Tuesday, March 02, 2021

मनाच्या अवस्था ते निर्मन अवस्था

https://krishnmurti.blogspot.com/2021/03/blog-post_2.html 

वरील भाषांतर केल्या नंतरचे विचार:

[3/2, 6:55 AM] Vitthal Sawant: एखादे मन देव, देश, धर्म, गुरु, ग्रंथ, संप्रदाय यांच्या भक्तीतून म्हणजे त्यांच्या संमोहन मधून रिकामे झाले की त्याला रिकामे मन म्हणतात. असे रिकामे मन नंतर द्रष्टा आणि दृश्य हे एक आहे हे समजू शकते. ते उलटे असू शकणार नाही असे मला वाटते.

जोपर्यंत एखाद्या मनाला आपणास सत्य का समजत नाही असा प्रश्न पडतो त्यावेळी त्याचे संस्कार आणि त्याची संस्कृती सत्याच्या आड येत आहे हे लक्षात येते तेव्हा तो त्या जीवनातून मुक्त होवू शकतो. 

विकृती नष्ट झाल्याशिवाय सत्य दर्शन असंभव आहे. द्रष्टा आणि दृष्य हे एक आहेत हे समजणे म्हणजे सत्य दर्शन आहे आणि ते आपण संस्कारांच्या विकृती मध्ये जीवन जगत असू तर ते समजणे अशक्य आहे.

[3/2, 7:30 AM] Vitthal Sawant: मन हे नेहमी मर्यादित असते त्याला अमर्याद व्हायचे असते.

मन मर्यादित असताना त्याला संसारातील सुखे आकर्षित करतात जसे की सेक्स, food, politics, music, dance, tours etc. यांना आपल्या शास्त्रांनी तुच्छ सूखे कल्पीली आहेत.

याउलट देव, देश, धर्म, गुरु, ग्रंथ, संप्रदाय यामध्ये मन अमर्याद होण्याचा प्रयत्न करते. यांना शास्त्रांनी उच्च स्थान दिले आहे त्यामुळे त्यांची भक्ती म्हणजेच मुक्ती असे समीकरण झाले आहे. 

परंतु मनाच्या हे लक्षात येतं नाही की त्याला सतत मनोरंजन हवे असते यासाठी हि तुच्छ सूखे आणि उच्च भक्ती निर्माण झाली आहेत. त्यामध्ये ते आकंठ बुडालेले असते. आणि मग ते सगळे उपभोगून नंतर शांतीच्या मागे लागते.

म्हणजे जोपर्यंत मन अपूर्ण असते तो पर्यंत मनाला मनोरंजन हवे असते तोपर्यंत ते सुख आणि भक्ती करीत राहते. आणि जेव्हा एखादे मन सर्व सुखांचा त्याग करायला तयार होते त्यावेळी ते अमर्याद INTELLIGENCE च्या कक्षेत येते आणि मग त्याचे सत्य जीवन सुरू होते.

[3/2, 8:00 AM] Vitthal Sawant: इथे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात की, 

हे नेमके घडते कसे?

जे मन सुखांच्या मागे सतत लागलेले असते ते मन सुखांचा त्याग का करेल?

INTELLIGENCE जे नेहमी अव्यक्त असते ते मनाला त्याची सूखे सोडण्यासाठी guide आणि force करू शकते काय?

की जे मन सांसारिक सूखे उपभोगून नंतर भक्ती करून थकले आहे ते आता शांत होवू इच्छित आहे, त्याला आता काही नको आहे, ते मन सहज अवस्थेत येत असावे काय?

सांगून कोणत्याही मनास समजत नाही. प्रत्येक मनाला जे हवे आहे तो ते मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असते. जेव्हा खरीखुरी शांती ही त्याची गरज निर्माण होईल तेव्हा त्याला ती प्राप्त होईल.

[3/2, 9:02 AM] Vitthal Sawant: *कर्म, भक्ती, ज्ञान, मुक्ती या चारही मनाच्या अवस्था असाव्यात?* 

जेव्हा मनास आत्यंतिक सुखाची अपेक्षा असते तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी *कर्म* आवश्यक असते.

कर्म आणि सुख लोलुपता यातून समाज विघातक वृत्ती येवू नये म्हणून देव, देश, धर्म यांची *भक्ती* ही मनाची अवस्था येत असावी. 

सुखलोलुप आणि भक्तीपेक्षा जीवनाचे सत्य शोधणे श्रेष्ठ आहे यासाठी *ज्ञानप्राप्ती* करून घेणे अपरिहार्य होते. 

सुख, भक्ती आणि ज्ञान या सर्व मनाच्या अवस्था होत याची जाणीव मनास होणे म्हणजे त्या सर्वानपासून *मुक्तता* होय. 

मर्यादित मन आणि अमर्यादित INTELLIGENCE या दोन्ही मधील सीमारेषा म्हणजे मनाची ही मुक्तवस्था असणार. या सिमारेशेचया आतील जगा विषयी मन सजग असू शकते परंतु त्या सीमा रेषेच्या पलिकडील अवस्था ही मनाची नसते म्हणून ते मनाला जाणता येत नाही.

[3/2, 9:23 AM] Vitthal Sawant: मर्यादित मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांच्या पलीकडे अमर्याद अवस्था असावी असे भासते परंतु हि अमर्याद अवस्थाच फक्त अस्तित्वात असते. 

अमर्याद अवस्थेवर मनाच्या अवस्थांचे ढग आलेले असतात. ढगांचा एकेक पुंजका नाहीसा होताच आकाश स्वच्छ, निरभ्र होते.

[3/2, 9:40 AM] Vitthal Sawant: संपूर्ण मानव समाज एकाचवेळी मनाच्या एकाच अवस्थे मध्ये अथवा मनाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये असू शकणार नाही. 

कोणी सुखलोलुप असू शकतो, कोणी भक्ती करीत असेल, कोणी ज्ञानी असेल आणि कोणी मुक्त असू शकतो.

जसे सुखलोलुप इतरांना नावे ठेवतो तसेच मुक्तजन सुद्धा इतरांना नावे ठेवतात, त्यांना अज्ञानी, विकृत समजतात वगैरे 😄😄😄