Sunday, March 07, 2021

श्रद्धा आणि सत्य

 प्रश्न: आपणाकडे हजारो वर्षांची परंपरा आहे जी आपणास ईश्वर, परब्रम्ह, ब्रम्ह, आत्मा, परमात्मा या गोष्टींचे प्रतिपादन करत असतात. या गोष्टी आपल्या श्रद्धा बनलेल्या आहेत. आपली मने त्यांच्या श्रद्धा मधून बाहेर येत नाहीत. तेच सत्य आहे की सत्य त्यापेक्षा काही वेगळे आहे?

कृष्णमूर्ती : Word is not the thing, description is not the described. शब्दांनी सत्याचे वर्णन करता येत नाही. ज्याचे वर्णन करता येतात, ती वर्णने म्हणजे सुद्धा सत्य नव्हे, हे प्रथम आपल्या मनात खोलवर रुजले पाहिजे. 

आपले वेद, उपनिषदे, गीता, इतर ग्रंथ, ग्रंथकर्ते, शंकराचार्य सारखे विद्वान हि सर्व मंडळी आपले मन संमोहित करत राहतात हे सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे आहे. 

सत्य म्हणजे काय असावे यासाठी वरील सर्व शास्त्रे, ग्रंथ यांचा अभ्यास करायला हरकत नाही. परंतु त्यातील मतितार्थ लक्षात आला की त्यांना लगेच संपूर्ण बाजूस करायला हवे, ते आपला आधार बनता कामा नये. ज्याला कशाचा तरी आधार लागतो ते सत्य नसते याची मनात खूणगाठ बांधलेली असावी.

सत्य हे सर्व धार्मिक आणि अध्यात्मिक संकल्पनांच्या बाहेर असणार हे त्यामुळे आपणास समजू शकते. 

जिथे मन जावू शकत नाही, ज्याचा विचार करता येत नाही असे 'जे काही असेल ते तसे'  सत्य असू शकते.

https://youtu.be/qxlhTgCeA4w

No comments:

Post a Comment