Sunday, June 06, 2021

तथ्य, भ्रम आणि सत्य

विश्व आणि विश्वातील सर्व सजीव निर्जीव हे जसे तथ्य आहेत तसेच तथ्य म्हणजे मानवी युद्ध आहे. बरोबर? मनुष्य हिंसक आहे ही वस्तुस्थिती आहे. तथ्य म्हणजे राष्ट्रा राष्ट्रातील विभागणी, राजकीय विभागणी, धार्मिक विभागणी, वैचारिक विभागणी आहे.  बरोबर?  तुम्ही आणि मी - विभागणी आली, स्त्री आणि पुरुष - विभागणी आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की जेथे विभाजन आहे तेथे संघर्ष आहे. यहूदी - अरब, मुस्लिम -  हिंदू इत्यादी. तर जेथे विभाजन आहे तेथे संघर्ष आहे. ते एक सत्य आहे. तो एक नियम आहे. बरोबर?

प्रत्यक्षात जे काही चालले आहे किंवा प्रत्यक्षात काय आहे ते सर्व तथ्य असते. या तथ्यांवरून आपण जे निष्कर्ष काढतो, आवड आणि नापसंत ठरवितो जरी ते वास्तविक दिसले तरी ते भ्रम असतात.

विचारांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट वास्तविक आहे. विचारांनी हा मंडप तयार केला आहे. मंडप एक वास्तव आहे. विचारांनी हा मायक्रोफोन तयार केला आहे. तो वास्तव आहे. विचारांनी विविध भ्रम आणि संकल्पना निर्माण केले आहेत, ते सर्व वास्तविकता आहे. जे काही विचार निर्माण करते ते सर्व वास्तविकता असते - इमारत, तांत्रिक गोष्टी ज्या विचारांती तंत्रज्ञानाने तयार केल्या आहेत - संगणक, दूरदर्शन इत्यादी. विचारांनी निर्माण केलेले भ्रम यासह विचारांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट वास्तविकता आहे. राष्ट्रीयत्व हा एक भ्रम आहे. आणि देव हा सुद्धा एक भ्रम आहे, विचारांनी ते सर्व निर्माण केले आहेत.

परंतु विचारांनी निसर्ग - झाड, बाहेरील गोष्टी तयार केल्या नाहीत.  बरोबर?  पण झाडाच्या लाकडापासून बनविलेले खुर्ची ही एक वास्तविकता आहे.  कृपया, लक्ष द्या.  विचारांनी निसर्ग निर्माण केलेला नाही, परंतु झाडा पासून खुर्ची बनविणे हे वास्तव आहे. 

जेव्हा आपणास कोणताही भ्रम नसतो तेव्हाच योग्य कृती होऊ शकते. बरोबर?  जेव्हा भ्रम नसतो, जेव्हा मन सर्व प्रकारच्या भ्रमांपासून मुक्त असते तेव्हाच योग्य कार्य होऊ शकते. ते स्पष्ट आहे.  मी मनोरुग्ण असल्यास मी योग्यरित्या वागू शकत नाही. ते स्पष्ट आहे. मी संभ्रमित असल्यास मी योग्य वागू शकत नाही. मी त्याच्या निष्कर्षांद्वारे एखाद्या पूर्वग्रहाच्या विशिष्ट प्रकारात अडकल्यास मी योग्य रीतीने वागू शकत नाही. दैनंदिन जीवनात, योग्य मार्गाने वागण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भ्रम आहे तोपर्यंत योग्य कृती शक्य नाही.

तर सत्य जे काय आहे ते असे वसंत ऋतू सारखे, फुलांसारखे, पाण्यासारखे सहज वाहणारे होऊ द्या. जेव्हा मनाने सर्व काही जे अव्यवस्थित होते ते सर्व व्यवस्थित केले असेल तेव्हाच ते येऊ शकते. बरोबर?

अजून एक प्रश्न होता: मनुष्य आणि निसर्गाचा काय संबंध आहे? 

विचारांनी मनुष्य निर्माण केलेला नाही.

मग माणसाचा निसर्गाशी काय संबंध आहे? मनुष्य त्याने निर्माण केलेल्या भ्रमात राहिला तर त्याचा निसर्गाशी काही संबंध नाही. पण भ्रम नसलेला माणूस, ज्याने विचारांनी काय निर्माण केले आहे हे पाहिले आहे तो मनुष्य सर्व विचार त्यांच्या योग्य जागी ठेवतो, मग त्याचा निसर्गाशी संबंध आहे. 

मला आश्चर्य वाटेल जर आपणास हे समजले तर.