नैसर्गिक तत्ववेत्ता - यु जी कृष्णमुर्ती
दक्षिण भारतीय यु जी कृष्णमुर्ती हे जागतीक किर्तीचे फार मोठे तत्ववेत्ते होते. त्यांनी स्वतः कोणतेहि पुस्तक लिहिले नाहि, कोणतिहि संस्था स्थापन केली नाहि, कोणतेहि अभ्यासवर्ग सुरू केले नाहित, त्यांचे स्वतःचे कार्यालय वा कोणि सहाय्यक नव्हते. त्यांनी कोठे व्याख्याने दिली नाहित, कोठे सत्संग केला नाहि, त्यांनी शिष्यांचा गोतावळा तयार केला नाहि. या सर्व संस्कारांनी मनुष्य जातीचे अगोदरच प्रचंड नुकसान केले असताना आपल्यामुळे त्यामध्ये अधिक भर पडता कामा नये याचि त्यांनी कटाक्षाने काळजि घेतली. त्यांच्याकडे भौतिक संपन्नता नव्हती, कौटुंबिक परिवार नव्हता, जमिन जायदाद नव्हती, कोणतिहि सांसारीक माया त्यांच्या जवळ नव्हती. वयाच्या चौदाव्या वर्षापासुन ते सतत प्रवास करत होते. सहा महिन्यापेक्षा जास्त काळ मुक्काम ते एका ठिकाणि करत नसत. परदेशामध्ये कफल्लक अवस्थेमध्ये फिरत असताना एका परदेशी व्यक्तीने त्यांचि सर्व जबाबदारी स्वीकारली व जेमतेम परिस्थितीमध्ये ते आपला ऊदरनिर्वाह करत होते.
त्यांचि विचारसरणि :
आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यासाठी मी सर्व काहि प्रयत्न केले होते परंतु त्याएैवजी मला नैसर्गिक अवस्था प्राप्त झाली. आतापर्यंत सर्वांनी जे काहि अनुभवले असेल, जो काहि विचार केला असेल, जो काहि भावनाविष्कार अनुभवला असेल ते सर्व अनुभव, विचार, भावना माझ्या अस्तित्वा मधुन पुर्णपणे नाहिसे झाले आहेत. हि घटना अध्यात्मिक, धार्मिक, मानसीक, शारीरिक स्तरावरील नाहि. कारण रूपांतरण करण्यासारखे तसे तिथे काहिहि नसते. विचारांच्या गैरसमजुतीमुळे आपण हे सर्व केवळ गृहित धरलेले असते.
मानवाच्या मानसीक विकृतीतून विचार जन्माला येतात. म्हणून त्यातून जन्मलेली कोणतीही गोष्ट हि विनाशकारी असते. सर्व आध्यात्मिक किंवा इतर प्रकारचे विचार व त्यांनी दिलेले अनुभव हेच आपल्या दुःखांचे मूळ कारण आहेत. खरेतर आपल्या शरीरास सतत आनंद किंवा सुखी जिवनाविषयी ओढ नसते. हि ओढ विचारी मनाचा कल्पनाविष्कार असतो.
मी कोणताहि नवीन संदेश देणार नाहि. खरा गुरू तोच जो आपल्या शिष्यांमधिल सर्व जुनाट श्रध्दास्थानांना, संकल्पनांना हाकलुन बाहेर काढण्यासाठि त्यांना मार्गदर्शन करतो. तो शिष्यांना एकटे चालावयास सांगतो. तो शिष्यांना असे सांगतो की, जर तुम्ही अपयशी ठरलात तर तुम्ही पुन्हा उठा व पुन्हा चालावयास लागा.
मी जे काहि सांगत आहे त्यामध्ये तथ्य असेल तर ते टिकेल, तथ्य नसेल तर ते स्वतःच कोलमोडुन पडेल, त्याला कोणत्याहि श्रध्दायुक्त अधिकारीक टेकुचि आवश्यकता नाहि.
जेव्हा, 'मी काय आहे, मी कोण आहे?' यासारख्या अध्यात्मिक प्रश्नांचा निकाल न लागताच ते नाहिसे होतात, तेव्हा कोणतेहि ईतर प्रश्न शिल्लकच राहणार नाहित.
अधिकाधिक ज्ञानार्जनाचि ईच्छा धरून विचार आपले अस्तित्व निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जसे श्रोत्याला अधिकाधिक ऐकण्यात स्वारस्य असते आणि त्या ऐकण्यामुळे श्रोत्याचे सातत्य कायम राहत असते.
असा कोणताहि मार्ग नाहि जो आपणास आपल्या विचारांच्या जडणघडणि पासुन मुक्त करू शकेल, त्यामुळे काही तथाकथित आध्यात्मिक गुरूंचे ऐकून स्वत:चि जडणघडण बिघडविण्याचा प्रयत्न करू नका. मनाचि जडणघडण बदलण्याचा प्रयत्न करणे हि एकप्रकारे त्याचि नविन जडणघडण करण्या सारखेच असते. एक विचार घालवण्यासाठि पुन्हा दुसरा नविन विचारच आणावा लागतो.
समाधिचि विचारशुन्य अवस्था अस्तित्वात नसते. जागृत अवस्थेमध्ये शरीर त्याच्या सर्व अवयवांसहित पुर्ण क्षमतेने कार्य करत असते, त्याला निद्रेमध्ये शांत होण्यास वाव मिळत असतो, तिच परिस्थिती ध्यानावस्थेमध्ये निर्माण झाल्याने काहि काळ विचार थांबतात, परंतु त्यांना जास्त वेळ थांबवता येत नाहि. मलाहि विचार येत असतात परंतु मी विचारांचा वापर माझ्या भौतीक वा अध्यात्मिक ऊद्देशासाठि करत नाहि.
आपण नेहमीच आपण जे नाही आहोत ते बनू इच्छितो, काहीतरी वेगळे बनणे ही आपली खरी समस्या आहे. आणि आपण आपल्या सर्व शक्तीचा गैरवापर सतत तिथेच करत असतो. तीच ऊर्जा रोजच्या समस्यांना सोडविण्यासाठी आपण वापरत नाही आणि हेच आपल्या दुःखी जिवनाचे मुळ कारण आहे.
सर्वजण शांती मिळविण्यासाठि प्रयत्न करत असतात. परंतु प्रत्यक्षात कोणत्याहि समाजास त्याचे अस्तित्व शिल्लक राखण्यासाठि शांततेचि गरज नसते त्यामुळे समाज हा शांत व्यक्तिकडे एक धोका म्हणुन पहात असतो. म्हणुन ज्यावेळी आपण शांत होतो त्यावेळी आपण समाजाचे शत्रुत्व पत्करत असतो.
माझ्याबरोबर नातेसंबंध ठेवण्यासाठी ईतरांना खुप कठीण जाते. कारण कोणतीही भावना, मानसिक समस्या, दुःख, वेदना मला स्पर्श करू शकत नाहीत. दुसऱ्यांचे अश्रू तर मला बिलकुल प्रभावित करीत नाहीत. निसर्ग हा कठोरच असतो, तो जन्माला घालतानाहि रडवतो व मरतानाहि रडवतो.
ज्ञान हेच अज्ञानास जबाबदार असते त्यामुळे कोणतेहि ज्ञान आपणास अज्ञानापासुन मुक्त करू शकणार नाहि. जे आहे ते कसे नाहि व जे नाहि तेच कसे सत्य आहे हे ज्ञान आपणास चुकिचे मार्गदर्शन करत असते व आपल्या अज्ञानामध्ये अधिकाधिक भर टाकित असते, ज्ञान हे अज्ञान मुलक असते. ज्ञानाचा अंत (वेदांत) झाल्याशिवाय सत्य गवसत नाहि.
या विश्वामधिल प्रत्येकजण दुःख विरहित निरंतर सुखाचि अपेक्षा करत असतो जे केवळ अशक्य आहे. मला सुख म्हणजे काय हे माहित नाहि त्यामुळे मी कधिहि दुःखी नसतो.
आपणास जे शिकविले जाते तेच आपणास ज्ञात असते व तेच आपल्या स्मृतीमध्ये राहते, हे सर्व यांत्रीक आहे. या असल्या पढिक ज्ञानामुळे आपण आपली वेगळी प्रतिमा तयार करतो व 'मी' चा भ्रम तयार होतो. तिथे अज्ञातात काहितरी अधिक असावे असे आपणास वाटत असते. हि जि अपेक्षा असते कि तिथे आपल्या व्यक्तीत्वाहुन वेगळा असा मी असावा तीच सर्व गुंतागुंतीस जबाबदार आहे.
आपणाकडे असलेल्या एैकिव ज्ञानावर आधारित आपले प्रश्न असतात, त्यांचि ऊत्तरेहि आपणाकडे असतात, खरेतर ऊत्तरेच प्रश्न तयार करत असतात. जर ऊत्तरे त्यांचि कामे पार पाडत नसतील तर त्यांना आपण हुसकाऊन लावावयास हवे. परंतु आपण असे करू शकत नाहि कारण या ज्ञानाभोवती, या ऊत्तराभोवती श्रध्दांचे संरक्षक वलय तयार झालेले असते त्यामुळे या गौडबंगालामधुन बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाहि.
श्रध्दांच्या ठेकेदारांनी निर्माण केलेले तथाकथीत ज्ञान मानवी समस्या सोडवण्यास पुर्णपणे कुचकामी ठरले आहे तरीहि त्यांचा त्याग करण्याचे धैर्य आपणामध्ये नाहि. मानवास मुक्त करणारे ज्ञानच त्यास मुर्ख बनवत असते कारण जो स्वतः मुक्तच आहे त्यास दुसरे कोणिहि मुक्ती देऊ शकत नाहि.
https://youtu.be/ZWAiJzKN5bs