Wednesday, March 03, 2021

मन आणि सत्य यांचा संबंध

 


कृष्णमूर्ति: जेव्हा एखादी व्यक्ती ही विवेकी विचार करू लागते त्यावेळी त्याच्या मनातील शांत अवस्थेचे काय होत असावे? 


DAVID BOHM: जेव्हा मन शांत झालेले असते आणि त्या शांतीने संकल्प विकल्पांचे विचार नाहीसे झालेले असतात त्यानंतर विवेकी विचार हे सत्य अवस्थेशी समांतर चालत असणार.


कृष्णमूर्ती: ते समांतर असतील की दोघांमध्ये एकसुत्रीपणा असेल?


DAVID BOHM: एका अर्थाने ते एकच असू शकतील कारण विवेकी विचार हे सत्य विषद करत असतात. 


कृष्णमूर्ती: आपण पूर्वी सांगितले होते की विचार हे सत्य नसतात. विचार हे कालबद्ध असतात तर सत्य हे कालमुक्त असते.


DAVID BOHM: सत्य अवस्था विचारांवर अवलंबून नसते हे बरोबर आहे परंतु विचार हे सत्य अवस्थेवर अवलंबून आसु शकतात. सत्य अवस्थेमुळे विचारांना योग्य गती मिळणे शक्य आहे.


कृष्णमूर्ती: सत्य हे विचारांवर कृती करू शकत असेल तर ते सर्व एकाच मनाच्या ठिकाणी आहेत असे होते. म्हणजे तिथे सत्य आणि विचार अशी द्वैत अवस्था नाही. सत्य अवस्था हि विचारांची मदत घेवू शकते, विचारांच्या माध्यमातून ती वास्तविक जगात कार्य करू शकते, त्यावेळी तिच्या विवेक बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो. या उलट, जेव्हा विचार सत्यावर प्रतिक्रिया करतात तेव्हा तिथे विभाजन दिसते, अद्वैत दिसते.


डेव्हिड बोम: होय. सत्याचे कार्य करण्यासाठी वास्तविकता हे एक आवश्यक क्षेत्र आहे. पण जेव्हा संमोहित विचार सत्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते सत्यापासून विभक्त असतात, तेव्हा खरी अडचण येते. (तथाकथित प्रचारक जेव्हा स्वरूप साक्षात्कार नसताना ग्रंथ लिहीत असतात) तेव्हा ते सत्य अवस्थेचा केवळ कल्पना विलास असतो.


कृष्णमूर्ति: आणि म्हणून ते विभागलेले आणि खंडित असतात, द्वैतबुद्धित असतात, होय.


डेव्हिड बोहम: आणि असा कल्पनाविलास  वास्तविकतेस सत्याचा दर्जा देतात, त्यास अधिक विकृत करतात. जेव्हा वास्तविकता ही सत्य अवस्थेची एक क्रिया, कार्य असेल तर ती त्याचा एक भाग असते, तेव्हा ते दोन्ही एक असतात.


कृष्णमूर्ती: होय. जेव्हा विवेकी बुद्धिमत्ता वास्तविकतेच्या क्षेत्रात कार्य करते, तेव्हा दोन्ही एक असते, ते विभाजन करत नाही.


कृष्णमूर्ती: सर, आपणास असे म्हणायचे आहे काय की, जेव्हा सत्य अवस्था ही वास्तविक अवस्थेच्या संपर्कात येते, क्रिया करते तेव्हा ते दोन्ही एक असतात, तेव्हा द्वैत नसते. म्हणजे सत्याला वास्तवतेची कार्य करण्यासाठी आवश्यकता भासते? 


आपण सत्याविषयी काही बोलू शकत नाही. सत्य म्हणजे काय हे त्याचा अनुभव येत नाही, ते अज्ञात आहे आणि अज्ञातच राहणार आहे. आपण फक्त वास्तविकता आणि वास्तविकतेचे अज्ञान याबद्दलच चिंतन करू शकतो. वास्तविकता म्हणजे आपले विचार, भूतकाळ, माहिती संग्रह, श्रद्धा म्हणजे सर्व मानसिक कल्पना आणि त्यावर आधारित जीवन होय. आपल्या मानसिक - वास्तविक अवस्थेतील अज्ञाना विषयी, विकृती विषयी, संमोहन विषयी आपण सजग होणे, त्यांना सतत निरपेक्ष वृत्तीने न्याहाळणे एवढेच करू शकतो, त्यांचा प्रतिरोध सुद्धा करू शकत नाही. हे जे निरपेक्ष न्याहाळणे असते त्याला स्वातंत्र्य हवे असते, संकल्प विकल्प विरहित विचारांचे स्वातंत्र्य हवे असते. असे स्वातंत्र्य आपणास ती ऊर्जा देते ज्यामुळे आपली विकृती नाहीशी होते. ते आकलन, विकृतींना पाहणे हेच सत्य होय. म्हणजेच सत्य हे आपल्या विकृती पाहणे आणि त्या नुसार क्रिया करणे याच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. यालाच आपण सत्सदविवेक म्हणू शकतो, जो वास्तविक जीवनात विकृती विना कार्यरत होऊ शकतो. 


जेव्हा आपण स्वतःला विकृती पासून मुक्त करतो तेव्हा सत्य म्हणजे ती विकृती पाहणे, म्हणजेच विवेकी क्रिया करणे होय आणि त्यानुसार विवेकाचे वास्तविक जीवना मध्ये आचरण करणे होय. आपल्या जाणीव मध्ये, आपल्या जीवनामध्ये असंख्य संमोहन असतील, प्रचंड अज्ञान असेल, अनेक विकृती असतील ते सर्व या निरपेक्ष न्याहाळण्यात एकत्रित निघून जातील. हे सर्व होण्यासाठी मन शून्य अवस्थेत हवे.


DAVID BOHM: शून्य अवस्था म्हणजे रिकामे मन


कृष्णमूर्ती: मनाला रिकामे करणे म्हणजे खरी साधना होय, खरे ध्यान होय.



No comments:

Post a Comment