आपली आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी मी आपणास काही मंत्र देण्यासाठि येथे आलो नाही. गुरु, ग्रंथ, आध्यात्मिक साधना इत्यादी सारख्या बाहेरच्या सहाय्यकाचि याकामी मदत होत नसते. जेव्हा बाहेरील सहाय्यकावर आपली मदार असते तेव्हा तिथे तो काहितरी करेल अशी आशा असते आणि ही आशा आपणामध्ये असहायता निर्माण करीत नाही. आपण स्वतः काहि न करता सर्व काहि त्याच्यावर सोपवुन निर्धास्त होतो. बाह्य मदत आपणास सत्य समजण्यास अडथळा निर्माण करते. मला याबद्दल निश्चित खात्री आहे परंतु ही निश्चितता मी इतरा मध्ये प्रसारित करू शकत नाही, अर्थात ईतर कोणिही तसे करू शकत नाहि. जे तसे सांगतात ते निश्चिपणे फसवेगिरी करत आहेत.
आत्मसाक्षात्कारा सारखी आध्यात्मिक ध्येये हि आपल्या अध्यात्मिक सत्याच्या शोधासाठी जबाबदार आहेत. जोपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाहि तोपर्यंत आपला सत्याचा शोध चालुच रहातो. खरेतर तथाकथित आध्यात्मिक ध्येये हि सुध्दा आपली स्वतःची नसतात. संस्कृती, संस्कार यांनी तीं आपणावर बिंबवलेली असतात. संस्कृती व संस्कारा मधुन आलेले ज्ञान आपली अध्यात्मिक ध्येय निश्चित करत असतात. आपण त्यांना अध्यात्मिक म्हणत असतो परंतु त्यांचे खरे स्वरूप हे सांसारीकच असते. अध्यात्मिक साधने द्वारे आपली सांसारीक दुःखे कमी होतील हा त्या मागचा उद्देश असतो. आपण आपले सांसारीक जिवन, धार्मिक वा अध्यात्मिक जिवन असे तुकडे करतो ते चुकिचे आहे कारण सर्व काहि संसारासाठिच, सुखासाठि चाललेले असते.
आपल्या शरिरास आत्मसाक्षात्कार, परमानंद, परमशांतीचि आवश्यकता नसते. मन जे विचार व माहितींचे माहेरघर असते त्याने या काल्पनीक अवस्था बनविल्या आहेत व त्यांचे ध्येयामध्ये रूपांतरण झाले आहे. ध्येयप्राप्तीसाठि सत्याचा शोध व सत्याच्या शोधासाठी गुरू, त्यांचे ग्रंथ, धर्म, रिती रिवाज आदि बाह्य संस्कृतीचा व संस्कारांचा डोलारा ऊभा राहिला आहे. आता या पोकळ डोलाऱ्याचा ईतका विस्तीर्ण विस्तार झाला आहे कि त्यामध्ये अध्यात्मिक ध्येये व सत्याचा शोध सुध्दा हरवले गेले आहेत.
हे लक्षात येणे अतिशय महत्वाचे आहे कि काहिहि समजण्याचे नाहि. काल्पनीक असणाऱ्या अध्यात्मिक ध्येये व सत्याच्या शोधाचा अंत व्हायला हवा. अधिकाधिक धार्मिक ज्ञान प्राप्त करण्याचे थांबले गेले पाहिजे. आपणा जवळ जे धार्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाने आपल्या मानवी समस्या सोडविल्या नाहित. संस्कृतीप्रधान पुर्वेकडिल देश पश्चिमेकडिल भौतीक दृष्ट्या प्रगत देशाकडे याचना करत फिरत असताना दिसते. संस्कृतीने जे प्रश्न सोडविले नाहित ते प्रगत तंत्रज्ञानाने सोडविले आहेत हे मान्य करावे लागेल. धार्मिक ज्ञान आपल्या समस्या सोडवेल या आशेने आपण ते गोळा करत असतो परंतु ते अधिक समस्या निर्माण करत असते. धार्मिक ज्ञानाचे भांडार ऊपलब्ध असताना म्हणजे त्यामध्ये मानवीय समस्यांचि तथाकथित ऊत्तरे असताना सुध्दा तरीहि समस्या शिल्लक आहेत कारण हे तकलादु धार्मिक ज्ञान व त्याचि ऊत्तरे समस्या सोडविण्यासाठि असमर्थ आहेत. धार्मिक ज्ञान पुर्णपणे नाकारल्या नंतर या ज्ञानाने निर्माण केलेला आशेचा ब्रम्हराक्षस कोसळुन पडेल व मनुष्य आपल्या नैसर्गिक अवस्थेमध्ये परत येईल त्याच्या सर्व समस्या आपोआप नाहिशा होतील.
सामान्य मनुष्याचे जिवन जगणे हे तसे अगदि सोपे असते, काहि विशेष करायचे नसते परंतु ते अतिशय अवघड झाले आहे. प्रत्येकास जो तो आहे त्या एैवजी काहितरी वेगळे बनायचे असते.यासाठि भरपुर खटाटोप करावा लागतो, आपल्या अस्वस्थ जिवनाचे हेच कारण आहे. काहितरी असामान्य, विशेष, अर्थपुर्ण कर्तुत्व करण्याच्या हव्यासापोटी आपण आपले स्वास्थ्य, मनः शांती हरवून बसतो. जेवढा जास्त वेळ आपण प्राप्तीच्या मागे लागु तेवढा जास्त वेळ आपणास सामान्य मनुष्य बनण्यास लागेल.
- U G Krishnamurti
