Thursday, July 23, 2020

Observer is observed


Observer is observed हे कृष्णमूर्ती यांचे क्रांतिकारक उद्गार आहेत. त्यांच्या या उद्गाराचा खरोखर अर्थ समजला तर अध्यात्म समजणे खूप सहज होऊन जाते. याचा प्राथमिक अर्थ द्रष्टा हाच दृश्य आहे असा होतो. परंतु नेमका दृष्टा-दृष्य हे समजत नाही. आणि इथेच बहुतेकांचा गोंधळ उडत असतो. 

दृष्टा म्हणजे अनुभव करणारा कर्ता होय आणि दृश्य म्हणजे आपण जे अनुभव करतो ते कर्म होय. अनुभव करणारा मी व अनुभवात येणारे कर्म, कार्य वगैरे. अनुभवा मध्ये अनुभव व अनुभव करणारा असे द्वैताचा भास होत असतो. 

अनुभव हा शारीरिक नसून तो मानसिक विचार प्रक्रियेचा भाग आहे. मानसिक स्वभावाच्या अनुभवा मध्ये आपले विचार हे दुभागले जातात. विचारच मानसिक कर्ता व विचारच मानसिक कर्म या पद्धतीने वेगवेगळे भासविले जातात. यातील कर्ता हा मी म्हणजे आपण आहे असा भास निर्माण होतो आणि कर्म म्हणजे अनुभव हे दृश्य आहे असा भास निर्माण होत असतो. कर्ता मी हा विचार, विचारच असलेल्या कर्मापासून स्वतःस वेगळा समजू लागतो आणि द्वैत निर्माण होते. 

शरीरास भूक लागणे हे नैसर्गिक व एक शारीरिक गरज आहे.  परंतु मला चांगले व पोटभर खायला हवे ही आपली मानसिक ईच्छा असते. 
या उदाहरणात शरीर हे दृष्टा नसून भुकेचा विचार करणारे मन हे दृष्टा आहे. मिळेल ते अन्न शरीर खाते हे नैसर्गिक आहे. 
मला जेवण भेटले, ते चांगले होते किंवा वाईट होते, कमी होते किंवा अधिक होते, माझी भूक भागली अथवा मी अजूनही उपाशी आहे हे सर्व विचार म्हणजे अनुभव होत आणि त्यालाच दृश्य असे समजण्यात येते.
भूक लागणे, अन्न मिळवणे, अन्न खाणे, अन्न पचविणे या सर्व नैसर्गिक शारीरिक क्रिया आहेत, त्यांचा द्रष्टा किंवा दृश्य या विधानाशी संबंध नाही.

प्रथम आपल्या दिवसभरातील नैसर्गिक, शारीरिक क्रिया कोणत्या आहेत व मानसिक क्रिया कोणत्या आहेत याचे पृथक्करण करता यायला हवे त्यालाच कृष्णमूर्ती Choiceless awareness ध्यान असे म्हणतात. असे ध्यान ही ठराविक वेळेची साधना न होता आपला नित्य दिनक्रम बनला जातो. नैसर्गिक व मानसिक क्रियांच्या पृथक्करण करण्याच्या समजेतून सत्य काय आहे व असत्य काय आहे याची स्वतःस उकल होवू शकते. स्वतःच्या अनुभवातून ही उकल शक्य असते तिथे बाह्य मार्गदर्शन, मदत उपयोगी पडू शकत नाही. सत्य इतके साधे, विना सायास आणि सोपे आहे परंतु अती काल्पनिक भोंदूगिरी मुळे आपला विश्वास बसू शकत नाही. 

दृष्टा व दृश्य एकच आहेत हे लक्षात आल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात सहजता येते. मला एखादी गोष्ट अयोग्य आहे हे पटल्या नंतर मी ती कदापिही करणार नाही. कदाचित आपणास दृष्टा व दृश्य एकच आहेत हे तत्त्वज्ञान माहीत नसेल, आपणास ती अध्यात्मिक संकल्पना माहिती नसेल परंतु आपले आचरण तसे असेल तरीही तो जीव मुक्त आहे. एखाद्याला अभ्यासाने सत्य काय आहे हे समजले असेल किंवा एखाद्याचा अभ्यास नसेल परंतु त्याचे आचरण सत्यवादी चे असेल तरी दोघेही सत्यवादी आहेत. अभ्यासाने ज्याला समजले व इतरांना जो समजावून देवू शकत असेल त्याला आपण ज्ञानी म्हणू शकतो आणि ज्यांना समजले नाही परंतु आचरणात आले आहे त्यांना आपण सात्विक भक्त म्हणत असतो.

Wednesday, July 22, 2020

गुरूंचे सहाय्य कितपत असते?


Truth is pathless land असे JK म्हणतात याचा सरळ सरळ अर्थ असा वाटतो की सत्य प्राप्तीचा कोणताही मार्ग नाही. 

परंतु त्याचा इतर अर्थ असा असू शकतो की पूर्वी कोणीही न चोखाळलेला रस्ता, आपला स्वतःचा मार्ग असाही अर्थ असू शकतो. यासाठी total independence आवश्यक असावे. 

एखादे ज्ञानी आपले मित्र आहेत, त्यांच्या बरोबर राहिलो, त्यांच्या पुस्तकांची पारायणे करीत राहिलो की काम संपले असे वाटण्याची शक्यता असते. यामध्ये आपण आपले स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो. स्वतः काही वेगळा प्रयत्न न करता त्यांच्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याच्या खाजगी मालकीच्या मार्गाने आपण जावू शकतो परंतु आपण त्याचे मालक नाही बनू शकत, असे कदाचित intelligence चे नियम असू शकतात. 

एखाद्या realised master च्या सानिध्यात राहण्याचे भाग्य लाभू शकते, त्याचे संस्कार मिळू शकतील, ते मार्ग सुद्धा दाखवतील  परंतु तरीही सत्य समजणार नाही कदाचित तो मार्ग उघडण्या आधी आपणास काही वेगळ्या अनुभवा मधून जावयाचे बाकी असेल, काही अग्नी परीक्षा द्यायच्या बाकी असतील आणि आपली ती तयारी नसेल. May be, just speculations.

Monday, July 20, 2020

अज्ञान म्हणजे काय?


आपले विचार व आपली माहिती हि अज्ञानी व असत्य का आहे? 

आपल्या अज्ञानामुळे आपणास ज्ञान प्राप्त होत नाही. अज्ञान म्हणजे आपल्या मेंदूच्या स्मृतिमध्ये साठवली गेलेली अज्ञानमुलक माहिती होय. सूर्य नित्य, सदोदित आहे परंतु त्याचे कधी कधी दर्शन होत नाही याचा दोष सूर्याचा नाही तर त्याच्या व आपल्या मध्ये येणाऱ्या रात्र, ढग आदि अडथळ्यांचा आहे. आपल्या कडील माहितीचा संग्रह हेच ज्ञान प्राप्तीस अडथळा करत असते. आपल्या माहिती मध्ये आपली वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहिती बरोबर इतर ग्रंथ, संप्रदाय, संत, तत्वज्ञानी, राजकारण, समाजकारण या सर्वांचे विचार असतात. हे सर्व विचार म्हणजे ज्ञान नसून ते अज्ञान आहे आणि या अज्ञानी विचारांमुळे आपणास ज्ञान प्राप्त होत नाही. हे केवळ ऐकून समजणे वेगळे आणि तेच सत्य आहे याची खात्री पटणे वेगळे आहे. 

विचार व माहिती हे दोन्हीही भूतकाळातील आहेत, भविष्य काळामध्ये त्यावर आधारित कृती अपेक्षित असते म्हणून ते अर्धवट आहेत. या अर्धवट माहिती व विचारांमुळे आपल्या स्वतःमध्ये व समाजामध्ये सर्वत्र दुही, वितुष्ट, दुफळी, युद्धे होत असतात. आपली मने कलुशीत होण्यास ही अर्धवट माहिती कारणीभूत आहे. मनामधील कलुशित माहितीमुळे मेंदू सुद्धा दूषित होतो. दूषित मेंदूमधील प्रदूषित विचारांचे पूर्वग्रह दूषित अज्ञानाचे नमुने (pattern) तयार होवू लागले की संपूर्ण मानवी समाज सतत एकमेकांशी विरोध करीत राहतो. 

मानवी स्वभावातील या विरोधिभासाचे कारणे बाहेर शोधली जातात. अनेक विद्वान त्यावर विद्वत्तापूर्ण लिखाण करतात, भाषणे देतात, पक्ष काढतात, सत्ता हस्तगत करतात परंतु मानवी समस्यांचे निराकरण होत नाहीच, समाजाचे एकत्रीकरण होत नाही, उलट ते सर्व fascisam कडे वाटचाल करत राहतात.

मानवी समस्यांचे मूळ आपले विचार आहेत. विचार आपल्या अस्तित्वाचे विभाजन करतात. एक विचार कर्ता बनून दुसऱ्या विचारांचे कर्मात रूपांतरण करून कर्ता व कर्म वेगळे आहेत असे भासविले जाते. कर्ता नेहमी आता मी काय कर्म करत आहे व भविष्यात काय कर्म करायचे आहे यांची नेहमी तुलना करत असतो. आपल्या अस्तित्व मधील हे प्राथमिक विभाजन हेच नंतर आपल्या कुटुंबातील, समाजातील दुहीचे कारण बनते, हे समजणे म्हणजे realisation आहे जे विचारांवर आधारीत नसून part of intelligence आहे. हि विवेक बुद्धी अज्ञानाचा नाश करते व आपणास ज्ञानाशी एकरूप करते.

Saturday, July 18, 2020

मी चे आकलन

जसे स्मार्टफोन सारख्या हार्डवेअर ला अँड्रॉइड सारखी ऑपरेटिंग सिस्टीम लागते तशी मानवी शरीराला विचारांची गरज असते शरीर संगोपन करण्यासाठी.

अँड्रॉइड सिस्टम वर वेगवेगळी ऍप इंस्टॉल करून आपण ऑडियो, व्हिडिओ, चॅटिंग करू शकतो तसेच विचार हे शरीर संगोपनार्थं कुटुंब, समाज, संप्रदाय आदि संकल्पना तयार करून त्याद्वारे स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो.

शरीराच्या ज्ञान इंद्रियांना झालेल्या संवेदना मेंदूकडे पाठविल्या जातात, मेंदूत त्यांचे पृथक्करण होवून त्या साठविल्या जातात. याला आपण *अनुभव* म्हणतो. मेंदूच्या *स्मृतिमध्ये* जे काय *ज्ञान* साठविले जाते त्यांचे विचार निर्माण होवून ते स्फुरण पाऊ लागतात. ते विचार *मी* चे एक वेगळे भासमान अस्तित्व तयार करतात, तो अहं, कर्ता म्हणून शरीराचा ताबा घेतो. हा आगंतुक मी पाहुणा असून मालक बनतो आणि शरीरास काय हवे व काय नको या ऐवजी त्याला काय हवे व नको याची जास्त काळजी घेतो. 

विचार थांबले की मी नाहीसा होतो म्हणून मी चतुरपणे मेंदूला सतत विचारात गाडून टाकतो. 

आपला प्रत्यक्ष काहीही संबंध नसताना अनेक विषय आपले मन चघळत राहते आणि मी चे अस्तित्व शाबूत राहते.





या सर्व वेगवेगळ्या प्रतिमा आहेत. प्रतिमा चित्रित केल्या नंतर त्या भूतकाळात जमा होतात, मृत होतात. परंतु जेव्हा भूतकालीन मृत प्रतिमा एका मागून एक जलद गतीने दाखविल्या गेल्या तर त्यातून जिवंत भासणारे चलत चित्र तयार होते. (काही कारणाने वरील प्रतिमांची तयार केलेली अनिमेशन फाईल upload होवू शकली नाही).

शरीरास होणाऱ्या संवेदना या एक एक इमेज असतात परंतु मेंदू, मन, विचार, मी हे सर्व मिळून त्या वेगवेगळ्या इमेज ची एक घटना बनवतात. अशा अनेक घटना जागृत अवस्थेत आपल्या स्मृतीत साठवील्या जातात आणि ते आपले ज्ञानभांडार बनते. आपण आपली, आपल्या नातलगांच्या अशा इमेज बनवून स्मृतीत ठेवल्या आहेत. या साठविलेल्या images खरेतर भूतकाळ आहे, dead आहेत. परंतु मन त्यांना सतत play करत जिवंत ठेवते. 

आपण आपल्या मित्रांशी मैत्री करतो म्हणजे आपली इमेज व आपल्या मित्राची इमेज यांची मैत्री असते. दोन्ही इमेज आहेत, दोन्ही भूतकालीन आहेत त्यामुळे मैत्री, प्रेम जे जिवंत आहे ते भूतकालीन इमेज पासून शक्य नाही. परंतु मन स्वार्थासाठी तशी भावना तयार करते. त्यामुळे स्वार्थापोटी तयार झालेले, मानवी विचारांवर तयार झालेले प्रेम तकलादू असते.



ब्रम्ह जिज्ञासा

1) सर्वं खल्विदं ब्रह्म...... हे वेद वाक्य आहे. सर्वच ब्रह्म आहे. तर  मग  जगत  दिसूच नये.  नेह नानास्ति किंचन. आम्हाला नाना आकार दिसतात. हे कसे?  
2) तत्वमसि. ते तूं आहेस. असे वेद सांगतो. आम्हाला तसे न वाटता मी देह आहे असे वाटते.  
3) ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या...... आम्हाला जगत सत्य वाटते. ब्रह्म माहीतच नाही. मग जीवो ब्रह्मैव ना पर: हे कसे कळावे?

उत्तर: चार वेदांचे सार म्हणून प्रत्येक वेदांची प्रत्येकी एक अशी चार महावाक्ये आहेत. त्यावेळच्या साक्षात्कारी ऋषींचा तो साक्षात्कार असणार. साक्षात्कारी म्हणजे ज्यांचा वैयक्तिक *मी* हा वैश्विक *ब्रम्ह* झाला आहे असे योगी. असे conversion झाल्याशिवाय त्या अवस्थेची अनुभुती येणे शक्य नाही. ब्रम्ह अवस्थेला पोहोचलेला योगी सर्वत्र केवळ ब्रम्ह अनुभवतो. याचा अर्थ त्याला आसपासच्या व्यक्ती, चराचर दिसत नाही असे नाही परंतु ते सर्व ब्रम्ह आहे असे त्याला दिसते. पूर्वीच्या व नंतरच्या अनुभवात फक्त अनुभवणारा बदलतो. अनुभव तेच असतात फक्त अनुभवणारा *मी* ऐवजी *ब्रम्ह* झालेला असतो. 

आपल्या स्मृतीमध्ये साठलेल्या अनुभव, माहिती आदींचे गाठोडे म्हणजे *मी* आहे. गाठोड्या मधील चष्म्याची साथ घेवून गाठोड्या बाहेरील बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत म्हणून सत्य दिसत नाही.

Tuesday, July 14, 2020

Real Meditation


Meditation हा विषय आपण स्वतःच संशोधन करण्याचा विषय आहे. प्रत्येकाने स्वता: तो शोध घेतला पाहीजे, मार्गदर्शन J.Krishnmurti यानी व भगवान बुद्धाने करुन ठेवलेच आहे पण त्यांच्या शिकवणुकीचा सार काही कुणाच्या लक्षात येत नाही व मग फक्त बुद्धीच्या स्तरावर शब्दश: अर्थ काढले जातात. प्रत्यक्षात practically काही ध्यान घडतच नाही. 

प्रथम meditation चा उद्देश आपल्या मनात स्पष्ट झालेला असायला हवा. 

मी चा शोध घेणे म्हणजे meditation आहे. 

या मीचा शोध घ्यायचा असेल तर मनाचा शोध घ्यावा लागतो कारण मी ची भावना हि मनाशी संबंधीत आहे. मन म्हणजे काय याच्यावर चिंतन केले तर मन हे नाम - रुप स्वरुपाचे आहे असे लक्षात येते. मी शोधायचा असेल तर मन समजुन घ्यावे लागते, मन म्हणजेच consciousness होय. Consciousness हा नेहमी दोन घटकांचा बनलेला असतो व ते दोन घटक असतात अनुभवणारा आणि अनुभव. Consciousness म्हणजे experience - experiencer.

अनुभव व अनुभवणारा यांचे स्वरुप समजुन घेणे, त्यांची कार्यपद्धती समजुन घेणे, त्यांचे स्वाभावीक गुणधर्म समजुन घेणे, त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध समजुन घेणे म्हणजे Real meditation होय. 

या अनुभवणारा - अनुभव यासाठी अध्यात्मात नाम - रुप असा शब्द आहे. नाम म्हणजे अनुभवणारा व रुप म्हणजे पंचभुतांचा अनुभव. यालाच इतर अनेक विशेषणे आहेत: 

  • experiencer - experience
  • द्रष्टा - दृश्य 
  • subject - object
  • अहम - इदम 
  • अस्मद - युष्मद 

म्हणजेच Real meditation चा अर्थ आहे 
या experiencer - experience विषयी सतत अखंड प्रतिक्षण वर्तमान क्षणात सजग रहाणे. प्रतिक्षण जिवन जगत असताना या दोघा विषयी आपल्याला सजग रहायचे आहे ही एक कला आहे ही कला आत्मसात करणे म्हणजे Real meditation होय. 

आता आपल्याला जिवन जगताना निरनिराळ्या गोष्टीचे अनुभव येत असतात, जे खालील गोष्टींचे असु शकतात,

(१) कायेचे अनुभव 

(२) इंद्रियांचे अनुभव 

(३) चित्ताचे अनुभव 

(४) अनुभवणाऱ्याचा अनुभव 

अनुभवणाऱ्या शिवाय अनुभव कधीच अस्तित्वात नसतो व अनुभवाशिवाय अनुभवणारा कधीच अस्तित्वात नसतो. हे प्रथम आपल्याला पक्के माहीत पाहीजे. कारण नाम - रुप म्हणजे experiencer - experience ही joint psycho- physical
Phenomenon आहे. ही joint psycho - physical phenomenon विषयी आपल्याला काहीच फारसे माहीत नसते व या मनो कायीक प्रक्रियेविषयी नीट माहीती नसण्यालाच अविद्या / अज्ञान म्हटले गेले आहे. 

प्रत्यक्ष वर्तमानातील क्षणात या experiencer - experience ला जाणणे म्हणजेच Real meditation होय, आता real
meditation अजुन सोपे करुन टाकु 
experiencer -experience या दोन गोष्टीसाठी आपण एकच शब्द वापरु experience मग experience म्हणजे काय याचा शोध घेणे म्हणजे real meditation अशी सोपी व सुटसुटीत व्याख्या आपण real meditation ची करु. 

ईतक सोप आहे real meditaion, वर्तमानात जो काही अनुभव येत आहे त्या अनुभवाचे वर्तमानात निरीक्षण करत त्या अनुभवाचे संपुर्ण स्वरुप जाणणे म्हणजे real meditation होय. 

मला वाटते real meditation चा खरा अर्थ आता सर्वांच्या लक्षात नक्की आला असेल, बस real meditation असे असते. Real meditation काही रहस्यमय बाब नव्हे ती आपल्या जिवनाशी direct संबंधीत असलेली बाब आहे. 

असा वर्तमानातील आपल्या जिवनात अनुभवास येणाऱ्या प्रत्येक experience चा समजुन उमजुन निरीक्षण करत आपण शोध घेतला तर आपल्याला experience चा स्वभाव, experience चे प्रकटने व experience चा लय होणे ही प्रक्रिया सतत घडत असल्याचे आपल्याला उमजु लागते. 

बाहेर प्रसंग घडतो व अंतरंगात काही तरी अनुभव येतो, जर मनासारखी घटना घडली तर सुखाचा, समाधानाचा, तृप्तीचा अनुभव येतो व मनाविरुद्ध घटना घडली तर दुखाचा, असमाधानाचा, निराशेचा, अतृप्तीचा अनुभव येतो किंवा ती घटना आपल्याशी संबंधीत नसेल तर मग कोणताही सुखाचा वा दुखाचा अनुभव आपल्या अंतरगात उठत नाही, ज्या गोष्टीशी आपले तादात्म्य असते त्याच गोष्टीचे अनुभव सुखदायक वा दुखदायक बनुन अंतरंगात प्रकटतात. जसे जर भारत पाकीस्तानची one day cricket match झाली व भारत हरला तर भारताशी तादात्म्य असल्याने सर्व भारतीयाना दुखाचा व निराशेचा अनुभव येतो व पाकीस्तानी लोकाना सुखाचा व समाधानाचा अनुभव येतो, जितके तादात्म्य अधिक, जितके conditioning अधीक तेव्हढा जास्त तीव्रतेचा अनुभव येत असतो, एखाद्याला जर भारताविषयी खुप जास्त तादात्म्य असेल तर त्याला भारताच्या पराभवाने प्रचंड दुख होत असते व जर एखाद्याचे भारताशी फार तादात्म्य नसेल तर भारताच्या पराभवाने त्याला फार दुख वा निराशा अनुभवाला येत नसते, ही गोष्ट आपण अगदी clearly समजुन घेणे गरजेचे आहे, आता पहा घटना तर एकच घडली की cricket match चा निकाल लागला पण त्या एकाच घटनेने भारतीय मन दुखी झाले तर पाकीस्तानी मन सुखी झाले, आता आपण ही match ची घटना जर एका जपानी माणसाला कळली तर त्याला सुखही होत नाही व दुखही होत नाही कारण त्याला भारताशीही तादात्म्य नाही व पाकीस्तानशी ही तादात्म्य नाही व cricket शी ही तादात्म्य नाही त्यामुळे त्याला कोणताही सुखाचा वा दुखाचा अनुभव येत नाही, सुख वा दुखाचा अनुभव येण्यासाठी आधीचे तादात्म्य वा conditioning वा संस्कार असावे लागतात तरच त्या conditioning नुसार अनुभव येतात हे नीट उमजले तर मग सर्व अनुभवांचे गणीत स्पष्ट होत असते. तसेच हे अनुभव कसे निरास पावतात हेही आपण नीट समजुन घ्यायचे आहे कारण सर्व अनुभवांच्या निरासात सत्य प्रकटन होत असते.

J. Krishnmurti नेहमी म्हणतात if you can end all experiences of conscious, subconscious, unconscious and universal consciosness then in ending of totality of all experiences there is realization of truth. म्हणुन या अनुभवांच्या निरासाचेही गणीत आपण नीट समजुन घ्यायचे आहे या अनुभवां विषयी जर आपण आसक्ती द्वेषाची प्रतिक्रिया केली तर हे अनुभव अधीक बळकट होत असतात व जर या अनुभवाविषयी आपण सजग निर्विकल्प राहीलो तर या अनुभवांची ताकद संपुन जात असते व शेवटी हे अनुभव पुर्णपणे निरास पावत असतात.

J. Krishnmurti म्हणतात, Choiceless awareness is a process of meditation. हा अनुभवांचा निरास आपण एका दृष्टांतानुसार समजुन घेवु.

आपल्या कार ची battery चे उदाहरण आपण घेवु जर कार पुढे चालवली तरी battery charge होते व कार मागे, reverse चालवली तरी battery charge च होते. तुम्ही positive reaction करा की negative reaction करा, battery charge च होते पण जर तुम्ही कार जागेवरच दोन- चार महीने उभी ठेवली तर battery आपोआप discharge होते तसे मन रुपी अनुभव वा अनुभवरुपी संस्कार निरास करण्यासाठी साक्षीभावात स्थीर असलेल्या सजग निर्विकल्प निरीक्षणाची गरज असते असे choiceless observation घडले तर अनुभव निरास पावत असतात जशी battery आपोआप dishcharge होते तसे. ही गोष्ट तुम्हाला नीट समजली तर तुमच्या meditation ला सुरवात झाली म्हणुन समजा. असे आपले नेहमीचे जिवन जगत असताना ज्या घटना आपल्या जिवनात वर्तमानात अनुभवायला येतात त्या सर्व अनुभवां सोबत निर्विकल्प निरीक्षणात स्थीर असणे म्हणजे real meditation.

अशा पद्धतीने समजेतुन साक्षीभावात स्थीर झाल्यास सुख, दुख, चिंता काळजी, भय, क्रोध, greed, desire ईत्यादी सर्व अनुभवांचे गणीत सुटत असते. 

अशा पद्धतीने प्रत्येक अनुभवासोबत खालील प्रमाणे contemplation हे सुरु ठवायचे आहे हे contemplation म्हणजे अनुभव समजुन घेणे होय. 

आता Real meditation ची theory आपल्याला समजली मग ही समजेची पट्टी आता आपण आपल्या जिवनात येणाऱ्या सुख व दुखाच्या अनुभवाना खाली दिल्याप्रमाणे लावायची आहे, प्रत्येक अनुभव आला की आपण contemplation सुरु ठेवायचे, 
  • experience is past, संस्कार नेहमी भुतकाळातील संस्कार असतो. 
  • experience is conditioning, अनुभव नेहमी पुर्व मान्यता असतो. 
  • experience च्या मुळाशी cause - effect असतो, कार्यकारणभाव असतो.
  • experience म्हणजे Recycling असते
  • experience म्हणजे Remoulding असते,
  • experience एक यांत्रीक घटना आहे.
  • experience is illusion, अनुभव हा भ्रम असतो.
  • experience is transient असतो, अनुभव नेहमी अनित्य असतो, नेहमी बदलणारा असतो 
  • experience is joint psycho - physical phenomenon, अनुभव ही मनातील मनोकायीक द्वैत प्रक्रिया आहे.
  • experience is time process and becoming process, अनुभव हा भुतकाळातील असतो व तो वर्तमानात प्रकटतो व आपण आवड निवडची प्रतिक्रिया केली तर भविष्यकाळाची निर्मिती होते व काळाचे चक्र अखंड कार्यान्वीत रहाते.
  • आणी सर्वात महत्वाचे व कदाचीत आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणजे experience is experiencer ही अद्वैत बुद्धीची समज.

ही समज जर आली तर द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होत असते व अद्वैत बुद्धीत खरा choiceless awareness प्रकटत असतो जो समजेतुन प्रकटलेला असतो, हा साक्षीभाव बळजबरीचा काही हेतु धरुन बळजबरीचा साक्षीभाव नसतो या खऱ्या choiceless awareness च्या दिव्य अशा अद्वैत दृष्टीच्या समजेत अनुभवाचा निरास आपोआप घडत असतो. ही experience is experiencer ही समज खरी समज आहे, meditation शिकवणारे सर्व अज्ञानी गुरु शिकवतात की experiencer हा experience पेक्षा भिन्न असतो पण J.Krishnmurti सारखा खरा मार्गदर्शक आपल्या experience is experiencer अशी जगावेगळी समज देवुन आपल्या द्वैत बुद्धीचे परीवर्तन अद्वैत बुद्धीत कसे करतो हे अनुभव घेण्यासारखे आहे. experience असेल तर सोबत experiencer असलाच पाहीजे, experiencer असेल तर सोबत experience असलाच पाहीजे, जेव्हा असतात तेव्हा दोन्ही असतात व जेव्हा नसतात तेव्हा दोन्ही नसतात असे जेव्हा असते तेव्हा ते भिन्न नसतात ते एकच असतात, आता पहा रात्री दोन वाजता जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असतात तेव्हा तुमचे पाचही इंद्रिय झोपलेली असतात, विचार बंद असतात, स्वप्नही नसते, कोणताच experience नसतो तेव्हा experiencer असतो का ? तेव्हा experiencer नसतोच आपण झोपेत कोठे आहोत याचा पत्ताही नसतो, पलंगावर आहोत की गटारीत पडलो आहोत की जंगलात आहोत की मच्छरदाणीत आहोत, जिवंत आहोत की मेलेलो आहोत याचेही भान नसते म्हणुन J.Krishnmurti सांगतात 

  • observer is observed
  • experience is experiencer
  • द्रष्टाच दृश्य आहे 
  • अनुभवच अनुभवणारा आहे 
  • कर्ताच क्रिया आहे व क्रियाच कर्ता आहे.
  • ज्ञाताच ज्ञेय आहे.
  • seer is seen 

या नाम रुपात्मक joint psycho - physical phenomenon ची समज येणे हीच गीतेतील दिव्यदृष्टी आहे, ही दिव्यदृष्टी प्रकटली, ही समज आली तर पुढील आत्मज्ञान घटना आपोआप घडते. ही समज ध्यानाची गुरुकिल्ली आहे हे ज्याला ज्याला समजेल व ज्याचे चित्त शुद्ध असेल त्याला ज्ञान झाल्याशिवाय रहाणार नाही याची ग्वाही खरे मार्गदर्शक दोन्ही बाहु उभारुन देत असतात जसे व्यासानी बाहु उभारुन सांगीतले तसे. 

सर्व अज्ञानी गुरु मात्र या समजेच्या विरुद्ध शिकवण देवुन अज्ञानी जीवाला कायमचे भवचक्रात अडकवुन ठेवत असतात ही 100% fact आहे. 

हे ज्याला उमजेल तो भाग्यवान.

  • conscious
  • subconscious
  • unconscious
  • universal consciousness

या सर्व स्तरावरील असे हे सर्व संपुर्ण नामरुपात्मक भ्रमाचे अनुभव निरास पावतात तेव्हा नामरुपाचा खेळ ज्या निर्गुण निराकार तत्वाच्या अधीष्ठानावर सुरु असतो त्या निर्गुण निराकार तत्वाची ओळख त्या निर्गुण निराकार तत्वाला होते याला आत्मज्ञान म्हणतात. 

यापेक्षा अध्यात्म दुसरे काहीच नाही. 


  • श्री विजय पांढरे, 9822992578, vbpandhare@gmail.com

Saturday, July 11, 2020

Illusion of Self prevents Realisation


आता पर्यंत गेल्या शेकडो हजारो वर्षात अनेक खरे संत व ज्ञानी या जगात जन्मले आहेत व त्यानी जगाला मार्गदर्शन केले आहे. कृष्ण, बुद्ध, येशु ख्रिस्त, महावीर, नानक, कबीर, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ, J. Krishnmurti, रमण महर्षी अशी शेकडो नावे घेता येतील, शेकडो शेकडो ग्रंथात त्या तत्वाच वर्णन आहे व अनेक लोक अशी अशी कृती केली तर, अशी अशी साधना केली तर ती अनुभुती प्रकटते असे सांगतात पण तसे प्रयत्न करणाऱ्या कुणालाही तशी अनुभुती येताना दिसत नाही व जे स्वताला धार्मीक असे म्हणवतात, त्यांचे प्रत्यक्ष जिवनातील आचरण अत्यंत विरोधाभासी असते. सर्व धर्मात त्या तत्वाचा उल्लेख आहे पण हेच सर्व धर्म व त्यांचे धर्मगुरु एकमेकाशी संघर्ष व युद्ध करताना आढळतात. ईतक महत्वाच ते तत्व आहे, त्या तत्वाचा एव्हढा मोठा गलबला येथे चालु आहे पण ही अनुभुती मात्र प्रकटतच नाही असा सर्व सामान्य लोकांचा अनुभव आहे.

काय करत नाहीत हे लोक संशयाच्या भोवऱ्यात अडकुन, अध्यात्माच्या नावाखाली प्रचंड गोंधळ घातला आहे या अज्ञानी लोकानी या अध्यात्म क्षेत्रात.

अज्ञानी लोक संत विचारापासुन दुर गेल्याने सर्वत्र हिंसा, तणाव, चिंता, काळजी, संघर्ष व युद्धाचे वातावरण आहे. सार्वजनीक व वैयक्तीक जिवन चिंतानी तणावग्रस्त व दु:खपुर्ण झाले आहे. मग हे अज्ञानी गुरु सांगतात तुला जर देव प्राप्त झाला मग यातुन सुटुन जाण्यासाठी जो गुरु जे सांगेल ते हे लोक करत सुटतात, नामजप करणे, वाऱ्या करणे, मुर्ति पुजा करणे, उपवास तपास करणे,अन्नदान करणे, पोथी पुराण वाचणे, कोणत्या तरी पंथात वा संप्रदायात सामील होणे, भगवे वा हिरवे कपडे घालणे, भजन किर्तन करत रहाणे, तिर्थाला व चारीधामला जाणे दान धर्म करणे, प्रपंच्याचा त्याग करणे, हिमालयात निघुन जाणे, योग साधना वा प्राणायाम साधना करणे असा निरनिराळ्या मतांचा
गोंधळ येथे चालु आहे. याला JK conditioned mind म्हणतात.

J Krishnmurti सारखा माणुस येतो व आपल्याला सांगतो की,

"The totality of our conditioning can be broken, not bit by bit, not part by part which takes time and we have a huge stock of conditioning so the only way to freedom is to look and understand the observer observed phenomenon which is joint duality phenomenon. By directly perceiving the truth of the fact that observer is observed then that perception of truth dissolves the conditioning in one stroke of a glance. In understanding of the truth the false whithers away. The ignorant problem of life can not be tackled by mind or intellect or by effort but ignorance can be tackled by awakened insight and for awakening of insight there must be a unfettered choiceless observation. 

In mind we have established a idea of separate ever enduring self as atman and untill this idea of seperate self exists there can be no true perception. This idea of separate self is real mischief monger, if mind liberates itself from this mischief monger at all levels of consciousness right up to emergence of consciousness then there is liberation from the idea of separate self and that is freedom. We have taken granted that separate self as being true and that is ignorance. Through clear thinking and intelligent action we can cross this stream of pain and sorrow. 

Idea of seperate self is ignorance and the background of our tradition and habit which is blind prejudice in our consciousness process. That idea of seperate self prevents us from the complete understanding of all the layers of consciousness up to its origin. That idea of seperate self is real problem and that is the real reason behind the confusion and suffering in our life. I beg you to listen what is being said without your conditioning interfering in to observation. Once the mind is freed of wrong notion of self then that understanding frees you from the whole past which is store house of past conditioning. That belief of separate self prevents mind from the complete understanding of life. Freedom from all past prejudices and beliefs is must. The belief of separate self is blind belief which is real ignorance."

Further JK says, 

"What we call religion is a set of prayers, rituals, dogma, wishing to find god, accepting the authority and a vast number of superstitions. The seeker who is really trying to find what is true must abandon all that. The mind must be free of all superstitions of gods and gurus and blind beliefs they have established in our mind and heart, then only such a pure choiceless observant mind is capable of discovery of truth. You must break away from idea of religion and the self.

The mind which has insight of observer is observed is pure and empty mind. And in such pure mind there appears the truth. Truth comes uninvited, when mind is pure without the misbelief of self. The mind which understands that there is no self, there is no me and mine that mind realises the truth of existence as process of consciousness in ignorance.

This all is real meditation. 

Just learn how to look choicelessly without thev idea of self in mind and in that selfless looking whole ignorance whithers away."


माउली ज्ञानेश्वरीत म्हणते,

एक अंतरी निष्चळ,
जे निहाळता केवळ,
विसरले सकळ,
संसारजात ll...(अध्याय -2)

समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

पहात पहात पाहे,
निसंग होवुनी राहे ll
ना तरी जाणीवेच्या ठिकाणी,
करता दधी कडसणी,
नवनीत निर्वाणी,
दिसो लागे ll 

JK नी सर्व अंधश्रद्धा व misbeliefs सोडायला सांगीतले. 

माउलीने पण तेच सांगीतले,

देव ते कल्पीत,
शास्त्रे ती शाब्दीक,
पुराणे सकळीक,
बाष्कळीक ll.......( गाथा )

मी सृजी पाळी संहारी,
ऐसे बोलती जे चरचरी,
ते अज्ञान गा अवधारी,
पंडुकुमरा ll... (अ -५/८२ )

अज्ञान समुळ संपता,
भ्रांती ती नाश पावता,
मग समजते अकृतत्वता,
ईश्वराची ll.... (अ-५/८३ )

श्री विजय पांढरे, 9822992578, vbpandhare@gmail.com

Real Meditation



मनाला जर Real Meditation समजले तर खोल पर्यंत अगदी निर्गुण निराकार अवस्थे पर्यंत मनाच्या सर्व स्तरांची अनुभुती अंतरंगात प्रकटते. असे खरोखर घडले तरच आपल्या अस्तित्वाचा संपुर्ण खुलासा अंतरंगात होवू शकतो.

आपले अस्तित्व म्हणजे आपल्या चार अवस्था / चार वाचा / चार consciousness यांचा बोध होणे होय. हा बोध मनाचा बोध मनाला होत असतो किंवा self चा बोध self ला होत असतो. अस्तित्व म्हणजे सुक्ष्म मनाचे gradual consolidification म्हणजे सघनीकरण आहे. Nothingness मधे आकाश (space) प्रकटावे, आकाशात हवा प्रकटावी, हवेत वाफ (vapour) प्रकटावी, वाफेत ढग प्रकटावा, ढगातुन पाण्याचे अगणीत fragmented थेंब निर्माण व्हावेत व हे पाण्याचे थेंब अजुन सघन होवुन त्या थेंबाचे रुपांतर गारेत व्हावे व ही गार नंतर वितळुन पाणी होते,पाणी समुद्राला जावुन मिळते व पुढे समुद्रातील पाण्याची वाफ होते वाफेचा ढग होवुन पाऊस पडतो आणि जलचक्र अखंड चालु रहाते. अगदी अशीच ही consciousness च्या / मनाच्या रुपांतरीत होण्याची कहाणी आहे व आपण स्वताच ते संपुर्ण रुपांतरण आपल्या ठायी अंतरंगात अपरोक्षपणे अनुभवणे या प्रक्रियेला Meditation म्हणतात. 

Consciousness म्हणजे द्रष्टा - दृश्य तादात्म्य. द्रष्ट्या शिवाय दृश्य नाही व दृश्याशिवाय द्रष्टा नाही. असतात तर दोघे असतात नाहीतर दोघे नसतात. द्रष्टा - दृश्याचे असणेपण दोन प्रकारचे असते एक द्वैतपणे आणि दुसरे अद्वैतपणे.

Universal consciousness म्हणजे अद्वैत द्रष्टा - दृश्य / ब्रह्म / परा / महाकारणदेह / तुर्या / विज्ञान होय. Universal consciousness म्हणजेच स्वसंवेद्यता.

Fragamented consciousness म्हणजे unconscious / सुषुप्ती / कारण देह / प्राणमय कोष / जीवभाव होय. हा जीवभाव स्वप्न व जागृतीचा भास निर्माण करतो.

अस्तित्व प्रक्रियेशी असलेली आपल्या असणेपणाची एकरुपता प्रत्यक्ष समजणे हेच self knowledge किंवा आत्म स्वरुपाचे ज्ञान होय. ही अस्तित्वाची प्रक्रिया ज्या निर्गुण निराकारातुन उगम पावते त्या निर्गुण निराकाराला परमात्मा / परमेश्वर / परब्रह्म / शुन्य / Nothingness म्हणतात. या अवस्थेत Awareness हाच Awareness च्या सुक्ष्मातिसुक्ष्म अवस्थेत असतो. खरे म्हणजे consciousness किंवा मन हेच परमात्म स्वरुप आहे. हा consciousness किंवा हे मन म्हणजेच ते स्वसंवेद्य तत्व आहे ज्याला आपण परमात्मा म्हणतो, universal consciousness म्हणजे परमात्मा व fragmented consciousness म्हणजेच individuality रुपी जीवभाव, individual consciousness universal consciousness चाच भाग आहे, अंश आहे म्हणुन सर्व जीव परमात्म्याचे अंश आहे असे म्हटले जाते पण नुसते ग्रंथ वाचुन, श्रवण करुन, तर्क बुद्धी विचाराच्या सहाय्याने हे समजले असे वाटले तरी ते actually समजलेले नसते, JK यांचे Real meditation समजले तर हे स्वसंवेद्य तत्व जे मन आहे ते मन स्वताच स्वताच्या स्वसंवेद्यतेत या अस्तित्वाचा संपुर्ण मागोवा अगदी उगमापासुन शेवटापर्यंत घेउ शकते हेच Real meditation होय.

Scientist जी Quantum theory, Black hole ची कल्पना मांडत आहेत ती theory याच दिशेने जाणारी आहे.

मनाच्या द्वैत प्रक्रियेच्या समजेतुन मन जेव्हा जागृती व स्वप्नावस्था ओलांडुन सुषुप्तीत सजगपणे प्रवेश करते तेव्हा जीवाचा अपरोक्ष बोध जीवाला होतो, सुषुप्तीत असजगतेत प्रवेश करणाऱ्यासाठी सुषुप्ती ही गाढ निद्रा असते. सुषुप्ती ही जीवभावाचे बीजस्वरुप आहे, सुषुप्ती म्हणजे fragmented mind जे सुक्ष्म मनच आहे जन्म मृत्यु किंवा जीवाचे शरीर रुपाने व्यक्त अव्यक्त होणे या जीवभावामुळे होत असते. जर meditation कळले तर पुढची अवस्था प्रकटत असते जीला तुर्या/ ब्रह्म / universal consciousness/ विज्ञानमय कोष किंवा भगवान बुद्धांच्या शब्दात विज्ञान म्हणतात. या सर्वांचे उगमस्थान निर्गुण निराकार तत्व आहे. त्या निर्गुण निराकार तत्वाला हिंदु धर्मीय परब्रह्म / परमात्मा / परमेश्वर म्हणतात, त्याच तत्वाला ख्रिश्चन आकाशातला बाप म्हणतात तर मुस्लिम त्याच निर्गुण निराकार तत्वाला अल्ला म्हणतात, बुद्धाने त्याच तत्वाला शुन्य म्हटले, हिंदु तत्वज्ञानाच्या वेद उपनिषदात या तत्वाचा शुन्य वा महाशुन्य म्हणुन उल्लेख खुप ठिकाणी आढळतो. पण Real meditation समजलेले नसल्याने अस्तित्वाची ही वैश्विक एकरुपता अंतरंगात न अनुभवल्याने हिंदु - मुस्लिम -ख्रिश्चन - बौद्ध - जैन - शिख तत्वज्ञाने भिन्न भिन्न आहेत असे अज्ञानामुळे वाटते व पुढे या अज्ञानातुन धर्माधर्मातील तेढ, युद्धे, हिंसा, दहशतवाद कसा पसरतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत म्हणुन Real meditation मधे अस्तित्वाशी असलेली एकरुपता जाणणे हाच सर्व समस्यांवरचा एकमेव उपाय आहे. या Real meditation ला भगवान बुद्ध "एकायनो मग्गो " म्हणतात जो खरा व एकमेव असा वैश्विक उपाय आहे जो सर्व मानव जाती साठी आहे.

Let us ponder over it and let the mind be free of all illusions created by mind itself.

What remains at the end of all illusions is known as Truth which is निर्गुण निराकार तत्व which is original ground of all existence which is eternity.

श्री विजय पांढरे, Mob.9822992578, Vbpandhare@gmail.com

Friday, July 10, 2020

आत्म साक्षात्काराची प्रक्रिया

एका साधकाने प्रश्न केला आहे की बहुतेक सर्व संत म्हणतात की आत्मा हा निर्गुण निराकार व अमर आहे, व हा आत्मा प्रत्येक जीवात निवास करतो व जीवा ठायीच्या मन व इंद्रियांच्या अनुभवाने हा आत्मा जाणत असतो, असे असताना गौतम बुद्ध म्हणतात की आत्मा नावाची मन इंद्रियाना जाणणारी काहीही चिरंतन वस्तु नाही, त्या निर्गुण वस्तुला त्यानी शुन्य हा शब्दही वापरला आहे. कृष्णमूर्ती देखील त्या निर्गुण वस्तुला Nothingness म्हणतात, पण that is not self and "There is no self " असेही स्पष्ट वक्तव्य ते बुद्धाप्रमाणे करतात. अशा विरोधाभासी statements मुळे गोंधळ होतो, जर हे सर्व साक्षात्कारी संत आहेत तर त्यांच्यात एकवाक्यता का नाही? 

उत्तर: या आपल्या मनातील गोंधळाला कारण आहे आपल्याला असलेले अस्तित्व प्रक्रियेसंबंधीचे अज्ञान.
अस्तित्व प्रक्रियेचे अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय याचा खुलासा श्रवण वा वाचन करुन होवु शकत नाही. तरी तर्काचे सहाय्य घेवुन आपण समजण्याचा प्रयत्न करु. 

संताचा आत्मा शब्दामागील लक्षार्थ, बुद्धाचा अनात्म वा शुन्य शब्दाचा लक्षार्थ व J.Krishnmurti चा 
" no self " किंवा Nothingness या शब्दाचा लक्ष्यार्थ, संतानी वापरलेल्या आत्मा या शब्दाचा त्यांच्या मनातील लक्षार्थ व आपल्या मनातील आत्मा या शब्दाचा अर्थ यांचा ताळमेळ लागत नसल्याने हा गोंधळ झाला आहे. या गोंधळावर आज स्पष्ट व निष्पक्षपणे चिंतन करु. 

ही जी मतभिन्नता वाटते तीच्या कारणाचा शोध आपण घेवु. अस्तित्व प्रक्रियेचे संपुर्ण ज्ञान जो पर्यंत Real meditation मधे होत नाही तो पर्यंत, ही संपुर्ण अस्तित्व प्रक्रिया कळत नाही व मग ग्रंथात लिहिलेल्या गोष्टीबाबत काही तरी कल्पना करुन आपण आत्मा असा असा आहे असे म्हणत असतो, जी वस्तुस्तिथी नसते केवळ कल्पनाविलास असतो म्हणुन मत मतांतरे असतात. 

आत्मज्ञानी व्यक्ती मधे मतभिन्नता नसते.ते कोणताही शब्द वापरोत त्यांच्या शब्दांचा लक्ष्यार्थ एकच असतो.

सर्वात प्रथम आपण आत्मा कशाला समजतो याचे चिंतन केले तर लक्ष्यात येते की सामान्य माणसाला वाटते की प्रत्येकाच्या शरीरात आत्मा असतो व प्रत्येक शरीरातील आत्मा वेगळा वेगळा असतो, मृत्यु होतो तेव्हा हा आत्मा शरीर सोडुन जातो व हाच आत्मा नंतर जन्मालाही येतो व या शरीरातील मन इंद्रियांचे अनुभव हा आत्मा घेत असतो, अशी साधारण माणसाची मान्यता असते. आता ही वैयक्तीक आत्म्याची कल्पना कशी चुकीची आहे हे आपण अगदी सामान्य logic नेही लगेच तपासु शकतो.

आत्म्याच्या बाबत गीतेत उल्लेख येतो की आत्मा एक अमर, चिरंतन, omnipresent, omnipotent, अनंत, अपार वस्तु आहे या आत्म्याला मरण नाही व हा आत्मा कशानेही जळत नाही व कोणतेही शस्त्र त्याचे तुकडे करु शकत नाही. आता जर आत्म्याचे तुकडे होतच नाहीत तर प्रत्येक शरीरात वेगवेगळा आत्मा आहे ही मान्यता चुकीची ठरते. 

आता सर्व धर्मात आणि सर्व संप्रदायात आत्म्या संबंधी सांगीतलेली अजुन एक कल्पना पाहु. संत म्हणतात, सर्व शरीरात एकच विश्वात्मक आत्मा वास करत असतो व हा आत्मा विश्वात्मक तसेच निर्गुण निराकार व चेतन असतो. सर्व जीव या विश्वात्मक आत्म्यात रहातात व हा वैश्विक आत्मा सर्व जीवांना मन इंद्रिया मार्फत जाणत असतो म्हणजे मन इंद्रियाना जे जे अनुभव येतात त्या सर्व अनुभवाना जाणण्याचे काम आत्मा करत असतो. 

आता या मान्यतेत काय चुक आहे ते पहा अगदी logically जरी विचार केला तरी ही मान्यता कशी चुक आहे हे पहाता येते. एका बाजुला म्हणायचे आत्मा निर्गुण निराकार आहे, निर्गुण आहे म्हणजे त्यात एकही गुण नाही आणी दुसरीकडे म्हणायचे तो सर्व प्राण्यातील मन इंद्रियातील अनुभवाना जाणतो असे विरोधाभास या मान्यतेत आढळतो आणी सत्य परीस्तिथी तर अशी आहे की हा आत्मा निर्गुण निराकार असल्याने स्वत: ही स्वता:ला जाणत नसतो, जो स्वतालाही जाणत नाही तो सर्व भुतांच्या मन इंद्रिय अनुभुतीला जाणतो असे म्हणणे विरोधाभासी असल्याने ही मान्यता देखील चुक ठरते. 

संत ज्याला निर्गुण निराकार म्हणतात त्याला बुद्ध शुन्य म्हणतात व कृष्णमुर्ती Nothingness म्हणतात या तीन statement मधे कोणताही विरोधाभास नाही.

मग पुढचा प्रश्न उपस्थीत होतो जर आत्मा चेतन असुन जाणत नाही तर मग मन इंद्रियांचे अनुभव येतात तरी कोणाला? म्हणजे हे जे कळत ते कोणाला? 

आता एक एक करुन आपण विचार करु, प्रथम आपण डोळ्याना जो अनुभव येतो त्याचा विचार करु.

प्रथम विचार करु की श्वास सतत सुरु असतो या श्वासाला कळते का तर उत्तर येते की श्वासाला कळत नाही, मग पुढचा विचार करु शरीराला कळते का? तर उत्तर येते की शरीर तर जड आहे व जडाला कळत नाही म्हणुन शरीराला ही कळत नाही. मग विचार करु डोळ्याला कळते का? पण उत्तर येते की कारण डोळे जड आहेत आणी जडाला तर कळत नाही म्हणजे डोळ्यानाही कळत नाही आणी जडाला कळले असते तर मग प्रेताच्या डोळ्यानाही कळले असते पण प्रेताच्या डोळ्याना कळत नाही म्हणजे डोळ्यानाही कळत नाही.

मग विचार करु की मनाला कळते का पण मन तर material process आहे व material म्हणजे पंचभुते आहेत व पंचभुते तर जड आहेत म्हणुन मनालाही कळत नाही. मग कळते कोणाला? कारण कळते तर आहेच मग कोणाला कळते? श्वास घेतला हे श्वासाला कळत नाही, शरीराला कळत नाही, डोळ्याला कळत नाही व मनालाही कळत नाही, मग कळते कोणाला? कारण शरीर जे चेतन व जड तत्वाचे गाठोडे आहे यात चेतन स्वता: स्वता:ला जाणत नाही व जड तर जडच आहे, अनुभव चेतनला येत नाही व जडालाही येत नाही. 

शरीर व मन याशिवाय कळणे किंवा जाणणे हे जागृती, स्वप्न, सूषुप्ती या इतर अवस्थांमध्ये सुद्धा चालू असते. परंतु एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जाणत नसते. जागृतीतील मन इंद्रियांचे अनुभव स्वप्नावस्थेत येत नसतात तसेच ते अनुभव सुषुप्तीलाही येत नसतात व सामान्य मन इंद्रियात बेहोष असलेल्या माणसासाठी तर सुषुप्ती ही गाढ निद्रा असते म्हणुन मन इंद्रियांचे अनुभव सुषुप्तीलाही कळत नसतात. अंत:करणाची पुढची अवस्था आहे तुर्या वा ब्रह्ममयता जो universal consciousness आहे, वैश्विक जाणीव आहे पण ही पण अंत:करणाची एक अवस्था आहे व एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जाणत नसते म्हणुन मन व इंद्रियांचे अनुभव ब्रह्माला किंवा तुर्येलाही येत नसतात व त्या शेवटच्या निर्गुण निराकाराला तर स्वताची पण जाणीव नाही, ते तत्व कोणालाच जाणत नाही त्या तत्वाला कोणाचाच पत्ता नाही, मन इंद्रियांच्या अनुभवाचाही पत्ता नाही व चारी अवस्थांचाही पत्ता नाही. अशी सर्व सत्य परीस्थिती आहे. पण आपणाला अनुभव येत आहेत व अनुभव येणारा मी हा तर इंद्रिय ही नाही, मन ही नाही, जागृतीही नाही, स्वप्नही नाही, सुषुप्ती ही नाही, तुर्या/ ब्रह्म ही नाही व त्या पलीकडचे निर्गुण निराकार तत्वही नाही कारण माझी मला जाणीव आहे व निर्गुणाची जाणीव तर निर्गुणाला नाही म्हणुन मी निर्गुण सुद्धा नाही. 

मग आपणाला मन इंद्रियांचा अनुभव येतो तरी कसा हा मोठाच गहन प्रश्न आहे. जे काही मन व इंद्रियांचे अनुभव आहेत ते मी ला कळतात पण हा मी कोण हे काही कळत नाही. 

हा मी न कळणे म्हणजेच अज्ञान होय, अविद्या होय, माया होय, द्वैत होय,अहंकार होय.

आपण बुद्धीच्या सहाय्याने खुप शोध घेतला पण बुद्धीला हा मीचा बोध कधीच होवु शकत नाही. तुम्ही डॉक्टर असा की Engineer असा कीप IAS असा की IPS असा, आमदार खासदार असा की मुख्यमंत्री असा की पंतप्रधान असा की nobel prize winner शास्त्रज्ञ असा तुम्हाला हा बोध होवुच शकत नाही, हा बोध फक्त ज्याला real meditation समजले व अंतरंगातील चारी अवस्थांचा निरास ज्या मनाने अपरोक्षपणे आपल्या अंतरंगात अनुभवला त्या चार अवस्था निरासातच हा बोध प्रकटतो, दुसरा इलाजच नाही.

या real meditation मधे व चार अवस्था निरासात असे होते तरी काय ज्यामुळे हा बोध प्रकटतो हे पहाणे देखील मोठे मार्गदर्शक ठरेल. अर्थात real meditation मधील अपरोक्ष अनुभुतीशिवाय ही गोष्ट कळणे फारच कठीण आहे. 

सर्व संतानी ही गोष्ट त्यांच्या हयातीत समजावुन सांगीतलेली आहे, त्यांचे ग्रंथ या गोष्टीचे पुरावे आहेत. पण त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ अज्ञानी मन समजुच शकत नसल्याने व समजावणारे ९९.९९ % अज्ञानी असल्याने संतशिकवणीच्या अर्थाचा बेअर्थ काढुन तो बेअर्थ समाजात प्रचलीत होण्याचे अज्ञान कार्य अज्ञानात घडलेले दिसते. अन्यथा अध्यात्माची ईतकी अधोगती झाली नसती ती सद्या जितकी झाली आहे. 

संतानी सांगीतले की सृष्टी ही नाम -रुपात्मक असुन अनित्य व अनात्म आहे. याच्यातील कोणतीच गोष्ट नीटपणे न समजल्याने अध्यात्म भलतीकडेच भरकटुन गेले आहे. संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम, एकनाथ महाराज, वेदांत व उपनिषदे यातील नाम - रुपाचा अर्थही कोणाला समजला नाही.

नामाला तर शब्द समजुन शब्द रटण्याचा प्रकार संताचे नावाखाली काही जणानी केल्याचे दिसुन येते. संतानी तर अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याची दखल न घेता संताचे नाव सांगुन नकली सकाम अध्यात्म समाजात रुढ केले यात शंका ती काय? 

आता आपण नाम - रुप या शब्दाचा खरा अर्थ पाहु कारण नाम - रुप समजल्या शिवाय real meditation ला सुरवातच होत नाही. 

नाम - रुप म्हणजे
  • psycho - physical Phenomenon.
  • मनो - कायीक प्रक्रिया 
  • Psycho - somatic प्रक्रिया.
  • Mind - matter phenomenon
  • Time - space phenomenon. 

अगदी सोप्या शब्दात समजुन घ्यायचे असेल तर 

नाम -रुप प्रक्रिया म्हणजे मन प्रक्रिया. Mind process. Mind - matter, चित - जड प्रक्रिया.

गीतेत म्हणतात 
  • पुरुष - प्रकृती 
  • ज्ञान - विज्ञान 
  • क्षर - अक्षर 
  • क्षेत्रज्ञ - क्षेत्र 
  • अव्यक्त - व्यक्त 
यालाच 
  • द्रष्टा - दृश्य 
  • ज्ञाता - ज्ञेय 
  • अनुभव - अनुभविता 
  • subject - object
वेदांतात म्हणतात 
  • अहम - इदम 
  • I and you 
  • I am that 
  • तत्वमसी 
  • अहम ब्रह्मास्मी 
  • द्रष्टाच दृश्य आहे 

J krishnmurti म्हणतात,
  • observer is observed 
  • experience is experiencer.
  • Thiker is thought 
  • consciousness is content of consciousness.

या वाक्यांचा अपरोक्ष अर्थ real meditation मधे समजतो तेव्हा द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होवुन मग अद्वैत बुद्धीच्या म्हणजे choiceless awareness च्या विवेकाच्या प्रकाशात चारी अवस्थांचा अपरोक्ष निरास होवुन चारी अवस्था पलिकडील चार अवस्थाच्या निर्गुणाचा बोध निर्गुणाला होवुन अस्तित्व प्रक्रिया संपूर्ण समजुन नाम - रुप हा सर्प - रज्जुचा प्रकार असल्याचे उमजते. रज्जुच्या अज्ञानात सर्पाचा भास रज्जुवर प्रकटतो तसा चारी अवस्था व त्यांचे अधीष्ठानाचा अज्ञानात त्या चारी अवस्थावर, चारी अवस्थांच्य्या अज्ञानात अहम चा भास प्रकटतो जो रज्जुवरील सर्पाप्रमाणे nonexising असा भ्रम असतो. जसा अज्ञानी बालकासाठी fantom तसा अज्ञानी मनासाठी अहम असतो. दोरी कळली की जशी सर्प आपोआप मावळतो तसा ego मावळुन त्या ego च्या मावळण्यात निर्गुणाचा बोध निर्गुणाला होणे म्हणजे अहम ला आपले Nothingness स्वरुपाचा बोध होणे मोक्ष होय मग मी व माझे ही कल्पना पुर्णपणे मावळुन जाते मग तेथे माउली म्हणते,

मी माझी आठवण,
विसरले जयाचे अंतकरण,
तया संन्यासी जाण,
अर्जुना तु ll......( ज्ञानेश्वरी )

अजुन जास्त काय सांगु.

असा निर्गुणाचा बोध झाला की 
अशी अपरोक्षपणे 
self ची पुर्ण प्रक्रिया self ला समजणे हेच self knowledge होय.

- श्री विजय पांढरे, 9822992578, vbpandhare@gmail.com