामी अनंत काळ टिकण्यासाठि ठेकेदारांनी भविष्यकालीन ऊदात्त स्वप्ने, रितीरिवाज, नियम, कायदे यांच्या बेड्या भक्तांना ठोकलेल्या असतात. या बेड्यांनि प्रत्येकांच्या हालचालीवर ईतकी बंधने आलेली असतात, त्यांना ईतके अपंग बनविलेले असते कि श्रध्दांच्या तुरूंगाबाहेर टाकलेली ऊडी नेमकि त्या छोट्याशा, अरूंद खंदकाबाहेर पडेलच याचिहि खात्री नसते. त्यामुळे पुर्णत्वाच्या योग्यतेस पात्र होण्यासाठि व स्वतःस पुर्णपणे मुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये खुपच कमी लोक यशस्वी होतात.
- ईमॅन्युयल काँट, जर्मन तत्वज्ञ
No comments:
Post a Comment