Sunday, January 28, 2018

अव्यभिचारी भक्ति


मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते || #गिता_१४:२६ ||


आणि जो माझी अव्यभिचारी भक्तियोगाने सेवा करतो तो त्रिगुणांचे ऊल्लंघन करून ब्रम्हभावास समर्थ होतो. #ज्ञानेश्वरी_१४:२६ 

ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्वारंभपरित्यागी होणे आवश्यक आहे असे सांगितल्या नंतर भगवान श्रीकृष्ण अजुन एका गोष्टिचे प्रतिपादन करतात ते म्हणजे 'अव्यभिचारी भक्ती'. अव्यभिचारी भक्ति म्हणजे नेमके काय हे समजणे अतिशय महत्वाचे व अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे साखर व तिचा गोडपणा हे एकच आहे त्याप्रमाणे ईश्वर व त्याचे विश्व हे एकच आहेत. विश्व बाजुला सारून ईश्वर निराळा आहे असा प्रकार नसुन केवळ सर्व काहि विश्वच होय.

तैसे विश्व येणे नावे । हे मिचि पै आघवे । म्हणौनि विश्वपण जावे । मग तैं माते घेयावे । तैसा नव्हे आघवे । सकटचि मी । एेसेनी माते जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेद काहि देखिजे । तरी व्यभिचारू तो । ज्ञा. १४:२६:८१

ईश्वर विश्वाहुन वेगळा, विश्वाबाहेर स्वर्गामध्ये आहे असे समजणे हा व्यभिचार आहे. हि विभक्तिचि भावना नसणे म्हणजे अव्यभिचारी भक्ति होय. मुळात ईश्वरास व स्वर्गास कोणिहि पाहिलेले नाहि कारण तो या विश्वाहुन वेगळा नाहि. जे विश्व आहे त्याचे त्याच स्वरूपामध्ये स्वीकार न करता जो नाहि त्याचे अवडंबर माजवुन आपणच आपल्या या अज्ञानातुन मोक्षासाठि अखंडपणे साधना करत असतो हा व्यभिचार आहे.

ईश्वर कोणितरी आहे व त्याचि साधना केल्याशिवाय अखंड सुख प्राप्त होणार नाहि या अविचाराने व भितीपोटि मनुष्याने ईश्वराचि या विश्वाहुन वेगळि अशी संकल्पना मांडली व सर्व संस्कार, धर्म, जाती, रितीरिवाज, प्रार्थना, साधना यांच्या मालीका त्याच्याभोवती तयार केल्या व त्यामध्ये तो स्वतःच पुरता अडकुन पडला आहे.

ज्याप्रमाणे रूग्णाला ईंजेक्शन टोचले वा त्याचे ऑपरेशन केले तर त्यास त्रास झाला तरी तो ते सहन करतो कारण ऊपचारांना पर्याय नाहि हे त्याला माहिती असते त्याप्रमाणे मनुष्य जन्मामध्ये सुख दुःख हे येतच रहाणार हे एकदा कबुल केले कि त्याचा त्रास होत नाहि. कोणत्याहि गोष्टिचा त्रासच होऊ दिला नाहि तर दुःखहि होणार नाहि. दुःखच नाहिसे झाले कि सुखी जिवनाचि अपेक्षा, स्वर्ग प्राप्तीचि अपेक्षा, मोक्षाचि अपेक्षा यांना काहि अर्थच रहात नाहि. या गोष्टिंचा व्यवसाय करणाऱ्यांचि दुकाने आपोआप बंद होतील, त्यांनी निर्माण केलेली माणसा माणसामधिल द्वेषभावना नाहिशी होऊन श्रध्देखातर होणाऱ्या हिंसाचाराचे समुळ ऊच्चाटन होऊ शकते.

एेसेनी बा समरसे । दृष्टि जे ऊल्हासे । ते भक्ति पैं एेसे । आम्हि म्हणो । ज्ञा. १४:२६:८७

विश्वापलीकडे ईश्वर नावाचि कोणितरी महान शक्ति आहे व अलीकडे मी दीन दुबळा मनुष्य प्राणि आहे हे अज्ञान नष्ट होऊन जे अनादि, स्वाभाविक, नैसर्गीक एैक्य ऊरते तिच नैसर्गीक अवस्था होय तिलाच तत्वदर्षींनी परम ज्ञान व परम त्रिगुणातीत ब्रम्हावस्था, मोक्षावस्था असे म्हटलेे आहे.

मनुष्य इन तीनों गुणोंसे किस प्रकार अतीत होता है इस प्रश्नका उत्तर श्रीकृष्ण अब देते हैं। जो संन्यासी या कर्मयोगी सब भूतोंके हृदयमें स्थित मुझ परमेश्वर नारायणको कभी व्यभिचरित ( विचलित ) न होनेवाले अव्यभिचारी भक्तियोगद्वारा सेवन करता है -- उस भक्तियोगके द्वारा जो मेरी सेवा करता है -- वह इन ऊपर कहे हुए गुणोंको अतिक्रमण करके ब्रह्मलोकको पानेके लिये, अर्थात् मोक्ष प्राप्त करनेके लिये योग्य समझा जाता है। अर्थात् ( मोक्ष प्राप्त करनेमें ) समर्थ होता है। #आदि_शंकराचार्य

And he who serves Me with unswerving devotion, he, crossing beyond the qualities, is fit for becoming Brahman.
#Swami_Sivananda

No comments:

Post a Comment