Wednesday, November 04, 2020

परम अवस्थेचे दिशा दिग्दर्शन

हजारो वर्षापासून परंपरा आणि श्रद्धा यामध्ये बद्ध झालेला जीव त्यातून मुक्त होऊ शकतो काय?

परंपरा आणि श्रद्धा हे आपल्या मेंदूमध्ये घट्ट पणे पाय रोवून बसलेल्या आहेत. त्यांना कॉन्शसनेस म्हणजे चैतन्य यांनी बांधून ठेवलेले आहे त्यामुळे प्रथम आपण या चैतन्याचा विचार करू या.

चैतन्य म्हणजे नेमके काय आहे?

चैतन्य हे मेंदूमधील स्मृतींचे बनलेले असते. स्मृती मधील आपल्या ज्या आठवणी असतात त्या आठवणींचे सतत उजळणी करत राहणे हे चैतन्याचे काम असते. भूतकाळातील आठवणी मध्ये सतत रममाण होण्यामुळे आपला मेंदू हा जुनाच राहतो त्याच्या मध्ये नाविन्य निर्माण होत नाही. मेंदूमधील जुन्या विचारांनी आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असते, माणसा माणसांमध्ये दरी निर्माण होत असते.

आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या जुनाट विचारांचा त्याग केला तर साहजिक त्या विचारावर आधारित माणसा माणसा मधील दरी कमी होईल, आपले दुःख कमी होईल. व्यावहारिक विचार कायम ठेवून मानसिक विचारांचा त्याग करता येऊ शकतो.

आपल्या श्रद्धा आणि परंपरा या हजारो वर्षापासून बनले गेले आहेत आणि या हजारो वर्षांच्या श्रद्धा वरून आपले विचार बनले गेले आहेत या विचारांचा अंत करायचा म्हणजे परत तेवढेच वर्षे जाऊन द्यावे लागतील. भूतकाळ मध्ये गेलेला वेळ आणि आणि भविष्य काळामध्ये त्यांना घालवण्यासाठी लागणारा वेळ हे सर्व वेळकाढू पणा आहे आणि ते अशक्य सुद्धा आहे मग यावर इतर कोणता मार्ग आहे का?

जुन्या विचारांचा आधार काढून घेऊन त्याठिकाणी नवीन विचारांचा शिरकाव होऊन देण्यामध्ये खूप मोठा धोका असते कारण आपला मेंदू सुरक्षित जीवन जगण्याच्या कल्पनांमधून जे त्याला सुरक्षा देत असते ते सोडायला तयार होत नाही आणि जे नवीन आहे ते मला सुरक्षा देईल काय? या शंकेने नवीन स्वीकारायला तयार होत नाही. ज्या मेंदूस सुरक्षित आणि सुखी जीवन जगायचे आहे आहे तो असा धोका घेऊ शकत नाही. केवळ असे जिज्ञासू ज्यांना जीवन हे मानसिकरीत्या सुरक्षित आणि सुखी नसते ते निसर्ग नियमांनी संरक्षित आहे हे कळलेले असते असे मेंदूच नवीन धोका घ्यायला तयार होतात. ज्यांनी जीवनामध्ये अपार संकटांचा सामना केला आहे, अपार दुःख भोगले आहे असे मेंदू त्यांच्या अनुभवातून धोका घेण्यास प्रवृत्त झालेले असतात.

आपल्या सर्व प्रकारच्या मानसिक विचारसरणीचा अंत हा आपल्या खऱ्या खुऱ्या अस्तित्वाशी एकरूप होणे होय. अशा अवस्थेमध्ये प्रस्थापित होणे होय जी अवस्था सर्व इतर अवस्थांचे मूळ स्थान असेल.

अशा परम अवस्थेमध्ये येण्यासाठी काय करावे लागेल? कोणतीही मानसिक क्रिया आपणास त्या अवस्थेत येऊ देणार नाही. फक्त अशी जाणीव खूप महत्वाची आहे की आपण परंपरागत, श्रद्धाळू जीवन जगत आहोत, त्यांच्या बंधनातील जीवन जगत आहोत, त्या श्रद्धा आपणास सत्याकडे फिरकू देत नाहीत अशा प्रकारे आपल्या कृत्रिम, बनावट परंपरागत, श्रद्धाळू जीवनशैलीचे निरीक्षण करीत त्यातील कृत्रिमपण कमी करावे लागेल, संपवावे लागेल. बहुसंख्य लोक परंपरा आणि श्रद्धा यांच्या मगरमिठीत पूर्णपणे अडकले आहेत, त्यांचे सर्व प्रयत्न त्यांना त्या दलदली मध्ये अधिकाधिक अडकवित आहेत. आपण त्या श्रद्धा, परंपरा रुपी मगरीचे शिर कलम करण्यासाठी कोणीतरी गरुडावर बसून येईल असे श्रद्धा सांगतात त्यावर विश्वास ठेवून स्वतः काही न करता वाट पहात असतो आणि मगरीचे शिकार होत राहतो. आपले जीवन हे मानसिक श्रद्धा रुपी मगरींचे जाळे आहे हे लक्षात येणे हे अतिशय महत्वाचे आहे. 

- J Krishnamurti आणि पुपुल जयकर यांच्या मधील गहन चिंतन

https://youtu.be/LjNsrVHbctU



No comments: