कृष्णमूर्ती: जो वैश्विक करुणेस पात्र झालेला असतो तो सर्वांवर प्रेम करतो परंतु त्यांच्यावर तो अवलंबून रहात नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहणे म्हणजे करुणा नव्हे. वास्तविक जीवन जगत असताना ज्या गोष्टींमुळे आपले जीवन विकृत होणार आहे ते ओळखणे आणि ते ओळखणे हेच सत्य होय कारण त्यामुळेच वास्तविक जीवनात झालेल्या आणि होणाऱ्या विकृतीचे मूळ आपणास सापडते.
David Bohm: होय, मनाचे होणारे विकृतीकरण (conditioning) ओळखणे हेच सार आहे.
कृष्णमूर्ती: जो ते विकृतीकरण ओळखतो, त्याच्या ते आकलनात येणे हिच ती सत्याची कृती असते. ती व्यक्ती मग संसारात दिसून सुद्धा सत्य अवस्थेत राहत असते.
DAVID BOHM: होय, मला वाटते जेव्हा जिज्ञासू दुसऱ्यांवर (ग्रंथ, गुरु, ईश्वर) अवलंबून राहतो तिथेच चूक करतो. दुसऱ्या गोष्टींचे जास्त स्तोम माजविले जात असल्यामुळे तो त्यांना विशेष महत्त्व देतो आणि मग त्याच्या साधनेचे विकृतीकरण होते.
कृष्णमूर्ती: हि गोष्ट आपण ज्यांना सांगायला जातो ते ती स्वीकारत नाहीत उलट विरोध करतात इतके समाज मनाचे विकृतीकरण झाले आहे. तो विरोध कशाने नाहीसा होईल?
सुदैवाने मी त्याचा बाऊ करीत नाही. जर त्यांना सत्य ऐकायचे नसेल तर तो त्यांची आणि सत्याची समस्या असेल माझी नाही.
बुद्ध, ख्रिस्त, मुहंमद, कृष्ण ते हिटलर, स्टॅलिन या सर्वांनी मानवी चेतनेत इतकी भर घातली आहे की ते ओझे वाहत बसण्याशिवाय मानवाला गत्यंतर नाही. त्यामध्ये आपण अधिक भर टाकून ते ओझे अजून जड करावे काय?
David Bohm: नाही, आपण ते ओझे सर्वस्वी नाहीसे करत आहात.
कृष्णमूर्ती: विकृतीकरण करणाऱ्या सर्व गोष्टींपासून संपूर्ण मुक्ती हेच सार आहे. मुक्त मन ते पाहु शकते, आणि ते पाहणे हीच साधना आहे. विकृतीच्या बंधनात राहणे हे मानसिक गुलामीचे लक्षण आहे. आणि जी व्यक्ती ते बदलू इच्छित नाही ती व्यक्ती त्या बंधनात रुतत जाते.
विकृतीच्या रुळलेल्या मार्गातून बाहेर पडा, मुक्ती तिथेच आहे, तेच पहिले आणि अंतिम पाऊल आहे. आपली झालेली विकृती लक्षात येताच त्याची जी ऊर्जा आपणास उपलब्ध होते ती ऊर्जा मग आपणास मदत करते.

No comments:
Post a Comment