मनाला जर Real Meditation समजले तर खोल पर्यंत अगदी निर्गुण निराकार अवस्थे पर्यंत मनाच्या सर्व स्तरांची अनुभुती अंतरंगात प्रकटते. असे खरोखर घडले तरच आपल्या अस्तित्वाचा संपुर्ण खुलासा अंतरंगात होवू शकतो.
आपले अस्तित्व म्हणजे आपल्या चार अवस्था / चार वाचा / चार consciousness यांचा बोध होणे होय. हा बोध मनाचा बोध मनाला होत असतो किंवा self चा बोध self ला होत असतो. अस्तित्व म्हणजे सुक्ष्म मनाचे gradual consolidification म्हणजे सघनीकरण आहे. Nothingness मधे आकाश (space) प्रकटावे, आकाशात हवा प्रकटावी, हवेत वाफ (vapour) प्रकटावी, वाफेत ढग प्रकटावा, ढगातुन पाण्याचे अगणीत fragmented थेंब निर्माण व्हावेत व हे पाण्याचे थेंब अजुन सघन होवुन त्या थेंबाचे रुपांतर गारेत व्हावे व ही गार नंतर वितळुन पाणी होते,पाणी समुद्राला जावुन मिळते व पुढे समुद्रातील पाण्याची वाफ होते वाफेचा ढग होवुन पाऊस पडतो आणि जलचक्र अखंड चालु रहाते. अगदी अशीच ही consciousness च्या / मनाच्या रुपांतरीत होण्याची कहाणी आहे व आपण स्वताच ते संपुर्ण रुपांतरण आपल्या ठायी अंतरंगात अपरोक्षपणे अनुभवणे या प्रक्रियेला Meditation म्हणतात.
Consciousness म्हणजे द्रष्टा - दृश्य तादात्म्य. द्रष्ट्या शिवाय दृश्य नाही व दृश्याशिवाय द्रष्टा नाही. असतात तर दोघे असतात नाहीतर दोघे नसतात. द्रष्टा - दृश्याचे असणेपण दोन प्रकारचे असते एक द्वैतपणे आणि दुसरे अद्वैतपणे.
Universal consciousness म्हणजे अद्वैत द्रष्टा - दृश्य / ब्रह्म / परा / महाकारणदेह / तुर्या / विज्ञान होय. Universal consciousness म्हणजेच स्वसंवेद्यता.
Fragamented consciousness म्हणजे unconscious / सुषुप्ती / कारण देह / प्राणमय कोष / जीवभाव होय. हा जीवभाव स्वप्न व जागृतीचा भास निर्माण करतो.
अस्तित्व प्रक्रियेशी असलेली आपल्या असणेपणाची एकरुपता प्रत्यक्ष समजणे हेच self knowledge किंवा आत्म स्वरुपाचे ज्ञान होय. ही अस्तित्वाची प्रक्रिया ज्या निर्गुण निराकारातुन उगम पावते त्या निर्गुण निराकाराला परमात्मा / परमेश्वर / परब्रह्म / शुन्य / Nothingness म्हणतात. या अवस्थेत Awareness हाच Awareness च्या सुक्ष्मातिसुक्ष्म अवस्थेत असतो. खरे म्हणजे consciousness किंवा मन हेच परमात्म स्वरुप आहे. हा consciousness किंवा हे मन म्हणजेच ते स्वसंवेद्य तत्व आहे ज्याला आपण परमात्मा म्हणतो, universal consciousness म्हणजे परमात्मा व fragmented consciousness म्हणजेच individuality रुपी जीवभाव, individual consciousness universal consciousness चाच भाग आहे, अंश आहे म्हणुन सर्व जीव परमात्म्याचे अंश आहे असे म्हटले जाते पण नुसते ग्रंथ वाचुन, श्रवण करुन, तर्क बुद्धी विचाराच्या सहाय्याने हे समजले असे वाटले तरी ते actually समजलेले नसते, JK यांचे Real meditation समजले तर हे स्वसंवेद्य तत्व जे मन आहे ते मन स्वताच स्वताच्या स्वसंवेद्यतेत या अस्तित्वाचा संपुर्ण मागोवा अगदी उगमापासुन शेवटापर्यंत घेउ शकते हेच Real meditation होय.
Scientist जी Quantum theory, Black hole ची कल्पना मांडत आहेत ती theory याच दिशेने जाणारी आहे.
मनाच्या द्वैत प्रक्रियेच्या समजेतुन मन जेव्हा जागृती व स्वप्नावस्था ओलांडुन सुषुप्तीत सजगपणे प्रवेश करते तेव्हा जीवाचा अपरोक्ष बोध जीवाला होतो, सुषुप्तीत असजगतेत प्रवेश करणाऱ्यासाठी सुषुप्ती ही गाढ निद्रा असते. सुषुप्ती ही जीवभावाचे बीजस्वरुप आहे, सुषुप्ती म्हणजे fragmented mind जे सुक्ष्म मनच आहे जन्म मृत्यु किंवा जीवाचे शरीर रुपाने व्यक्त अव्यक्त होणे या जीवभावामुळे होत असते. जर meditation कळले तर पुढची अवस्था प्रकटत असते जीला तुर्या/ ब्रह्म / universal consciousness/ विज्ञानमय कोष किंवा भगवान बुद्धांच्या शब्दात विज्ञान म्हणतात. या सर्वांचे उगमस्थान निर्गुण निराकार तत्व आहे. त्या निर्गुण निराकार तत्वाला हिंदु धर्मीय परब्रह्म / परमात्मा / परमेश्वर म्हणतात, त्याच तत्वाला ख्रिश्चन आकाशातला बाप म्हणतात तर मुस्लिम त्याच निर्गुण निराकार तत्वाला अल्ला म्हणतात, बुद्धाने त्याच तत्वाला शुन्य म्हटले, हिंदु तत्वज्ञानाच्या वेद उपनिषदात या तत्वाचा शुन्य वा महाशुन्य म्हणुन उल्लेख खुप ठिकाणी आढळतो. पण Real meditation समजलेले नसल्याने अस्तित्वाची ही वैश्विक एकरुपता अंतरंगात न अनुभवल्याने हिंदु - मुस्लिम -ख्रिश्चन - बौद्ध - जैन - शिख तत्वज्ञाने भिन्न भिन्न आहेत असे अज्ञानामुळे वाटते व पुढे या अज्ञानातुन धर्माधर्मातील तेढ, युद्धे, हिंसा, दहशतवाद कसा पसरतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत म्हणुन Real meditation मधे अस्तित्वाशी असलेली एकरुपता जाणणे हाच सर्व समस्यांवरचा एकमेव उपाय आहे. या Real meditation ला भगवान बुद्ध "एकायनो मग्गो " म्हणतात जो खरा व एकमेव असा वैश्विक उपाय आहे जो सर्व मानव जाती साठी आहे.
Let us ponder over it and let the mind be free of all illusions created by mind itself.
What remains at the end of all illusions is known as Truth which is निर्गुण निराकार तत्व which is original ground of all existence which is eternity.
श्री विजय पांढरे, Mob.9822992578, Vbpandhare@gmail.com
