Thursday, March 22, 2018

पुनर्जन्म



शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् || गिता १५:८ ||

ज्याप्रमाणे वायु गंधाना एका ठिकाणापासुन दुसरीकडे वाहुन घेऊन जातो त्याप्रमाणे अंतरात्मा हा मनासह ईतर ज्ञानेंंद्रियांना एका शरीपासुन दुसऱ्या शरीराकडे घेऊन जातो. - #ज्ञानेश्वरी १५:८ 

स्थुल शरिराच्या मृत्युनंतर आत्म्याच्या शक्तिमुळे मनासह अंतःकरणाचे सुक्ष्म शरीर दुसऱ्या नविन शरीरात प्रवेश करते. आपले दिसणारे हाडामांसाचे स्थुल शरिर हे मृत्युनंतर निसर्गाशी एकरूप होते. मन, चित्त, बुध्दि, अहंकार यांना अंतःकरण व सुक्ष्म शरीर समजले जाते. अंतःकरणामध्ये आपल्या पुर्वीच्या सर्व आठवणि, अतृप्त ईच्छा, वासना ईत्यादि साठविलेले असतात. स्थुल शरीराच्या मृत्युनंतर सुक्ष्म शरीर दुसऱ्या स्थुल शरीरामध्ये प्रवेश करते. पुर्व कर्मानुसार व राहिलेल्या अतृप्त वासना पुर्ततेसाठि अनुरूप असे नविन शरिर सुक्ष्म शरिरास प्राप्त होत असते. 

आपले विश्व, स्थुल शरीर व सुक्ष्म शरीर हे सर्व भौतिक वस्तुंचे बनलेले आहेत. या भौतीक विश्वाचे कार्य सतत चालु रहाण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या ऊर्जेचि, शक्तिंचि, प्रकाशाचि आवश्यकता असते. ऊर्जा, प्रकाश वा शक्ति या गोष्टि भौतीक विश्वाकडे नसतात. आत्म्याच्या चैतन्यशक्ती मधुन भौतिक विश्व आपला संसार चालविण्यासाठि आवश्यक असणाऱ्या शक्ति प्राप्त करत असते. आत्म्याच्या चैतन्यशक्तीच्या प्रभावाखाली भौतीक विश्व कार्यरत असते. आत्मा व त्याच्या शक्ति स्वतः काहि करत नाहित परंतु त्यांच्या प्रभावाखाली विश्व, स्थुल शरीरे व सुक्ष्म शरिरे यांचे कार्य चालु असते. आत्मा हा भौतीक विश्वाच्या व शरीरांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाहि. स्थुल व सुक्ष्म शरिरे हि भौतिक विश्वाचे भाग आहेत. भौतिक विश्वाच्या प्रत्येक सजिव व निर्जिव कणांमध्ये अंतःकरण असते व हे अंतःकरण आपले स्थुल शरीर निवडत असते. अंतःकरणाच्या शुध्दतेनुसार त्यास नविन शरिर प्राप्त होत असते. 

जब देहादिसंघातका स्वामी जीवात्मा शरीरको छोड़कर जाता है तब वह मन और ईंद्रियोंको आकर्षित करता है। जैसे वायु गन्धको लेकर जाता है वैसे ही, जब जीवात्मा पहले शरीरसे दूसरे शरीरको पाता है तब मनसहित इन छः इन्द्रियोंको साथ लेकर जाता है। - #आदि_शंकराचार्य 

When the soul obtains a body and when He leaves it, He takes inner subtle body and goes to another body as like the wind takes the scents from place to place. - #Swami_Sivanand