Saturday, July 18, 2020

ब्रम्ह जिज्ञासा

1) सर्वं खल्विदं ब्रह्म...... हे वेद वाक्य आहे. सर्वच ब्रह्म आहे. तर  मग  जगत  दिसूच नये.  नेह नानास्ति किंचन. आम्हाला नाना आकार दिसतात. हे कसे?  
2) तत्वमसि. ते तूं आहेस. असे वेद सांगतो. आम्हाला तसे न वाटता मी देह आहे असे वाटते.  
3) ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या...... आम्हाला जगत सत्य वाटते. ब्रह्म माहीतच नाही. मग जीवो ब्रह्मैव ना पर: हे कसे कळावे?

उत्तर: चार वेदांचे सार म्हणून प्रत्येक वेदांची प्रत्येकी एक अशी चार महावाक्ये आहेत. त्यावेळच्या साक्षात्कारी ऋषींचा तो साक्षात्कार असणार. साक्षात्कारी म्हणजे ज्यांचा वैयक्तिक *मी* हा वैश्विक *ब्रम्ह* झाला आहे असे योगी. असे conversion झाल्याशिवाय त्या अवस्थेची अनुभुती येणे शक्य नाही. ब्रम्ह अवस्थेला पोहोचलेला योगी सर्वत्र केवळ ब्रम्ह अनुभवतो. याचा अर्थ त्याला आसपासच्या व्यक्ती, चराचर दिसत नाही असे नाही परंतु ते सर्व ब्रम्ह आहे असे त्याला दिसते. पूर्वीच्या व नंतरच्या अनुभवात फक्त अनुभवणारा बदलतो. अनुभव तेच असतात फक्त अनुभवणारा *मी* ऐवजी *ब्रम्ह* झालेला असतो. 

आपल्या स्मृतीमध्ये साठलेल्या अनुभव, माहिती आदींचे गाठोडे म्हणजे *मी* आहे. गाठोड्या मधील चष्म्याची साथ घेवून गाठोड्या बाहेरील बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत म्हणून सत्य दिसत नाही.