Tuesday, April 17, 2018

सातत्याचा भ्रम

आपणास निरंतर सुख हवे असते परंतु हे शक्य आहे काय? त्यासाठि निरंतरता म्हणजे नेमके काय आहे हे प्रथम समजायला हवे.

आपल्यामध्ये 'मी' किंवा 'मन' किंवा 'आत्मा' असे काहि अस्तित्वात आहे काय? आपण जे पहात आहोत, जे एैकत आहोत, जो सुगंध घेत आहोत, ज्याचि चव घेत आहोत ईत्यादिंचा समन्वय साधणारा एखादा समन्वयक, साक्षी आतमध्ये आहे काय?

वास्तविक, कोणत्याही दोन संवेदनां दरम्यान नेहमीच अंतर असते. विचार हा समन्वयक बनुन हे अंतर स्वतः जोडतो. दोन संवेदनांमधिल पोकळी भरून काढुन समन्वयक निरंतरपणाचा एक भ्रम बनुन स्वतःला प्रस्थापित करतो.

नैसर्गिक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या संवेदनांकडून येणारे संदेश समन्वयित करणारा समन्वयक, साक्षी, आत्मा, मन वगैरे असे अस्तित्वात नसते. प्रत्येक संवेदना या स्वतंत्रपणे स्वतःच्या कमालीच्या कौशल्याने कार्य करत असतात. बघणे, एैकणे, स्वाद चाखणे, वास घेणे आदि सर्व संवेदना नैसर्गीकपणे, स्वतंत्ररित्या चालु असतात. परंतु जिवास जेव्हा एक किंवा दोन किंवा सर्व संवेदनांचा समन्वय साधणे आवश्यक असते, तशी बाहेरून मागणी येते तरीही तेथे समन्वयक नसतो, परंतु समन्वयाचि एक तात्पुरती स्थिती निर्माण होते. नैसर्गिक अवस्थेमध्ये सातत्य नसते. जेव्हा मागणी पूर्ण केली गेली जाते, तेव्हा पुन्हा एकदा विसंगत, विजोड, वेगळ्या संवेदनांचे कार्य स्वतंत्ररित्या सुरू राहते. नैसर्गिक अवस्थेमध्ये हे नेहमी असेच असते. एकदा समन्वयक व त्याचि निरंतरता संपली की - अर्थात ती कधीही अस्तित्वात नव्हती; फक्त निरंतरतेचा तो एक भ्रम होता. ति निरंतरता एकदा संपली कि पुर्णपणे संपुष्टात येते, ती परत कधि येत नाहि. जेव्हा समन्वयकच नसतो, तेव्हा संवेदनांचि जुळविणे नसते, संवेदनांचे भाषांतर नसते, त्यांना समजुन घेणे नसते त्यामुळे त्या संवेदना सहज, साध्या व शुद्ध नैसर्गिक स्वरूपामध्ये राहतात.

निरंतरता हाच भ्रम असल्यामुळे निरंतर सुख हि एक कल्पनाच आहे. शरीरास आपल्या संवेदनांचे जतन व संरक्षण करावयाचे असते त्यामुळे कोणत्याहि संवेदना अती झाल्या कि तो त्या संवेदनाना कंटाळवाण्या करून संवेदनांचे संरक्षण करतो. निरंतर सुख हि शरिराचि वा संवेदनांचि गरज नसते तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये आलेल्या समन्वयकाचि म्हणजे विचारांचि गरज असते ती स्वतःस निरंतर बनविण्यासाठि. त्यामुळे भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी, असे झाले आहे.

 - यु जी कृष्णमुर्ती

No comments:

Post a Comment