आपणास दुःख का सहन करावे लागते?
आपण इतर जनावरांची कत्तल होताना त्यांची तडफड पाहतो तसेच मृत्यू, हिंसा, अपघात यामधून होणारे दुःख पाहतो ते सर्व भौतिक दुःख आहे आणि ते खरे असते. हे भौतिक दुःख पाहून आपले मन मानसिक दुःखाची कल्पना बनविते.
एखादी भौतिक दुःखद घटना घडली की त्याला पर्याय नसतो. म्हणजे आपला एखादा नातलग मृत्युमुखी पडला तर भौतिक दृष्ट्या त्याला परत आणता येत नाही. त्या loss ची भरपाई करता येत नाही, ते accept करावेच लागते. आपला माणूस कायमचा गेला आहे आणि आता तो परत येणार नाही. ही समज, हे आकलन यातून ते दुःख खरेतर संपुष्टात यायला हवे असते.
परंतु आपले मन हे काळ आणि त्यावर आधारित विचार यांच्या मार्फत तो incidence, तो loss दुःखद आठवणींच्या विचारांनी जिवंत ठेवते.
भौतिक दुखापासून पळवाट नसते परंतु आपले मन अनेक कल्पना लढवीत राहते, नवीन आशा दाखवीत राहते आणि आपणास आपल्या झालेल्या दुःखातून पळवाट शोधण्यास मार्ग हवा असतो.
भौतिक घटना घडून गेल्या नंतर आपला मी ते दुःख जिवंत ठेवत असतो. म्हणजे भौतिक घटना घडून गेल्या नंतर जे दुःख होत असते ते आपल्या मी ला.
आपला मी हा एक विचार आहे, तो एक भास आहे, तो काल्पनिक आहे, तो खरा नाही त्यामुळे त्याचे सुख दुःख खरे नसतात, काल्पनिक असतात.
एकदा आपणास मी आणि त्याच्या कल्पना यांचा साक्षात्कार झाला की सर्व मानसिक दुःखे ही मी या भासाची आहेत, प्रत्यक्षात तसे काही नसते याचे आकलन होते आणि नंतर आपण कधीच दुःखी होणार नाही.
संपूर्ण मानवजात अशा मानसिक कल्पनांमुळे दुःखी आहे आणि आपला मी त्या कल्पना आपल्या आयुष्यात आणतो म्हणून आपला मी दुःखी आहे
आपण मानसिकरीत्या दुःखी आहोत कारण संपूर्ण मानवजात मानसिकरीत्या दुःखी आहे.
I am the world and world is me. - J Krishnamurti
No comments:
Post a Comment