अध्यात्मिक साधू संतांनी अनुभवलेले व वैज्ञानिकांनी नंतर पडताळलेले हे विश्व दोन प्रकारचे आहे,
- एक व्यक्त, दृश्य, भौतीक, बाह्य, प्रकृती, physical स्वरूपाचे आहे तर दुसरे
- अव्यक्त, अदृश्य, अध्यात्मीक, आंतरीक, पुरूष, spiritual स्वरूपाचे आहे.
अध्यात्मिक विश्व हे ऊर्जा स्वरूपात असल्यामुळे ते चैतन्यमय आहे तर भौतीक स्वरूपातील विश्व हे अचेतन भासते. अध्यात्मिक ऊर्जेमधुनच भौतीक पदार्थ निर्माण होत असतात त्यामुळे त्या ऊर्जेचे गुण हे भौतीक पदार्था मध्ये ऊतरत असतात. काहिंमध्ये (मनुष्य) ते जास्त प्रमाणात दिसतात तर काहिंमध्ये (दगड माती) ते कमी प्रमाणात दिसतात. दगडांमध्ये चैतन्य जवळ जवळ दिसतच नाहि. दगडांपासुन पुढे माती, वनस्पती, पशु पक्षी, मनुष्य प्राण्यापर्यंत हे चैतन्य हळु हळू नैसर्गीक रित्या विकसीत होत असते. काहि विशिष्ट पध्दतींनी या गुणांचा विकास करता येतो (ध्यास, ध्यान). या गुणांचा साधनेने प्रचंड प्रमाणात विकास केल्यामुळे सामान्य माणुसहि असामान्य महामानव बनु शकतो याची अनेक ऊदाहरणे आपल्या परिचयाची आहेत.
म्हणजे आपले खरे स्वरूप हे ऊर्जेचे आहे आणी ति ऊर्जा आपल्या मध्ये आत्म स्वरूपामध्ये ऊपस्थीत आहे. विश्वामधील ऊर्जेला परमात्मा व शरीरा मधील ऊर्जेला आत्मा म्हटले जाते परंतु स्वरूपाने त्या दोन्ही एकच आहेत. जसे आकाराने विशाल असलेल्या समूद्रातील पाणी व आकाराने लहान असणाऱ्या पेल्यामधील पाणी हे पाणीच असते.
भौतीक पदार्थाने बनलेले शरीर, त्याचे विचार, संकल्पना, भावना, त्याचे अस्तीत्व, अनास्तीत्व, कालावधी ज्या कशामुळे त्याचा आपणास प्रत्यय येत असतो ते सारे नाशीवंत अाहे, ते आपले खरे स्वरूप नाही.
आपणास आपल्या खऱ्या स्वरूपाचा प्रत्यय येण्यासाठी सतत आपल्या मनास ध्यानधारणेच्या माध्यमातुन अंतर्मुख केल्याने अचेतन शरीराचा लोभ लोप पाऊन आपण त्यापासुन मुक्त होऊन सचेतन चैतन्याशी एकरूप होऊ शकतो.
No comments:
Post a Comment