Wednesday, February 07, 2018

संसारवृक्ष

श्री भगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् || भ गिता १५:१ ||

सर्वोत्तम ब्रम्ह ज्या वृक्षाचे मुळ आहे, ज्याच्या फांद्या खाली आहेत म्हणजे संसार निकृष्ट आहे परंतु तो कधिहि क्षय पावत नाहि अशा या वृक्षाचि पाने म्हणजे वेद आहेत म्हणजे निकृष्ट ज्ञान आहे. जो या संसारवृक्षास निट जाणतो तो खरा ब्रम्हज्ञानी होय. - #ज्ञानेश्वरी_१५:१ 

मागील अध्याया शेवटि भगवंतांनी असे सांगितले कि, ज्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाले आहे त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. हे ब्रम्हज्ञान प्राप्त होण्यासाठी व झालेले ब्रम्हज्ञान टिकण्यासाठि अंतःकरण शुध्द व पवित्र असले पाहिजे. अंतःकरण शुध्द होण्यासाठी विवेक व वैराग्याचि आवश्यकता असते. ज्याप्रमाणे अन्नामध्ये विष आहे हे समजताच आपण अन्न कितीहि चांगले असले तरी ते टाकुन देतो त्याप्रमाणे संसार हा मिथ्या आहे व ब्रम्हज्ञानासाठि अडथळा आहे हे समजल्या नंतर वैराग्य सहज प्राप्त होते. संसार हा अडथळा आहे हे समजविण्यासाठि भगवंतांनी ऊलट्या वृक्षाचि ऊपमा दिली आहे. संसाररूपि झाड ऊलटे केल्याशिवाय म्हणजे त्याचा बिमोड केल्याशिवाय त्याचे मुळ असणारे ब्रम्ह अनुभुतीमध्ये येत नाहि. ब्रम्ह हे सर्वत्र समान आहे परंतु संसाराच्या कल्पनेमुळे ते वर आहे असा भास निर्माण होतो. निर्गुण निराकार ब्रम्हास मायेच्या अज्ञानाचा विळखा पडतो. अज्ञान हे या संसारवृक्षाचे बिज आहे. गाढ झोपेचि सुषुप्ती हा बिजांकुर आहे, तर स्वप्नावस्था व जागृतअवस्था हि त्याचि फळे आहेत. महाभुते हि या वृक्षाच्या फांद्या आहेत. अंतःकरणाचे मन, बुध्दि हि या वृक्षाच्या डहाळ्या आहेत. ज्ञानेंद्रिये हि या वृक्षाचि पालवी होय. आठ अंगानी बहरलेला हा संसारवृक्ष ब्रम्हास पुर्ण झाकोळुन टाकतो. 

या संसारवृक्षास तो विचारांप्रमाणे सतत नाश पावत असतो म्हणुन अश्वत्थ म्हटलेे आहे तर दोन विचारांमधिल जागा स्मरणशक्ति भरून काढते व विचार अव्यय भासतात त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अव्यय आहे. केवळ ब्रम्ह सत्य आहे, जगत नित्य भासत असुनही ते अनित्य आहे, मिथ्या आहे हे जो जाणतो तो ब्रम्हज्ञानी होय. 

The Blessed Lord said They (the wise) speak of the indestructible peepul tree having its root above and branches below, whose leaves are the metres or hymns: he who knows it is a knower of the Vedas. - #Swami_Sivanand

श्रीभगवान् बोले --, ( यह संसाररूप वृक्ष ) ऊर्ध्वमूलवाला है। यह संसारवृक्ष अव्यय माना जाता है। ऋक् यजु और सामरूप वेद, जिस संसारवृक्षके पत्तोंकी भाँति रक्षा करनेवाले होनेसे पत्ते हैं। - #आदि_शंकराचार्य