Thursday, June 28, 2018

अध्यात्मिक गुलामी


आपले सर्वांचे अध्यात्मिक ज्ञान हे अध्यात्मिक ग्रंथामधुन आलेले असते. या ज्ञानामध्ये आपले स्वतःचे असे काहिहि नसते. आपण ज्यांना गुरू समजत असतो त्यांनी सुध्दा गिता - ज्ञानेश्वरी तोंडपाठ केलेली असते. ज्ञानेश्वरी हि संस्कृत गितेचे प्राकृत रूपांतरण आहे. गिता हे ऊपनिषदांचे सार आहे. ऊपनिषदे हि प्राचिन ऋषि मुनींचे विचार आहेत. कोणताहि विचार मग तो अध्यात्मिक असो वा सांसारीक असो तो मनाचा आविष्कार असतो. मन व विचार हे अध्यात्मिक असु शकत नाहित. निर्गुण, निराकार, निर्विकार, निर्विचार अवस्थेमध्ये विचार व भावनांचा पुर्णपणे अभाव असतो. त्या अवस्थेचे आकलन होत नसते, त्या अवस्थेचे वर्णन करता येत नाहि व ति अवस्था नेमकि कशाने प्राप्त होते याचे नेमके ऊत्तर कोणाकडेहि नाहि. असे असताना अनेक संप्रदाय व अमेक गुरू परंपरा ऊभ्या राहिल्या आहेत. हे सर्वजण कोणत्या तरी महात्म्याचा वा ग्रंथांच्या आधारावर चाललेल्या असतात. ज्यांना अध्यात्माचे काहिच कळत नसते अशांना हे आपले शिष्य बनवतात. संप्रदायाचा जास्तीत जास्त प्रसार करणे हाच एकमेव सर्वांचा ऊद्देश असतो. अध्यात्मिक साधने एैवजी आश्रमाचा संसार सांभाळण्यासाठि शिष्यांना दिवस रात्र राबविले जाते.

आपण गुरू वा मंत्र अशा कोणावर तरी श्रध्दा ठेवलेली असते व त्या श्रध्देमधुन बाहेर पडण्यासाठि फार मोठ्या धैर्याचि आवश्यकता लागते. अध्यात्मामध्ये जोपर्यंत आपण कोणाचा तरी आधार घेत असतो तोपर्यंत आपण स्वतंत्र नसतो. जोपर्यंत आपण स्वतः स्वतंत्र नसतो व दुसऱ्यांच्या विचारांवर मनन, चिंतन व ध्यान करत असतो तोपर्यंत आपण त्या विचारांमध्ये अडकलेलो असतो. संप्रदायांचे गुलाम असो वा गुरूंचे गुलाम असो वा विचारांचे गुलाम असो, गुलामांना स्वातंत्र्याचि पहाट लाभत नाहि. सर्वप्रकारचि गुलामी झुगारून दिल्याशिवाय स्वातंत्र्याचा सुर्य ऊगवत नाहि.

जोपर्यंत आपणास धर्म, संप्रदाय, गुरू, ग्रंथ यांच्या मध्ये सत्याचा भास होत असतो तोपर्यंत आपण त्यांचे गुलाम बनुन रहात असतो. जर आपणास खरोखर सत्याचा ध्यास असेल तर आपणास या सर्व अधिकारी सत्ता स्थानांवरील ठेवलेला विश्वास व श्रध्दा काढावी लागेल. हे सर्व स्वतः चुकलेले आहेत व आपली दिशाभुल करत आहेत याबद्दल आपली खात्री व्हायला हवी. ज्यावेळी आपण या सर्वांच्या गुलामी मधुन मुक्त होऊ, स्वतंत्र होऊ त्यावेळी आपल्या सर्व चुकिच्या संकल्पना, चुकिचा शोध, चुकिचि ऊद्दिष्टे कोसळुन पडतील, आपले विचार व आपले मन आपले गुलाम होईल. असे जेव्हा होईल तेव्हा आपण त्या सत्याचे केवळ दार्शनिक नव्हे तर सत्यच होऊन राहु.  - यु जी कृष्णमुर्ती

Saturday, June 23, 2018

ब्रम्ह जिज्ञासेचे मृगजळ


निर्गुण, निराकार, अव्यक्त, कालातीत असे ज्या ईश्वरीय शक्तीचे वर्णन केले आहे त्यास अध्यात्मिक जगतामध्ये ब्रम्ह असे संबोधले जाते. आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ति सगुण, साकार, व्यक्त व समयबध्द अशी अवस्था आहे. समयबध्द अवस्थेमध्ये जगत असताना कालातीत अवस्था म्हणजे जिथे काळ नावाचि व्यवस्था नाहि अशा अवस्थे बद्दल आपण कसलीहि कल्पना करू शकत नाहि. कालातीत अवस्थेचा कसलाहि अनुभव करता येऊ शकत नाहि. त्या अवस्थेचे आकलन होणे शक्य नाहि. त्या अवस्थेस आपण पकडु शकत नाहि. मग त्या अवस्थेचे वर्णन करणे, तिच्याबद्दल लिहिणे वा तिच्याबद्दल बोलणे कोणासहि शक्य होत नाहि.

कालातीत अवस्थेचे ज्यांनी ब्रम्ह, परमात्मा, परमशांत, सच्चिदानंदमय असे वर्णन केले आहे तो एक फसवा मार्ग आहे. ज्यांनी त्या कालातीत अवस्थेचे वर्णन केले आहे ते स्वतः त्या फसव्या मार्गामध्ये स्वतः अगोदर फसलेले आहेत व त्यांचे अंधानुकरण करणारे परत परत फसत आहेत. या फसव्या भुलभुलैय्या मार्गामधुन बाहेर येण्याचि कोणतिहि पळवाट नसते. मृगजळाचा पाठलाग करणाऱ्यांचे क्षितीज कधि संपतच नसते. क्षितिजा पलीकडे जाण्याचा जेवढा प्रयत्न करू तेवढे ते विस्तारीत होत जाते. आपण सर्वजण या मृगजळाचे शिकार आहोत.

ब्रम्ह, साक्षात्कार वगैरे सर्व काहि केवळ मृगजळ आहे याचि खात्री होताच आपली धावपळ थांबते, शोध संपुष्टात येतो, महान ऊद्दिष्टे गळुन पडतात, असामान्य कल्पनांचे विश्व कोसळुन पडतात, जिवन अतिशय सामान्य व नैसर्गिक होऊ लागते. ज्या साक्षात्कारासाठि जंग जंग पछाडले होते त्याचा मागमुसहि रहात नाहि. - यु जी कृष्णमुर्ती

Tuesday, June 19, 2018

मुक्तावस्था



सर्व अध्यात्मिक गुरूंनी आपणास सांगीतले आहे कि परमेश्वर हा अव्यक्त, निर्गुण, निराकार असे ब्रम्ह आहे. ति एक अवस्था आहे व तिचा साकार विश्वाशी, साकार विश्वामधिल साकार जिवजंतु, प्राणि, वनस्पती यांच्याशी सुतराम संबंध नाहि. अव्यक्त, निर्गुण, निराकार ब्रम्हाचा कोणासहि, कोणत्याहि काळि कदापिहि अनुभव येऊ शकणार नाहि. म्हणजे ते आहे असेहि सांगता येऊ शकणार नाहि व ते नाहि असेहि सांगता येऊ शकणार नाहि. जर ते असेल असे मानले तरी ते साकार मुर्तीमध्ये तर नक्किच असु शकणार नाहि. व ते जर निर्गुण निराकार व अव्यक्त स्वरूपामध्ये राहु ईच्छित असेल तर ते आपल्या दैनंदिन जिवनामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या काहि प्रभाव पाडणार नाहि कारण जे निराकार आहे त्याच्या ध्यानीमनीहि (त्याला मन नसणार) साकार विश्व व त्यामधिल साकार सजीव व निर्जिव नसणार. त्यामुळे त्याचि भिती बाळगण्याचि आवश्यकता नाहि व त्याचि आराधना करण्याचिहि आवश्यकता नाहि.

निर्गुण निराकार अव्यक्त ब्रम्हाविषयी कसलीहि माहिती ऊपलब्ध होऊ शकत नाहि. ज्याचि आपणास कसलीहि माहिती नसते त्याचे ज्ञान होऊ शकत नाहि, त्याचे आपण वर्णन करू शकत नाहि. असे असताना ब्रम्ह हे सच्चिदानंदमय आहे, ते परमशांत, परमानंदमय, परमप्रेममय, परम चैतन्यमय आहे असे त्याचे वर्णन करणे रास्त नव्हे, चुकिचे आहे. हा केवळ बुध्दिमानांनी आपल्या बुध्दिचे वैभन दाखविण्यासाठि केलेला कल्पनाविष्कार आहे.

निर्गुण, निराकार ब्रम्हाचा कोणताहि अनुभव येऊ शकणार नाहि त्यामुळे त्याचि धारणा होऊ शकणार नाहि, त्याचे ध्यान करता येणार नाहि. ईतर सर्व साधना या सगुण, साकार विश्वामधिल लबाड मनुष्यांनी ऊदरभरणार्थ सुरू केल्या आहेत. निर्गुण निराकारास प्राप्त करण्याच्या कोणत्याहि साधना नाहित. आपण जे काहि करू ते सर्व भौतिक शरीर व मनाच्या माध्यमातुन करणार. शरीर व मन हे आपणास निराकाराच्या विश्वामध्ये घेऊन जाऊ शकत नाहित. जर साध्य निराकार असेल तर साकार साधना ऊपयोगाच्या नाहित.

मुळात निर्गुण निराकार अव्यक्त ब्रम्ह वगैरे काहिहि नाहिये. साध्यच नाहिसे झाले कि साधना आपोआप नाहिशा होतात. जोपर्यंत आपण काहितरी आहे असे गृहित धरतो तोपर्यंत आपण त्यासाठि काहिंना काहि करत रहातो. प्राप्त करण्यासारखे ब्रम्ह, ईश्वर, परमात्मा, आत्मा, आत्मसाक्षात्कार वगैरे काहिहि नाहिये हे लक्षात येताच आपली फार मोठ्या शोधापासुन मुक्तता होते, आपण शांत होतो, आपली भिती नाहिशी होते. आपण आपल्या नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. हव्यास, अपेक्षा, सततचा शोध यांच्या दुष्टचक्रामधुन आपली जेव्हा सुटका होते तोच मुक्तीचा क्षण असतो व त्यानंतरचि अवस्था हिच मुक्तावस्था असते.

यु जी कृष्णमुर्ती

Sunday, June 17, 2018

Ultimate Reality

We all are interested in experiencing unknown, ultimate reality. How can unknown ever become known? Not a chance. We can not experience unknown. Ultimate reality is not negation like 'Neti Neti’, negative approach of Vedas. When they failed in positive approach then they invented 'Neti Neti’ the negative approach. But 'Neti Neti’ is still a positive approach because they are interested in reaching their goal and all goals are positive goals.

There is no such thing as Beyond or Unknown or Ultimate reality. Unless we understand this, we will keep doing something to experience unknown. The search will not end as long as goal is there. There is no way to know unknown by anyone and no one can express it. When this dawns on us then all goals, all hopes goes off. There is nothing to search, nothing to understand. When this search is not there or any movement to know unknown is not there then what will happen no one can imagine. Bliss, Love are all poetic concepts only. 

Meditation will not help us to realise unknown. Meditation is like drugs which can damage our sensory system. Teachers ask us to control our thoughts and be aware of thoughts, but it's just not possible to be aware of thoughts and we can't control thoughts. We can't separate ourselves from thoughts and say these are my thoughts because we are actually thoughts. If thoughts are not there, we won't be there, no one will be there to observe the thoughts. Everything around us is created by thoughts including illusion of our own existence. If thoughts are not used just for their original basic purposes then it becomes our enemy, it creates illusions after illusion and we lost ourselves in those illusions.

If someone experiences space between two thoughts as thoughtless state, he feels extraordinary about it but its again thought induced space between two thoughts. Thoughts are very much there, space is just pause between two thoughts. To control thoughts we are asked to control breathing, this may choke and damage our body. We can't achieve that state by any efforts, all our actions should fall to their natural state.

- U G Krishnamurti

चिरंतन सुखाचे रहस्य


सजीवांना स्वतःचे संरक्षण, संगोपन व प्रजोत्पादन करण्यासाठी विचारांचि गरज असते. मनुष्य सोडुन ईतर सर्व सजीव केवळ त्याच कामासाठि विचारांचि मदत घेतात व स्वतःस अधिक विचारां पासुन अलीप्त ठेवतात. मनुष्य प्राण्याला अधिकाधिक व चिरंतन सुख हवे असते, दुःख कदापिहि नको असते यासाठी तो अधिकाधिक विचार करत बसतो. विचारांनाहि स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असते त्यासाठि विचारांनाहि सातत्य हवे असते. अधिकाधिक सुखांच्या लालसेने मनुष्याने प्रथम देवाचि निर्मिती केली नंतर धर्मांचि निर्मिती केली व त्यानंतर विज्ञानाचि निर्मिती केली. धर्म मार्तंडांनी, अध्यात्मिक गुरूंनी व वैज्ञानीकांनी चिरंतन सुख शक्य आहे असे सांगितले व सर्वजण त्याच्या शोधासाठि अहोरात्र झटत आहेत. मनुष्याला धार्मिक कर्मकांडामध्ये सुख सापडले नाहि म्हणुन काहिंनी अध्यात्माचा मार्ग पकडला तर काहिंनी विज्ञानाचा मार्ग पकडला. दोघांचाहि सतत शोध चालु आहे. अध्यात्मिक गुरूंनी ध्यानसाधना करून काल्पनीक आत्मा व काल्पनीक परमात्म्याचा शोध लावुन स्वत:चि व आपल्या भक्तांचि घोर फसवणुक केली आहे व भविष्यामध्ये हि ते चालुच राहणार आहे. वैज्ञानीकांनी भितीवर मात करण्यासाठी भयंकर अस्त्रे, शस्त्रे व रोबोट बनवुन मानवाच्या विनाशाचि पायाभरणि केली आहे. या दोघांनिहि मनुष्याला कष्ट, मेहनत न करता व नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करत एैषोआरामामध्ये कसे जगायचे यावर आपल्या मोठमोठ्या संस्था ऊभारल्या आहेत. एैषोआरामामध्ये राहणे म्हणजेच सुख अशी त्यांचि जाहिरात करणारे पटवुन देण्यात यशस्वी झालेले आहेत.

मनुष्याला देव, धर्म, धर्म मार्तंड, गुरू व विज्ञान चिरंतन सुख कदापिहि देऊ शकणार नाहित कारण या सर्वांचा पाया स्वार्थी विचार हे आहेत. विचार हे स्वार्थासाठीच निर्माण होतात त्यामुळे त्यामधुन निष्काम कर्म योग साधणे अशक्य आहे. भौतीक सुखाचि अपेक्षा असो वा अध्यात्मिक मुक्तिचि अपेक्षा असो दोन्हि सारखेच आहेत कारण दोन्हिमध्ये अपेक्षा आहेत व अपेक्षा हि स्वार्थीच असते.

निसर्ग हा सतत बदलत असतो, त्याला नित्य नुतन वैविध्य हवे असते. निसर्गामध्ये चिरंतन काहिहि नसतेे. आपल्या सभोवतालचे विश्व आहे तसे म्हणजे त्यामधिल सुखदुःखांसहित स्विकार करायला शिकलो कि स्वार्थी विचार आपणास मुर्ख बनवित नाहित. अधिकाधिक व चिरंतन सुखांचि लालसा दाखविणारे सर्व विचार हे मनुष्य जातीचे शत्रु आहेत याचि खात्री आल्यानंतर चिरंतन सुखांचि आवश्यकता संपुन जाते. सुखांचि अपेक्षा संपल्यानंतर दुःख वाट्यास येत नाहि.

ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ति असो द्यावे समाधान ।।

Sunday, June 10, 2018

अंतीम सत्याचा सावळा गोंधळ

स्वर्ग, ईश्वर, आत्मा आदि संकल्पनांमुळे अंतीम सत्याचा फार मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ते अंतीम सत्य काय आहे हे कोणिहि अनुभवु शकत नाहि यामुळे ते आहे अथवा नाहि याचा कोणि पडताळा घेऊ शकत नाहि. तरीहि ब्रम्ह सत्य आहे असे समजायचे व नित्य अनुभवास येणारे जगत मात्र मिथ्या समजायचे. हे शब्दांचे खेळ बुध्दिमंत विचारवंतांनी अनेक शतके चालविलेले आहेत. खरेतर आपल्याभोवती असलेले जग हेच सत्य आहे. बुद्धिमान विचारवंतांनी बनविलेल्या काल्पनीक अंतिम सत्याचा व या वास्तविक सत्याचा परस्पर संबंध नाही. जोपर्यंत आपण अंतीम सत्यास आपल्या कल्पनाविश्वामध्ये शोधत राहु तोपर्यंत वास्तवामध्ये असलेले सत्य आपणास दिसणार नाहि.

काल्पनीक परमशांती प्राप्त करण्यासाठी आपण वास्तविक सत्यापासुन पळ काढत असतो व त्यासाठि जे काहि करतो त्यामुळे या जिवामध्ये विद्यमान असणारी सहज शांतअवस्था लक्षात येण्यास अडथळे निर्माण होतात. भोवतालच्या जगताशी आपला सुसंवाद साधणे हि खरी शांती होय. आपणास या जगामध्ये सुखा समाधानाने जगायचे असेल तर या जगाच्या म्हणजे समाजाच्या नितीनियमां प्रमाणे वागणे फार महत्वाचे असते. संस्कृतीने व समाजाने लादलेल्या वास्तवतेचा स्विकार करत असताना हे सुध्दा ध्यानात घ्यायला हवे कि काल्पनीक स्वर्ग वा मुक्तावस्था प्राप्त करण्यासाठी आपण काहीहि करू शकत नाही.

जेव्हा स्वतःस फार मोठा पुण्यात्मा बनविण्याचि ईच्छा संपुष्टात येते आणि आत्मसाक्षात्कारा सारखी आदर्श ऊद्दिष्टे पुर्ण करण्याचि मागणि नसते तेव्हा आपण आपल्या वास्तविक नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. या अवस्थेमध्ये आपला आपणाशी संघर्ष नसतो, आपला समाजाशी संघर्ष नसतो. जेव्हा आपण आपल्या स्वतःशी शांततापूर्ण असतो तेव्हाच आपण समाजातील इतरांशी शांततापुर्ण सौहार्दाने नांदु शकतो.

जेव्हा आपणास जगापासुन काहीही नको असते,  जेव्हा आपण कशाचाही शोध घेत नसतो, जेव्हा देव, गुरु, ग्रंथ, त्यांची शिकवण आणि त्यांचि साधना यांसारख्या बाहेरील हालचाली जेव्हा नसतात, तेव्हा आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या जीवनऊर्जा प्रवाहास ऊर्ध्वगती प्राप्त होते, या ऊर्ध्वगतीचा अनुभव करता येत नाहि. प्राणशक्तीच्या ऊर्घ्वगतीस बाह्यशक्तिंचि आवश्यकता नसते, तिला पुर्णपणे स्वातंत्र्य हवे असते, स्वतःचा वेगळा प्रवाह हवा असतो व सर्वार्थाने एकांताचि शुन्यावस्था हवी असते.

मी ध्यानसाधने विरूद्ध नाही. परंतु, आपण आपल्यासमोर ठेवलेले तथाकथीत निस्वार्थी बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे ते साधन नाही. आत्मसाक्षात्काराचे लक्ष्य आणि ते प्राप्त करण्यासाठी लागणारे ध्यानाचे तंत्र हे दोन्हि आत्मकेंद्रित आहेत. आणि आपण यादोघांद्वारे जे काही मिळवू इच्छितो तोही स्वार्थी क्रियाकलाप आहे. काहितरी केल्याने सहज अवस्था प्राप्त होत नाहि व काहि न केल्याने सुध्दा सहज अवस्था प्राप्त होत नाहि. 

- यु जी कृष्णमुर्ती