अध्यात्मिक साधनेचा उद्देश एकच आहे व तो उद्देश आहे मानवाला त्याच्या दुखातुन, चिंतेतुन, काळजीतुन, भयातुन, ईच्छा वासनातुन मुक्त करुन मानवाचे जिवन दुखमुक्त करणे.
साधनेच्या सुरवातीलाच मोक्ष प्राप्त करणे, आत्मज्ञान प्राप्त करणे, ईश्वर प्राप्ती वगैरे गोष्टींचे अमिष साधकाला दाखवणे योग्य होत नाही. असे अमिष दाखवले तर स्वार्थी व कामी जीव त्या अमिषाच्या लोभापायी साधना सुरु करत असतो व जन्मभर साधना करुन त्या लोभी मनाला काहीही प्राप्त होत नसते, म्हणुन अध्यात्माचा सार समजुन मग अध्यात्मीक प्रवास योग्य मार्गदर्शनाखाली झाला पाहीजे. जितके धर्म आहेत, जितके पंथ आहेत, जितके संप्रदाय आहेत, जितक्या साधना पद्धती आहेत, जितके ग्रंथ आहेत, जितके गुरु आहेत त्या सर्व एकाच उद्दीष्टावर काम करतात हे जर समजले तर आपली साधना with clarity होते. अशी समजपुर्वक साधना केली तरच आपला प्रवास योग्य दिशेने होत असतो.
मी कोण आहे? हे जग काय आहे? व या जगाचा व माझा काय संबंध आहे याचा खुलासा अंतरंगात होण्यासाठी चित्त शुद्धी करावी लागते. चित्तशुद्धीची प्रक्रिया काय आहे हे कळण्यासाठी चित्त वा मन म्हणजे काय व ही मनाची वा चित्ताची यंत्रणा कशी काम करते हे नीट समजावुन देणे हे खऱ्या मार्गदर्शकाचे काम असते व म्हणुन आज आपण याच विषयावर चिंतन करणार आहोत. हाच खरा सर्व साधनांचा विषय असतो हे जर समजले नाही तर सर्व व्यर्थ होय. वेदांत / उपनिषद, कृष्णमूर्ती व भगवान बुद्ध यानी हाच विषय स्पष्ट केला आहे व हाच अध्यात्माचा मध्यवर्ती विषय आहे म्हणुन मन वा चित्त याच विषयावर आज आपण चिंतन करु.
सर्व अस्तित्व मनच आहे हे प्रथम समजले पाहीजे. Existence is contents of consciousness म्हणुन मन वा चित्त यांचा शोध घेणे हेच अध्यात्म आहे. कृष्णमूर्ती या गोष्टीला mind process म्हणतात तर भगवान बुद्ध या mind process लाच धम्म म्हणतात. वेदांतात या mind process लाच त्रिपुटी असे नाव आहे. चित्त, मन, धम्म, त्रिपुटी, consciousness ही सर्व एकाच mind process ची वेगवेगळी नावे आहेत. चित्ताचा सखोल व सुक्ष्म शोध घेणे, चित्त प्रक्रिया जाणणे व चित्ताचा समुळ निरास अपरोक्ष पणें अनुभवत, चार अवस्था रुपी चित्ताच्या अधीष्ठानाशी असलेली एकरुपता अंतरंगात अनुभवत, अस्तित्वाची नाम रुपात्मक असलेली द्वैत संपुर्ण प्रक्रिया real meditation मधे अंतरंगात जाणणे व द्वैताचा संपुर्ण निरास अनुभवत नंतर अद्वैत अपरोक्षपणे अनुभवत त्या पलिकडे असलेल्या निर्गुण निराकाराशी एकरुप होणे यालाच अध्यात्म असे नाव आहे, असे झाले असता संपुर्ण अस्तित्व प्रक्रिया अंतरंगात अपरोक्षपणे अनुभवली जाते. असे चित्ताठायी असलेले अंतर्द्वंद्व मुळापासुन उखडले जाणे फार महत्वाचे आहे. अज्ञानी माणसासाठी बाह्य जगतात तर द्वंद्व आहेच पण अंतरंगातील भयंकर भयपुर्ण अशा द्वंद्वाची ओळख सामान्य मनाला नसतेच. जो पर्यंत अंतरंगातील विविध अवस्थात inbuilt असलेली ही द्वंद्वे निरसत नाहीत तो पर्यंत मनाची भ्रमातुन सुटका होत नाही. ही अंतर द्वंद्वे कशी मिटतात याचे मार्गदर्शन फक्त खरे साक्षात्कारी मार्गदर्शकच करतात.
शेतकरी मंडळीना माहीत आहे की शेतात एक लव्हाळी नावाचे तण रुपी गवत असते व त्याचे जमिनीखाली दीड दोन फुट एक गाठ असते व जो पर्यंत जमीन खोदुन ती गाठ काढुन टाकली जात नाही तो पर्यंत ते शेतातील तण कधीच मरत नसते. तसेच खोल मानवी मनात देखील अशीच अज्ञानाची गाठ आहे जी चारी अवस्थात कार्यरत असते त्या चारी अवस्थेतील अज्ञानाचा निरास होत नाही तो पर्यंत आत्मज्ञान प्रकटत नसते. Real meditation म्हणजे चारी अवस्थेतील अज्ञानाचा निरास करण्याची कला आहे.
अध्यात्मात consciousness बद्दल किंवा मनाबद्दल वा चित्ताबद्दल खुप अज्ञान आजही प्रचलीत आहे, जे अध्यात्म शिकवतात अशा गुरु पैकी 99.99 % गुरुना या consciousness ची वा या चित्ताची नीट माहीती नाही असे आढळले आहे. This is very disturbing statement for those gurus but that is fact. सर्व जण असे मानतात की मन प्रक्रियेत, consciousness ला Matter व्यतिरीक्त स्वतंत्र अस्तित्व आहे पण ही मान्यता अत्यंत चुक आहे. consciousness हा नेहमी नाम - रुप अशा joint psycho - physical phenomenon च्या स्वरुपातच असु शकतो. संपुर्ण अस्तित्वाचा भास ही अशी एक नाम - रुपात्मक joint psycho- physical phenomenon आहे. आपले चित्त शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे आधी आपण ओळखायला शिकले पाहीजे. या बाबत पक्के पक्के लक्षात ठेवले पाहीजे की ज्या चित्तात तथाकथित दैवी, चमत्कारिक भास प्रकटतात ते चित्त अशुद्ध असते. जितके अतींद्रिय अनुभवांचे भास जास्त तितके ते चित्त जास्त अशुद्ध असते. जे अतिशुद्ध चित्त असते त्यात कोणतेही भास होत नसतात. जे स्वयंभु असते वा स्वयं प्रकाशमान असते त्यात अशुद्धी प्रवेश नाही करु शकत. चित्तात अशुद्धी प्रकटत असते म्हणुन चित्ताला म्हणजे consciousness ला वा mind ला स्वतंत्र अस्तित्व कधीच नसते, it is always associated with matter.
जेव्हा चित्तातील सर्व भास निरास होतात व चित्तात कोणताही भास असत नाही तेव्हा अशा निराभास चित्ताला शुद्ध चित्त म्हणतात. चित्त संपुर्ण शुद्ध झाल्याशिवाय अस्तित्व प्रक्रियेचे आकलन अस्तित्व प्रक्रियेला होत नसते.
या चित्ताला वा mind ला संत नाम म्हणतात व हे अस्तित्व नामरुपात्मक आहे असे संत नेहमी सांगतात, संताच्या या सांगण्याचा अर्थ आहे की अस्तित्व ही joint mind - matter phenomenon आहे व जागृती, स्वप्न, सुषुप्ती तथा तुर्या अवस्थेत ही नामरुपात्मक joint प्रक्रिया कार्यरत असते
consciousness ला स्वतंत्र अस्तित्व नाही. ज्या गोष्टीला स्वतंत्र अस्तित्व असते त्यात अशुद्धी कधीच प्रवेश करु शकत नाही. चित्तात अशुद्धी प्रकटते म्हणुन चित्ताला स्वतंत्र अस्तित्व नाही असे सिद्ध होते. Consciousness (नाम ) is always associated with its content ( रुप).
Consciousness is observer or experiencer and content is the thing observed or experienced. याचा अर्थ द्रष्टाच दृश्य असतो व द्रष्टा - दृश्य ही joint duality phenomenon आहे.
ही joint duality phenomenon चारी अवस्था / चारी कोष / चारी देह / चारी वाचा / चारी consciousness मधे नामरुपात्मक duality च्या स्वरुपात कार्यरत असते.
जागृती मधे हे नाम - रुप पंचभुतात्मक स्वरुपात अन्नमय कोष म्हणुन consciousness मधे अनुभवाला येते तर स्वप्नात पृथ्वी धातु वगळता ईतर चार भुतांच्या स्वरुपात स्वप्न म्हणुन consciousness मधे अनुभवाला येते. तसेच सुषुप्ती मधे हे नामरुप आकाश व वायु यांच्या स्वरुपात प्राणमय कोष म्हणुन consciousness मधे अनुभवाला येते व तुर्या अवस्थेत हे नाम - रुप आकाश स्वरुपात consciousness मधे अनुभवाला येते.
तर नाम - रुपा पलिकडील अवस्थेत consciousness ला consciousness चा अनुभव येत नसतो. ही एक शब्दातीत अवस्था आहे व विचार बुद्धी व इंद्रियाना कळतच नाही. केवळ real meditation मधे ज्या मनाला observer is observed किंवा experience is experiencer किंवा द्रष्टाच दृश्य आहे असा बोध होवुन स्वतंत्र observed शिवाय observer अस्तित्वात नाही हे समजते तेव्हा कुठे मनातील द्वैत संपुष्टात येते हे द्वैत observer is observed या समजेतुन मिटने दिव्य दृष्टी आहे. ही दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय आत्म ज्ञान प्रकटतच नसते. ही दिव्य दृष्टी प्राप्त होण्यासाठी मन निष्काम असावे लागते, अशा पात्र मनाला जेव्हा observer is observed ही दिव्य दृष्टी देणारा खरा मार्गदर्शक भेटतो तेव्हा त्या पात्र मनाचे काम पूर्ण होवुन जाते.
- श्री विजय पांढरे, 9822992578, vbpandhare@gmail.com
