Sunday, January 14, 2018

मकर संक्रांती

|| ईश्वरीय ज्ञान ||

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च || गिता १४:१७ ||

From Sattva arises knowledge, and greed from Rajas; heedlessness and delusion arise from Tamas, and also ignorance.

उत्कर्षको प्राप्त हुए सत्त्वगुणसे ज्ञान उत्पन्न होता है और रजोगुणसे लोभ उत्पन्न होता है तथा तमोगुणसे प्रमाद और मोह -- ये दोनों होते हैं और अज्ञान भी होता है।

ऊत्कर्ष पावलेल्या सत्वगुणापासुन ईश्वरीय ज्ञान ऊत्पन्न होते आणि रजोगुणापासुन लोभ ऊत्पन्न होतो तर तमोगुणापासुन प्रमाद, मोह व अज्ञान ऊत्पन्न होते.

अध्यात्मिक ज्ञानाचि आवड निर्माण होण्यास सत्वगुण आवश्यक असतो. सत्वगुणाचि वाढ होण्यापुर्वी आपल्या मधिल तामसिक अज्ञान व राजसीक लोभ कमी व्हायला हवा. तामसीकता व राजसीकता हे दोन्हि ईश्वरीय ज्ञानास प्रतिबंध करतात तर सत्वगुण हा ईश्वरीय ज्ञान प्राप्तिसाठि सहाय्यभुत ठरतो. जे काहि प्राप्त करावयाचे ते आपणामध्येच आहे परंतु काहि गोष्टि ते समजण्यास सहाय्यभुत ठरतात तर काहि गोष्टि ते समजण्यास अडथळा ठरतात.

तिळामधिल तामसीकता व गुळामधिल राजसीकता एकत्र करून सात्विकतेच्या गोडव्याने आपण नविन ऊत्तरायणाच्या ज्ञान मार्गाने आपल्यावरील आलेली अज्ञानाचि संक्रांत दुर सारण्यासाठि जिवनमुक्तीचा ध्यास धरूया.